Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अमितव
(No subject)
शॉपिंग, लिस्ट वगैरे म्हटल्यावर मला माझं हे जुनं चित्र आठवलं :

नवरा दूध आणायला जातो VS मी दूध आणायला जाते
आमच्याकडे दोन व्यक्तींच्या
आमच्याकडे दोन व्यक्तींच्या जीवनात जेवढे पदार्थ एक्सपायरी (फक्त पाकिटावरील तारीख पाहुन नव्हे, तर प्रत्यक्षात तो पदार्थ खरंच आता वापरण्याजोगा नाही याची खात्री करून) झाल्यामुळे आणि शिजवलेले पदार्थ उरले आहेत तर 'दोन वॉच कुटुंबांना देण्याची मोफत सोय असूनही' फ्रीजमध्ये विसरून नासल्यामुळे वाया जातात, त्यात अजून दोन लोक सहज स्वतःचे पोट भरून, एखाद्या गरजु व्यक्ती/प्राण्याला अधुन मधून खाऊ घालण्याचे पुण्य पदारात जमा करू शकतील.
मैत्रेयी कॉस्ट्को आहे का हे??
मैत्रेयी कॉस्ट्को आहे का हे??
(सगळीकडे हीच गत असते म्हणा)
छे, फ्री गोल्ड चा ही मोह झाला नाही त्याला
हाहाहा भारीच. किती मस्त
हाहाहा भारीच. किती मस्त डीटेलिंग.
खूपच मस्त इमॅजिनेशन, मैत्रेयी
खूपच मस्त इमॅजिनेशन, मैत्रेयी!!

किंवा मेन्यू बदलतो.>> भारीच
किंवा मेन्यू बदलतो.>> भारीच आहे हे. एकूणच प्रतिसाद
मुला मुलींनो एक लवकर मदत करा.
मुला मुलींनो एक लवकर मदत करा. शंकरपाळी करताना मैदा समजून तांदळाचे पीठ भिजवले. बराच वेळ झाला एकजीव का होईना म्हणून विचार करता करता नंतर चाखून पाहिलं तर तांदळाचे पीठ होतं. त्याचं काय करता येईल लवकर सांगा.
देवकी,https://www.youtube.com
देवकी,
https://www.youtube.com/watch?v=BMfRLzTpwH8
हे तांदळाच्या पिठाचे शंकरपाळे एअरफ्रायरमधले. मला वाटते असेच तळूनही करता येतील.
मै, भारी चित्र! आमच्या कडे
मै, भारी चित्र! आमच्या कडे अगदी उलट परीस्थिती आहे नवरा vs मी.
आमच्याकडे अॅप वगैरे नाही. दोन मास्टर लिस्ट्स, एक देशी/ इंटरनॅशनल आणि एक अमेरीकन, या रेफरन्ससाठी. बहुतेक गोष्टींबाबत एक वापरात आणि कमित कमी एक स्टॉकमधे असे असते. लवकरच स्टॉकमधले वापरायला घ्यावे लागेल अशा स्टेजला यादीत नोंद होते. तसेही घरात दोनच माणसे, आलटून पालटून नोंद करत रहातो. काही गोष्टी या पॅन्ट्री स्टॉक अप कॅटेगरीत आहेत. त्या सेल नुसार, सिझननुसार स्टॉकअप केल्या जातातच. बाकी पेरीशेबलची यादी फ्रीजवर. जे आणले त्यावर आठवड्याचा फ्लेक्झिबल मेनू असतो. त्यातून एखादे फळ/भाजी. दही-दूध वगैरे फुकट जाईल वाटल्यास योग्य प्रेप करुन फ्रिजरला.
स्वाती 2,एअर फ्रायर नाही.पण
स्वाती 2,एअर फ्रायर नाही.पण मावेत/कढईत होते का बघते. धन्यवाद!
पण मावेत/कढईत होते का बघते.
पण मावेत/कढईत होते का बघते. धन्यवाद. >> मावे मध्ये कन्वेक्शन मोड / ओव्हन मोड असेल तर होईल. तेच तापमान ठेवा. वेळ जरा जास्त लागेल एअर फ्रायर पेक्षा.
Finally तांदळाच्या पिठाचे
Finally तांदळाच्या पिठाचे बारीक बारीक वडेच करण्यात आले.बिचाऱ्या स्वातीने व्हिडीओ पाठवला.पण शंकरपाळे करण्यासाठी तूप जास्त होतेच.त्यामुळे पिठाचा गोळाच बनत नव्हता.2 शंकरपाळी करून पाहिली.मावेत बेक करायचा प्रयत्न केला.पण अयशस्वी झाल्याने सरळ छोटेसे गोळे करून दाबून तळून काढले.चांगले नाही लागत पण वाईटही नाहीत.
अल्पना,मावेत करण्याइतका पेशन्स नव्हता म्हणून तळून काढले.
Hi majhi ek recipe aahe.
Hi majhi ek recipe aahe. Lekhan madhe. Tandulacha tihkat padarth..
हेवी व्हिपिंग क्रीम शिल्लक
हेवी व्हिपिंग क्रीम शिल्लक आहे . काय काय बनवता येईल ?
