सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खेळाडू अन सैनिकही फुकट काम करत नाहीत,
सैनिक , सेनापती ह्यांचे महत्व भारतात राजेशाहीपासून आहे , मुळात 1947 नंतर लोकशाहीच्या 4 पिढ्या झाल्या तरी राजांचेच आकर्षण संपले नाही , म्हणून सेनापतींचेही आहे

एक म्हण आहे कोणत्या भाषेतली ते नाही आठवत.. बहुतेक जापानी. जर तुझ्याकडे दोन पैसे असतील तर एका पैशाने अन्न विकत घे आणि दुसऱ्या पैशाचा एक गुलाब घे. अन्न तुला जगवेल आणि गुलाब तुला का आणि कसं जगायचं ते शिकवेल.
आपल्याकडे संस्कृत सुभाषित आहेच की
साहित्यसङ्गीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः ।
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥
सीमेवरच्या जवानाला पुलंच्या माझे खाद्यजीवन या लेखाने उभारी दिली. अनेक तरूणांनी लक्ष्य सिनेमा पाहून सैन्यात जायचे ठरवले. कलेचे सामाजिक योगदान मोठे आहे. म्हणून कलाकार हे खूप प्रभावशाली असतात. त्यामुळे अशा घटनेमुळे समाजमन ढवळून निघत असते.
सुशांतच्या आत्महत्येने अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे. दुःख तर आहेच आहे.
सीमेचे रक्षण करताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांविषयी कृतज्ञता आणि दुःख दोन्ही भावना आहेत. पण त्याचा उल्लेख या धाग्यावर अस्थानी आहे.

ऋन्मेष, कलाकार समाजाला जे देतो ते ईनडायरेक्ट असतं. किती जणांना त्यांच्या कलेने आनंद दिलेला असतो, उभारी दिलेली असते, डिप्रेशनमधुन वाचवलेलं असतं. ते कलाकारांना पण माहीत नसते व कदाचित त्यांच्या कलेचा जीवनात आनंद घेणार्‍यांना पण. पण ते असते. (यात पैसे मिळतात म्हणुन कलेच्या नावाने पाट्या टाकणारे येत नाहीत).
मन उदास असते, माणुस एकाकी असतो, माणसात असुन जेव्हा त्याला एकटेपणा वाटतो तेव्हा आवडीचे सिनेमे, खेळ पहातो, गाणी ऐकतो, पुस्तके वाचतो, इतर क्षेत्रातल्या कलेचा अस्वाद घेतो. त्यामुळे त्याला पुन्हा शक्ती मिळते. त्यामुळे ही एकप्रकारे सेवाच आहे. कलाकार 'चला आता मी सेवा करायला कलाकार बनतो' हे म्हणुन कलाकार बनायला जात नाही तरीही ती नकळत केलेली सेवाच असते. ती कला कित्येकदा मानसोपचार तज्ञांचे काम कमी करत असते.

दुसऱ्या कलाकार वर कोणतेच ठोस कारण माहीत नसताना त्यांच्या वर आरोप ह्या धाग्यावर झाल्या मुळे हा धागा श्रद्धांजली चा न राहता भरकटला.
कलाकार हे समाजातील महत्वाचे घटक आहे हे मान्य आहे पण कलेच्या नावावर आज कल काय काय चालत हे सिनेमा serial madhye दिसत आहे.
कसल्याच कथा नसलेले सिनेमे,अभिनयाच्या नावाखाली अंग प्रदर्शन सर्रास चालू आहे.
कलाकार,कथा लेखक,ह्या सर्व बाबतीत दर्जा पूर्ण घसरला आहे.
खरे कलाकार,उत्तम कथा लेखक आता तयारच होते नाहीत.
कलाकार हे स्वतःला आपण कोणी तरी खास वेगळे आहोत असे समजत आहेत.
तेवढे ते खास नाहीत.
त्या मुळे प्रेक्षक आणि कलाकार ह्यांच्या मध्ये दुरावा आहे.
हिंदी भाषेत काम करणारे जाहीर कार्यक्रमात सर्रास इंग्लिश बोलतात.
त्यांचे चाहते इंग्लिश बोलणारे नाहीत हिंदी बोलणारे आहेत ह्याची त्यांना जाणीव नाही.
त्या मुळे त्यांना जास्त किंमत देण्याची
गरज नाही

ऋन्मेष, कलाकार समाजाला जे देतो ते ईनडायरेक्ट असतं. किती जणांना त्यांच्या कलेने आनंद दिलेला असतो,
>>>>>

सुनिधी मी माझ्या आधीच्या पोस्टम्ध्ये हेच लिहिले आहे.
ती योगदानाची पोस्ट उपरोधाने लिहिली होती Happy

...

