युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

अरे वा किती प्रतिसाद. धन्यवाद. कुकीज बनवायला घरी अव्हन नाही. टिकते ना पीनट बटर मग काय काय करून संपवीन इथे मुंबईत माण सांना पण बुरशी लागते. त्यामुळे वाया जायला नको म्हणून विचारले. उद्या डोसे बेत आहे. तेव्हा चटणी करीन व दाण्याची आमटी पण करीन. साखि खाणे बंद आहे. ब्रेड पण घरी फार नसतो पण आणून अडी नडीस सँडविच बनवून खाता येइल. मै वो बडा बाटल खतम करकेइच रहेंगा.

हिरव्या टमाटो ची चटणी अफलातून लागते. आंध्रा पद्धतीची करून गरमागरम वा फाळत्या भाता बरुबर जबरी लागते. राइस प्लेट रेड्डी मोड ऑफ.

आमचे टिकटॉकर सांगतात की केळ्याच्या जवळ ठेवा, की पिकतात. >>>>> मज्जा आहे, कारण आमचे टिकटॉकर म्हणाले avocado पिकलेल्या टोमॅटो बरोबर ठेवले तर छान आणि लवकर पिकतात. म्हणजे avocado पिकायला टोमॅटो आणि टोमॅटो पिकवायला केळी आणायला हवीत.

पिनट बटर फ्रीजमध्ये टिकेल. मी नवऱ्याला आवडेल म्हणून आणलं तर शेंगदाणे आवडणाऱ्या त्याला काही फार आवडलं नाही म्हणून मी ज्या रस्सा भाज्या दाण्याचं कूट घालून करते त्यात, त्याऐवजी घातलं, तसं आवडलं आम्हा दोघांना. असं घालून संपवले एकदाचं. मी तशी लहान बाटली आणलेली पण आता कानाला खडा, परत ते आणणार नाही.

हिरव्या टोमॅटो चटणी ची रेसिपी छान आहे सगळ्यांची...लिंबू ची addition नवीन आहे..
लगेहात दोडक्याच्या शिरांची चटणी रेसिपी पण द्या कुणीतरी.

दोडक्याच्या म्हणजे शिराळ्याच्या शिरा लांब लांब असतील तर अंदाजे अर्धा बोट लांबीचे तुकडे करायचे. तेलात जिर मोहरी हिंग , मिरच्यांचे तुकडे , थोड तिखट, हळद घालून फोडणी करायची, नंतर त्यात दोडक्याच्या शिरांचे तुकडे घालून मंद गॅस वर पररत राहायचं. साधारण कोरड्या झाल्या की तीळ आणि सुक्या खोबऱ्याचा कीस घालून पुन्हा परतायचं. मीठ साखर घालायची. एकदम कुरकुरीत झाल्या शिरा आणि खोबर, तीळ की झाली चटणी. ही चटणी आम्ही वाटत नाही.

अशीच सेम टू सेम लाल भोपळ्याच्या सालींची ही करतो फक्त भोपळा लाल भोपळ्याची सालं किसून घेतो भोपळा चिरायच्या आधी. ती पण अप्रतिम लागते.

हेमाताईंनी लिहीलं साधारण तशाच प्रकारे करते मी, दुधीच्या सालीचीही करते फक्त साली बारीक चिरुन घेते, किसत नाही. तीळ फोडणीतच घालते, आलं तुकडे, दाणेही घालते मिरच्यांबरोबर, कढीलिंबही घालते. पडवळ बिया, फ्लॉवरचे कोवळे दांडेही सेम प्रकारे करते. मीही वाटत नाही, आई वाटायची हे सर्व.

मी दोडका,दुधाची सालं किसून काढते एक दिवस सुकू देते दुसऱ्या दिवशी ममोने लिहलंय तशी कुरकुरीत चटणी करते वाटत नाही . आमटी भात ,खिचडी बरोबर छान लागते.

अमा, डोश्याला पिनट बटर लावुन,वरतुन दोन चिमुट लाल तिखट नाहीतर मसालाभुरभुरते मी. रोल करुन ऑफिसात ब्रेकफास्ट.

ऑफिसमध्ये दिवाळीचे Potluck आहे. ९०% गोरे आहेत. मी डेझर्ट साठी साइन अप केले आहे. त्यांना आवडणारे भारतीय गोड पदार्थ कोणते असू शकतात जरा थोड्या आयडिया मिळाल्या तर बरं होईल. धन्यवाद.

