सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<सुशांत ने आत्महत्या का केली? हे फक्त त्यालाच माहित असेल>
अगदी!!

सिम्बा, तुमच्या 'सरणार कधी रण..' कवितेच्या रसग्रहणाचा धागा आठवत राहिला त्या दिवशी.

<आपल्या स्वप्नांची पालखी इप्सिताचा गड गाठत नाही तो पर्यंत येणारे प्रोब्लेम्स चे चौफेर हल्ले परतवणारा बाजी आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो. आपली स्वप्न,ध्येये पूर्ण होईपर्यंत वाढत्या बळाने येणाऱ्या समस्यांशी तो झुंजत असतो. मात्र कधीतरी तो सुद्धा विव्हल होतो,त्याला हि शस्त्रे ठेवावीशी वाटतात. नेमकी हिच वेळ असते त्याला तोफांचे आवाज कानी न आल्याची आठवण करून देण्याची.>

ही आठवण व्हायला हवी.

विविध अंगांनी आत्महत्ये मागची कारणं शोधुन त्यावर उपाय, वेगळे विचार सोशल मिडियाच्या माध्यमातुन जगासमोर आणले गेले तर भविष्यात कदाचित काहि सुशांत आत्महत्येचा मार्ग निवडणार नाहित. व्हॉट्सॅपवरच मराठी स्टेज कलाकाराची एक क्लिप पाहिली; पेडणेकर आहे बहुतेक त्याचं आडनांव. त्याला देखील आर्थिक चटके बसले आहेत पण त्याने खचुन न जाता एक छोटा उद्योग सुरु केला आहे. क्लिनिकल डिप्रेशन वर औषधी उपचारां सोबत असे मॉरल बुस्टर हि देणं गरजेचं आहे...

तो गेला कायमचा... हे अंतिम सत्य तर आहेच परंतु आपल्याला आवडणाऱ्या माणसाची अशी sudden exit मनाला चटका लावून जाते म्हणून आपण तर्कवितर्क लढवून त्याचं कारण शोधू पाहतो. अर्थात हे कारण खरं फक्त त्यालाच माहीत असेल. तो नैराश्यात होता खरं पण इतकं सहजपणे माणूस या जगातून जाऊ शकतो? मित्र घरी आहेत, रात्री गप्पाटप्पा झाल्या असतील, सकाळी तो उठला त्याने डाळिंबाचा ज्युस घेतला , खोलीत गेला आणि गळफास घेतला....अगदी अकल्पित आहे.
तो गेल्याची खूप हळहळ वाटते पण एका गोष्टीबद्दल त्याचा प्रचंड राग येतोय, आपल्या थकल्या भागल्या एकाकी वडिलांचा आणि जीव लावणाऱ्या 4 बहिणींचा विचार का नाही केला त्याने की आपल्यामागे यांचं काय होईल. त्या दिवशी त्याचे वारंवार शुद्ध हरपणारे वडील पाहून काळजाचं पाणी पाणी झालं. अशी वेळ कोणत्याही पित्यावर येऊ नये रे बाप्पा...

इथे कोणत्या ही विषयाला किंमत देणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही.
सुशांत सिंग हा काही महान कलाकार ह्या प्रकारात मोडणारा कलाकार नव्हता.
भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये त्याचे कोणतेच महान कार्य नाही.
आत्महत्या करण्या मागे त्याचे वैयक्तिक आयुष्यातील काही तरी फालतू कारण सुध्दा असू शकत त्या साठी बाकी लोकांना जबाबदार धरण्यात काही अर्थ नाही.
देशात रोज किती तरी लोक आत्महत्या करतात त्यातील ही एक ह्या पेक्षा ह्या केस मध्ये वेगळे काही नाही.
चित्रपट हा धंधा आहे जो फायदा करून देवू शकतो त्याच कलाकारांना कोणताही निर्माता संधी देणार हे सरळ समीकरण आहे.

