कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

RT-PCR चाचणी false positive येण्याची शक्यता आहे का?

मानव,

होय, ही (आणि अन्य कुठलीही अशी ) चाचणी फॉल्स + असू शकते.

काही मुद्दे :
१. या (आणि कुठल्याही) विषाणूची उत्क्रांती सतत चालू असते. त्यामुळे त्याच्या जनुकातले काही भाग बदलू शकतात.

२. चाचणीसाठी वापरले गेलेले किट आणि अन्य तांत्रिक घटकही यासाठी कारण ठरतात.

३. Swab contamination हेही एक कारण.
४. अर्थात याचे प्रमाण अत्यल्प राहावे असे प्रयत्न किट उत्पादकांकडून केलेले असतात.

विक्रम,
हळद.....इ. >>>>

कुठल्याही रसायनाला ‘औषध’ म्हणून मान्यताप्राप्त व्हायचे असेल, तर त्याचे शास्त्रशुद्ध रुग्णप्रयोग (R C Trial) व्हावे लागतात. त्यानंतर त्याचा अहवाल येतो. त्यावर तज्ञांची मते व चर्चा आणि पुढे औषध म्हणून मान्यता, अशा पायऱ्या असतात.

अशा घरगुती उपायांचे बाबत कुठे शास्त्रशुद्ध प्रयोग केलेले आहेत का, हे संबंधित लोकांनी प्रसिद्ध करावे. मग त्यावर काही भाष्य करता येईल.

या लसीने पहिले दोन टप्पे पार करूनही, करोनावर खात्रीशीर उपाय म्हणुन बाजारात का नाही आणली? तिसऱ्या टप्प्यात एक रुग्ण आजारी पडला असता चाचण्या का थांबवल्या?
हे जर लक्षात आले तर कोव्हीड सारख्या नव्या आजावर खात्रीशीर घरगुती उपायांच्या ढकलपत्रांना किती महत्व द्यावे ते लक्षात येईल.

भरत +१.
.........................

व्यक्तिगत संपर्कातून काही जणांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे, सध्याच्या आजारात घडलेल्या काही आश्चर्यकारक घटनांबद्दल. उदाहरणार्थ, एखादे १०३ वर्षाचे गृहस्थ सुद्धा या आजारातून खडखडीत बरे झाले आणि दुसऱ्या टोकाला 35 ते 40 वयोगटातील काहीजण चक्क मृत्युमुखी पण पडले.
तर हे असे का ?

या संदर्भात “संसर्गजन्य आजारांची सहनशीलता” (tolerance) या संकल्पनेवर गेली पंधरा वर्षे संशोधन चालू आहे. बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत आणि मानवी प्रयोगही आता टप्प्याटप्प्याने होत आहेत.

समजा, दोन समान वय आणि लिंग असलेल्या व्यक्तींची तुलना आपण करतो आहोत. त्या कोणालाही अन्य कुठला दीर्घ आजार नाही. आता दोघांना एकच जंतुसंसर्ग होतो. त्याचे शरीरातील परिणाम मात्र असे असतात :

१. एकाचा आजार अगदी सौम्य किंवा लक्षणविरहीत देखील राहू शकतो, तर
२. दुसऱ्याचा आजार अति गंभीर होतो.

वरील १ मध्ये शरीरात जंतुविरोधी दाह प्रक्रिया अगदी गरजेइतकीच मोजून-मापून होते. त्याने जंतूंचा नाश तर होतोच आणि शरीरातील बाकीच्या पेशींना इजाही पोहोचत नाही.

परंतु २ मध्ये मात्र हीच प्रक्रिया अनियंत्रित किंवा विचित्र प्रकारची (erratic) होते. त्यातून जे ‘वादळ’ उद्भवते, त्यातून शरीरातील अन्य पेशी आणि पर्यायाने अवयवांना देखील इजा पोहोचते.

ही प्रक्रिया शरीरातील कशामुळे नियंत्रित केली जाते, त्याचाच हा अभ्यास आहे.
कोविडच्या निमित्ताने भविष्यात हे संशोधन अधिक गती घेईल अशी आशा आहे.

आजची 'ऑक्सफर्ड ने थांबवली लसीची चाचणी' या बातमी आधी, 4 दिवसांपूर्वी मी मटा मध्ये बातमी वाचली होती की सिरम इन्स्टिट्यूट, पुणे येथे लसीच्या बाटल्या भरायला सुरू झाल्यात..
म्हणजे त्यांना प्रचंड खात्री होती लसीच्या रिझल्ट बद्दल...

>>>> सिरम इन्स्टिट्यूट, पुणे येथे लसीच्या बाटल्या भरायला सुरू झाल्यात..>>>>

औषध महानियंत्रकांनी ‘सीरम’ला नोटीस बजावली.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/serum-institute-issues-stateme...

लस शरीरात टोचल्यानंतर काही व्यक्तींमध्ये ऑटोइम्युन प्रकारची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. त्यातून काही अत्यल्प गंभीर घटनाही घडू शकतात. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने लस निर्मितीमध्ये कुठलीही घाई करणे धोक्याचे असते. अशी एखादी घटना घडल्यास तिचा सांगोपांग अभ्यास करून मगच पुढे जावे लागते.