किती क्रिम उरले आहे? सोपा
किती क्रिम उरले आहे? सोपा प्रकार म्हणजे आईस क्यूब ट्रे मधे घालून फ्रीज करणे आणि ते क्यूब्ज सॉस (पॅन सॉस/ पास्ता सॉस) , सूप, ब्रेकफास्ट कॅसेरोल वगैरे करताना वापरणे. बर्याचदा पाकृत अगदी थोड्या प्रमाणात विपिंग क्रिम वापरायचे असते तेव्हा हे क्यूब्ज उपयोगी पडतात. उत्साह असेल आणि अर्धा कप ते एक कप हेवी विपिंग क्रिम असेल सॉल्टेड कॅरॅमल सॉस करुन ठेवता येइल.
पेरू भाजून खाण्याची पद्धत
पेरू भाजून खाण्याची पद्धत कुणी सांगू शकेल का?
( या धाग्यावर चालेल ना हा प्रश्न?)
>>पेरू भाजून खाण्याची पद्धत
>>पेरू भाजून खाण्याची पद्धत कुणी सांगू शकेल का?>> भाजत बसण्याएवढा धीर कसा धरवतो म्हणते मी! असो .
पेरु कापून अर्धे तुकडे ओवन मधे बेक करता येतील पण जास्त पेरु असल्यासच हे बरे पडते असेच ग्रील वर भाजता येइल. वर थोडे बटर टाकावे लागेल. सफरचंद बेक करतो तसे. देशात बेक करता येइल असा मावे असतो ना त्यातही जमावे.
एक-दोन पेरुंसाठी चिमट्यात पकडून गॅसवर भरीताचे वांगे भाजतो तसे ट्राय करु शकता - मी केले नाहीये.
पेरू उकडून चांगला लागेल/
पेरू उकडून चांगला लागेल/ लागतो का?
मी एकदा उत्साहात माबोवरची शिजवून पेरुची चटणी/ लोणचं केलं पण नाही आवडली ती चव. अगदी सोन्यासारखा पेरू फुकट दवडल्याचं फीलिंग आलं.
रुचिरामध्ये -पेरूचा कायरस
रुचिरा -पेरूचा कायरस - पेरूच्या फोडी शिजवायच्या .
माहेरी पेरुचे झाड होते. खूप
माहेरी पेरुचे झाड होते. खूप पेरु, गल्लीत सगळ्यांना वाटूनही उरायचे. आई पेरुच्या फोडी घालून सुधारस असतो तसे करायची, पोळीसोबत खायला. खूप खास लागत नसे पण नावडती भाजी खाण्यापेक्षा बरे म्हणायचो.
छान लागततो पेरूचा मेथांबा
छान लागततो पेरूचा मेथांबा/मेपेरू त्यासाठी पेरू चवदार व खूप पिकलेला असावा. Costco चे छोटे छोटे पेरू पिवळे झालेत पण साशंक आहे तरी करून बघीन. गूळ भरपूर घालावा लागतो...
विकतचे मेथीचे ठेपले शिळे झाले तरी तुकडे पडत नाही त्यासाठी काय घालतात?
मेथीचे ठेपले शिळे झाले तरी
मेथीचे ठेपले शिळे झाले तरी तुकडे पडत नाही त्यासाठी काय घालतात?
दही + अधिकचे मोहन
पेरूचे पंचामृत देखील छान
पेरूचे पंचामृत देखील छान लागते
भाजत बसण्याएवढा धीर >>
भाजत बसण्याएवढा धीर >>
एक-दोन पेरुंसाठी चिमट्यात पकडून गॅसवर भरीताचे वांगे भाजतो तसे ट्राय करु शकता >> थँक्स.
पेरू उकडून मग तो गर वाटून,
पेरू उकडून मग तो गर वाटून, गाळून त्यात साखर टाकून आटवायचा त्यात वेलचीपूड टाका. थोडे तूप, बटर टाकून गोळा सुटू लागला की थापा. गार झाला की वड्या थापा.
सोन्यासारखा पेरू फुकट
सोन्यासारखा पेरू फुकट दवडल्याचं फीलिंग आलं...... अगदी.
माझ्या मैत्रिणीने पेरूचे लोणचे की काय ते आणले होते.डबा उघडल्यावर भयाण वास आला होता. सॉरी पण रहावले नाही.
भाजत बसण्याएवढा धीर....... +१.
थँक्स ऋतुराज.
थँक्स ऋतुराज.
आम्ही हिवाळ्यात जास्त थंडी पडल्यावर पेरू आणत नाही. हिवाळ्यात पेरू भाजून खायचा असतो हे माहिती नव्हतं.
पेरू भाजून खातात हेच माहिती
पेरू भाजून खातात हेच माहिती नव्हतं.
छान पिकलेल्या पेरूचे फोडणीला लाल मिरची आणि मेथी घालून केलेलं लोणचे आवडतं. गुळ लागतोच त्यात.
पेरू जास्त पिकले की संपवायला
पेरू जास्त पिकले की संपवायला मी ताजं लोणचं /कोशिंबीर करते. पेरू बारीक चिरून मीठ, साखर, गार फोडणी आणि कैरी लोणच्याचा मसाला घालून कालवायचं. लगेच खायला घ्यायचं.
Pages