सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार तोच असे जरी मान्य केले तरी ह्या निमित्ताने चित्रपट दुनियेतील अनेक प्रघात समोर येत आहेत ज्यांचा संबंधित लोकांनी विचार करणे गरजेचे आहे. उदा: कंत्राटातील जाचक अटी-शर्ती. एखाद्या स्टुडीयोबरोबर ५ वर्षात ३ सिनेमे करणे. त्या दरम्यान इतर सिनेमे न करणे. इतर व्यवसायात एखाद्या व्यक्तीस काही व्यावसायिक त्रास होत असेल तर प्रभावी संघटना असते, "ओम्बडस्मन" किंवा निष्पक्ष "मिडीयेटर्स" असतात. तसेच अनेक फ्रिलान्सिंग व्यवसायात आर्थिक व्यवस्थापन कसे करावे ह्याचे काही ना काही प्रशिक्षण संघटनेमार्फत दिले जाते. चित्रपट जगात अशा व्यावसायिक पद्धतींचा आजही अभाव आहे असे सध्या वाचलेल्या बातम्यांवरून वाटले.
एकमेकांवर दोषारोप, चिखलफेक करण्यापेक्षा जे घडले त्यात सगळ्यांचेच नुकसान झाले, कलाकार घडवण्यात सिनेसृष्टीतील लोकांनी दिलेला वेळ्/श्रम/पैसा अल्प मोबदला (ROI) देवून गेला याची जाणीव या निमित्ताने सगळ्यांना व्हावी. सुशांतला श्रद्धांजली.

सुशांत गेल्याच वाईट तर खुप वाटलं... आत्महत्या जरी असं वाटतं असली तरी मुळात ती हत्याच आहे.. सहज मनात आलं, गंमत करून बघूया म्हणून कोण आत्महत्या करत नाही.. बरंच काही सोसलं असेल बिचार्याने..कारण फिजिक्स आणि ग्रह तार्याविषयी इंटरेस्ट असलेला माणूस असा अविचार कधीच करू शकत नाही...

यश मिळवणं सोप्पं आहे पण ते टिकवणं जास्त अवघडं आहे.. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुमचे मित्र कमी शत्रू जास्त वाढतं जातीलच. सुशांत तर बाॅलिवूड स्टार होता..हाय लाईफस्टाईल मेंटने ठेवणं आणि स्वतःच चार्म कायमं ठेवणं अशी आव्हाने प्रत्येक स्टारला असतात पण हे ग्लॅमर फसवं आहे..ड्रगसारखं चढतं जातं.. आणि ते मिळवण्यासाठी, वाढवण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जातो.. ( उगाच का, न्यूड, सेक्स क्लिप लिक होतात) आणि सुशांतच्या बाबतीत हेच झालं असणार तथाकथित बाॅलीवूड माफियांनी करिअरची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला, हिनवलं गेलं.. अपमानित केलं गेलं.. हे जे एक्स्ट्रा बर्डन देण्याचा कायम किंवा ट्रिगर करण्याचा काम ह्या लोकांनी चोख केलयं..

माणसाने नेहमी कुठल्याही परिस्थीतीत खुश राहावं...आहे ती परिस्थितीला सामोर जावं हाच तो उपाय..मागे अज्ञाशी बोलणं झालं होतं..भगवानदादाविषयी त्याने सांगितलं.. एक व्यक्ती रातोरात स्टार होतो..एका खोलीत राहणारा माणूस जुहुसारख्या ठिकाणी दहा खोल्याचा बंगलयात राहायला जातो आणि परत उतरती कळा आल्यावर परत एका खोलीत आनंदाने राहतो...ह्यालाच जगणं म्हणतात कदाचित .

हे सगळ्यांनाच जमतं असं नाही.. काही सहन करातात, स्विकारतात तर काही हाच मार्ग अवलंबतात..

आमच्या ऑफिसचीच गोष्ट सांगतो.. एक मॅनेजर होता ..मोठी कॅबिन, डामडौल, इज्जत वैगेरे सगळं होतं पण तो एका मेन डायरेक्टर्सच्या नेहमी विरोधी असायचा...अचानक हवा बदलली...तो विरोधी मेन झाला.. सगळी सूत्रे त्याच्या हातात गेली आणि ह्याचं डिमोशन झालं..लवाजमा, इज्जत, कॅबिन मानमुराद सगळं गेलं आणि त्यानेही सहन न होऊन आत्महत्या केली.. ही तर एका कंपनीची गोष्ट.. पण बाॅलिवूडबद्दल बोलायचं झालं तर तुम्हीच कल्पना करा..

