कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साद.... हे मूळ इंग्लिश मध्ये आहे हो !!!! म्हणून तसेच टाकले कारण त्याची संदर्भ पोस्ट इंग्रजीतच आहे हो !!!
थोडक्यात सांगतो.... याचे मूळ अवजाच्या कंपनाशी आहे.... रोगागणिक आवाजाचे कंपन बदलते असा सिध्दांत इटली-रोम मधील शास्त्र्ज्ञांनी मांडून प्रयोग केले आहेत.... तुमचा आवाज मोबाईल वर नोंदवून एका अ‍ॅपद्वारे त्याचे विश्लेषण करून कोरोना आहे की नाही हे ठरवण्याचा प्रयत्न आहे.
डि वाय पाटील महाविद्यालय व त्यांचे प्राध्यापक यात सहभागी आहेत

<<रोगागणिक आवाजाचे कंपन बदलते असा सिध्दांत इटली-रोम मधील शास्त्र्ज्ञांनी मांडून प्रयोग केले आहेत.... तुमचा आवाज मोबाईल वर नोंदवून एका अ‍ॅपद्वारे त्याचे विश्लेषण करून कोरोना आहे की नाही हे ठरवण्याचा प्रयत्न आहे.>>
===>
Mobile मधले App, Technology ची उत्क्रांती....... ह्म्म....

https://www.loksatta.com/mumbai-news/102-doctors-infected-with-corona-de...

वरील link वरील एक मुद्द.....==> व्यापक अभ्यासाची गरज

नुकतेच दीर्घकालीन मधुमेही असलेले काही परिचित कोविडने दगावले. मधुमेह आणि कोविड (किंवा अन्य आजार) यांचे नाते एकमेकास अधिक खड्ड्यात घालायचे असते. ( अब > अ + ब ).

मधुमेही कोविडग्रस्ताचे बाबतीत शरीरात अशा घटना घडतात :

१. इन्सुलीनचे उत्पादन कमी होणे,
२. शरीर पेशी इन्सुलीनच्या कार्यास दाद न देणे आणि
३. काही कोविडग्रस्त रुग्णालयदाखल व्यक्तींना steroidचे उपचार चालू असतात. हे औषध इन्सुलीनच्या विरोधी गटातील आहे.

अशा तऱ्हेने वरील तिहेरी परिणामातून मूळचा मधुमेह अधिक बिघडतो. त्यातून कोविडची गुंतागुंत वाढून तो गंभीर होतो.

मधुमेहींना जर इन्शुलीन व प्राणवायू सोडून जर दुसरी औषधं दिली नाहीत तर कदाचित इम्युनिटी काम करील असे वाटते. गुंतागुंत होऊन मरण येण्यापेक्षा हा उपाय करुन पहायला हवा.

डॉ संकेत मेहता अभिनंदन !

हे डॉ कोविड ने स्वतः रुग्णालयात दाखल असताना आणि स्वतः ऑक्सिजनवर असताना दुसऱ्या रुग्णासाठी धावून गेले:

https://m.timesofindia.com/city/surat/doc-on-oxygen-support-risks-own-li...

नमस्कार डॉक
माझे सासरे जवळपास 68 वर्षांचे आहेत,डायबेटीस, high bp कोलेस्ट्रॉल, high शुगर आणि एक heart attak अशी त्यांची हिस्ट्री आहे,
तर गेल्या काही दिवसांपासून त्यांना थोडा ताप होता,जो 2 दिवसात गेला मात्र कंबर दुखी 8दिवस होती,
अतिशय अशक्तपणा सोडल्यास सध्या काही त्रास नाही,पण अशक्तपणा जात नाही म्हणून शेवटी doc कडे गेले तर xray आणि स्कॅन करायला सांगून करोना होऊन बऱ्या होण्याच्या स्टेज ला ते आहेत असं सांगितलं डॉ नी
त्यांच्या सोबत सासूबाई वय 65(याना डायबेटिस आहे)सुद्धा राहतात,इतक्या दिवसात त्यांना साधा खोकला सुद्धा नाही,
Doc नि फक्त सध्या 8दिवस घरीच दोघांना वेगळंच राहायला सांगितलं आहे,

हे सगळच खूप चमत्कारिक नाही का

आदू,
,इतक्या दिवसात त्यांना साधा खोकला सुद्धा नाही,
Doc नि फक्त सध्या 8दिवस घरीच दोघांना वेगळंच राहायला सांगितलं आहे,
हे खूप चमत्कारिक नाही का

>>>>
तुम्हाला नक्की कुठली गोष्ट चमत्कारिक वाटली, ते जरा स्पष्ट करता का ?
आणि कोविड विषाणू चाचणी केली होती का याचा उल्लेख हवा.

