कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतीश
होय. अनेक रक्तवाहिन्यात गुठळ्या होऊ शकतात. त्याचा अंदाज येण्यासाठी ही चाचणी असते.

कुंतल

या चाचणीचा निर्णय पूर्णपणे संबंधित डॉ नी घ्यायचा असतो. साधारणपणे जे रुग्ण रुग्णालयात भरती होतात, त्यांची ही चाचणी सुरवातीलाच गरजेनुसार केली जाते.

सध्या या आजाराच्या निदानासाठी जो नाकातील स्वाब घेतात ती प्रक्रिया रुग्णांसाठी काहीशी त्रासदायक ठरते. मध्यंतरी काही कार्यालयात तेथील संपूर्ण कर्मचारी वर्गाचे स्वाब घेतले गेले. त्यातील काहींनी त्या प्रक्रियेनंतर दिवसभर डोके दुखत होते अशी तक्रार केली.

आता यावर तोडगा म्हणून रुग्णाच्या लाळेची तपासणी हा एक पर्याय पुढे आलेला आहे. नाकाच्या तुलनेत लाळेची तपासणी ही कमी संवेदनक्षम आहे. सध्या त्याचे काही चाचणी संच परदेशात वापरात आलेले आहेत. यातून आभासी नकारात्मक निष्कर्ष काहीसे अधिक येऊ शकतात हेही खरे. तूर्त चाळणी चाचणी म्हणून ती ठीक आहे.

यासंदर्भात इस्राईलमध्ये अजून एक संशोधन चालू आहे. त्यात रुग्णांनी फक्त एक गुळणी डिशमध्ये गोळा करायची आहे. आणि मग spectral तंत्रज्ञान वापरून केवळ एक सेकंदात रोगनिदान करता येईल अशी चाचणी विकसित होत आहे.

मागील भागात ( https://www.maayboli.com/node/75123) हा प्रश्न (प्र. क्र. १४) आलेला आहे. त्यावर आता अधिक संशोधन झाल्याने त्याचे विस्तारित उत्तर इथे देतो.

प्र. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, हे खरं आहे का ?

होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला ( ACE२) चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो.
रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.

अधिक संशोधनातून खालील भर पडली आहे :

दम्याचे रुग्णांना अजून एक फायदा होतो. हे रुग्ण तोंडावाटे steroids चा फवारा घेत असतात. या औषधामुळे श्वसनमार्गात ACE२ एन्झाइमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अशा लोकांना कोविड झाल्यास तो बऱ्यापैकी नियंत्रणात राहतो.

मात्र धूम्रपानी व्यक्तींत वरील एन्झाइमचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे त्यांचा कोविड अधिक वाईट होऊ शकतो. तसेच अशा व्यक्तींनी धूम्रपान सोडल्याचेही सुपरिणाम दिसले आहेत.

उच्चरक्तदाबावरील ACE Inhibitors आणि ARB या औषधांमुळे कोव्हीडची तीव्रता वाढते असा काहींचा दावा आहे, तर काही म्हणतात यात तथ्य नाही. एप्रिल /मे मध्ये तर ARB Losartan या औषधाचा कोव्हीडसाठी उलट फायदा होऊ शकतो या अपेक्षेने मीनेसोटा विद्यापीठात त्याची कोव्हीड रुग्णांवर चाचणी सुरू झाली असे वाचण्यात आले, पण पुढे काय झाले कळले नाही.
(मी डॉक्टरांच्या सल्ल्याने ARB बदलून Beta Blocker सुरू केले त्या काळात.)

आता इतके महिने उलटून गेल्यावर उच्चरक्तचापाच्या या दोन प्रकारच्या औषधांच्या कोव्हीडवरील संबंधांविषयी अधिक माहिती, निष्कर्ष उपलब्ध झाले आहेत का?

मानव,
तो बऱ्यापैकी घोळदार आणि काथ्याकूट झालेला विषय आहे. सवडीने खोलात जाऊन बघतो.