एक साधा अभिनेता ह्या पलीकडे काय ओळख आहे
काय समाज कार्य आहे.
>>>>
माझ्यासाठी तरी सगळे चांगले अभिनेते, क्रिकेटर्स, गायक, लेखक संगीतकार, हे समाजकार्यच करत असतात. लाखो करोडो लोकांच्या आयुष्यात आनंद फुलवत असतात
Submitted by ऋन्मेऽऽष on 20 June, 2020 - 01:01

कलेच्या नावावर आज कल काय काय चालत हे सिनेमा serial madhye दिसत आहे.
कसल्याच कथा नसलेले सिनेमे,अभिनयाच्या नावाखाली अंग प्रदर्शन सर्रास चालू आहे.

>>>>>>>>

सुशांतने यातले काही केले आहे का?
जाणून घ्यायला आवडेल

सुशांतने यातले काही केले आहे का?
जाणून घ्यायला आवडेल
खरे सांगायचे तर सुशांत हा अभिनेता आहे हे मला माहीतच नव्हत.
त्याची मालिका किंवा सिनेमा मी बघितलेला नाही.
त्याच्या आत्म्हत्ये नंतर सुशांत कोणी अभिनेता आहे हे माहीत पडले.

दामिनी नंतर मी चित्रपट गृहात जावून बघितलेला सिनेमा म्हणजे तानाजी.
आणि मला आवडणाऱ्या कलाकार मध्ये तो येत नाही.
थिएटर करून आलेले कलाकार मला आवडतात त्यांच्या अभिनय मध्ये प्रचंड ताकत आहे.
नाना पाटेकर,परेश रावल,अमरीश पुरी,ओम पुरी,अजय देवगण,इत्यादी ही लाईन बरीच मोठी आहे.
अभिनेत्री मध्ये तब्बू .आत्ताच्या .
ह्या पेक्षा जास्त संबंध आपला त्या क्षेत्राशी नाही.
मालिका मध्ये मराठी मालिकाच पसंत आहेत.
श्वास सारखे मराठी चित्रपट खूप आहेत ते आवडतात त्यांचा दर्जा नक्कीच उच्च आहे.

वटवृक्ष, तुम्ही काढा धागा. किंवा हेमंत३३ तुम्ही काढा. नुसती बडबड काय कामाची? कृती करा. "तुम लढो हम कपडे संभालते है" असं करु नका.>>>>>
अमाला ती पावर नाय !

थिएटर करून आलेले कलाकार मला आवडतात त्यांच्या अभिनय मध्ये प्रचंड ताकत आहे.
>>>>>

अभिनयात ताकद असून काय फायदा?

समाजासाठी योगदान नको का?

हेमंत सर, <दामिनी नंतर मी चित्रपट गृहात जावून बघितलेला सिनेमा म्हणजे तानाजी.
ह्या पेक्षा जास्त संबंध आपला त्या क्षेत्राशी नाही.>
तरीपण <कसल्याच कथा नसलेले सिनेमे,अभिनयाच्या नावाखाली अंग प्रदर्शन सर्रास चालू आहे.
कलाकार,कथा लेखक,ह्या सर्व बाबतीत दर्जा पूर्ण घसरला आहे.
खरे कलाकार,उत्तम कथा लेखक आता तयारच होते नाहीत.> हे कसं माहीत झालं?

हेमंत सर, अजय देवगणने कोणत्या नाटकात काम केलं?

हेमंत सर, तुम्ही कोणत्या मराठी मालिका बघता?