इथल्या काही कमेंट्स अगदीच अनावश्यक वाटल्या. ज्यांना दुःख झालं नाहीये ते धागा उघडतात कशाला?

हा धागा श्रध्दांजलीचा आहे. Some of us who were and are his fans are mourning his passing. Please have the decency to let us mourn.

@ सनव माझ्या कमेंटबद्दल बोलताय काय? असं असेल तर आता माझी कमेंट मी मागे घेतो...

Sorry Physics मध्ये देशात 7वा नव्हे. Physics scholar होता .एका फ्रेंच महिलेची post असे काही आहे Instagram वर पाहिले

तो गेल्याच दुःख नाही झाल तर ते तुमच्याकडे ठेवा.
हा धागा श्रद्धांजलि चा आहे. त्याने क़ाय केले क़ाय नाही ते त्याच्यासोबत च गेले.
श्रद्धांजलि वहायची इच्छा नसेल तर अपमान तरी करू नका....
आणि हो , ज्या इंडस्ट्री मधील सो कॉल्ड व्यक्ति ला तो गेल्याच दुःख नसेल ना, त्याला एन्जॉय करायला सांगा ! निदान त्या व्यक्ति च्या आनंदाचे तरी कारण बनेल सुशांत....
तो इतका मोठा नव्हता, त्याने क़ाय म्हणे केले आहे , त्याचा धागा कशासाठी , असले प्रश्न पडलेल्या लोकांनी त्यांना हवे ते धागे काढ़ा उसवा क़ाय हवे ते करा.....
फ़क़त गेलेल्याचा अपमान करु नका

अरे बस करा... प्रेमात अपयशी झाल्यामुळे त्याने आत्महत्या केलीय... बाकीच्यांना दोष देणे बंद करा...

100

देशात रोज हजारो आत्महत्या होत असतील त्या मधील एक सुशांत
त्या साठी धागा काढून कसली श्रद्धांजली वाहतो. आहोत.
एक साधा अभिनेता ह्या पलीकडे काय ओळख आहे
काय समाज कार्य आहे.

एक साधा अभिनेता ह्या पलीकडे काय ओळख आहे
काय समाज कार्य आहे.
>>>>

माझ्यासाठी तरी सगळे चांगले अभिनेते, क्रिकेटर्स, गायक, लेखक संगीतकार, हे समाजकार्यच करत असतात. लाखो करोडो लोकांच्या आयुष्यात आनंद फुलवत असतात

सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर इस्राईलने देखील ट्विट केलं आहे. इस्राईलने सुशांतला आपला मित्र म्हटलं आहे. इस्राईलच्या परराष्ट्र खात्याचे जनरल आणि डेप्युप्टी डायरेक्टर Gilad Cohen यांनी सुशांतच्या आठवणीत एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, मी सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर संवेदना व्यक्त करतो. तो इस्राईलचा खरा मित्र होतो. तुझी नेहमी आठवण येईल. जेव्हा तो इस्राईलला आला होता. तेव्हा असं काही केलं होतं.'
....

वाचनात आलेली एक बातमी

एखाद्याच्या श्र्द्धांजली धाग्यावर येऊन त्याने काय मोठे योगदान दिले होते असे म्हणने मला रुचत नाही.

आणि दरवेळी कलाकारांच्या योगदानाची तुलना सीमेवरच्या जवानांशी करणे बिलकुल पटत नाही.

सीमेवरील जवानांसाठीही तितकेच दुःख होते पण त्यांना आपण पाहिलेले नसते, दृष्टीआड सृष्टी. अभिनेते, क्रिकेटर यांना पाहिलेले असते, एक व्यक्तिगत जिव्हाळा मनात असतो त्यामुळे चटका बसतो.

सुशांत किती वाईट होता याबद्दल बोलून उपयोग नाही, तो वाईट होता म्हणून त्याची आत्महत्या समर्थनीय ठरत नाही. धागा श्रद्धांजलीचा आहे, ज्यांना वाईट वाटले त्यांनी श्रद्धांजली वाहा, नसेल वाटले तर राहू द्या. उगीच गेलेल्याबद्दल वाईट बोलू तरी नका.

