Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुक्या खोबर्याची चटणी बनवून
सुक्या खोबर्याची चटणी बनवून बघा.
एक पीनट बटर चा मोठा डब्बा आहे तो कसा संपवावा? पी बी जे सेंडविच कसे बनवायचे? बाकी काय काय करता येइल दाण्याची आमटी?
ब्रेडच्या एका बाजूला पिनट बटर
ब्रेडच्या एका बाजूला पिनट बटर दुसऱ्या बाजूला जॅम सदृश जे काय घरात असेल ते चोपडायचे. स्वर्गसुख.
सफरचंदाच्या फोडी पिनट बटर मध्ये बुडवून बारक्या आवडीने खातो. नुसतं चमचा चमचा खायला ही मस्त लागतं. स्प्रिंग रोल्स बरोबर थाय डीप मध्ये पण आवडतं.
कधी देसी पदार्थात वापरलं नाही पण साखि मध्ये चांगलं लागेल वाटतं.
अमा, पिनट बटर घालून स्टर
अमा, पिनट बटर घालून स्टर फ्राय सॉस छान होते.
१ टे स्पून सोया सॉस, १ टी स्पून हॉट सॉस, आवडीनुसार लिंबू रस/विनेगर, हवे असल्यास १/२ टी स्पून मध्/साखर, १ टी स्पून आलं-लसुण पेस्ट, ३ टे स्पून पिनट बटर, पाव कप कोमट पाणी /स्टॉक सगळे एकत्र मिक्स करुन घ्यायचे. असेच थाई करी पेस्ट ,फिश सॉस आणि पिनट बटर वाले सॉसही छान होते.
त्या सोबत शिजवलेली होल विट स्पॅघेटी ,भरपूर भाज्या + गरज असल्यास थोडे प्रोटीन(चिकन्/टोफू)
क्रॅकर्सवर किंवा ब्रेडवर
क्रॅकर्सवर किंवा ब्रेडवर पिबटर लावून त्यावर केळ्याची/सफरचंदाची स्लाईस छान लागते.
भिजवलेल्या रोल्ड ओट्स मधेही पिनट बटर घालता येते.
अरे हो! ओट्स + पीबी लाडात
अरे हो! ओट्स + पीबी लाडात आलात तर चॉकेलेट चिप्स अशा कुकीज रोज नव्याने मॉर्निंग शो नामक कार्यक्रमांत काहीतरी भारी सापडलं असे अविर्भाव करुन दाखवत असतात. कधी केल्या नाहीत. तुम्ही करा आणि सांगा.
>> कधी देसी पदार्थात वापरलं
>> कधी देसी पदार्थात वापरलं नाही पण साखि मध्ये चांगलं लागेल वाटतं.>> नाही वाटत. साखिमध्ये आपलं दाण्याचं कूट कोरडं असतं. पिनट बटरने गिचका होईल.
अमा, किती क्वांटिटी आहे माहित नाही पण सफरचंदांच्या फोडींबरोबर मस्त लागतं.
दाण्याच्या कुटा ऐवजी नाही,
दाण्याच्या कुटा ऐवजी नाही, तेल/ तुपाऐवजी - किंवा बरोबर पिनट बटर असं डोक्यात होतं. ते वितळून सगळीकडे पसरेल ना? का गिचका होईल?
साध्या होलव्हीट कणकेत पिनट
साध्या होलव्हीट कणकेत पिनट बटर घालून मळून गोड दशम्या करता येतील.(कणकेत काहीही ढकलता येतं अशी माझी श्रद्धा आहे.)
पुरण पोळी सारखी पी ब पोळी
पुरण पोळी सारखी पी ब पोळी बनवा. युट्यूब वर रेसिप्या आहेत
>> दाण्याच्या कुटा ऐवजी नाही,
>> दाण्याच्या कुटा ऐवजी नाही, तेल/ तुपाऐवजी - किंवा बरोबर पिनट बटर असं डोक्यात होतं. ते वितळून सगळीकडे पसरेल ना? का गिचका होईल?>> कल्पना नाही पण पिनट बटर खिचडीला सूट होईल कोणत्याही रुपात असं वाटत नाही.
3 ingredient peanut butter
3 ingredient peanut butter cookies
सोपी, झटपट, फेलप्रूफ आणि टेस्टी रेसिपी.
पोळीवर पीनट बटर पसरायचे सढळ
पोळीवर पीनट बटर पसरायचे सढळ हाताने. केळ्याच्या पातळसर चकत्या कापून पसरायच्या. वरून मध किंवा काकवी शिंपडून गुंडाळी करायची . हात तोंड चिकट होतील याची चिंता न करता हाणायची गुंडाळी
मी नेहमी वापरते पीनट बटर
मी नेहमी वापरते पीनट बटर देशी पदार्थात. साखि मधे कुटासोबत अॅडिशनल फ्लेवर म्हणून वापरले आहे. (कधी कूट कमी पडले म्हणून) गिचका नाही होत. वांग्याच्या भाजी/ तत्सम रश्श्यात इवन कोशिंबिरीत पण बर्याच वेळा घातलेले आहे कूट तयार नसेल तेव्हा. इन्स्टन्ट ओटमील करताना त्यात पीनट बटर + हनी किंवा मेपल सिरप + कोणतीही फळे हे काँबो मस्त लागते. अॅपल स्लाइसेस सोबत नुसते पी. ब. मस्तच लागते. हेल्दी स्नॅक.
