युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

शंकरपाळे खाताना चुरोज प्रतिसाद वाचला. Lol आता डुलसे-डे-लेच्चे किंवा त्याचा जो काय उच्च्चार असेल... त्याला कसं रिप्लेस करू? मला शंकरपाळे त्यात बुडवुन खायचेत आता. Lol

3 & 1/4 cups आईस्क्रिम आणि 4 & 1/3 cups मिल्क पावडर (फुल फॅट)
यामधे तो बेकिंगचा लहान चौकोनी ट्रे भरून साधारण २५-३० बर्फ्या झाल्या. यात बिघडण्याचे काही चान्सेस नसावे आणि आईस्क्रिम मधे दुध, साखर, क्रिम सगळंच असल्याने काही वेगळं घालायची गरज नाही. कुठलाही फ्लेवर आईस्किर्म घ्या आणि बर्फ्या पाडा Proud

सर्वांना धन्यवाद. खूप छान आयडियाज मिळाल्या.
अंजली खरंच छान सोप्पी रेसिपी आहे नक्की ट्राय करीन, मनापासून धन्यवाद.

अंजली यांची रेसिपी भन्नाट आहे. सेव्ह करून ठेवलेय ती लिंक. फक्त भारतात ती कॅरी करताना वितळेल का काय असे वाटते. घरी खायला मस्त.

मिक्सर चांगला असेल तर तो चटणी हवी असतानाही पेस्ट करून देईल. मला सोलापुरी पिनट बटर बनवायचं आहे एकदा. शेंगदाणे+ भरपूर लसूण+जिरे+ भरपूर तिखट +मीठ+ तेल आणि नेहमीपेक्षा जास्त घूर्र .

काल आमच्या ऑफिस मधील potluck पार पडले. शेवटी युट्युब वरील ही रेसिपी फॉलो केली. सर्वांना खूपच आवडले. यामध्ये कस्टर्डच्या ऐवजी रबडी घातली होती. सर्वांना तुमच्या सजेशन साठी धन्यवाद.
https://www.youtube.com/watch?v=9lUoLBKKK5k

कोत बो कोतबो फीलिन्ग.

इथे फार विचारले पीनट बटर काय करावे. मग चटणी करुन बघितली पण काही चव जमली नाही. बाटली बाजुला ठेवली. पेनिसिलिनचा शोध लावायला. आता लेक दिवाळीत आली एव्ढेच नव्हे माझ्याबरोबर पुजा साहित्य घ्यायला मार्केटात पण आली. आता इतके केल्यावर बास्केट घेउन शॉपिन्ग करत होती तर परत रोल्ड ओट् चे पाकीट , हर्शीचे चॉकोलेट पाव् डर चा डब्बा, व पीनट बटर!!! मी हळूच छोटी बाटली घे म्हटले.
मग रोल्ड ऑट्स ब्रेफा करु का असे नेक्स्ट डे विचारले तर ते आदल्या रात्री भिजवावे लागतात म्हणे. तर ते आता सर्व माल पडून आहे.
दिवाळी स्पिरीट!! गरम मसाला मधल्या परेश रावळ सारखे वाटते आहे. आता ती शनिवारी रविवारी येते म्हणते आहे तर शुक्रवारी रोल्ड ऑट्स भिजत घालू का? बहुतेक स्मूदी होईल.. ग
मुलांनी घरी मायक्रो गटग केले नॉट बिग पार्टी तर मला घरी दूध आहे का विचारले. मजकडे दूध नसतेच कधी. मग मी पातेले धुवुन थोडे पाणी घालुन ठेवले. दूध मागवा व गरम करा म्हणून.

तर माचा लाटे बनवायला लॅक्टोज फ्री मिल्क दोन मागवले. त्यातले एक पडून आहे. थोडे माचा पावडर पाकीटनीट बंद करुन ठेवले आहे. ह्यात बर्फ घालुन प्याय्चे म्हणे. मी होते ते चार मग धुवुन पुसून ठेवले बापडीने. और क्या करते.

>>माचा लाटे गार मामला आहे.>>
अमा, गरम पण चांगला लागतो. माचा पावडरच्या दुप्पट गरम पाणी वापरायचे आणि मस्त घोटून घ्यायचे. आयकियाचे फ्रॉदर आहे ते स्वस्त आणि मस्त आहे दुधाला फेस आणायला.

जिऱ्यांबरोबर कढईत भाजून पावडर करून ठेवता येईल आणि सगळ्या भाज्यांमध्ये आणि आमटीमध्ये घालता येईल. छान चव येते भाज्यांना

लसणीच तिखट, सुक्या खोबऱ्याच्या करंज्या, डिंक मेथीचे लाडू एवढं लगेच सुचलं.
फ्रीज मध्ये जागा असेल तर वाट्या ठेवा नसेल तर किसून ठेवा . खुप दिवस टिकेल. जसं लागेल तर वापरता येईल, संपवण्याची गरज पडणार नाही.

Suke खोबरे कातळ्या करून मिक्समधून काढून छोट्या पाउच किंवा डब्यात भरून ठेवा.मी असे खोबरे भाजून फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये जागा असेल तर नारळाच्या कवड्या पिशवीत घालून ठेवा.

आमच्या कडे सुके खोबरे शक्यतो चटणीत, बाकर करून ठेवणे इ. संपते. कालसुद्धा मोठ्या मार्केट मध्ये मात्र १३०/- ला किलोभर सुक्या खोबर्‍याचे डोल मिळालेत अन मी ते नेहेमीच्या इम्पल्स मोडात घेतलेत पुन्हा! असो. पण मागच्या वेळच्या अनुभवानुसार हवाबंद डब्यात प्लॅस्टिक मध्ये बंद करून ठेवलेले डोल (सबंध खोबरे, क्रॅक गेलेले किंवा वाट्या नाही) छान टिकलेत.
गरजेनुसार एक डोल काढून वापरायचो आम्ही; त्यातून उरलेला मात्र फ्रिजात.

सुके खोब रे हाय झाले तर त्याला वेगळा वास येतो.

केक रोल किंवा केक करुन त्यात मध्ये व वरुन स्ट्रोबेरी जॅम किंवा मिक्स फ्रुट जाम लावायचा व वरुन किसलेले सुके खोबरे भुरभुरायचे. फार यम्मी लाग ते. माझ्या लहान पणी प्रभात रोडच्या सुरुवातीला, दर्शनच्या आधी बहुतेक एक रीगल बेकरी होती तिथून बाबा आणत असत. ३० पैसे ची पेस्ट्री.

Pages