देशात रोज हजारो आत्महत्या होत असतील त्या मधील एक सुशांत
त्या साठी धागा काढून कसली श्रद्धांजली वाहतो. आहोत.
एक साधा अभिनेता ह्या पलीकडे काय ओळख आहे
काय समाज कार्य आहे. -----------
म्हणून च म्हणते आहे , infact सर्व च म्हणत आहेत नाही आवडत तर येऊ नका या धागयावर कोणी सक्ती केलिये का??? त्याने समाज कार्य क़ाय केले हे झापडे काढून सर्च करा म्हणजे समजेल.... तुमच्या त्या so called इंडस्ट्री फ्रेंड ला विचारु नका हा! ते काही नाही केले असेच सांगणार....
एक फु स -
कधीही कोणाच्या मृत्यु नंतर त्याचा अपमान करु नका. कोणाच्याच !
get well soon

माझ्यासाठी तरी सगळे चांगले अभिनेते, क्रिकेटर्स, गायक, लेखक संगीतकार, हे समाजकार्यच करत असतात. लाखो करोडो लोकांच्या आयुष्यात आनंद फुलवत असतात.>>>>

अगदी खरं. माणसं एखाद्या माणसाच्या मृत्यूने दु:ख्खी होतात, ती त्या माणसामुळे आपल्या आयुष्यात काही सुखाचे क्षण आले म्हणून. किंवा त्या व्यक्तीशी रिलेट करू शकतात स्वत:ला म्हणून. त्या माणसाने किती समाजसेवा केली किंवा बाहेर काय कर्तृत्व गाजवले म्हणून नाही.

त्यामुळे सीमेवरील जवानांशी तुलना करण्यात काहीच पाॅईंट नाही. त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि कृतज्ञताही आहेच. एखाद्या चित्रपट कलाकाराला श्रद्धांजली वाहिली म्हणून सैनिकांना विसरलो असं नाही होत.

आणि परफेक्ट कुणीच नसतं. एखादा माणूस विक्षीप्त, अव्यवस्थित आणि त्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट असू शकतो.

मरणान्ति वैराणि आणि गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये असे सामाजिक संकेत आहेत. कारण मृत व्यक्ती स्वत:ला डीफेन्ड करू शकत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर येउन त्यांचं कर्तृत्व काय किंवा तो माणूस कसा वाईट होता हे सांगणं फारच अप्रस्तुत आहे.

श्रद्धांजली चा धागा आहे ना ज्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहायची आहे त्या व्यक्ती बद्भल दोन शब्द लिहून वाहिली पाहिजे होती.
इथे काय घडल असे ह्या विषयी काहीच माहिती नसताना दुसऱ्या व्यक्तींना आरोपी बनवले जात आहे.
स्वतःच्या बिनबुडाच्या storya रचल्या जात आहेत.

सैनिकांचे मरण झाले तर आपण त्यांना वीरगती प्राप्त झाली म्हणतो कारण आपल्या कार्याच्या क्षेत्रात ते सर्वोच्च बलिदान असते, त्यात भूषण आहे. सैनिकांच्या वडिलांना असं घडणार हे अनपेक्षित नसते. अभिनेत्यांनी मरण पत्करणे अपेक्षित नसते. त्यामुळे अनपेक्षितपणे येणार्‍या भावना -जसे, हळहळ, प्रेम, आनंदाच्या आठवणी, श्रद्धांजली इ.- व्यक्त होण्यासाठी धागा आहे हे चांगलंच आहे.
मानवी आयुष्याचे एक मूल्य असते. प्रत्येक वेळी ते प्रेम, सेवा इ अमूर्त भावनिक मापात नाही मोजता आले तरी. सुशांतच्या कामामुळे सिनेमे अमुकढमुक कोटीपर्यंत व्यवसाय करत होते. अनेक घरात चूल पेटत होती ह्याला काही मोल आहेच की.

गेलाय तो आता . आणि एखादी व्यक्ती गेल्यावर तिच्या मृत्युचे असे धिंडवडे काढणं शोभतं का तुम्हाला सर्वांना ? श्रद्धांजली वहा आणि पुढे व्हा .

चीन बरोबर झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहीद झाले , त्या बद्दल कोणी धागा काढला आहे का ?
मला दिसत नाही म्हणून विचारले !

चीन बरोबर झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहीद झाले ,> >

ह्या धाग्यावर किमान सुशांतच्या गुणदोषांची चर्चा होतेय.

पण तुम्ही म्हणताय तसा धागा निघाला तर सैनिकाला श्रद्धांजली वाहिली जाईल की नाही माहीत नाही पण नेहरू ते मोदी चिखलफेकीला सुरवात होईल. सध्या इथले राजकारण जरा थंड पडलेय, त्यात नवी जान भरली जाईल.