माउईसाठी होममेड ट्रीट्स पण फार मस्त होतात पीनट बटर+ बनाना+ एग+ व्हीट फ्लार घालून. रेसिपी नेट वर सापडेल.
मेधा +१ तूप साखर पोळीचा
मेधा +१ तूप साखर पोळीचा विदेशी अवतार पीबीजे (पोळी) आहे. काहीही नसलं की तो घरदार आनंदाने खातं.
शेंगदाणे जात्याच खमंग/nutty
शेंगदाणे जात्याच खमंग/nutty आहेत, त्यामुळे गोडाशी तितकी मैत्री होत नाही त्यांची, चिक्की सोडून. तेच काजू हा त्यांचा श्रीमंत भाऊ कमी nutty असल्याने त्याची चांगली 'कतली' होते. हे माझं मत आहे, तुम्ही घाला काय घालायचं ते.
पिनट बटर कितीही दिवस टिकते, त्यामुळे काय गडबड आहे संपवायची. ज्या पनीरच्या भाज्यांमध्ये काजूपेस्ट लागते त्यात कधीकधी मी पिनट बटर लोटते. पिनट बटरच्या कुकीजही होतात. कुत्र्याला स्नान घालताना तो पळून जाऊ नये म्हणून एक suction cup -lick mat मिळते त्याला चोपडून बाथरूमच्या भिंतीवर चिकटवते. काल कियारा अडवाणीची इन्स्टा पोस्ट बघितली, ती सफरचंदाच्या चकत्यावर पिनट बटर पसरवून रोज तीन वाजून चोवीस मिनिटाला खाते म्हणे, तिचं इतकं आवडतं स्नॅक आहे की ती 3:24 ची आतुरतेने वाट बघते म्हणे. किती स्पेसिफिक ते
साखिसाठी सायोला अनुमोदन. बिग नो नो. सा खि is all about texture. साबुदाणा वड्यात कदाचित चालेल.
ज्या (कोरड्या ) भाज्यांमध्ये दाण्याचे कूट घालतो त्यात घालता येईल. भेंडी व फुलकोबीत जमेल असं वाटतंय. यूट्यूबवर मिल्क शेकमधेही घातलेलं बघितलं आहे.
मैत्रेयी, शोधते ती डॉग ट्रीट रेसिपी.
साखिसाठी सायोला अनुमोदन. बिग
साखिसाठी सायोला अनुमोदन. बिग नो नो. सा खि is all about texture. - माझे ही अनुमोदन.
Peanut butter oatmeal मध्ये छान लागते. , Protein बॉल रेसीपी मध्ये (शेंगदाणा लाडू सारखे ) वापर करा. सफरचंद, केळे आणि ह्याची जोडी मस्त. एक thai salad dressing आहे जे मी बरणी संपत आली की त्यातच सोय सॉस, व्हिनेगर घालून बनवते
बर, मला एक मदत हवी आहे. बागेतले हिरवे टोमॅटो संपवायचे आहेत हिवाळ्या आधी. कुणाकडे रेसीपी असतिल तर सांगा प्लीज
हिरव्या टोमॅटोची चटणी छान
हिरव्या टोमॅटोची चटणी छान होते. लसूण, हिरवी मिरची, मीठ, जिरे, शेंगदाणे, थोडी साखर घालून परतून मिक्सर मधून घूरकावून घ्यावे.
अस्मिता, परतून घ्यायचे का
अस्मिता, परतून घ्यायचे का टोमॅटो की कच्चेच?
परतून, जिऱ्याची फोडणी करून
परतून, जिऱ्याची फोडणी करून शेंगदाण्यासहीत सगळं परतून घेणे.
हिरवे टोमॅटो चटणी
हिरवे टोमॅटो चटणी
कढईत कढीपत्ता, तीळ, जिरे खमंग भाजा आणि बाजूला काढा.(तीळ उडतात.त्यासाठी थोडावेळ झाकण ठेवून भाजले तरी चालेल.)
आता कढईत तेल घेऊन त्यात टोमॅटो 8 भाग केलेले आणि पाहिजे तितकी हिरवी मिरची एक मिरचीचे 3 भाग करून असे एकदम खमंग होईपर्यंत(टोमॅटो ची साल ब्राऊन आणि थोडी कडक झाली पाहिजे) उलट सुलट परता.
