समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................
हरे राम!
हरे राम!
हरे राम!
.
शीर्षकातील अक्षम्य चूक :
शीर्षकातील अक्षम्य चूक :
Put in isolation last week, Ghaziabad girl tests positive fo ..
Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/92070871.cms?utm_source=c...
https://timesofindia.indiatimes.com/city/ghaziabad/girl-isolated-last-wk...
https://timesofindia.indiatimes.com/city/ghaziabad/girl-isolated-last-wk...
खाली पूर्ण बातमी :
have tested negative for the zoonotic disease, officials sa ..
सुरुवातीस स्पष्ट करतो, की
सुरुवातीस स्पष्ट करतो, की वरील बातमी फेकाफेकी नाही ! त्यामध्ये शास्त्रीय तथ्य आहे.
जेव्हा मद्यपानामुळे विषबाधा होते तेव्हा बऱ्याचदा अशा मद्यपींनी methanol हा घटक असलेली गावठी/ भेसळयुक्त दारू प्यालेली असते. मौजमजेसाठी आपण जे ‘अधिकृत’ मद्यप्राशन करतो ते ethanol असते.
methanol हे अतिशय घातक रसायन आहे. त्याने विषबाधा झालेला रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा सुरुवातीचे उपचार म्हणून इथेनॉलयुक्त मद्य भराभर देता येते. यामुळे मिथेनॉलने शरीरावर होणारे दुष्परिणाम तात्पुरते रोखता येतात. हा उपचार बाधेनंतर लवकरात लवकर केल्यास उपयुक्त ठरतो.
अर्थात, यानंतर डायलिसिस आणि अन्य पूरक उपचार करावे लागतात, जेणेकरून मिथेनॉलचा पूर्णपणे निचरा होतो.
स्त्री व पुरुष अशा सर्व
स्त्री व पुरुष अशा सर्व रक्तदात्यांना विचारला गेलेला प्रश्न:
गरोदर आहात का ?
स्पष्टीकरण इथे:
https://www-foxnews-com.cdn.ampproject.org/v/s/www.foxnews.com/world/bri...
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/lifestyle/health-news-corona-short-lived-due-to...
या बातमीचं हेडर वेगळं आहे आणि बातमी च्या मजकुरात ते एका ठिकाणी ओमीक्रॉन दीर्घकाळ टिकला असं पण म्हणतायत.कहना क्या चाहते हो भाई
बंड्या - फो फेसबुकावरून साभार
बंड्या - फोटो फेसबुकावरून साभार
वरील दोन्ही भारीच.!
वरील दोन्ही भारीच.!
तिन्ही भारी आहेत!
तिन्ही भारी आहेत! प्रेग्नन्सीवाल्या बातमीत चूक नसली तरी ती रोचक
आहे!
अ ग दी !
अ ग दी !

......
'पुरुष व गरोदर' या मुद्द्यावरून मला महाराष्ट्र आरोग्य विभागाने बऱ्याच वर्षांपूर्वी केलेले एक सुरेख भित्तीपत्रक आठवले. कुटुंबनियोजनाचे महत्त्व पटण्यासाठी ते केले होते.
त्यामध्ये 9 वा महिना लागल्यागत मोठे पोट असलेला पुरुष दाखवला होता व त्याच्याखाली अशी ओळ होती :
"पुरुषांवर जर अशी वेळ आली असती, तर त्यांनी कुटुंब नियोजनाचा नक्कीच गांभिर्याने विचार केला असता !!"
प्रेग्नन्सीवाल्या बातमीत चूक
प्रेग्नन्सीवाल्या बातमीत चूक नसली तरी ती रोचक Wink आहे! >> +१
लोकसत्तेचा थोडा जुना अंक
लोकसत्तेचा थोडा जुना अंक हाती लागला. त्यात नावीन्यता असा शब्द दिसला. तो खटकला म्हणून शोधले तर तो प्रचलित होतो आहे. नाविन्यता परिषद असे शासकीय संस्थेचे नावही आहे.
य हा प्रत्यय लावून बनवलेल्या भाववाचक नामाला आणखी ता जोडल्याने काय होते?
होय,
होय,
व्याकरणदृष्ट्या पटत नाही.
प्रेग्नन्सीवाल्या बातमीत चूक
प्रेग्नन्सीवाल्या बातमीत चूक नसली तरी ती रोचक Wink आहे! >> +१
आज एक टीव्ही9 ची क्लिप
आज एक टीव्ही9 ची क्लिप व्हायरल झालीये
त्यातली निवेदिका राज्यपाल कोशारीना झाली मुख्यमंत्र्यांची लागण असे बोलत आहे
आई ग ....
