करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.
 या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१.	 हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२.	कोविड१९  घडामोडी  : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)
वरील दुसर्या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.
या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !
एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !
अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.
मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
 
,<<कॅरडीएक एंझाइम्स वाढले
,<<कॅरडीएक एंझाइम्स वाढले आहेत>>
ओह! पण तुमची ही टेस्ट का केली?
काळजी घ्या, लौकर बरे होण्यास शुभेच्छा.
माझी लक्षणे ब्रेठलेसनेस ऑन
माझी लक्षणे ब्रेठलेसनेस ऑन एक्झर्शन होती
दुसरे ताप , अंगदुखी तेंव्हा नव्हते
तीन दिवसांपासून हार्ट रेट 130 इ असतो
म्हणून केली
जे होतंय ते कोविड डेंग्यू की कार्डिअक असे लक्षात घेऊन ते काम करत आहेत
डेंग्यू ची पण साथ आहे.
डेंग्यू ची पण साथ आहे.
Heart beat rate लवकर कमी झाला पाहिजे
श्वास घेण्यास त्रास होत आहे तो कमी झाला पाहिजे
तुम्ही टेंशन घेवू नका.
होईल सर्व व्यवस्थित
ब्लॅक कॅट, काळजी घ्या
ब्लॅक कॅट, काळजी घ्या.विश्रांती मध्ये तडजोड करू नका.
स्ट्रेस फ्री राहण्यासाठी
स्ट्रेस फ्री राहण्यासाठी विनोदी सिरियल किंवा सिनेमे बघा.किंवा तुमच्या आवडीची गाणी ऐका.
रिपोर्ट विषयी बिलकुल विचार करू नका.ते तुमच्या डॉक्टर वर सोपवा
Hi black cat please do stress
Hi black cat please do stress test and ECG . Best wishes.
स्ट्रेस टेस्ट नॉट पोसीबील
स्ट्रेस टेस्ट नॉट पोसीबील
लेग फ्रॅक्चर्स
Worried about your heart.
Worried about your heart.
ब्लॅककॅट , निदान लवकर होऊन
ब्लॅककॅट , निदान लवकर होऊन तुम्हांला बरे वाटो!
पनवती लागली राव
पनवती लागली राव
घरात माणसे 3 , एक मी , मला अगदी पांढरा शुभ्र शर्ट आणला , जो मी कधीच घालत नाही
मुलीला एक टेबल आणले , तर तेही आणणार्याने पूर्ण पांढरे आणले , त्यावर एक दुसरा कुठला स्पॉटदेखील नाही आहे
लोक काय अडाणी आणि भिकारडे असतात , अरे एम बी बी एस दोक्तर रोज पांढरे बेड , पांढरे लिनन , पांढऱ्या गोळ्या , पांढरे पेपर ह्यातच असतो , आताच माझ्या समोरचा रुग्ण गेला त्याला पांढरेच घातले आहे. मग त्यांच्या घरात बाकी वेळेसाठी इतर रंगांच्या वस्तू कुणी आणल्या तर बिघडले कुठे , चाळिशीतला डॉकटर आणि शाळकरी मुलगी ह्यांना अगदी आवर्जून एकाच वेळी दोन पांढऱ्या वस्तू देण्यामागचा काय पर्पज ?
मी त्याच वेळी बोललो होतो , पनवती लागणार , शेवटी टेबलावर एक दिवस रात्री करण अर्जुनचा की राम लखनाचा व्हिलन विधवेवर रंग उडवतो तसे त्यावर स्केच पेनने रेषा ओढल्या ,
टेबल ताबडतोब हलवायला सांगितले, ते सकाळी सुताराने नेले.
तोवर दुपारी माझा ब्रेथलेसनेस वाढला आणि मी दुपारी लंच अवर्समध्ये तपासण्या केल्या , ते एडमिशन बोलले , मी चार पर्यंत ओपीडी केली आणि मग एडमीट झालो
बोकलतच्या धाग्यावर कॉपी करतो
बोकलतच्या धाग्यावर कॉपी करतो
गेला गेला म्हणता म्हणता डोकं
गेला गेला म्हणता म्हणता डोकं वर काढणारा हट्टी राक्षस आहे हा कोविड. लक्षणं अंगावर काढू नका.
You will be seriously missed BLACKCAT. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
भावपूर्ण श्रद्धांजली !
भावपूर्ण श्रद्धांजली !
<<कॅरडीएक एंझाइम्स वाढले आहेत>>
असे त्यांनी आधी लिहिले होते. अधिक काही समजले नाही.
पण जो काही आजार झाला असेल त्याचा हृदयावर परिणाम झालेला दिसतोय.
Pages