चीन बरोबर झालेल्या चकमकीत आपले २० जवान शहीद झाले , त्या बद्दल कोणी धागा काढला आहे का ?
>>>>>

माझ्यासारख्या धागाकर्त्याने असा धागा काढला तर याला धागा काढायची घाई असाही अनुभव येतो ईथे. धागा काढणे चर्चेसाठी गरजेचे असते हे फॅक्ट कोणी लक्षात घेत नाही. मला अश्या प्रतिसादांनी फरक पडत नसला तरीही एखाद्या संवेदनशील विषयावर तो धागा केवळ मी कढला आहे म्हणून वाद नको या हेतूने मी बरेचदा टाळतो. आणि मग क्धीतरी या अश्या पोस्टही ऐकाव्या लागतात. पण अश्या पोस्ट लिहिण्यापेक्षा तो धागा तुम्हीही काढू शकला असता. वाद नाही घालत आहे. पण विचार करा.

पण नेहरू ते मोदी चिखलफेकीला सुरवात होईल.
+७८६
हा त्रास असतोच. ते सुरू झाले की मी धागा सोडतो. एखादी व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाला फेव्हर करतेय हे लक्षात येताच मी तिला त्या विषयापुरते सिरीअसली घेणे सोडून देतो. म्हणून त्या धाग्यातून आता काही मिळणार नाही म्हणून धागाही सोडून देतो. पण हे काही काळाने घडते. त्याआधी योग्य चर्चाही होते.

नाही म्हणजे सुशांत सिंग खूपच किरकोळ आहे , त्याच्या पेक्षा महत्वाचे जवान सीमेवर रक्षण करताना धारातीर्थी पडले !
म्हणून विचारले हो !
आणि शेवटी थोडा वाद विवाद होणारच , त्यात काय नवीन ?
मोदी आणि नेहरूंची तुलना होणारच आणि त्यात वावग काय ?

भारतासाठी प्रत्येक नागरिक महत्वाचा... मग तो सीमेवरील जवान असो वा मुंबईतील रहवासी... कोण किरकोळ कोण महत्वाचा हे कसे ठरवता???

वटवृक्ष, तुम्ही काढा धागा. किंवा हेमंत३३ तुम्ही काढा. नुसती बडबड काय कामाची? कृती करा. "तुम लढो हम कपडे संभालते है" असं करु नका.

गेल्या काही वर्षात सिने/टीव्हीवरील कलाकारांमधे बर्‍याच आत्महत्या झाल्या, प्रत्येकवेळी सर्वांनाच वाईट वाटले. अजुनही वाटते.
पण यावेळी कल्पनाही केला नव्हता असा लोकांचा उद्रेक झालाय. यावरुन तो लोकांना प्रचंड जास्त जवळचा वाटत होता, त्याच्याबद्दल अतिशय आपुलकी वाटत होती हे ढळढळीत दिसतंय ते जाणवत नाही का? प्रत्येकाची कारणे वेगळी असतील पण सत्य आहे हे.
त्यामुळे याबद्दल जास्त भावना व्यक्त केल्या म्हणजे गेलेल्या सैनिकांबद्दल भावना नाहीत असं समजण्याची चूक करु नका. एकेक सैनिक म्हणजे एकेक कोहिनुर हिरा असतो हे कोणीच नाकारणार नाही.

काढा धागा, लिहा प्रत्येक सैनिकाबद्दल लेख. खुप मोठे काम कराल तुम्ही. नाहीतर नुसती वायफळ बडबड समजुन दुर्लक्षच करतील सगळे.

कोण किरकोळ कोण महत्वाचा हे कसे ठरवता???
>>>>

समाजासाठीचे योगदान काय आहे यावर ठरवले जाते.

म्हणजे एखादा कलाकार समाजाला काहीही योगदान देत नसतो. तो केवळ आपला व्यवसाय करत असतो. मग तो सुशांत असो वा शाहरूख, असो. लता मंगेशकर असो वा पुल देशपांडे, असोत. सचिन तेंडुलकर असो वा दादासाहेब फाळके.असोत..
मुळात कलाकारांना भारतरत्न का दिले जाते हे सुद्धा अनाकलनीय आहे... खेळाडू जे जगभरात देशाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांना देत नाहीत. आणि जे कलाकार स्वत:च्या पोटापाण्यासाठी व्यवसाय करतात त्यांना मात्र देतात हे आणखी अचाट आहे.

Pages