सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पवित्र रिश्ताच्या डायरेक्टरची मुलाखत ऐकली. त्यात त्याने म्हटले की सुशांत नुसता अभिनयच नाही पण इतर तांत्रिक गोष्टीत पण प्रचंड आवडीने लक्ष द्यायचा निरीक्षण करायचा. आपला शॉट झाला की जाऊन बसायचे असे न करता कॅमेरा, लाईट व इतर सर्व कसे चालते ते शिकुन घ्यायचा. त्याला दिग्दर्शक पण बनायचं होतं एक दिवस. मुळात या क्षेत्रातल्या तंत्राची आवड होती. म्हणुन इतका हुशार असुन देखील या पुर्ण नवीन क्षेत्रात आला व यशस्वी झाला. केवळ पैसे मिळवणे वा टपोरी रोल करुन नाव कमावणे हे त्याचे ध्येयच नव्हते.
ही मुलाखत ऐकुन हळहळ अजुनच वाढली की का याला वेळेवर गर्तेतुन बाहेर काढायला हात मिळाला नाही?

जोहर-चोप्रा-खान नी नुसतेच त्याला आपल्या सिनेमात नाही घ्यायचे ठरवले असे नाही तर इतरही सिनेमे मिळू नयेत असे सुरु केले असतील तर किती वेदना झाल्या असतील!
छिछोरे हीट झाल्यावर जे सिनेमे मिळाले ते हातातुन काढुन घेऊन रणवीर सिंग वगैरेना दिले. तयार होते ते कोणी घेईना (यात पण लॉबी केली गेली असेल).
ज्या क्षेत्रावर निस्सीम प्रेम आहे, त्यात खूप काही करायचं आहे, अंगात प्रचंड गुणवत्ता आहे व सिनेमे प्रचंड हिट झाले असताना, प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय हे धडधडीत दिसत असताना आपल्याला त्यातुन हाकलायला लोक टपलेत हे कळल्यावर काय अवस्था होईल?
प्रत्येकाची सहनशीलता वेगळी असते, हा खूप मृदु निघाला. सहन करता आलं नाही.

अरे सिनेमात घेऊ नका त्याला, ठीक आहे ना पण इतरांनीही घेऊ नये असे प्रयत्न कशाला?? केवळ आदित्य चोप्राची वेब सिरीज नाकारली म्हणुन ?? किती माणुसपण सोडाल? त्यांचे सिनेमे वाईट असतात पण पब्लिसीटी इतकी भयानक करतात की ते वाईट आहेत हे कळेपर्यंत पैसा कमवुन जातात.
जोहर-चोप्रा-खान-कपूर-भट्ट यांचे व यांच्या अपत्यांचे सिनेमे पहाणे बंद केले आहे पण आता तर चुकुनही पहाणार नाही. नाहीतर हळुहळु या माफियांचे स्टुडंट ऑफ इयर वा दबंग असलेच सिनेमे हिंदीतुन पैदा होत रहातील.
च्र्प्स तुमचे एका अर्थी बरोबर आहे, माफियांची चूक तर आहेच पण प्रेक्षकांची पण. परंतु त्यांना असले टपोरी सिनेमे बघुन बघुन त्याची इतकी सवय झालीये की बिचार्‍यांना अस्सल सिनेमे असतात हेच विसरायला झालंय. काहीकाही येत असतात नाही असं नाही पण जास्त माथी जे मारलं जातंय तेच लक्षात रहातंय.

सुशांत सारखी बुद्धीमान मुलं, फिल्मी बॅकग्राउंड नसताना या क्षेत्रात येण्याचा विचार करतात तेव्हा 'इथे काहीही कारणामुळे जमलं नाही तर मी अमुक अमुक अल्टर्नेटीव्ह करीयर करीन किंवा करु शकण्याची पात्रता घेऊनच या क्षेत्रात येईन' असा विचार का करत नाहीत याचं आश्चर्य वाटतं.
अर्थात या क्षेत्रात एकदा पडल्यावर वेळेअभावी इतर करीयर पर्यायांचा विचार करायला किंवा ते अमलात आणण्यात इतर काही अडचणी येत असल्या (कुठेही गेलं तरी लोकांनी ओळखणे इ) तर तसंही असू शकेल म्हणा.

