कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राणायाम इ.ने फरक पडतो का असा एक प्रश्र्न होता. हे उत्तर नाही. पाहण्यात आलेले प्रकरण आहे.
स्त्री. वर ९०. ब्रह्मविद्येचा प्रगत अम्यासक्रम पूर्ण केलेला.
त्यातले सर्व व्यायाम प्रकार नियमितपणे करते.
ताप आला. टेस्ट केली.
तिचा निकाल येईतो , म्हणजे दोन दिवसांत उतरला.
टेस्ट पॉझिटिव्ह.
पुढे एकदा अॉक्सिजनची गरज पडली.
दोन आठवड्यांत ठणठणीत.
मुलगी डॉक्टर असल्याने मनपाच्या परवानगी घरीच उपचार केले.

कोविडमुळे जे लोक रुग्णालयात दाखल होते आणि बरे झाले त्यांच्याबाबतीत पुढे निरीक्षण महत्वाचे आहे. त्यातील काही जणांना फुफ्फुस अथवा हृदयाचा त्रास होऊ शकतो असे दिसले आहे.

म्हणून अशांचे बाबतीत काही मूलभूत काळजी अशी घ्यायची असते :
१. समतोल आहार
२. शिस्तीत वजन नियंत्रण
३. धूम्रपान कायमचे बंद
४. व्यायाम तज्ञांचे सल्ल्याने विशिष्ट व्यायामप्रकार. या प्रकारांनी हाडे व स्नायू यांचे कमाल कंडिशनिंग केले जाते.
..............................
ब्रह्मविद्येचा अभ्यासक्रम >>

या अथवा अन्य पर्यायी उपायांबाबत कोणाचा अभ्यास असल्यास लिहा.

ज्यांना दुसर्‍यांदा इन्फेक्शन झालं अशा चार रुग्णांत आताचा आजार अधिक गंभीर स्वरूपाचा आहे / होता .
पहिल्यावेळी त्यांना लक्षणे नव्हती / अगदी सौम्य लक्षणे होती त्यामुळे शरीरात फारशा अँटिबॉडीज तयार झाल्या नाहीत. असं आज एन्डीटीव्हीवरच्या कार्यक्रमात पाहिलं.

ही बातमी
https://indianexpress.com/article/india/lancet-reinfection-in-four-mumba...

कोरोना संबंधी नकली संशोधनाचा सुळसुळाट झाला आहे . याबद्दलचा लेख वाचताना कोणते रिसर्च पेपर मागे घेतले गेले त्यावर लक्ष ठेवणारी मंडळीही आहेत, असं कळलं.
https://retractionwatch.com/retracted-coronavirus-covid-19-papers/

भरत +१
नकली संशोधनाचा हा बाजार जगभरात फैलावला आहे.

नकलीपेक्षाही 'प्री-प्रिंटींग' म्हणजे Peer review किंवा तज्ञांकडून मान्यता मिळायच्या आधीच प्रकाशित करणे प्रकार वाढले आहे. त्यामुळे संशोधन मागे घ्यावे लागते. नकली प्रकारही आहेत.

कोविडमधून बरे झालेल्यांचे प्रमाण आता वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. याच्या दुसर्‍या टोकाला असेही काही रुग्ण आहेत की ज्यांच्या फुफ्फुसांना तीव्र इजा पोहोचली आहे. त्यामध्ये काही डॉक्टर्स आणि अन्य ‘योद्धे’ यांचाही समावेश आहे. अशा रुग्णांना व्हेंटिलेटर आणि तत्सम कृत्रिम श्वसन उपायांवर ठेवूनही बरे वाटत नाही. अशा गंभीर रुग्णांसाठी एका सर्वोच्च आधुनिक तंत्रज्ञानाचा (ECMO किंवा ELS) वापर केला जातो. जगभरात सध्या २५०० रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यातून बरे झालेल्यांचे प्रमाण 40 ते 50 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. खूप खर्चिक असलेल्या या तंत्राचा अल्प परिचय करून देतो.

हा उपचार म्हणजे थोडक्यात रुग्णाला ‘कृत्रिम हृदय-फुफ्फुस यंत्रणेवर’ ठेवणे. यात नळीद्वारे रुग्णाच्या शरीरातील रक्त काढून ते या यंत्राला पोहोचवले जाते. यंत्रामध्ये त्यातील कार्बन-डाय-ऑक्‍साईड काढून घेऊन त्यात ऑक्सिजन भरला जातो .आता हे ‘शुद्ध’ झालेले रक्त रुग्णाच्या शरीरात पुन्हा नळीद्वारे पोचवले जाते.

यामागचा हेतू असा आहे. श्वसनकार्य पूर्णपणे यंत्रावर सोपवल्याने रुग्णाचे फुप्फुसांना विश्रांती मिळते आणि त्यामुळे विषाणूने केलेल्या इजेमधून बरे होण्याची संधी मिळते.