आत्महत्या झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या मामा नी आमचा महाराष्ट्र पोलिस वर विश्वास नाही अशी स्टेटमेंट दिली आणि cbi चोकशी ची मागणी केली.
जसा सुशांत सिंग हा महान व्यक्ती आहे आणि महाराष्ट्र सरकार ती केस योग्य रीतीने solve karnar nahi.
हास्यास्पद मागणी होती.

ते काही असो. स्टार किड्सचे करण जोहरचे मुव्हीज आता स्ट्रीम पण करावेसे वाटणार नाहीत. आणि करोना गेल्यावरही थिएटरला या लोकांना बघायला जायची इच्छा नाही. त्यापेक्षा हॉलिवूड किंवा मराठी चित्रपट बरे.

मी शेवटी इतर अनेक सुशांत फॅन्स बघत आहेत तसंच पवित्र रिशता बघायला सुरुवात केली. फक्त सुशांतचे सीन बघून बाकी फॉरवर्ड करून टाकायचं. त्याचा मालिकेतील पहिलाच डायलॉग मराठीत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये त्याला मराठी लाईन्स आहेत ज्या त्याने सहजतेने म्हटल्या आहेत.

मालिका बघतानाही त्याने जे केलं त्याचं सावट मनावर आहेच पण आता बघणं addictive झालंय. मी आधी या मालिकेचे काही एपिसोडस बघितलेले पण सलग पहिल्यांदाच बघत आहे. बाकी नवोदित कलाकार मख्ख, नवखा अभिनय करत असताना आणि सविता प्रभुणे, उषा नाडकर्णी वगैरे लाऊड अति अभिनय करत असताना हा मुलगा किती संयत सहज काम करून गेला होता. नो वंडर त्याला पवित्र नंतर मोठ्या मुव्हीज मिळाल्या.
सच अ बिग लॉस.

क्रिकेट आणि नाचगाणेवाल्या मंडळींना लोक का एवढं डोक्यावर घेऊन नाचतात ते कळत नाही. काही अपवाद वगळता ह्यांचं समाजासाठी मोठं योगदान असतं असेही काही नाही. गेल्यावरबी कवतिक संपत नाही
Submitted by जिद्दु on 18 June, 2020 - 03:48

>>>>>>>>>>>>> यावरून काही आठवले जे लिहावे म्हणता म्हणता राहून गेले ...आता एक लेख लिहीन म्हणतो.

आपण या कलाकारांना डोक्यावर चढवून ठेवलंय, जे जवान शहीद झाले त्याबद्दल कोणी काही खेद व्यक्त नाही करत, आणि या घटनेवर मात्र वेगळा धागा काढून चर्चा होते.

क्रिकेट आणि नाचगाणेवाल्या मंडळींना लोक का एवढं डोक्यावर घेऊन नाचतात ते कळत नाही. काही अपवाद वगळता ह्यांचं समाजासाठी मोठं योगदान असतं असेही काही नाही.
हे डोक्यावर घेणारे पण डोक्यावर पडलेले असतात.
स्वप्नांच्या भासमय जगात वावरणारे असतात.

आपण या कलाकारांना डोक्यावर चढवून ठेवलंय, जे जवान शहीद झाले त्याबद्दल कोणी काही खेद व्यक्त नाही करत, आणि या घटनेवर मात्र वेगळा धागा काढून चर्चा होते
ह्या वरून च ह्या लोकांची mentality समजते.
चीन च्या हल्ल्यात किती सैनिक शहीद झाले ह्याला ह्यांच्या लेखी काही किँमत नाही.
पण स्वतःच्या मर्जी नी आत्महत्या करणाऱ्या साठी अश्रू गाळण्यासाठी धागा काढून चर्चा करत आहेत.