करू शकण्याची पात्रता चा ऑप्शन वगैरे मला नाही वाटत कारण त्याच्याकडे पैसा आणि बुद्धिमत्ता होती.
त्याच्या नावाला ही एक ब्रांड वैल्यू आलेली त्याने कोणतेही दूसरे पर्याय शोधले असते तरी त्यात यश च मिळवले असते.
नासा मध्ये जाऊन आलेला मुलगा , अजुन बर्य्याच गोष्टीत अव्वल असलेला मुलगा ज्याच्याकडे talent ची कमी नव्हतिच
अगदी डांस स्कूल ओपन केले असते तरी त्याने कामवले च असते क़ी....
पण त्याचे नैराश्य बॉलीवुड ने साइड लाइन करण्याबाबत होते.
कळत नाही इतक्या सर्वात त्याला त्याच्या एकत्या वडिलांचा जरा ही विचार मनात आला नसेल का????
राहून राहून वाइट वाटते आहे ते यचे.
दुसरे म्हणजे फ्यूनरल ला नीच मीडिया वाले ज्या प्रकारे हसत होते, धमाल करत होते त्याची चीड़ आली.
कृति sanon ने चांगलीच पोस्ट लिहिली आहे त्यावर. अर्थात त्याचा किती फरक पडेल देव जाणे
सुशांत परत येणार नाही.
इंस्टा वर मि त्याला फॉलो करते.
त्याने लास्ट पोस्ट लिहून डिलीट केलेली जी आता खुप वायरल होते आहे.
मारण्याच्या 5 तास आधी लिहिलेली.
ज्या लोकांना माहित होते की हा नैराश्यत आहे त्याच सो कॉल्ड जवळच्या लोकांनी तेव्हा त्याला एक फोन केला असता तर???
मागे एक इंटरव्यू मध्ये एकलेले की तो फ़क़त 2 तास झोपयचा.
हे ही कारण आसु शकते का ,त्याच माइंड शांत न राहता तो नैराश्यत जांयचे?????

https://www.lokmat.com/bollywood/neil-nitin-mukesh-once-said-shut-shahru...

वरील लिंक नुसार नील नितीन मुकेश चे हि करिअर संपवण्यात ह्याच गॅंग चा हात असणार..
त्याला अवॉर्ड शो मध्ये शारुख आणि सैफ ने चिडवलं होता.. नील खूप चिडला होता या विडिओ मध्ये

स्पर्धा हे कारण पटले नाही . एका रोल साठी हजारो मुले ट्राय करतात , सगळी आत्महत्या करतात का ?
शिवाय इतके 10-15 तरी रोल मिळाले होते , करोडोची एस्टेट जमली होती, आता ह्या वयात गप लग्न करून रहाणे अपेक्षित होते ,
पण अपेक्षा जास्त ,
इतराना , इंडस्त्रिला दोष देण्यात अर्थ नाही.
आणि ह्या 15 - 20 मध्ये तरी असा कुठला सुपर हिट शिनेमा होता ह्यांचा ? 7 सिनेमे होते म्हणे , केंसल केले म्हणे , हे तर होतच असते, ह्याला मिलालेले 15 ही कुणाला तरी केंसल करून ह्याला दिले , असेही झाले असेल

जोहर चोप्राचे तर माधुरी , संजय दत्त घेऊन सिनेमे पड़लेत , शाहरुख चे ही नवे पडलेत

हे सगळं ऑफिस पॉलिटिक्स सारखंच नाही का? तिथे तक्रारीला कदाचित वाव असेल.
------
गेली काही वर्षे अवॉर्ड नाइट्स म्हणजे roast show झाले आहेत. यात अँकर्स आणि आयोजक दोघे सारखेच जबाबदार. फराह -साजिदच्या कमेंटमुळे आशुतोष गोवारीकरने चिडून तिथेच उत्तर दिलं होतं. त्या दो घांनी त्याला उडवून लावलं. इतर कोणी मनावर घेतलं नाही.
शाहिदच्या पहिल्या अवॉर्डच्या वेळी शाहरुख- सैफ त्याच्यावर काही कमेंट्स करत होते. त्याच्या उंचीवरून होत्या बहुतेक. शाहिदने अवॉर्ड घेऊन स्टेजवरून काही ऐकू न आल्याच्या आविर्भावात पळ काढला.
इर्फानला त्याच्या लुक्सवरून कमेंट मिळाली होती.
विद्या बालनने अँकर्सना छान नटलेले वेटर्स म्हणून परतफेड केली होती.
सगळ्यांनाच हे जमेल असे नाही.
गेल्या दहा वर्षांत अवॉर्ड शोज पाहिलेले नाहीत. पण सगळे तसेच चाललेले दिसते आहेत.

