Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
स्टील कट ओट्स रात्रभर भिजवा
स्टील कट ओट्स रात्रभर भिजवा अगर नका भिजवू, त्यांना शिजवूनच खावे लागतात. अगदी सात-आठ भिजवूनही फार फायदा होत नाही, केवळ उपमा मऊसूत होतो. ओट्स न भिजवता केलेल्या उपम्यालाही जवळपास तेवढाच वेळ लागतो पण किंचित रवाळ होतो.
समई वरील डागांबद्दल. साधे
समई वरील डागांबद्दल. साधे काळे डाग चांदी ऑक्सिडाइज्ड होते त्यामुळे येतात. हे काळे डाग काही अॅसिड पदार्थाचे शिंतोडे पडल्यामुळे पडले आहेत का ते तपासून बघा. म्हणजे करेक्ट उपाय करता येइल. ह्या व्यतिरिक्त रुपेरी म्हणून एक लिक्विड येते पितांबरी वाल्यांचे ते वापरून बघा.
<पाखरं काढून स्वच्छ धुवून,
<पाखरं काढून स्वच्छ धुवून, वाळवून , खाऊन पहा>
नक्की काय खायला सांगताय?
भरत तीळ हो. कडवट झाले असतील
भरत
तीळ हो. कडवट झाले असतील तर खतात टाक. मोबाईल वरून लिहायला फारच त्रास होतो.
. साधे काळे डाग चांदी
. साधे काळे डाग चांदी ऑक्सिडाइज्ड होते त्यामुळे येतात. हे काळे डाग काही अॅसिड पदार्थाचे शिंतोडे पडल्यामुळे पडले आहेत का>>>>> ऑक्सिडइज्ड होणं वेगळं हे acid सारखे डाग वाटतात! मी मध्यंतरी भारतात गेले त्यावेळी पितळी समई वापरायला काढली होती. दरम्यान या समईत किंचित तेल आणि वात होते ते तसेच राहिले होते जवळपास तीन आठवडे. आल्यावर समई स्वच्छ करायला घेतली तर हे डाग दिसले
खूप नाहीत पण मला वाईट वाटतंय.
रुपेरी इथे मिळाल्यास बघते. धन्यवाद!
हाउस होल्ड क्लीनिन्ग
हाउस होल्ड क्लीनिन्ग प्रोड्क्ट मध्येकधी कधी हार्श अॅसिड असते. आजू बाजूची साफ सफाई करत असताना कदा चित बारके थेंब समई वर उडले असतील.
ओह ओके
ओह ओके
खराब झालेल्या धान्यात जर
खराब झालेल्या धान्यात जर किड्यांची अंडी शिल्लक असतील तर कंपोस्टमधे ते किडे वाढून त्याचा डोक्याला ताप होऊ शकतो. (स्वानुभव) टाकायचेच असतील तर भाजून मग खतात टाका.
अबब
अबब
खताला पण भाजून टाकावे लागणार?
भाजलेले शेंगदाणे तसेच
भाजलेले शेंगदाणे तसेच राहिलेले . आता खवट लागतायेत. काय करता येईल?
टाकून द्या.
टाकून द्या.
खतात खपवा
खतात खपवा
तीळ शेंगदाणे इत्यादी तेल
तीळ शेंगदाणे इत्यादी तेल बिया आहेत. त्यातील तेल काही दिवसाने खराब होउ लागते( हाय होते म्हणतात किंवा ऑक्सिडाइज) व त्यात इर्रिवर्सिबल केमिकल चेंजेस होतात. हे परत पूर्व वत होत नाहीत. काही काळाने ते खराबच होणार. हे फार नैसरगिक आहे. नाही झाले तर त्यावर काही मानवी प्रक्रिया केलेली अस्णार. गरजे पुरते आणून वापरले तर नुकसान कमी होईल. आमच्या इथे गुज्जु किराणा वाला मुद्दाम खवट शेंगदाणे टाकतो अर्धा किलोत पाव किलो. त्यामुळे सर्व लॉट लवकर खराब होतो.
संपवायला खाल्ले तर पोट खराब होउ शकेल. ती काळजी घ्या.
सर्व तीळ टाकून दिले. आता
सर्व तीळ टाकून दिले. आता लागतील तेव्हा थोडकेच आणीन.