श्वास चित्रपट २००४ साली आला. गेल्या १५-१६ वर्षांत ला एकही चित्रपट त्याच्या तोडीचा वाटला नाही का?
श्वास चित्रपटात असं काय खास होतं?

आज छिछोरे पाहिला, पाहायचा राहिलाच होता, मुव्ही चांगला आहे आणि सुशांतची acting पण चांगली आहे. आत्महत्या करायला जाणाऱ्या मुलाचं तो कसं मतपरिवर्तन करतो हे दाखवलंय आणि असं असून तो स्वतः हे पाऊल उचलतो हे धक्कादायक वाटलं.
त्याचा एक डायलॉग खूप आवडला की, तुम्हारा रिझल्ट तय नही करता की तुम विनर हो या लुझर, ये तो तुम्हारी कोशीश तय करती है। काश, ये तुम वक्त पे समझ लेते सुशांत.....!

त्याचा एक डायलॉग खूप आवडला की, तुम्हारा रिझल्ट तय नही करता की तुम विनर हो या लुझर, ये तो तुम्हारी कोशीश तय करती है। काश, ये तुम वक्त पे समझ लेते सुशांत.....

डायलॉग लेखक लिहतात अभिनेता फक्त बोलतो.

सिनेमात दाखवली जाणारी व्यक्तिरेखा ही लेखक,निर्देशक उभे करतात.
त्या व्यक्तिरेखेत काम करणारा अभिनेत्याचा स्वभाव तसा नसतो.
सिनेमात गरिबांना मदत करणारे खऱ्या आयुष्यात गरिबांचा तिरस्कार करणारे असतात.
व्यसन मुक्ती चे संदेश देणारे अभिनेते खऱ्या आयुष्यात अट्टल व्यासणी असतात.
धार्मिक ,सोशिक स्त्री ची भूमिका करणारी अभिनेत्री व्यसनी,अनैतिक कामात आघाडीवर असतात.
सिनेमे बघून सुशांत चे व्यक्तिमत्व ठरवू नका.

सिनेमे बघून सुशांत चे व्यक्तिमत्व ठरवू नका.
>>>>
व्यक्तीमत्वाच्या विरुद्ध व्यक्तीरेखा साकारणे उत्तम अभिनेत्याचे लक्षण असते

मला आता जे लोक foul play बद्दल बोलत आहेत ते खरं वाटत आहे. म्हणजे बॉलिवूड माफियाने abettment of suicide तर केलंच पण मर्डर पण असावा का अशी शंका येते आहे. ट्विटरवर हा मुद्दा ट्रेंड होतोय.
पण तरी हे लोक इतके जास्त पॉवरफुल आहेत की खरं काय ते समोर येणं अवघड आहे. बॉलिवूडचे चित्रपट बघावे किंवा त्यातील 'स्टार्स'ची कोणतीही न्यूज वगैरे बघावी असं मात्र आता वाटत नाही. व्ही आर डन विथ इट.

बॉलिवूडचे चित्रपट बघावे किंवा त्यातील 'स्टार्स'ची कोणतीही न्यूज वगैरे बघावी असं मात्र आता वाटत नाही. व्ही आर डन विथ इट.

>>>> सहमत

@hemant33
सिनेमे बघून कोण त्याचा charecter ठरवत नाहीये ..
एक माणूस म्हणून पण तो चांगला होता ...तुम्ही movies बघत नाही किंवा त्याची death होण्या आधी ओळखत नव्हता म्हणुन दुसऱ्यांना ज्ञान नका देऊ..
जा त्याचा बद्दल अभ्यास करा मग बोला..
खूपबॉलीवूड च्या लोकांनीं पोस्ट केले असणार पण त्याच्या सोबत ज्यांनी कामकेलेआहे त्यांच्या पोस्ट रीड करा किंवा व्हिडिओस बघा माणूस म्हणुन कसा आहे कळेल.

बॉलिवूडचे चित्रपट बघावे किंवा त्यातील 'स्टार्स'ची कोणतीही न्यूज वगैरे बघावी असं मात्र आता वाटत नाही. व्ही आर डन विथ इट. >> सनव, अनुमोदन.