----------
नुकतीच पाहण्यात आलेली क्लिप - कॉफी विथ करणचा उद्देशच इतरांबद्दल वाईट बोलणे असा आहे. आलियाला तीन नावे देऊन कोणाशी लग्न, कोणाचा खून आणि कोणाशी लफडं करायला आवडेल असं विचारलं. सुशान्त तिच्या शेजारीच होता. तिने खून करायला त्याचे नाव निवडले.
आता हे सगळं मजे मजेत चाललंय म्हटलं तरी ज्यांना दोनाचे चार परत करता येत नाहीत, त्यांना त्रास होणारच. शिवाय असे सो कॉल्ड विनोद करताना किंवा ते केल्यावर प्रक्षेपित करण्याआ धी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणार का? आणि अँकर बडा निर्माता असल्यावर कोण नाही म्हणेल?

सुशांतचे जाणे चटका लावून गेले.
अशा प्रकारे इतक्या कमी वयात जायला नको होते.
त्याच्या आत्म्याला सद्गती लाभो ही प्रार्थना!

आताच्या नवीन स्वप्नाळू अभिनेते ,अभिनेत्री ह्यांच्या अपेक्षा च ह्यांचा घात करतात.
जे स्टेज अॅक्टर आहेत तेच खरे हाडाचे कलाकार आहेत.
बाकी हे हौसी कलाकार.अपेक्षा खूप मोठ्या.
आणि ह्यांना हवं 5असे घडले नाही की दुसऱ्याला दोष देवून स्वतःचे अवगुण झाकायचे ही वृत्ती.
सुशांत च्या मृत्यू ला तो स्वतःच जबाबदार आहे.

एक सुजाण नागरिक म्हणून आपण योग्य निर्णय घेऊन हे नक्की थांबवू शकतो. मी गेली ५ वर्ष सलमान खान, संजय दत्त यांचा एकही चित्रपट थिएटर मध्ये पाहिलेला नाही आणि यापुढेही पाहणार नाही. मला करण जोहर असाही आवडत नाही त्यामुळे त्याची चित्रपट मी गेली अनेक वर्षे थिएटरात पाहिले नाहीत आणि पाहणारही नाही. आपण ठरवून काहीतरी केले तरच परिस्थिती बदलू शकेल आणि नवीन आणि चांगल्या कलाकारांना योग्य संधी मिळेल. >>>>>>>
@कोंहसोंह ,
एकदम बरोबर ,
खरं म्हणजे ज्यांना शारुख , सल्लू आणि करण चा उर्मट पना सहन होत नाही त्यांनी सरळ त्यांचे सिनेमे पाहू नये म्हणजे डोक्याला ताप नाही .
मग त्यांनी बॉलीवुड हि त्यांची जहागिरी समजो नाही तर बापाची प्रॉपर्टी आपल्याला काय करायचे ?
त्यांच्या उत्पन्नात आपण कशाला हाथ भार लावायचा !
जास्त जर पहायची इच्छा झाली तर आहेच की telegram Happy

मागे एका एआयबी रोस्ट नामक वाह्यात प्रकारात करण जोहर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि आलिया भट सामील होते.
ईतके कंबरेखालचे प्रकरण होते ते की शी लाज वाटत होती हे सो कॉलड आपल्याला पडद्यावर हिरो म्हणून दिसणारे कलाकार प्रत्यक्षात ईतके चीप प्रकार एंजॉय करत आहेत

मी त्यावर माबोवर धागाही काढलेला. मला लिंक देता येत नाही. घमासान चर्चा झालेली. चारपाचशे प्लस पोस्ट आलेल्या. पण धक्का मला तेव्हा जास्त बसला जेव्हा कित्येक लोकं या प्रकाराचे समर्थन करत होते. नव्हे एंजॉय करत होते. तेव्हाच मला वाटलेले हि किड आहे फोफावत जाणार.

दीपिका पदुकोणही होती बरं त्यात.

अवॉर्ड शो मधले प्रकार आणि कॉफी चर्‍हाट त्याच्या आधीपासून सुरू आहे.