तुम्हाला नक्की कुठली गोष्ट चमत्कारिक वाटली, ते जरा स्पष्ट करता का ?>>>हो,खरतर मनात आलं ते लिहायला जरा अवघड वाटलं म्हणून टाळलं ते,पण सांगते-
आम्ही आणि ते बऱ्यापैकी लांब राहतो म्हणजे जिल्हे वेगळे आहेत,ते दोघेच तिथं म्हणून सतत काळजी वाटायची,त्यात ते शरीराने आणि मनाने कमकुवत ,त्यामुळे संसर्ग झालाच तर त्यांची कंडिशन क्रिटिकल होऊ शकते हे बऱ्याच ठिकाणी वाचून खुणगाठ बसली होती,सांगायला ही बरे वाटत नाही पण तसं काही झाले तर असावं म्हणून पैशाची सोय करून ठेवली होती
त्यांना संसर्ग झालाय पण अशक्तपणा सोडला तर काहीही त्रास नाही ह्याने जरा आश्चर्य चा सुखद धक्का बसलाच पण नंतर वाटले की इतक्या व्याधी असणारा माणूस तसा ठणठणीत आहे आणि कमी वयाची धडधाकट माणस icu मध्ये जातात हे कसं???
नक्की करोना ला काय समजायचं???

Swab टेस्ट केली नाही,xray आणि स्कॅन रिपोर्ट वरून तसे सांगितले doc नी, त्याला सुद्धा 4 दिवस उलटून गेले आहेत.
तब्बेत ठीक आहे म्हणून टेस्ट केली नाही,टेस्ट करण्याची गरज आहे का??
आम्ही त्यांना सध्या फक्त फोन वरून मदत आणि धीर देण्याचं करू शकतो,म्हणजे online धान्य भाजी वगैरे पोचवणे

वाटले की इतक्या व्याधी असणारा माणूस तसा ठणठणीत आहे आणि कमी वयाची धडधाकट माणस icu मध्ये जातात हे कसं??? >>

चांगला प्रश्न विचारलात !
मानवी शरीर अगम्य आणि आश्चर्यकारक आहे खरे .
काही मूलभूत पुढील प्रतिसादात लिहितो.

जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती

१. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही.

२. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे .....

a. एखाद्याची प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो.
b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो.

इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते.

३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते:

a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता
b. त्यांची प्रजनन क्षमता आणि
c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद

प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी.शिवाय व्हायरल ओव्हरलोड वेगळा असेल.साबा घरीच असल्याने व्हायरस शी संपर्क कमी आणि त्यामुळे को मोर्बिडीटीज असूनही सुदैवाने त्रास किंवा लक्षणं दिसली नसतील.
मलाही खूप आश्चर्य आणि वाईट वाटतं.अतिशय तरुण, धडधाकट , काहीही क्रोनिक आजार नसलेली मंडळी करोना ने जातात तेव्हा. Sad
अत्यंत चमत्कारिक आजार आहे.रोज वेगवेगळ्या गोष्टी कळतात.

शरीरात बऱ्याच गोष्टी आपोआप होत असतात- अगदी ऑटोकरेक्ट म्हणाव्या तशा !
एकंदरीत मानवी शरीराला औषधांची गरज कमी वेळा आणि खूप कमी प्रमाणात असते.
आपल्या हातात आहे बस्स ....
चांगला आहार, व्यायाम आणि सुयोग्य जीवनशैली.

तब्बेत ठीक आहे म्हणून swabटेस्ट केली नाही,टेस्ट करण्याची गरज आहे का??डॉक्टर कृपया मार्गदर्शन करा

नाही अनु,दोघेही घरीच आहेत सध्या,अगदी भाजी आणायला ही सोबत जातात दोघ,त्यामुळे परस्पर संबंध कमी येण्याचा आजिबात बेनिफिट of डॉउट देता येणार नाही Happy
पण ते दोघेही अगदी व्यवस्थित आहेत हे खूप खूप खूप मोलाचं आहे आमच्यासाठी _/\_

आदु तुमच्या व कुमार सरांच्या पोस्ट्स आवडल्या.
आदु अभिनंदन.
ऑटोकरेक्ट ..... शब्द फारच आवडला. गुंतागुंतीचे आणि चमत्कारिक आहे मानवी शरीर !