भरत काय बोललाय हो तो? त्याचा कोणताही व्हिडियो आता पाहवणार नाही. Sad

भरत काय बोललाय हो तो? त्याचा कोणताही व्हिडियो आता पाहवणार नाही. शद्
.>>>>>

ॲक्चुअली..
का झाले असे..
आज माझी बायकोही पुन्हा म्हणाली.. फारच ईंटेलिजंट होता तो. वेगळ्याच लेव्हलचा. फार वाईट झाले "
ती रोज यासंबंधित न्यूज फॉलो करते आणि मलाही सांगते. त्यामुळे आमच्याकडे अजूनही हा चटका लावणारा विषय आहे. त्याचे सामाजिक योगदान, अभिनय वगैरे सगळ्या पोकळ चर्चात आहेत..

दिशा सालियनच्या आत्महत्त्येनंतर ती सुशांतची मॅनेजर होती ही गोष्ट मीडियाने हायलाईट केली होती. त्याचबरोबर दिशाच्या आत्महत्त्येआधी सुशांतने तिला फोन केला जो तिने उचलला नाही वगैरे बातम्या देखील आल्या होत्या. कदाचित काही आतल्या वर्तुळातील लोकांनी सुशांतला दिशाच्या आत्महत्येकरिता जबाबदार ठरविण्याची शक्यताही असू शकते. यामुळेही कदाचित घाबरुन सुशांतने आत्महत्त्या केली असू शकते.

आता सुशांतच्या आत्महत्येकरिता इथे या धाग्यावर आणि एकूणच मीडियामध्येही अनेकांना दोषी / जबाबदार ठरविले जात आहे. या आरोपांमुळे उद्या यांच्यापैकी कुणी आत्महत्त्या केली तर? ही अनएंडिंग चेनही ठरु शकते. आत्महत्येचं खरं कारण ठाऊक नसताना पुराव्याशिवाय कुणावर आरोप करणे कितपत योग्य? कदाचित तीन महिन्यांचा लॉकडाऊन देखील आत्महत्येचं कारण असू शकेल.

श्रद्धांजली चा धागा आहे तो श्रद्धांजलीचाच राहू द्या म्हणणार्‍यांनी आधी हा धागा बेसलेस अ‍ॅलीगेशन्सचा होत आहे याकडेही लक्ष द्यावे.

मीडिया चा धंधा आहे सनसनाटी निर्माण करण्याचा त्या मधून टीआरपी वाढून आर्थिक फायदा होतो.
पण लोकांनी आपला कामधंदा सोडून त्यांच्या नादाला का लागावे.

सुशांत च्या अकाली जाण्याचे दु:ख आहे. त्याची सिरिअल मी पाहिली नव्हती की इतर कोणताही सिनेमा. फक्त शुद्ध देसी रोमान्स, पीके पाहिले होते. एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी होती त्याच्यात हे खरे.
पण तरीही...
<<<<आता सुशांतच्या आत्महत्येकरिता इथे या धाग्यावर आणि एकूणच मीडियामध्येही अनेकांना दोषी / जबाबदार ठरविले जात आहे. या आरोपांमुळे उद्या यांच्यापैकी कुणी आत्महत्त्या केली तर? ही अनएंडिंग चेनही ठरु शकते. आत्महत्येचं खरं कारण ठाऊक नसताना पुराव्याशिवाय कुणावर आरोप करणे कितपत योग्य? >>> याला अनुमोदन.

सुशांतचा ब्लॅक लॅब्राडोर जातीचा कुत्रा फज हा जिवंत असून व्यवस्थित आहे. अफवांवर विश्वास ठेवु नका.

https://www.loksatta.com/manoranjan-news/sushant-singh-rajput-dog-fudge-...

आजकाल गेलेल्या जिवांबद्दल १४ दिवसांचे ऑफिशिअल मोर्निन्ग पीरीअड संपे परेन्त वाइट बोलू नये हा सामाजिक संकेत पाळला जात नाही असे दिसते.

माझ्यातर्फे श्रद्धांजलि.

सैनिकांच्या वडिलांना असं घडणार हे अनपेक्षित नसते. अभिनेत्यांनी मरण पत्करणे अपेक्षित नसते.>>>
हे वाक्य खटकले. Sad

Pages