आज बाजारात ज्या अनुभवसिद्ध लशी उपलब्ध आहेत, त्यांच्याही बाबतीत अशी दुर्मिळ दुर्घटना घडू शकते. यामध्ये अगदी नेहमीच्या ‘ट्रिपल, एमएमआर, हिपाटायटीस-बी, इन्फ़्लुएन्ज़ा’ इत्यादींचा समावेश आहे.

आजची अक्षम्य चूक : त्यावर मी अशी इ मेल केली आहे :
प्रति
संपादक
सकाळ , पुणे
महोदय,
आपल्या ११/९/२० च्या अंकात पान ७ वर मोठी चूक झालेली आहे. (https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=7)
ती अशी :
बातमी : ‘अतिघाई महागात जाई “
चौकटीतले वाक्य :
Rapid antigen चाचणीत रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याचीच चाचणी होते

वरील वाक्यात “रक्ताच्या नमुन्याचीच” हे अत्यंत चुकीचे आहे.
या चाचणीत नाकातील swab चा नमुना घेतात.

लोभ असावा

https://twitter.com/bbc5live/status/1304344426567864322
If a vaccine doesn’t come along, what’s plan B?”

. जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित व्यक्ती सांगते आहे.
नवीन असं काही नाही. पण एक प्रकारे शिक्कामोर्तब

भरत, ठीक आहे.

आता हा विषय निघालाच आहे तर यासंदर्भातले दोन मतप्रवाह सांगतो.
१. यानुसार लसनिर्मिती महत्त्वाची आहे आणि ती यशस्वी व्हावी. प्रतिबंध केव्हाही चांगलाच. तो दीर्घकालीन उपयुक्त असेल.

२. मात्र, यानुसार काही वैज्ञानिक लसीच्या उपयुक्ततेबाबत साशंक आहेत. त्यांच्या मते जरी आपण सर्वांना लस दिली, तरी 40 टक्क्यांच्या आसपासच ती उपयुक्त ठरू शकेल, असा एक अंदाज. त्यामुळे या गटाचा कल सध्या प्रभावी उपचार शोधण्याकडे आहे.
तूर्तास दोन antibodies चे मिश्रण असलेल्या एका औषधाचे रुग्णप्रयोग तिसऱ्या टप्प्यात आहेत आणि ते उत्साहवर्धक आहेत. काही काळातच त्याची प्रगती समजेल.

बापरे. स्टाफ चं कौतुक आहेच.पण खूप धोका पत्करला.धूर ज्या प्रकारे कोंडतोय त्या प्रकारे अजून काही मिनिटात स्टाफ पेशंट ना वाचवता वाचवता शहीद झाला असता.व्हेंटिलेटर सारखी उपकरणे सेफ्टी चेक न करता बनवली गेली का?

दोन antibodies चे मिश्रण असलेल्या एका औषधाचे रुग्णप्रयोग तिसऱ्या टप्प्यात आहेत आणि ते उत्साहवर्धक आहेत. >>

antibodies असणारी औषधे बनवणे खूप महाग असेल ना? गरिबांना परवडतील का? सगळ्यांना घेता नाही आल्या तर परत तोच प्रॉब्लेम, सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही.

गुजरातमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाला>> व्हिडिओ बघितला. हे त्या ज्योती व्हाया रुपानी स्कॅम मधील आहेत की काय?

स्टाफ चं कौतुक आहेच.पण खूप धोका पत्करला >>> +११

antibodies असणारी औषधे बनवणे खूप महाग असेल ना >>> शक्य आहे. ती प्रत्यक्ष बाजारात आल्यावरच समजेल.

चर्चेत सहभागी सर्वांना धन्यवाद.
या आजाराच्या प्रयोगशाळा चाचण्यांसंबंधी सामान्यांमध्ये अजूनही काही गैरसमज आढळतात. त्यासाठी हा उपयुक्त तक्ता :

0001.jpg

प्रयोगशाळा चाचण्यांसंबंधी सामान्यांमध्ये अजूनही काही गैरसमज आढळतात. त्यासाठी हा उपयुक्त तक्ता : ==>
कुमार सर, खूपच धन्यवाद .....
Blood clotting test ( Blood test ) मझ्या मित्राची केली होती....

सतीश,
तुम्ही म्हणताय ती D-dimer चाचणी असावी. ती
कोविडची निदान चाचणी नव्हे.

ती कोविडबाधित रुग्णाची पूरक चाचणी आहे. ती सर्वांत करत नाहीत.

* कोविड साठी थुंकीवरची चाचणी>>>

प्रचलित नाकातील स्वाब घेणे हे रुग्णासाठी त्रासदायक आहे म्हणून थुंकीवरची चाचणी विकसित होत आहे. प्रगत देशांत त्याची किट्स उपलब्ध आहेत.

मात्र या चाचणीची संवेदनक्षमता कमी आहे. त्याच्या फॉल्स निगेटिव्ह निष्कर्षाबाबत सावध राहावे लागते.

चाळणी म्हणून तिचा उपयोग चांगला आहे. पण निदान चाचणी म्हणून ती सध्या पुरेशी योग्य नाही.

कुमार सर,
ती कोविडबाधित रुग्णाची पूरक चाचणी आहे. ==>
होय, ती कोविडची निदान चाचणी झल्यानंतर केली होती - Test cost him 8000-10000 approx ,
त्यच्या पत्नीला clotting मुळे admit करावे लागले होते.

कोविडमुळे clotting वेगाने होते का?

Pages