विमान चालविण्याचं प्रशिक्षण, आयर्नमॅन ट्रायथलॉनचं ( स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग) प्रशिक्षण घेणे, जंगलात एक आठवडा रहाणं, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणं, जवळपास १० नृत्यप्रकार शिकणं, शेती करणं शिकणं, आवडती ५० गाणी गिटारवर वाजवायची होती, एका लॅम्बोर्गिनीचं मालक होणं, स्वामी विवेकानंदांवर आधारित डॉक्युमेंट्री तयार करणं, क्रिकेट खेळणं, मार्स कोड( टेलिकम्युनिकेशन लॅग्वेंज) शिकणं,अंतराळाविषयीची माहिती जाणून घेण्यास उत्सुक विद्यार्थ्यांना शिकवणं, चार टाळ्या वाजून करण्याची पुशअप्स स्टाइल, एक हजार वृक्षारोपण करणं, दिल्लीतील कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक संध्याकाळ व्यतीत करणं, कैलाश पर्वतावर बसून ध्यानधारणा करणं, एक पुस्तक लिहिणं, सहा महिन्यात सिक्स पॅक अॅब्ज करणं,अशी अनेक स्वप्न सुशांतला पूर्ण करायची होती.

खूप सेन्सिबल स्वप्नं होती ही.यातली एक दोन पूर्ण करण्यावर लक्ष दिलं असतं तरी स्वतःला संपवण्यापासून कदाचीत थांबवू शकला असता.
अर्थात depression does not work that way.

https://youtu.be/ejhSFlV-6Gc. 3 idiots वरून सोनम wangchuk ने
अत्यंत कमी शब्दात अमीर खान ची केलेली पोलखोल .
तो रामगोपाल वर्मा सुध्दा विलासराव बरोबर ताज मध्ये कथानक बघायलाच गेला होता ना ?
काल सुशांत च्या मृत्य वर सिनेमा ची घोषणा झाली , आता त्यात दावूद चा पैसा आणि करण शारुखं सलमान चे कनेक्शन नसले म्हणजे मिळवली !!!!

चित्रपटातील लोकांना दुसरीकडे कामे करणे कठीण जाते असे वाटत असेल तर फिल्मी बॅकग्राउंड असलेल्या व चांगला दिग्दर्शक म्हणून नाव कमावलेल्या मन्सूर खानकडे बघा. बॉलिवूडकडे पाठ फिरवून तो कुंनूरमध्ये शेती करतोय आणि होमस्टे चालवतोय. मराठीतील संपदा जोगळेकरही खेड्यात जाऊन शेती करतेय. असे अजून कितीतरी असतील.

तात्पर्य हेच की जे मिळत नाही त्याच्यामागे धावून पदरी नैराश्य घेण्यापेक्षा दुसरे मार्ग चोखाळुन बघून आयुष्य आनंदात घालवावे. शेवटी जिंदगी ना मिले दोबारा हे अंतिम सत्य आहे, जी मिळाली तिचे सोने करा. सगळ्यांनाच चांगले आयुष्य नाही मिळत, इच्छा असूनही बऱ्याच गोष्टी नाही करता येत.

सगळा एकाच दिशेने विचार चाललाय. त्याच्या आत्महत्त्येबद्दल तो सोडून इतर सर्वांना झोडपणं...

एकतर हा मृत्यू म्हणजे खून किंवा मानसिक दबावामुळे आलेला हृदयविकाराचा झटका असा प्रकार नाहीये. त्याने स्वत:ला फास लावून घेतला म्हणजे ह्या मृत्यूप्रकरणी सर्वात मोठा थेट सहभाग त्याचा स्वतःचाच...

इतर लोकांवर बर्‍यापैकी खापर फोडून झालंय. त्याची काहीच चूक नाहीये का?