केदार नाथ शिनेमा लव्ह जिहाद वर होता , पिके मध्येहि त्याचा मुसलमान रोल होता , हे कारण देऊन , तो मेला ते बरे झाले असे लिहिणारेही आहेत

घराणेशाही आहे असे मानले तर रणधीर कपूर, राजीव कपूर हे तर अजिबात यशस्वी नव्हते. आता तुषार कपूर, अभिषेक बच्चन हे सुद्धा दिसत नाहीत. त्यामानाने सुशांतने खूप जास्त मिळवले होते. जे मिळाले नाही यापेक्षा काय मिळाले हे त्याने बघायला हवे होते.

Submitted by Hemant 33 on 18 June, 2020 - 12:01 >>>> +१
क्रिकेट आणि नाचगाणेवाल्या मंडळींना लोक का एवढं डोक्यावर घेऊन नाचतात ते कळत नाही. काही अपवाद वगळता ह्यांचं समाजासाठी मोठं योगदान असतं असेही काही नाही. गेल्यावरबी कवतिक संपत नाही Light 1
index

एआयबी रोस्ट हा अत्यंत घाण प्रकार आहे.
एआयबी चे बाकी व्हिडीओ बऱ्यापैकी सिनिक,सारकॅस्टिक आणि हुशार आहेत.नोटबंदी, the day india resigned,ओनेस्ट वेडिंग,ओनेस्ट कॅम्पस प्लेसमेंट वगैरे वगैरे
पण तो रोस्ट प्रकार अजिबात बघवला नाही.
अवार्ड फंक्शन चा त्यातल्या त्यात बरा आणि कमी बिलो द बेल्ट प्रकार सलमान अरबाझ चा आयटम होता.(यातही अरबाझ च्या भावना दुखावल्या गेल्या असल्या तरी भावानेच बोलल्याने ते थोडं सौम्य झालं असेल)
खरं तर नील नितीन मुकेश वर झालेल्या 3 नाव वाल्या जोक मध्ये मला काही विशेष वाटलं नाही.म्हणजे जोक म्हणून बोअर आहे पण इतकाही घृणास्पद नाही.(छोटी सी बात मध्ये कर्नल ज्युलियस वगैरे वगैरे सिंग अमोल पालेकर ला 'अरुण प्रदीप, याने दो दो नाम है' म्हणतो).
सुशांत वर झालेले जोक त्या अवार्ड मध्ये जोक्स म्हणण्याच्या लायकीचेही नव्हते.त्यावर कोणाला खरं हसूही येत नाही.
निनिमु ने या क्लिप च्या शेवटी दोघांच्या डोक्यावर अंडी फोडली आहेत ती मात्र एकदम खऱ्या भावनेने फोडली असावी.दोघेही प्रचंड डोक्यात जाणारा अभिनय करत होते.
रॅगिंग सारखाच प्रकार आहे हा.अगदी पूर्वकल्पना देऊन करत असतील तरी नाही म्हणण्याचा चॉईस नसेल.

सध्याचे अवॉर्ड शोज्, रिएलिटी शोज्, डान्स शोज्, अगदी कॉमेडी शोज् सुद्धा (मराठी पण) निव्वळ भंपकपणा, घाणेरडे जोक्स आणि नकली actions n reactions यांनी बरबटलेले असतात. सगळं स्क्रिप्टेड असतं. ज्याला पैसा आणि फेम मिळवण्यासाठी "रोस्ट" होणं मान्य असतं, तो हे शोज् करतोच. ज्यांना मान्य नाही ते इकडे फिरकतच नाहीत. पण म्हणून हे न फिरकणारे लोक talented नाहीत असं अजिबातच नाही ना.
प्रत्येक हव्या असलेल्या गोष्टीची काही किंमत मोजावी लागतेच. मुळात मला हे पण हवं, ते पण हवं, सगळंच हवं असं करून स्वतःचीच फरपट करुन घेणं आणि नंतर पदरात कमी गोष्टी आल्यानं हताश होऊन आत्महत्या, ड्रग्स, दारु, डिप्रेशनला जवळ करणं हे योग्य नाहीच. डिप्रेशन कुणी मागून आणत नाही पण आपल्या अपेक्षांचं ओझं इतकं वाढवायचं की आपल्यालाच पेलणार नाही, आणि मग नको ते पाऊल उचलायचं.
सुशांतचं वय किती, त्याने आजवर केलेलं काम किती. वेळ संपली होती का? जग संपलं होतं का? ज्यांना आता सगळे blame करतायत तेवढेच लोक शिल्लक होते का इंडस्ट्रीमधेे? मोठ्या बॅनरसोबत काम करायचंय असं म्हणत छोट्या बॅनरना त्यानेही कमी लेखलंच की.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे आपण या इंडस्ट्रीतच नव्हे या जगात आलो त्या घरच्या लोकांचा विचार त्याच्या मनात येऊ नये का? त्याने फक्त स्वतःपुरती पळवाट शोधली.
बादवे....आता प्रोटेस्ट करणारे सो कॉल्ड पुळकेबाज लॉकडाऊन संपल्यावर जेव्हा theators चालू होतील, तेव्हा पिक्चरची तिकीटं मिळवायला धावतीलच. पिक्चर कुणाचाही असला तरीही.