तब्बेत ठीक आहे म्हणून swabटेस्ट केली नाही,टेस्ट करण्याची गरज आहे का? >>> नको.

ताप आल्यास जरुर करावी.

कोविडबाधित मृतांचे शवविच्छेदन आता अधिक प्रमाणात होत आहे. त्यातून स्पष्ट झालेल्या काही गोष्टी :

१. फुप्फुसांना झालेली इजा लक्षणीय आहे हा विषाणू तिथल्या विशिष्ट (प्रकार- 2 ) पेशींवर हल्ला करतो. या पेशी एरवी एक मेद पदार्थ निर्माण करून फुफ्फुसे लवचिक ठेवतात. आता या कार्यात बिघाड होतो.

२. वरचा श्वसनमार्ग आणि फुप्फुसातील या विषाणूची घनता सार्स १/ मर्स च्या तुलनेत खूप जास्त आहे.

३. रक्तवाहिन्यांच्या आतील पातळ आवरणाला झालेली इजाही लक्षणीय.

बरोबर,
त्यातूनच पुढे रक्तगुठळी प्रक्रिया वेग घेते.

के तु
होय, होऊ शकते. साधारण प्रक्रिया अशे आहे:

अस्तराला इजा >> छोट्या गुठळ्या >>> लहान रक्तवाहिन्यांत अडथळे >> अवयव पेशींचा नाश.
हे फुफ्फुस व हृदयातही आढळले आहे.

नाशिक आणि पुणे तसेच दिल्लीतील सर्व्हेत असे आढळले आहे की अ‍ॅन्टीबॉडीसाठी चेक केलेल्या लोकात ६० ते ७० टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे व तो झाला हे त्यांना कळले देखील नाही.
असे असतांना पुढील पाऊले काय अन
दुसरी बातमी मुंबईत आता ५० वर्षापेक्षा अधिक वयाच्या असिम्प्टोमॅटिक लोकांना हॉस्पिटलाई़झ होणे अनिवार्य केले आहे.
यावर काय भाष्य करतील डॉक्टर लोक.... मी तर टोटली तज्ञावरचा विश्वास गमावू लागलो आहे

>>> अस्तराला इजा >> छोट्या गुठळ्या >>> लहान रक्तवाहिन्यांत अडथळे >> अवयव पेशींचा नाश.
हे फुफ्फुस व हृदयातही आढळले आहे.>>> किती मोठे सॅम्पल साईझ आहे... निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी आणि हे निरिक्षण लेमन साठी कसे उपयुक्त आहे?

निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी आणि हे निरिक्षण लेमन साठी कसे उपयुक्त आहे?>>>

शवविच्छेदने ही जगभर टप्प्याटप्प्याने होत आहेत. जिवंत रुग्णांच्या अभ्यासाशी तुलना करता त्यांची संख्या कधीही कमीच असते. (असा कुठलाही एक अभ्यास हजारो शवांवर केला जात नाही; तसे शक्य नसते याची नोंद घ्यावी). मात्र त्यातून जी माहिती मिळते ती अत्यंत बहुमूल्य असते. अशी माहिती जगभरात कालांतराने एकत्रित केली जाते आणि त्यातून आजाराचा सखोल अभ्यास होतो.

या माहितीचा उपयोग असा, की हा आजार श्वसन आणि रक्तवाहिन्या या दोहोंवर परिणाम करतो, हे सामान्याला कळते.

धन्यवाद डॊक्टरसाहेब..
नाशिक आणि पुणे तसेच दिल्लीतील सर्व्हेत असे आढळले आहे की अ‍ॅन्टीबॉडीसाठी चेक केलेल्या लोकात ६० ते ७० टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे व तो झाला हे त्यांना कळले देखील नाही.
असे असतांना पुढील पाऊले काय ?

या विषाणू विरोधात पुरेशी आणि आणि टिकाऊ प्रतिकारशक्ती मिळाली आहे का, हे ठरविण्यासाठी अँटीबॉडीज का ' T ' पेशी मोजायच्या याबाबत तज्ञांमध्ये मतभेद आहेत.

समजा, एखाद्या देशातील शासनाच्या वैद्यकीय सल्लागारांचे जर असे मत असेल, की अँटीबॉडीज हा पुरेसा पुरावा आहे, तर त्यानुसार एकंदरीत विलगीकरण वगैरे गोष्टींमध्ये शिथिलता आणता येईल.

Pages