समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................
त्यापेक्षा शहीद आणि हुतात्मा
त्यापेक्षा शहीद आणि हुतात्मा यांचीच व्याख्या आणि व्याप्ती वाढवून युद्धात/चकमकीत/हल्ल्यात देशासाठी बलीदान देणारे याचा समावेश करावा.
अन्यथा पुढे ए मेरे वतन के लोगो गाण्यावर आक्षेप, हुतात्मा चौक, शहीद भगत सिंह कॉलेजचे नाव बदला सगळे सुरू होईल.
मानव +१
मानव +१
काळानुसार शब्दाचा अर्थ बदलणं/ अधिक व्यापक होणं असं होऊ शकतंच ना. 'देव, देश अन धर्मासाठी' प्राणत्याग करणारे वीर त्या त्या काळात हुतात्मेच.
सहमत
सहमत.
शादी ह्या मूळ फारसी शब्दाचा अर्थ आहे आनंदी क्षण/सोहळा. पण आपण त्याचा अर्थ बदलून फक्त लग्नाला लावला (इथे व्यापकता कमी केली). असे कित्येक शब्द आपण मूळ अर्थापेक्षा वेगळ्या अर्थछटा घेऊन वापरतो. मग ह्या शहीद आणि हुतात्मा (शब्दांनी) काय घोडं मारलंय?
सहमत. बरोबर.
सहमत. बरोबर.
......
एक अन्य शंका.
एखाद्याने आपल्याला उपयुक्त माहिती सांगितली तर त्यावर उत्तर म्हणून लिहिताना माहितीसाठी धन्यवाद की माहितीबद्दल ?
कुठले योग्य वाटते
माहितीबद्दल आभारी आहे जे
माहितीबद्दल आभारी आहे हे जास्त बरोबर वाटतं. माहितीसाठी किंवा बद्दल धन्यवाद यापैकीच निवडायचं असेल तरी मी बद्दल निवडेन.
माहितीबद्दल की माहिती
माहितीबद्दल की माहिती दिल्याबद्दल?
की दोन्हीही बरोबर?
ह पा धन्यवाद
ह पा धन्यवाद
मानव
मानव
बहुतेक दोन्ही चालेल.
हे एक उदा:
बद्दल
[अ. बदल् = ऐवजीं] ऐवजी; मुळें; करितां; साठीं. “पाउसाबद्दल हत्ती घोडे उण्टें बहुत मेलीं”
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%...
ह पा, दाता हे साधारणपणे
ह पा, दाता हे साधारणपणे वर्तमानकाळवाचक आहे. देणारा. ( पण अर्थात व्याकरणाची ऐशी तैशी. तरी पण अर्थ वाही /वाहू शब्द कसेही आपलेसे केले तरी ते भाषेच्या दृष्टीने चांगलेच)
दानी हे विशेषण कधीही आणि कोणालाही लावता येईल.
हा शब्द हिंदीत चांगलाच प्रचलित आहे. मराठीला थोडा नवखा. पण रुळवायला काय हरकत आहे?
आणि अन्नदाता, सौख्यदाता ह्या मध्ये दात्याने काही तरी दिले आहे. बलिदात्याने अर्थात बळी दिला आहे. पण इथे अर्थ स्पष्ट होत नाही. स्वप्राणांचा बली असे स्पष्ट व्हायला हवे.
एक वास्तवदर्शी लेख : https:/
एक वास्तवदर्शी लेख : https://www.aksharnama.com/client/article_detail/5876
"आज मालक त्यांच्या मर्जीतला संपादक बसवतो, त्याचा लिखाणाचा दर्जा कसा आहे, तो समाजात किती प्रतिष्ठित आहे, याची ‘गणना’ केली जात नाही. त्याहीपेक्षा जाहिरात मिळवण्याचे कौशल्य तपासले जाते. त्यामुळे संपादक-पदाची पूर्वीसारखी प्रतिष्ठा राहिली नाही, हेही सत्य आहे. त्याचप्रमाणे, नोकरी टिकवण्यासाठी मालकांची मर्जी सांभाळण्याचे कामही संपादकांनी स्वीकारल्यामुळे पदाची अवहेलना झाली."
हीरा, तुम्ही सांगितलेला
हीरा, तुम्ही सांगितलेला काळाचा फरक रोचक आहे.
अजून एक फरक अर्थछटेत जाणवला. तो म्हणजे दाता हा एक किंवा अनेकवेळा दान करू शकतो. तो दान देण्याच्या वेळीच दाता असतो. दानी हा सहसा अनेकवेळा दान करतो/करते. त्यास दानाची वेळ सोडून इतर वेळीही दानी म्हणून संबोधता येते. एकदाच दान करणाऱ्याला दानी म्हणून संबोधले जाण्याची शक्यता कमी.