Rancidification
Rancidification
https://en.m.wikipedia.org/wiki/Rancidification#:~:text=Rancidification%....
असे म्हणतात
खोबरे , शेंगदाणे , काजू , बदाम खवट होतात , इतर तेलबियाही होतात
Yes. Thank you. Shabd visarla
Yes. Thank you. Shabd visarla
तीळ टिकवण्यासाठी त्यात लवंगा
तीळ टिकवण्यासाठी त्यात लवंगा घालून ठेवाव्यात. अजिबात खराब होत नाहीत. भाजायची गरज नाही. वापरताना लवंगा काढून टाका. 1k g तिळाला चांगल्या वाटीभर लवंगा टाकाव्यात. मिसळून ठेवा.
तीळ टिकवण्यासाठी त्यात लवंगा
तीळ टिकवण्यासाठी त्यात लवंगा घालून ठेवाव्यात >>> भारी! हे माहिती नव्हतं.
मखाण्यासंबंधीत सर्व
मखाण्यासंबंधीत सर्व सल्ल्यांकरिता आभार! आता संपवतो हळू हळू!
मखाणे तुपावरून परततांना वरून
मखाणे तुपावरून परततांना वरून मीठ घालून हलवलेकी सगळे मीठ खाली जाऊन बसते आणि मग खातांना मीठ कमी वाटते.
तर काय उपाय करावा?
<<
मखाने, पॉप्कॉर्न घरी करताना मीठ नीट लागत नाही.
यासाठी मीठ मिक्सरमधून बारीक दळून घ्यावे मग वापरावे. रेडीमेड पॉपकॉर्न साल्ट असच बनवतात.
विकतचे इडली पीठ आणलेयं. आंबट
विकतचे इडली पीठ आणलेयं. आंबट आहे.
काय करू आंबटपणा कमी करायला ??
खूप पाणी घाला आणी एका बाजूला/फ़्रीज़ मधे ठेवा.साधारण अर्धा तास झाला की पाणी वरती येईल पीठ खाली बसेल.हळूवार पाणी ओतून काढा
आणी खालील पीठ वापरा.आंबटपणा कमी झाला असेल.
ताक जास्त आंबट झाले की सेम ट्रिक वापरा.
धन्यवाद सोना. हीच युक्ती
धन्यवाद सोना. हीच युक्ती वापरली . बरोबर झालं मगं
माझ्याकडे कर्दळ भरपूर वाढली
माझ्याकडे कर्दळ भरपूर वाढली आहे. (canna लिली) या पानांचा उपयोग कसा करता येईल? (मोदक वाफवणे, पानगी करणे ईत्यादी?
वाफावयलाच केला पाहिजे अस नसेल
वाफावयलाच केला पाहिजे अस नसेल तर मी ताटात खाली घालते नैवैद्य दाखवताना गणपतीला. तसेच फ्लॉवर अॅरेंज करताना वापरते ती पान.
Oh OK सीमा, ताटात खाली घालते
Oh OK सीमा, ताटात खाली घालते म्हणजे नैवेद्य थेट पानावर वाढता का पाने ताटात ठेवून? सॉरी मी कधी केले नाहिये म्हणुन जरा विचारतेय
माझ्याकडे कर्दळ भरपूर वाढली
माझ्याकडे कर्दळ भरपूर वाढली आहे. (canna लिली) या पानांचा उपयोग कसा करता येईल?
>>> रोजच्या नाश्त्याला वगैरे ती पानं वापरू शकता. (म्हणजे खायला नव्हे, नाश्ता वाढून घ्यायला.
)
लहानपणी सुट्टीत आजीकडे गेलं की नाश्ता कर्दळीच्या पानावर आणि जेवण केळीच्या पानावर, हे ठरलेलं होतं. भांडी कमी पडतात घासायला.
Lol ललिता प्रीती! खाण्याच्या
Lol ललिता प्रीती! खाण्याच्या आकारमानानुसार पानांचे सिलेक्शन आवडले
ताटात खाली घालते म्हणजे
ताटात खाली घालते म्हणजे नैवेद्य थेट पानावर वाढता का पाने ताटात ठेवून? >> हो.
धन्यवाद, सीमा!
धन्यवाद, सीमा!
कर्दळीचे पान चवीला कडू असते.
कर्दळीचे पान चवीला कडू असते. वाफवायला वापरून पश्चात्ताप होईल.
Pages