सुशांतच्या बाबतीत अनेक गोष्टी एकदम दाटून आल्या असाव्यात. इंडस्ट्रीमधील लोकांनी अशा प्रकारे अन्याय करणं , फिल्म न मिळू देणं हे होतंच.

गेले काही दिवस युट्युब सजेशनमध्ये त्याच्याबद्दलचे व्हिडियो येत राहिले आणि बघत राहिले तेव्हा त्याच्या लव्हस्टोरीबद्दल समजलं. त्यानंतर माझ्या मनात जे विचार आले ते इथे लिहीत आहे(अस्थायी वाटल्यास प्रशासनाने डिलीट करावे, लिहू की नको असं मलाही वाटत होतं. असो.)

लग्न करायचं जवळपास ठरलेलं असताना त्याचा आणि अंकिताचा ब्रेकअप होणं दुर्दैवी होतं. ते 6 वर्ष एकत्र होते. त्याच्या आणि अंकिताच्या ब्रेकअपनंतर तो स्टेडी रिलेशनशिपमध्ये नव्हता. ब्रेकअप नंतर सुशांतने अंकिताबद्दल कधीच काहीही वाईट बोललं/लिहिलं नाही. जेव्हा अफवा उठल्या की तिच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांचा ब्रेक अप झाला तेव्हा त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून हे खोटं असल्याचं , ती व्यसनी नसल्याचं लिहिलं होतं. अशाप्रकारे तो नंतरही तिला प्रोटेक्ट करत होता.
ब्रेक अप होईपर्यंत अंकिता तिची ती एक सिरीयल सोडून इतर काम करत नव्हती. बहुधा ठरल्याप्रमाणे सुशांतशी लग्न करून सेटल होणं तिची प्रायॉरीटी होती. ब्रेकअपनंतर तिने मणिकर्णिका फिल्म केली (एक वर्षांपूर्वी). त्यावेळी सुशांतने तिला इंस्टावर पब्लिक मेसेज केला होता जो पाहून त्यांच्या एकत्र येण्याबद्दल चर्चा सुरू झाली होती.
पण नंतर 11 जूनला तिच्या एंगेगमेंटची बातमी आली आणि 14 जूनला सुशांतने ही स्टेप घेतली. त्यावेळी अंकिताने इंस्टावर 'God removes people from your life because he heard conversations you didn't hear.' असा मेसेज टाकला होता. नंतर तिने तो डिलीट केला. सुशांतने आयुष्याच्या शेवटच्या काही तासात तो मेसेज वाचला असेल का? मुळात स्वतःचा साखरपुडा झालेला असताना असा cryptic मेसेज टाकायची काय गरज होती?

सोशल मीडिया, खाजगी आणि पब्लिक आयुष्य , महत्वाकांक्षा, अनफेअर इंडस्ट्री या सगळ्याचा तोल साधता न आल्याने एक गुणी मुलगा हरवून गेला.