मानव,
ACEI आणि ARB आणि कोविड >>>>

उच्च रक्तदाबावरील ही औषधे आणि कोविड यासंदर्भात वैद्यकात बरीच उलटसुलट मते व्यक्त झाली आहेत. महासाथीच्या सुरुवातीस रुग्णांची ती औषधे बदलावीत असा सूर होता. पण आता नऊ महिन्यांनंतर चित्र पालटल्यासारखे दिसते आहे.

आता बऱ्याच वैद्यक संघटनांनी, ती औषधे जर पूर्वीपासून चालू असतील, तर तशीच ठेवावीत असे मत दिले आहे. या संदर्भात खालील निरीक्षणे उपयुक्त ठरली :

१. ज्या रुग्णांमध्ये पूर्वीची ती औषधे कोविड झाल्यावरही चालू ठेवली, त्यांच्यात हा आजार गंभीर झाल्याचे काही आढळले नाही.
२. उलट कोविडमध्ये रक्तवाहिन्यांचे अस्तर आणि गुठळी प्रक्रिया यासंदर्भात या औषधांचे काही फायदेच होतील, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. अधिक संशोधन चालू आहे.

३. मात्र, जर रुग्णात रक्तदाब नॉर्मलचे खाली जात असल्यास अथवा मूत्रपिंडाचे कार्य बिघडत असल्यास ती थांबवावीत.

धन्यवाद डॉक्टर.
वरील तिसरा मुद्दा हा कोव्हीड लागण झाल्यावर तसे होण्याची शक्यता आहे की त्याचा कोव्हीडशी काही संबंध नाही?

मानव
मुद्दा क्रमांक 3 अर्थात covidमुळे रुग्णालयात भरती झाल्यानंतरचाच आहे. तेव्हा शरीरात बऱ्याच उलथापालथी होऊ शकतात आणि म्हणून या दोन मुद्द्यांवर बारकाईने नजर ठेवावी लागते.

एरवी निव्वळ उच्च रक्तदाब असताना डॉक्टरांनी औषधांचे डोस व्यवस्थित ठरवलेले असतात. त्यामुळे रक्तदाब नॉर्मलचे खाली जाण्याचे प्रसंग उद्भवत नाहीत.

ओके, परत एकदा धन्यवाद. तूर्तास मी परत ARB सुरू करण्याचा विचार करत नाही.

>>>Scientists discover tiny antibody that completely neutralises novel coronavirus
The researchers set out to isolate the gene for one or more antibodies that block the SARS-CoV-2 virus, which would allow for mass production.>>
Scientists, including one of Indian origin, have isolated the smallest biological molecule to date that they say completely and specifically neutralises the SARS-CoV-2 virus which causes COVID-19.

Ten times smaller than a full-sized antibody, the molecule has been used to construct a drug — known as Ab8 — for potential use as a therapeutic and prophylactic against SARS-CoV-2, according to the study published in the journal Cell.

>>>.उच्चरक्तदाबावरील ACE Inhibitors आणि ARB या औषधांमुळे कोव्हीडची तीव्रता वाढते>>> यात टेल्मिकाईंड ४० एम जी येतात का?

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
कोविड विरोधात सध्या ज्या ३ प्रकारच्या लसींचे प्रयोग चालू आहेत त्यांचा तुलनात्मक तक्ता :

vacc comp.jpg

ऑक्स्फर्ड लशीची चाचणी पुनः चालू झाली आहे. > छान बातमी! पण नक्की ज्या कारणासाठी थांबवली होती आणि आता परत सुरु केली त्यामागचे कारण काय

रावी ,

पण नक्की ज्या कारणासाठी थांबवली होती आणि आता परत सुरु केली त्यामागचे कारण काय >>>

लस टोचलेल्या एका स्वयंसेवकाला “बराच न समजणारा त्रास” झाला होता म्हणून ती थांबवली होती.
त्यावरील संशोधन समितीने तो त्रास गंभीर/दखलपात्र नसल्याचा अहवाल दिला.>>>पुन्हा चालू.