गार झाल्यावर मिक्सरमध्ये आधी कढीपत्ता तीळ जिरे भाजलेले बारीक करून मग त्यात हे टोमॅटो मिरची आणि चवीपुरते मीठ घालून बारीक वाटा.चटणीची आंबट चव मस्त लागते.तीळ जास्त घालायचे नाहीत.चटणी कडू होईल.
(लिहून पूर्ण करेपर्यंत आधीच्या चटण्या आल्या.कोणत्याही प्रकारे करा.)
व्वा! मस्त वाटताहेत दोन्ही
व्वा! मस्त वाटताहेत दोन्ही रेसीपी. Thank you so much अस्मिता आणि अनु!
आम्ही अनुच्या रेसिपी प्रमाणे
आम्ही अनुच्या रेसिपी प्रमाणे हि.टोमॅटो चटणी करतो. उच्च टेस्टी असते.
क्वचित नारळ नसेल तेव्हा पटकन बागेतील टोमॅटो आणुन डोसा बरोबर पण ही चटणी केली आहे. मस्त लागते.
ममो, खूप असतील टोमॅटो तर फोडी
ममो, खूप असतील टोमॅटो तर फोडी करून फ्रीझ केले तरी चालतील. मी असे २-२ टोमॅटो फ्रीझ करते. नाही तर टोमॅटोची चटणी कशी संपवू हा प्रश्न विचारावा लागेल
घरात जर ग्रो लाइट असेल तर
घरात जर ग्रो लाइट असेल तर ग्रो लाइट खाली ठेवून हिरवे टॉमेटो पिकवता येतील. थोडेसेच असतील तर ब्राउनपेपर बॅगमधे गुंडाळून ठेवून सुद्धा पिकतात असं आमच्या इथलं अनुभवी गार्डनर्सचं म्हणणं आहे. मी ब्राउन पेपर बॅगचा उपाय कधी केला नाही पण ग्रो लाइटखाली ठेवून टॉमेटो पिकवले आहेत .
आमचे टिकटॉकर सांगतात की
आमचे टिकटॉकर सांगतात की केळ्याच्या जवळ ठेवा, की पिकतात. टमेटो! केळी नाही. किंवा दोन्हीही असेल. खखोदेजा. बागेतले आता उरले सुरले टमेटो काढून टाकतो. असंही आता कधीही फ्रॉस्ट होईल.
>>> आता उरले सुरले टमेटो
>>> आता उरले सुरले टमेटो काढून टाकतो. असंही आता कधीही फ्रॉस्ट होईल.
मग काढता कशाला? चांगले फ्रोझन राहातील झाडावरच - स्प्रिंगमध्ये थॉ झाले की काढून चटणी करा.
हे लिहितानाच त्यांच्यासमोर बेकार जोक्स मारमारून त्यांना पकवता येऊ शकेल असाही एक उपाय सुचला.
घ्या! आधीच उल्हास! त्यात असे
घ्या! आधीच उल्हास! त्यात असे सल्लागार.

आमच्या टमेटोंचं नाव केतकी आहे. पिकुन लाल व्हायच्या ऐवजी
पकाऊ जोक ऐकूनपिवळे पडतात. भोआकफ!(No subject)
मीरा - डोसे चटणी आयडिया ग्रेट
मीरा - डोसे चटणी आयडिया ग्रेट, आंबट चटणी बरोबर जाडसर पोळे चांगले लागतील!
सिंडरेला - फ्रीझ आयडिया आवडली! तसेच करून एक एक चटणी साठी बाहेर काढेन. चटणी कशी संपवू हा प्रश्न विचारावा लागेल Wink-- lol
मेधा, अमितव - थँक्स. मी खारी च्या त्रासामुळे आणते थोडे हिरवे असतानाच अणि बाहेर ब्राऊन बॅग मध्येच पिकवते
पण करेन करेन म्हणुन हिरव्या टोमॅटो che काही करत नाही. ग्रो लाइट एवढी मी प्रो नाहिये
but good to know!
स्वाती ताई - सगळा प्रतिसाद सुपर lol
पिकुन लाल व्हायच्या ऐवजी पकाऊ जोक ऐकून पिवळे पडतात.-- lol नीट बघा, टोमॅटो yellow नाहीतर heirloom असतील आणि तुम्ही लाल पडायची वाट बघत असाल! (हलकेच घ्या
शक्य आहे. पण टोमॅटो कधीकधी
शक्य आहे. पण टोमॅटो कधीकधी लाल पण होतात.
स्प्रिंग मध्ये हौसेने बिया आणलेल्या आणि यंदा पेरल्यावर आलेले निम्मे कोंब पक्षांनी खाऊन फस्त केले. मग असतील नसतील त्या सिमिला मिरची टोमॅटो च्या बिया घरी टोमॅटो कापला की त्यातील बिया मग चेरी म्हणू नका, वाईन म्हणू नका असं सगळं पेरलं. आडात भेसळ आहे तर पोहऱ्यात भेसळच येणार हे आत्ता लक्षात आलं.
Pages