आता बलिदान हे एकदाच देता येते. पण ते दान 'केल्यानंतर' संबोधण्यासाठी आपल्याला शब्द हवा आहे, केवळ दान करताना नको. यामुळे दाता की दानी ह्या दोन्हींमध्ये गोंधळ झाला. परंतु इतर भाषांतून उसने घेतलेल्या इतर काही शब्दांप्रमाणे बलिदानी हा शब्द हिंदीतून घेणे सोपे आहे. त्यामुळे तुमच्याशी सहमत.
ह.पा. + १
ह.पा. + १
आणखी म्हणजे बली कशाचाही देता येतो. कोंबडी, कोहळा,बकरा वगैरे. प्राणांचा बळी हा अर्थ स्पष्ट व्हायला हवा. हुतात्मा हा शब्द त्यातल्या त्यात योग्य वाटतो. आत्म्याचे हवन केलेला अशा स्पष्ट अर्थामुळे. अर्थात बलिदान हा शब्द मराठीत चांगलाच रूढ आहे. सुरुवातीला ते एक रूपक होते पण आता त्याला रूढार्थ चिकटला आहे.
बरोबर. इथे आत्मा ह्या शब्दाचा
बरोबर. इथे आत्मा ह्या शब्दाचा अर्थ 'स्वतः' असा घ्यावा. कारण नाहीतर आत्मा हा 'न च एनं दहति पावक:', म्हणजे पुन्हा विरोधाभास व्हायचा.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/lokrang/map-changes-rich-in-oil-daniel-yergin-t...
या लेखात ...
"हे २००६ साली प्रकाशित पहिल्या पुस्तकापासून माझ्यासारखा परात्पर लेखकदेखील सांगत आला आहे. तेव्हा या विषयास वाहून घेतलेले एíगन यांच्यासारखे अभ्यासक हे नमूद करत असतील तर ते या मांडणीला पुष्टी देणारे ठरते."
.. परात्पर चा अर्थ 'अत्यंत श्रेष्ठ; उच्च (ईश्वर).' असा आहे (https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4...)
एखादा लेखक स्वतःलाच परात्पर म्हणू शकतो ??
की लेखकाला अन्य कुठला शब्द वापरायचा होता आणि हा चुकून पडला आहे ?
लोकसत्ता app
लोकसत्ता app
थॅनोस लोकसत्तेत काम करत असावा
थॅनोस लोकसत्तेत काम करत असावा
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh/india-regrets-accidental-firing-of-...
संकेतस्थळावर बरोबर आहे. एडिट केलं?
हो, app मध्येही बदलल्याचं
हो, app मध्येही बदलल्याचं दिसतंय आता. इथलं वाचलं की काय?
इस्लाम हाच भारताचा खरा शत्रू;
इस्लाम हाच भारताचा खरा शत्रू; भिडे गुरुजी पुन्हा बरगळले
औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या ही इस्लाम धर्माच्या पोटतिकडीने केली असल्याचं संभाजी भिडे म्हणाले.
https://marathi.abplive.com/news/maharashtra/pune-sambhaji-bhide-controv...
विषय स्फोटक आणि भरपूर वाचक खेचणारा आहे. इथे तरी व्यवस्थित लिहायचे !
सध्याच्या गरमागरम चर्चांमुळे
स्पेलिंगची चूक झाली असेल असा
स्पेलिंगची चूक झाली असेल असा माझा ग्रह झाला होता. पण अधिक चौकशी करता खालील माहिती मिळाली :
https://www.rajasthansemen.com/
उलटा धक्का बसला म्हणजे हा!
उलटा धक्का बसला म्हणजे हा!
हा हा. भारीच.
हा हा. भारीच.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/navneet/grammar-of-the-marathi-language-marathi... : लेखाचे शीर्षक पहा:
भाषासूत्र : निर्थक शब्दयोजना, निर्थक अनुस्वार
भाषाविषयक धाग्याला सुद्धा निरर्थक शीर्षक !!
काय म्हणावे याला?
( शब्दकोशात जाऊन निर्थक हा शब्द नसल्याची खात्री करून घेतली)
छापील आवृत्तीत निरर्थक आहे.
छापील आवृत्तीत निरर्थक आहे.
जालीय आवृत्तीत कसं बदललं?
जालीय आवृत्ती ही जालीम
जालीय आवृत्ती ही जालीम आवृत्ती आहे. निर्थक असं न छापल्यामुळे छापील आवृत्ती वाचल्याचं सार्थक होईल.
जालीम आवृत्ती
जालीम आवृत्ती
यामध्ये भरपूर जालीय जादू होत असतात !
काल तुम्ही ती लिंक दिलीत
काल तुम्ही ती लिंक दिलीत तेव्हा ही चूक दिसली होती. पण आता या अशा चुकांचं काही वाटेनासं झालेलं आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही
सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही करू नका हे काम, आयुष्य खूप अवघड होईल!
https://www.loksatta.com/astrology/surya-grahan-2022-not-do-these-work-d...
अरे बापरे !
काय खरं नाही आयुष्याचं .....
कायच्या काय लिहिलंय तिथे!
कायच्या काय लिहिलंय तिथे!
कुठून पडत आहे?
शनिचरी अमावास्या त्याच दिवशी 'पडत आहे'
Pages