डॉ कुमार,तुमची समजवून सांगण्याची हातोटी विलक्षण सोपी आहे, अवघड विषय पटकन समजून जातात,
तुम्ही एकप्रकारे आमचे फॅमिली डॉक्टर सुद्धा झाले आहात, करोनाबद्दल नवीन काही ऐकायला मिळाले की नवरा लगेच विचारतो तुझ्या कुमार डॉक्टरांचे काय म्हणणं आहे यावर?? Happy

आदू
धन्यवाद. तसेही आपण माबोकर एका कुटुंबाचे सदस्य आहोतच.
Bw

डॉक
चांगली माहिती. वाचत आहे.
करोनाच्या रिपोर्टमध्ये ct value हा काय प्रकार असतो?

साद
करोनाच्या रिपोर्टमध्ये Ct value हा काय प्रकार असतो?
>>>>>
जेव्हा RT-PCR निष्कर्ष + असतो तेव्हा काही प्रयोगशाळा रिपोर्टमध्ये Ct चा उल्लेख करतात.
Ct = threshold cycle value.

हा आकडा जेवढा कमी, तेवढे विषाणूच्या जनुकाचे प्रमाण अधिक असे ते गणित आहे.
पण, त्याला महत्व देऊ नये कारण...

१. हा आकडा चाचणीसाठी वापरल्या गेलेल्या किटनुसार बदलतो. त्यामुळे अमुक एक आकडा निदानात उपयुक्त असे म्हणता येत नाही.
२. हे गणित करताना त्यात काही अंगभूत त्रुटी आहेत.

३. या प्रकाराचे प्रमाणीकरण झालेले नाही.
४. या संदर्भात जी काही ढकलपत्रे फिरताहेत त्यांकडे सरळ दुर्लक्ष करा. चाचणी +/- इतकी माहिती पुरे आहे.

वैजयंती,
आयोडीन हे पारंपरिक जंतुनाशक आहे खरे. परंतु ते त्वचेवर बाह्य उपयोगासाठी आतापर्यंत वापरले जाते. बाह्य उपयोगाचे बाबतीत सुद्धा काहीजणांना त्याची ऍलर्जी होऊ शकते. खोल जखमांचे बाबतीतही ते लावणे टाळले जाते. प्रस्तुत लेखात त्यांनी म्हटल्याप्रमाणे नाकात ते लावण्याचा प्रयोग कोणी घरगुती पातळीवर करायचा नाही. तो रुग्णालयातच संबंधीत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट परिस्थितीत ते करणार आहेत.

माझ्यामते अंतर्गत वापरासाठी आयोडीन तितकेसे सुरक्षित नाही. यावर अन्यत्र अधिक काही प्रयोग झाल्याचे कळल्यासच मत देता येईल.

ते व्हॅक्सीन येणार कि नाही येणार? व्हॅक्सीनशिवाय पर्याय नसेल तर निदान ते लवकरात लवकर चाचण्या पुर्ण करुन आणावे.

भारतात लसीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.
मुंबईत केइएम व पुण्यात ससूनला चालू आहेत.
(https://www.loksatta.com/mumbai-news/corona-vaccine-was-tested-on-three-...)

** सुरक्षितता हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. घाई धोक्याची ठरते.

धन्यवाद भरत , Happy
पाहिली ती लिंक....
डॉ कुमार,तुमची समजवून सांगण्याची हातोटी विलक्षण सोपी आहे, अवघड विषय पटकन समजून जातात,
तुम्ही एकप्रकारे आमचे फॅमिली डॉक्टर सुद्धा झाले आहात+1 ,
माझे तर कुमार सरांनी असं सांगितलय म्हणजे असंच असणार असं सुरू असतं ... फक्त तुमचेच लेख मी कुटुंबातील सदस्यांना पाठवते. बाकी कशावरच विश्वास नाही राहीलायं. तुमचे लेख व स्वतःचे तारतम्य यावरून सगळे निर्णय घेण्यात येतात. Happy धन्यवाद.

समजा ४० करोड लोक लस विकत घेऊ शकतात, ₹२,००० च्या किमतीत. तर ₹ ८० हजार करोड मिळतील आणि १३६ करोड लोकांपर्यंत लस पोचेल.

40 कोटी

तुम्ही तर 600 कोटी चे 40 हजार कोटी केलेत की

अस्मिता,
स्वतःचे तारतम्य >>> अगदी योग्य मुद्दा. सध्या या आजारासंबंधी माध्यमांतून इतके काही प्रसिद्ध होत आहे, की त्यातले कुठले वाचायचे याचे तारतम्य आपणच ठरवावे लागते.

BlC व मानव

>>>योग्य मुद्दा आणि अनुमोदन

Pages