वर कोणीतरी ड्राईव्ह सिनेमाचा विषय काढला आहे. या सिनेमाला थिएटरमध्ये प्रदर्शित न करता ऑनलाईन प्रदर्शित केल्याबद्दल तो निर्मात्यावर भडकला होता. असं भडकायचा त्याला अधिकार होता का? बायदवे हा निर्माता करण जोहर आहे ज्याच्यावर तो स्टारकिड्सशिवाय इतरांना संधी देत नाही असा आरोप केला जातोय मग त्याने सुशांतला चित्रपटात नायक कसे काय बनवले ह्या प्रश्नाचं उत्तर कोणी देईल काय?

ज्या अलिया भट्टला आता त्याच्या आत्महत्त्येबद्दल जबाबदार धरलं जातंय ती एकतर त्याच्याहून सहासात वर्षांनी लहान आहे आणि इंटरनेटवर मठ्ठ, बिनडोक म्हणून बर्‍यापैकी ट्रोल झालेली आहे. तिची एक सख्खी बहीण मानसिक विकलांग आहे. एक सावत्र बहीण नैराश्यामुळे व्यसनांच्या आहारी गेली होती. तर अशा ह्या अलिया भट्टच्या कॉमेंट्समुळे सुशांतने आत्महत्त्या केली? सिरीयसली?

आलिया भट्टवर रोज व्हॉट्सपद्वारे फिरणारे विनोद पाहता आणि करण जोहरला हिजडा, गे असल्या विशेषणांसह इतरही गलिच्छ संबोधनांनी रोज ट्रोल केले जात असता या दोघांनी तर आजवर एक हजार वेळा आत्महत्त्या करायला हवी होती.

त्यात त्याने कुठलीही सुसाईड नोट न लिहिल्याने कुणालाही शिक्षा होणार नाही. फक्त धूरळा उडविण्याचे काम चालू राहील.

तनुश्री दत्त व नाना पाटेकर प्रकरणाचं काय झालं? कोणी दोषी ठरलं का न्यायालयीन प्रक्रियेद्वारे? फक्त नानाच्या हातून काही चित्रपट गेले इतकंच या प्रकरणाचं फलित.

इथे पण निगेटिव्ह कमेंट द्यायला भीती वाटते कोणी upset झाला आणि मनाचे संतुलन बिघडून depression मध्ये गेला तर नको ते झेंगट पाठी लागायचे.
आपले असे नाही काही ही झाले तरी मानसिकदृष्ट्या भक्कम च राहणार.

ज्यांचे आवडते कलाकार आरोपीच्या पिंजरयात आहेत असे बरेच लोकं सुशांतलाच दोषी ठरवत आहेत किंवा आणखी भलत्याच कलाकारावर आरोप ठेवत आहेत.
ईथल्या चर्चेबद्दल असे नाही. एकूणच जी कुठे कुठे चर्चा वाचतोय त्यात असे मला दिसतेय.

आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा मानसिक छळ करणे हा गुन्हा कायद्याच्या पुस्तकातून काढून टाकला तरी चालेल असे काही प्रतिसाद पाहून वाटतेय.

सुशांतच्या आत्महत्येला फारच अवास्तव महत्त्व दिलंय मीडियानं; तुलनेनं जास्त चांगले आशयघन चित्रपट करणारे आणि मोठं योगदान देणारे कांचन नायक यांची तर कुठे बातमीच नाही.

आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा मानसिक छळ करणे हा गुन्हा कायद्याच्या पुस्तकातून काढून टाकला तरी चालेल असे काही प्रतिसाद पाहून वाटतेय.
Submitted by ऋन्मेऽऽष on 19 June, 2020 - 12:48

कोणीतरी केस टाकलीये ना कोर्टात. सिद्ध होत नाही तोवर कोणाला बोल लावण्यात अर्थ नाही शिवाय सुसाईड नोट नसल्याने हे सारं अंधारात तीर मारण्यासारखंच आहे.