पण नंतर 11 जूनला तिच्या एंगेगमेंटची बातमी आली आणि 14 जूनला सुशांतने ही स्टेप घेतली
>>>>
अच्छा हे पण प्रकरण आहे का यामागे
मी एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख ऐकलेला. मात्र हे डिटेल माहीत नव्हते. हे खूप मोठे कारण आहे. एखादा आधीच डिप्रेशनमध्ये असेल तर त्याला सारेच संपले असे वाटायला लागणे शक्य आहे Sad

>>ऋन्मेष ने शाहरुखसंबंधी लिहिले आहे
>>त्याला कारकिर्दीच्या त्या टप्प्यावर जवळपास एकाच शैलीतील चित्रप्ट सातत्याने करायचेच असतील असे नाही पण कदाचित त्यालाही अश्या सो >>कॉलड गॉडफादर्सना कधीच नकार देणे जमले नसणार.
बरोबर आहे. शाहरुखला करियर च्या सुरवातीला (बहुदा दिलवाले दुल्हनिया नंतर) दरमिया हा चित्रपट ऑफर झाला होता. त्यात एका तृतीयपंथीची मध्यवर्ती भूमिका होती आणि शाहरुख ह्या भूमिकेने उत्तेजित झाला होता.तेव्हाच्या टाईम्स ऑफ इंडियामध्येही अश्याच गॉसिप कॉलममध्ये शाहरुख हा आव्हानात्मक रोल करायला खूप उत्साहित आहे अश्या तर्हेचे विधान ही वाचले होते पण नंतर काय चक्रे फिरली कुणास ठाऊक. ?शाहरुख ऐवजी अरिफ जकारियाने हा रोल केला. नंतर असे कळले कि हा रोल करू नये म्हणुन शाहरूखवर निर्मात्यांनी दबाव टाकला कारण तो करत असलेल्या पुढच्या सर्व चित्रपटांवर ह्या चित्रपटातील त्याच्या तृतीयपंथी भूमिकेचा प्रचंड परिणाम झाला असता. शाहरूखने बहुदा त्याच्या पुढच्या करिअरचा विचार करुन हा रोल नंतर नाकारला असावा.
सुशांत जेव्हा आला तेव्हाच हा भावी शाहरुख खान आहे असे वाटले होते व त्याची प्रगतीही तशीच होत होती. त्याचे असे अकाली जाणे फार दु:खद आहे. देव त्याच्या आत्म्यास सद्गति देवो.

सुनिधींचा प्रतिसाद फार आवडला.
सुशांतच्या इन्स्टाग्रॅमवरच्या पोस्ट्स पाहिल्या की कळते की तो अतिशय चिंतनशील, विचारी, कुतुहलाने भरलेली व्यक्ति होता. अश्या लोकांना बॉलिवुडसारख्या सुमारांच्या सद्दीत जागा नसतेच किंबहुना असली तरी दुय्यम. तिथे चाटूगिरी करणारेच चालतात. अशा विशेष चुणुक दाखवणाऱ्यांना बाजूला टाकणे जोहर, चोप्रासारख्या भुरट्यांना महत्वाचे वाटते यावरूनच त्यांची लायकी कळते.
असो.

नुकतीच पाहण्यात आलेली क्लिप - कॉफी विथ करणचा उद्देशच इतरांबद्दल वाईट बोलणे असा आहे. आलियाला तीन नावे देऊन कोणाशी लग्न, कोणाचा खून आणि कोणाशी लफडं करायला आवडेल असं विचारलं. सुशान्त तिच्या शेजारीच होता. तिने खून करायला त्याचे नाव निवडले.

--- सुशांत अलियाच्या शेजारी नव्हता. करणने त्याला कधीही कॉफी विथ करण मध्ये बोलावलं नव्हतं. (Exclude करण्याचा हाही एक प्रकार. शो मध्ये न बोलावणं व प्रत्येक वेळी त्याचं नाव घेऊन इतरांना असले विचकट प्रश्न विचारणे.)

मागे दीपिकाने स्वतः किती डिप्रेस आहे यावर भाष्य केले होते आणि लोकांनी किती कौतुक केले होते. आता तिचा नवरासुद्धा या गँगमध्ये आहे असे वाचायला मिळतेय. तिला नैराश्य काय हे चांगलेच माहीत असतानाही कोणी नैराश्यात लोटला जाईल अशा गोष्टी करायला काहीच वाटले नाही? की तिचे नैराश्य हा तिचा पब्लिसिटी स्टंट होता? सोनमने आपण किती मेकप करतो हे जाहीर केल्यासारखा?

स्टेजवर बोलावून अपमान करणारे व ह्याला करमणूक समजून हसणारे दोघेही डोक्यावर पडलेले आहेत.