आई ग ....
हसून घ्या मग. काय करता.
मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करत
मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ खडसे यांनी वेगळी चूल मांडत शिवसेना आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शह दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/maharashtra-political-cris...
पत्रकारांची तारांबळ पाहता २ एकनाथांच्या आडनावांचा गोंधळ क्षम्य म्हणायचा !
काल एका वाहिनीने कॉंग्रेस
काल एका वाहिनीने कॉंग्रेस नेते बाळ ठाकरेंना भेटायला गेल्याचं सांगितलं म्हणे
वाचावे ते नवलच
वाचावे ते नवलच
"असं असतानाच राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला नियुक्ती द्यावी अशी मागणी एका शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केलीय. यासंदर्भातील पत्रच या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवलं आहे.
https://www.loksatta.com/trending/eknath-shinde-maharashtra-political-cr...
तापलेल्या राजकीय पर्यावरणात
तापलेल्या राजकीय पर्यावरणात असं काही चित्रविचित्र वाचलं की क्षणभर हास्याची लहर पसरते आणि मजा वाटते !
हे पहा
स्वप्नात अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स करणं म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हालाच अद्याप माहित नसलेल्या एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं असे नाही. हे फक्त तुमच्या जीवनातील एक विचित्र पैलू समजून घेण्याचा प्रयत्न आहे. याचा अर्थ तुमचं जीवन आणि विचार अधिक नियंत्रित आणि दृढ होऊ शकतात, असा याचा अर्थ आहे.
https://zeenews.india.com/marathi/spirituality/dreaming-about-sex-dreami...

नक्की काय म्हणायचेय यांना ?
हेहे
हेहे
भापो.
शेवटचा परिच्छेद इंग्लिश वरून थेट भाषांतर केल्याने 'बाय द हिमोग्लोबिन ऑफ द शुगर इन द कंट्री' झालाय फक्त.
अ ग दी.
अ ग दी.
(No subject)
सकाळपासूनच हरीश साळवे
सकाळपासूनच हरीश साळवे ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. हरीश साळवेंची फी खूप शोधली जात आहे. किंबहुना, साळवे हे देशातील सर्वात कठीण वकिलांपैकी एक मानले जातात आणि एक सामान्य समज आहे की त्यांनी घेतलेला खटला जिंकणे निश्चित आहे.
https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/n...
सर्वात कठीण वकिलांपैकी एक
????
कठीण आहे बुवा
बिनडोक भाषांतर करतात हे लोक.
बिनडोक भाषांतर करतात हे लोक.
बुलेटीनवर बुलेटीन काढण्याच्या
बुलेटीनवर बुलेटीन काढण्याच्या नादात ह्या सध्याच्या 'युद्धसदृश' (हल्लीच्या चुकीच्या वापरामुळे युद्धजन्य हा शब्द आधी आठवला होता) वातावरणात लष्कराच्या भाकर्यांचे फारच काम येऊन पडले आहे..
'कठीण कठीण कठीण किती पुरूष
'कठीण कठीण कठीण किती पुरूष हृदय बाई' , ह्यातले कठीण हृदय असेल या वकिल बाबूंचे . त्या बातमीत ह्यांची फीस खूप शोधली जाते असेही लिहिलेय. माझ्या डोळ्यासमोर हे वरचेवर केस जिंकून मिळालेले पैसे कुठेही टाकतात व बाकीचे लोक येऊन घरात टेबलखाली, सोफ्याखाली, पांघरणाखाली इ इ शोधताहेत असे आले.
केस जिंकून मिळालेले पैसे >>
केस जिंकून मिळालेले पैसे >> त्याउलट तिरुपतीला 'केस गमावून दान केलेले पैसे' अशी परिस्थिती असते.
बघा,
बघा,
अशा वृत्तांकनामुळे आपल्याला कसा वेगवेगळा कल्पनाविस्तार करायला मिळतो....
हर्पा,
हर्पा,
चला हवा येऊ द्या मधे एकदा कोर्टाचा गोंधळ दाखवणारे धमाल स्किट केले होते, त्यात वकिलाचा विग उडत जज्जच्या टेबलवर येऊन पडतो आणि जज्ज/कुशल बद्रीके विचारतो, 'ही तुमची केस आहे का ?'
@कल्पनाविस्तार
Pages