सुसाइड नोट अस्ती तरी काही झाले नसते

कॉन्ट्रेक्ट रदद् होउ शकते हेही कॉन्ट्रेक्ट मध्ये छापलेले असतेच

वाचतेय हा धागा.... बिपीनजींचही पटतंय... डिप्रेशनची ट्रीटमेंट चालू होती. आणि इतकं बरंच काही काही तो करत होता वर रुन्म्याने लिहीलंय तर डिप्रेशन मधून बाहेर पडायला ह्यासगळ्याची त्याला मदत झाली नाही का किंवा हे करताना वडील, बहीणींचे चेहरे डोळ्यासमोर आले नाही का? घरात राहणाऱया नोकराला काहीच शंका आली नाही का? आत्महत्या करणारा काही वेगळं वागत असतो ते त्याच्या मित्रांना कळलं नाही का? बाकी एकमेकांचे पाय खेचणारे व ह्या स्पर्धेच्या युगात हे जागोजागी प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतं... त्यासाठी आपलं इमोशनल कोशंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ....

मी नाव घेणार नाही. पण हिंदी सिने इंडस्ट्री मधील माझ्या ओळखीच्या एका विश्वसनीय आणि प्रतिष्ठित व्यक्तीनुसार (जिचा ५-६ चित्रपटांमध्ये सुशांतशी जवळचा संबंध आला होता) सुशांत हा अत्यंत विक्षिप्त, अव्यवस्थित, आतल्या गाठीचा आणि तिरसट माणूस होता. त्या व्यक्तीची प्रतिक्रिया - "सुशांत गेल्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही."

>>चित्रपटातील लोकांना दुसरीकडे कामे करणे कठीण जाते असे वाटत असेल तर फिल्मी बॅकग्राउंड असलेल्या व चांगला दिग्दर्शक म्हणून नाव कमावलेल्या मन्सूर खानकडे बघा. बॉलिवूडकडे पाठ फिरवून तो कुंनूरमध्ये शेती करतोय आणि होमस्टे चालवतोय. मराठीतील संपदा जोगळेकरही खेड्यात जाऊन शेती करतेय. असे अजून कितीतरी असतील.

+१ अगदी अगदी.

या अपेक्षेप्रमाणे न मिळणाऱ्या वागणुकीचा किंवा आणखी काही गोष्टींचा त्याने स्वतःला करून घेतलेला / त्याला झालेला त्रास ट्रिगर असेल पण आत्महत्येचे पाउल उचलण्यात क्लिनिकल डिप्रेशन या आजाराचा ही महत्वाचा भाग असावा असे वाटते.

तो हुशार होता, त्याच्याकडे बरेच काही होते, सगळे सोडून नव्या क्षेत्रात नव्याने सुरुवात करायला हवी होती. त्याने अजून काय काय करायला हवे होते हेही सगळीकडे वाचते आहे.
तो डिप्रेशन मधे होता, त्यावर उपचार चालू होते. नवीन काही करायची ईच्छाच होत नाही, काही सुचत नाही. त्यात परिचयातील/जवळच्या व्यक्तीच्या दूर जाण्याने, मृत्यूने तो निराशेच्या गर्तेच खचून गेला असेल. त्या कमजोर क्षणांवर मात करण्यात त्याला अशक्य झाले असेल त्यात एकांत....परिणामी त्याने आत्महत्या केली. Sad
त्या कमजोर क्षणांवर मात करणे त्याला जमले असते तर असे झाले नसते.
तुमचे मनःस्वास्थ्य कसे आहे, तुम्ही ते कसे टिकवता, त्यासाठी काय उपाय करता, कोणाची मदत घेता हे महत्वाचे मग तुमच्याकडे काय काय आहे, तुम्ही काय कमावले, गमावले याने काही फरक पडत नाही.

सुशांत Physics scholar होता. देशात 7वा आलेला. Engineering 3rd year मध्ये सोडले.

तो देशात सातवा फिसिक्स मद्धे नव्हता आला.
DCE - दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग च्या एंट्रन्स एक्साम मध्ये तो सातवा आला होता.
हे फिजिक्स स्कॉलर माहिती कुठे मिळाली तुम्हाला?

Pages