युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

हो, ते पण आहेच. आमचे हेडमास्टर शाळेत टाळ्या वाजवू देत नसत. टिचक्या वाजवा म्हणे. ध्वनी प्रदुषण होतं. दामले मास्तर परवडले प्रकार होता. मग आम्ही कंपास पेटया पाडून आनंद साजरा करत असू. Proud

आमच्या इथेही चालत नाहीत शाळेत केक किंवा इतर ब्रँड ची चॉकलेट्स.फक्त डेअरी मिल्क किंवा 5स्टार(त्यामुळे काम सोपे होते.)
आणि एक झाड न्यावं लागतं विकत घेऊन.

आमच्या शाळेत चॉकलेटस् वाटणं अलाव्ड नाही. मग शाळा सुटण्यापूर्वी आपल्या मुलांच्या वर्गातील न्यायला आलेलल्या आयांना/आज्यांना/आजोबांना ओळखून त्यांना २ मिनीट थांबाच्या खुणा करायच्या. प्लीज नोट हा एकसंध ग्रुप नाहीये. मुलांना न्यायला आलेल्या आज्या क्वासीमदर रोलमधे असल्याने त्यांना खुणा करणारी बाई कोण व तिच्या पाल्याला गेल्या अबॅकस टेस्टमधे किती मार्क होते इतपर्यंत माहिती असते, प्रसंगावधान असते. त्या निमुट थांबतात. आजोबा भंजाळलेले असतात व त्यांचे एकमेव उदिष्ट स्वतःला पर्यायी मुलाला या कोलाहलापासून दूर नेणे हे असते पण तोपर्यंत पोराला चॉकलेट मिळणार आहे याचा सुगावा लागलेला असतो व ते जागेवरून ढिम्म हलत नाही, न्यायला आलेल्या मदतनीस मावश्यांना मुलांना लवकरात लवकर घरी नेणे हा उद्देश असतो त्यामुळे त्या इकडेतिकडे बघत नाहीत, एखादा चूकार बाप मुलाला आणायला आला असेल तर नक्की कोणत्या गेटवर आपलं मुल येणाराय या विवंचनेत असल्याने एक बाई आपल्याला खुणा करून थांबायला सांगतेय या अदरवाईज रम्य परीस्थितीकडे तो चक्क दूर्लक्ष करतो.
हे झाल्यावर शाळा सुटल्यानंतरच्या भर गर्दीत, आपल्या मुलांना ताब्यात घ्यायचं, मग गेटपासून थोडं दूर जाऊन वॉचमनच्या शिट्ट्यांकडे दूर्लक्ष करून, सैरावैरा दुचाकी चालवणार्या आयांपासून स्वतःला व मुलाला वाचवत ऑब्स्क्युअर भाजीच्या पिशवीतून (चांगली पिशवी आणली तर टीचर/वॉचमनला शंका येऊन ते आपल्याला दूर पिटाळू शकतात) आणलेली चॉकलेटं मुलाच्या हस्ते वाटायची हा कार्यक्रम पार पडतो.
यातच हेलो आंटी म्हणणार्या एखाद्या मुलाला हसून हेलो देवांश असं रिप्लाय करून ‘मम्मा तो देवांश नाही प्रियांश आहे ‘ ही टिप्पणी ऐकणे, आपल्या क्लिकमधल्या आयांना व्हॉटस्ॲप चेक कर असा मुकाभिनय करून दाखवणे, कोणत्या व्हॅनमधून आपल्या वर्गातील पोरं जाताहेत हे नोट करून व्हॅन दादा/तायांना २ मिनीटची खूण करणे, मधेच मी आता ५ मिनीटांत क्लाएंटला डेमो देणार आहे पण माझं नाव इनपूट केल्यावर नेमफिल्डच्या जागी एबीसी एक्सवायझेड येतेय, आता काय करू किंवा इश्यू नं ७२साठी कोणता टॅग रेफर करू वगैरेंना आन्सर करत गेल्या वर्षीचा/ची बेस्ट फ्रेंड आता सी डिव्हीजनमध्ये गेल्याने गेट नं ५ वरून सुटणार आहे आणि तिला/त्याला चॉकलेट दिलं नाही किंवा एकंदरीतच चॉकलेटस् वाटली नाहीत तर एखादा धुमकेतू आढळून पृथ्वी नष्ट होणार असल्याने गेट नं २ वरून ५ वर जाणे असा मुरारबाजीचा लढा करावा लागतो.
या डाटासाठी अर्थातच बाप ट्रेन्ड नसल्याने त्याचा सहभाग आपली लांब तिकडे भुरू लावलेली चारचाकी कुणी टो करून नेत नाहीये ना यावर लक्ष ठेवणे किंवा ते होऊ म्हणून गाडीतच बसणे इतपतच असतो.
निमुटपणे वर्गात चॉकलेटस् वाटू दिली तर आया व मुलं कॉम्प्लेसंट होतील आणि ते योग्य नाही असा रास्त विचार यामागे असावा. ‘प्रयत्ने वाळुचे कण रगडीता’ची लाईव्ह अनुभूती मिळते.
शिवाय डिझास्टर, क्राऊड मॅनेजमेंट वगैरे मॅंडेटरी सेफ्टी ट्रेनिंग होऊन जातं आपसूक.

माझेमन, काय हे हाल Happy
त्याऐवजी व्हॉटसप ग्रुपवर 10 रु ची व्हाउचर वाटा सर्वाना, आपली आपली चॉकलेट घेऊन येतील दुकानातून.
(आम्ही आमच्या सोसायटीच्या बाहेर स्टेशनरी वाल्याला ही आयडिया दिली होती.की बाबा, प्रत्येक वाढदिवसाला लोक घाईत तुझ्याकडून गिफ्ट घेऊन जातात, तर तू गिफ्ट व्हाउचर बनवणं चालू कर, म्हणजे पाकिटात व्हाउचर देता येतील.आणि मग बड्डे कीड सगळी व्हाउचर एकत्र घेऊन येऊन पाहिजे ते विकत घेईल.मी हल्ली कंस का पूर्ण करत नाहीये मलाच कळत नाही.एक काळ होता की मी एका प्रतिसादात 5 कंस टाकून सगळे पूर्ण करायचे Happy )

माझे मन..मस्त पोस्ट. Happy
किती तो द्राविडी प्राणायाम.... चाकलेटं वाटायचा!!

माझेमन,भारी पोस्ट!

अनु, बहुतेक तुझी बढती होऊन आता कोडींग ऐवजी तू वर्ड प्रोग्रामिंग , ppt प्रोग्रामिंग करत असणार त्यामुळे कंस बंद करायची सवय गेली असेल..

माझे मन धागा काढा. सर्व आईबापांना भडास काढू द्यात अशी विनोदी कमेन्टरी वाचायला तरी मिळेल.

Wow..
Wink
तसेच खा वाटीत घेऊन.
सुरळीच्या वड्या.
बसेल तितकी कणीक कोथिंबीर मिसळून पराठे.
थापलेल्या वड्या रश्शात सोडून

एका गिफ्ट हॅम्परमध्ये प्रत्येकी 250 ग्राम ज्वारी फ्लेक्स, मका फ्लेक्स, मूग आणि चणा फ्लेक्स मिळाले आहेत. काय करता येईल?

फ्लेक्स म्हणजे पोहे ना? मक्याच्या आणि ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा, चना जोर (चोर?) गरम.
मुगाचे पोहे की अख्खे मूग?

Pages