आईस्क्रीम मिठाई
वॅनिला आईस्क्रीम सेमी पातळ करून घ्या. त्यात पाक काढलेले आणि अर्धे केलेले रसगुल्ले घाला. थोडं मसाला दूध (केशर वेलचीचा स्वाद असलेलं) आणि ड्राय फ्रुटस घाला. आईस्क्रिम घाला. परत दुसरा लेअर. आणि फ्रीजरला सेट करा. परत घट्ट झाल कि सर्व करा.
सोपी रेसिपी आहे. खूप लोक आहेत म्हणुन सजेस्ट केली.

आमच्या एका गोर्‍या सहकर्मचार्याला चक्क शेवयाची खीर आवडली होती.. नेहमीपेक्षा कमी गोड, बदाम काजूची पूड ( तुकडे नव्हते घातले) जायफळ घालून.. गार गरम कशीही छान लागते. वर केशराची काडीची सजावट..

धन्यवाद आभा आणि धनवंती. चांगले ऑप्शन्स वाटताहेत हे. रिकोटा चीजची बर्फी सुद्धा डोक्यात होती. त्यांना काही पदार्थ खूप गोड वाटतात कदाचित, म्हणजे गुलाबजाम वगैरे.

मलाई बर्फी, काकडी वगैरे मिळत असेल तर सांदण, वेगवेगळ्या शेप्सचे घारगे, हौस आणि वेळ असेल तर चिरोटे किंवा गुजिया (दिवाळीसाठी योग्य) - म्हणजे फिंगर फूड होईल. गोडी कमी ठेवता येते. नेणे सोपे व सांडलवंड नाही.

हो माझे मन, यावरून आठवले, मस्त तुपातले कमी गोड शंकरपाळे केल्यास चुरोज सारखे लोकांना देता येतील थोडे.किंवा एका मोठ्या बाउल मध्ये ठेवून त्यांना मोठ्या चमच्याने वाढून घेता येतील.
गुळाचा शिरा/नाचणी चे कमी गोड तुपातले लाडू पण आठवले. रम बॉल्स सारखे प्रसादाच्या कपात छोटे छोटे घालून.(हे लाडू चॅलेंजड मी म्हणतेय.याला म्हणतात आयजीच्या जीवावर...इत्यादी.)

मस्त तुपातले कमी गोड शंकरपाळे केल्यास चुरोज सारखे लोकांना देता येतील थोडे. >>> १००+

गोरे परदेशी चहा कॉफी कमी गोड घेत असतील पण त्यांचे केक, चॉकलेट डोनट हे प्रकार अगदी आपल्या सारखे व्यवस्थित गोड असतात . मग सगळे कमी गोड करा असं का सांगत आहेत ?

त्यांच्याशी तुलना म्हणून नव्हे, एकंदरच कमी गोडाची(डार्क चॉकलेट इत्यादी) टेस्ट डेव्हलप झालीय म्हणून.ज्यांना गोड आवडत असतील त्यांनी गोड करावे.

गोरे जरी तिथले गोड पदार्थ खात असले तरी त्यांना भारतीय गोड हे जास्त गोड वाटतं. आणि vice-a-versa.
जिभेला असलेल्या सवयी, बाकी काही नाही.
श्रीखंड विशेषतः आम्रखंड generally आवडतं. hung curd असल्याने जास्त healthy वाटतं.
सुका मेवा घातलेली शेवयाची खीरपण नेहमी नावाजली जाते.
पण ऑफिसमध्ये कोणाला nut किंवा lactose allergy नाही ना?
vegan असेल तर बिनदुधाचे गोङ पदार्थ खूपच कमी आहेत.

माझा ग्रूप सगळा टिपीकल मिडवेस्ट मधले गोरे , मी एकटी देशी असा आहे. त्यांना गाजर हलवा, सुजी मँगो केक, नानकटाई हे प्रकार आवडतात. गेल्या वर्षी थॅंक्सगिविंग पॉटलकला आयपीतला गाजरहलवा नेला होता. आयपीत होणारी सोपी पाकृ म्हणून बर्‍याच जणांनी रेसीपीही मागितली होती. ममोंची खोबर्‍याची बर्फी देखील आवडेल.

कालच लेकीने इन्स्टावर बघून अशी आईस्क्रिम बर्फी बनवली. वाडीलालचं रोज फ्लेवर आईस्क्रिम आणि मावा/मिल्क पावडर. फार भारी लागतेय. अशी पण पॉटलकला न्यायला चांगली वाटेल.

https://www.instagram.com/reel/Cy5wDE6sXZZ/

https://www.instagram.com/reel/CzA6hmUMcIL/

Pages