यात घाबरण्याचे कारण नाही. असे प्रयोगांत अपेक्षित असते. लशीमुळेच गंभीर त्रास झाला, असे पूर्ण सिद्ध झाले तरच प्रयोग थांबवतात.

त्यावरील संशोधन समितीने तो त्रास गंभीर/दखलपात्र नसल्याचा अहवाल दिला.>>>पुन्हा चालू. > ओके Happy . ( जगभरात लोकं डोळे लावून बसले आहेत, त्यामुळे दबावामुळे पळवाट शोधून काढली तर नसेल अशी कुशंका डोकावली होती. आता शंकानिरसन झाले. ) एकुणच छान माहिती मिळत्ये धाग्यातून. धन्यवाद.

गेल्या चार दिवसांत Ab8 या नव्या संशोधन- उपचाराबद्दलचे ढकलपत्र बरेच फिरलेले दिसते. म्हणून त्याबद्दलची सद्यस्थिती :

१. ही सूक्ष्म आकाराची अँटीबॉडी आहे.
२. ती मानवी रक्तातूनच वेगळी काढून विकसित केली आहे.

३. ती सार्स-२ ला मारक आहे.
४. तूर्त तिचे उंदीर व अन्य प्राण्यांवरच प्रयोग झालेले आहेत. त्याचे निष्कर्ष आशादायक आहेत.

५. ती औषध रुपाने शरीरात गेल्यावर मानवी पेशींना इजा करणार नाही. त्यामुळे तिचे दुष्परिणाम कमीत कमी होतील.
६. तिच्या सूक्ष्म आकारामुळे हे औषध नाकाद्वारेही देता येऊ शकेल.

७. तिचा रोगप्रतिबंधक म्हणूनही उपयोग होऊ शकेल.

मानव,
त्यांनी inhalation इतकेच म्हटले आहे.
कदाचित नाकात थेंबही असू शकेल.
पुरेसे विकसित झाल्यावरच स्पष्ट होईल.

छान. म्हणजे लसीपेक्षा सुरक्षीत वाटतेय हे.
केव्हा येईल वाट बघावी लागेल.

१०० हजार कोटी मॉलिक्युलमधून तो ab8 शोधुन काढला आहे.एकदम प्रॉमिसिंग वाटत आहे.२०२१ च्याआधी हुमन ट्रायल घ्यायला सुरु झाले तर योग्य ठरेल.

अभिनंदन !

‘टाटा’ समूह आणि CSIR-IGIB यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोविड१९ च्या निदानासाठी भारतीय बनावटीच्या स्वस्तदर चाचणीला सरकारी मान्यता मिळाली आहे. तिचे शास्त्रीय नाव CRISPR test असून ‘फेलुदा’ या नावाने ती ओळखली जाईल.

तिची वैशिष्ट्ये:
१. RT-PCR च्या समकक्ष अचूकता
२. कमी वेळात निष्कर्ष
३. स्वस्त
४. सुलभ प्रक्रिया

(https://www.livemint.com/companies/news/tata-group-to-launch-india-s-fir...)

बहुतेक लास्ट शिप या मालिकेत दाखविले होते की ज्या मार्गाने म्हणजे जसा आता कोरोना पसरतो आहे त्याच मार्गाने औषध पसरविले जाते आणि मग साथ आटोक्यात येते. तसे काही व्हावे अशी इच्छा फार आहे मात्र आयुष्य फिल्मी नसते ना.

कोनातून बरे झालेल्या लोकांना होणाऱ्या त्रासाद्दल लागल्यात काही माहिती आली आहेच.
ही बातमी मी आता वाचली.

https://indianexpress.com/article/india/covid-19-long-road-to-recovery-f...

Pages