मागे एक इंटरव्यू मध्ये एकलेले की तो फ़क़त 2 तास झोपयचा.
हे ही कारण आसु शकते का ,त्याच माइंड शांत न राहता तो नैराश्यत जांयचे?????>> नाही ,रिव्हर्स आहे ते म्हणजे नैराश्याने स्लिप डिप्रेव्हशन येते, त्यामुले अजुन नैराश्य अस व्हिशियस सायकल आहे ते !
बाकी बॉलिवुड मधिल नेपोटिझम्,प्रस्थापिताची मुजोरी हे न सपणारे विषय आहेत, सुशान्त एक चान्गला आणि मेहनती कलाकार होता आणि तो याचा बळि पडला हे अन्तिम सत्य बाकीजे मीडियात चालु आहे ते चर्वित चर्वण त्याने साध्य काही होणार नाहि.

कधी वाटत सुशांतने हार न मानता मयुरी कॉंगोने जशी दुसऱ्या करियरची चोखळली तस करायला हवं होतं. हुशार तर होताच त्यामुळे तिथेही चमकला असतंच. एक जीव वाचला असता.
अर्थात हे बोलणं सोपं आहे करणं कठीण याची जाणीव आहे . कोंडी झाल्यावर माणूस हतबल होतो याचाही अनुभव आहे . असो.

Submitted by पुंबा on 18 June, 2020 - 19:26>>> +1000

एक चांगला आणि उमदा कलाकार गमावला आपण.... Sad कारण काहीही असू दे पण तो परत येणार नाही !! पण जे लोक याच्या मागे आहेत त्यांना शिक्षा होईल असेही वाटत नाही, आपण आपल्या परीने शिक्षा करू शकतो ती म्हणजे त्यांचे चित्रपट, जाहिराती कधीच, कुठेच ( थेटरात किंवा मोबाईल वर, पायरसीद्वारेही) न पाहणे, सोशल मीडियावर फॉलो न करणे, थोडक्यात त्यांना अनुल्लेखाने मारणे , जसे ते सुशांतशी वागले तसेच... एवढंच करू शकतो!!

त्याचे पवित्र च्या वेळचे BTS (behind the scenes) व्हिडियोज youtube वर आहेत. त्यावेळी तो जस्ट एक टीव्ही कलाकार होता पण इतका आनंदी care-free tension-free उत्साही दिसतो. अंकितासोबत प्रेमळ नोकझोक, इतर कलाकारांसोबत हास्यविनोद- कुठेही ताणतणाव दिसत नाही.
आणि नंतर इतकं यश, प्रसिद्धी, पैसे मिळाल्यावर तो पूर्ण बदलला व तणावात गेला. What has bollywood done to him?
शेवटी माणसाला नक्की काय हवं असतं आणि काय महत्वाचं असतं हा प्रश्न पडतो.

हम्मम्म,
कॉलेज मध्ये असताना एक एकांकिका सादर केली होती, कॉलेज मधल्याच एका मुलाने लिहिली होती,
त्याचा पहिला draft साधारण असा होता,
एक इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षाला असणारा , बऱ्यापैकी लोकप्रिय, मनमिळाऊ, GF असणारा मुलगा अचानक आत्महत्या करतो,
मग त्याच्या वर्तुळातील लोक या सुंदर चित्राच्या त्यांना माहीत असलेल्या पैलू बद्दल बोलतात जसे GF बरोबर भांडण झालेले, एक विषय राहिलेला, वडिलांशी पटत नव्हते इत्यादी इत्यादी.. आणि हेच कारण पोसीबली कसे खरे आहे हे लावून धरत राहतात,

शेवटी एक बौद्ध भिक्षु येऊन सांगतो, त्याने आत्महत्या का केली पेक्षा त्याने आत्महत्या केली हे स्वीकारा, आता तो नाहीये इतकेच सत्य आहे, बाकी सगळे मिथ्या.

सुशांत ने आत्महत्या का केली? हे फक्त त्यालाच माहित असेल , बाकी आहेत ते सगळे तर्क ज्याला जगात काही किंमत नाही.

RIP सुशांत.

कधी वाटत सुशांतने हार न मानता मयुरी कॉंगोने जशी दुसऱ्या करियरची चोखळली तस करायला हवं होतं>>>> exactly हेच मनात आलेलं पहिल्या दिवशी.

Pages