इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमचा जर नियमित तोटा होत असेल <<<< नाही. अजून नियमित ट्रेडींग सुरुच केले नाहीये. मी अजुन मला जमेल् अशी पद्धत शोधतीये. सगळे प्रकार ट्राय करुन बघते आहे.

शेअर मार्केट नेऊन काशीला सोडून या

क्रूड ऑइल भारी आहे

3600 ला घेऊन 3603 ला विकले , 20000 त एक लॉट
मग 3606 ला विकून 3603 ला बाय

30 मिनिटात 4 सौदे करून 1200 रु मिळाले, 2 , 3 रु चेच प्रॉफिट घ्यायचे.

अरबाने पाय धुतलेले पाणी कुठे मिळेल ?

ट्रेंड रिव्हर्सलला बाहुबली मेथड वापरली , मणिबंधम बहिर्मुखम , हाण तीन बाण

हेंकेंन अशी लावायचे , ट्रेंड खाली खाली येत आहे , तर रिव्हर्सलला एक पेटर्न मिळतो , खालच्या 3 कँडल्स , त्यातला पहिल्या 2 लाल व मोठ्या शेपट्या, दुसर्याची शेपूट लांब व सर्वात खाली टोकदार, मग तिसरी कँडल हिरवी , पण ती स्ट्रॉंग हवी, ती वर असून लाल असली तरी घ्यायची नाही.

बेरीश ला असेच 3 बाण मिळतात , पण पहिले 2 हिरवे व नंतरची लाल असते, ती लालच हवी , खाली असून हिरवी असेल तरी नको . इथे बाणाची टोके वर , मधले सर्वात उंच असते

तिसरी केंडल मोठी व स्ट्रॉंग हवी

त्या खालच्या चित्रात , पांढरा बाण आहे तिथे बुलीश चेंज आहे,
त्याच्या आधीच्या वळणाला बेरीश पेटर्नपण आहे.

जापनिज केंडलला याच जागी बहुतेक हॅमर असावेत , पण मला ते फार भरोषयाचे वाटत नाहीत

आपल्याला ट्रेडींग जमायला लागलं आहे तेव्हाच मार्केट मस्त एक धोबी पछाड देतं आणि आपल्याला अजून खुप शिकायचं आहे हे परत जाणवतं.>>>>+११११११ प्रत्येक दिवशी इथे नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आज मी जेव्हा महिन्यापूर्वी घेतलेले ट्रेड्स बघतो तेव्हा मन बोलतं अरे रे किती कच्चा लिंबू होतो आपण. कुठलाही लॉस झालेला ट्रेड आपल्याला काहीतरी शिकवत असेल आणि आपण ती झालेली चूक पुढच्या ट्रेड मध्ये टाळली तर तो लॉस ट्रेड पण आपल्यासाठी सक्सेसफुल ट्रेड असतो.

जाड बॉडी असते.
वर जाणारी असेल तर खालची शेपूट लहान , खाली जाणारी असेल तर वरची शेपूट लहान,

दुसऱ्या कँडल ला किमान 50 % झाकणारी , किंवा ट्रेंड च्या बाजूकडे ओव्हरलेप होणारी हवी

त्या वरच्या मोठ्या बुलीश वेव्ह मध्ये दोन अगदी बारीक लाल केंडल दिसतात , त्या वीक आहेत , तिथे फाल्स सिग्नल होते , हे लगेच लक्षात येईल
तिसरी कँडल पूर्ण तयार झाल्यावरच ट्रेंड घ्यायचा आहे.

ही मेथड मला दिवसा निफ्टीत बघायची आहे , पण सकाळी वेळ नसतो, क्रूड मध्ये आज प्रथमच सौदे केले.

मी फॉलो करत असलेल्या सिस्टीमचे एक उदाहरण.

Britannia चा डेली चार्ट पहा. ३३०० ते ३४०० मधून तो परत फिरतो आहे. चार वेळा त्याने प्रयत्न केला. आत्ता तो त्या झोन च्या जवळ आहे.

download1.png

आता खालचा डाटा पहा.

Capture.JPG

मागच्या तीन सेशन्स मधे फ्युचरचा ओपन ईंटरेस्ट वाढत आहे. पण फ्युचर वाले बुलिश आहेत की बेअरिश हे कसे कळणार? ते दोन प्रकारे, ईंट्राडे चार्ट पाहून किंवा ऑप्शन्स डाटा पाहून.

६ तारखेचा कॉल्सचा ओपन ईंटरेस्ट १,२५,२०० होता. आणि ७ तारखेला एका दिवसात १,२४,००० कॉल्स विकले आहेत. ईथे एक गृहितक आहे की ऑप्शन्स विकणारे जास्त स्मार्ट आसतात. त्यांनी बरोबर शुक्रवारी कॉल्स विकले जेणे करुन त्यांना विकेंड चा टाईम डिके मिळावा. आता ७ तारखेला एवढे कॉल्स विकले तर तो पुढचे काही दिवस साईडवेज जाणार किंवा खाली जाणार. त्याला ईतक्या सहजासहजी वर जाऊ देणार नाहीत. त्यामुळे पुढचे काही दिवस मी त्याच्या प्रत्येक high ला कॉल विकणार, जो पर्यंत ३३२० च्या वर क्लोज देत नाही किंवा कॉल्स चा ओपन ईंटरेस्ट ड्रास्टीकली कमी होत नाही किंवा पुटस चा ओपन ईंटरेस्ट खूप वाढत नाही तो पर्यंत.

त्या डेटा मधे अजून एक गोष्ट पहा, ३ फेब ला कॅश प्राईज ४.२८% वाढली. पण फ्युचर, ऑप्शन्स मधे जास्त काही हालचाल नाही. त्यामुळे मी त्यात लाँग एंट्री घेतली नाही.

त्या दिवशी जर फ्युचर चा ओपन ईंटरेस्ट वाढला असता आणि पुटस ची विक्री वाढली असती तर तो जो पर्यंत ३०८० च्या खाली क्लोज होत नाही तो पर्यंत मी प्रत्येक लो ला पुट विकला असता.

चार दिवस झाले तो साईडवेज गेलाय. तुम्हाला असं नाही वाटत की हा ट्रॅप असू शकतो? खाली यायचं असतं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याने डाउन मूव्हमेंट सुरू केली असती. जशी पूर्वी दोनदा दिले. यावेळी तीनही कॅडल एकाच रेंजमध्ये आहेत. मी यामध्ये तेव्हाच शॉर्ट करेन जेव्हा हा या तीन दिवसांची रेंज ब्रेक करून खाली क्लोजिंग देईल अन्यथा माझ्यासाठी हा चार्ट बुलीश आहे.

मी चार्टस जास्त पहात नाही. डाटा पाहतो. डाटा मधे काही हालचाल दिसली तर जाऊन चार्ट पाहतो. सोमवारी किंवा मंगळवारी हा स्टॉक २ ते ३ % खाली जाणार असे मला वाटते.

आणि राहता रहिले ट्रॅप विषयी तर ते मार्केट मधे पदोपदी असतात. त्यासाठीच स्टॉप लॉस आणि मनी/रिस्क मॅनेजमेंट महत्वाची असते.

Watchlist for 10.02.2020
1. MINDTREE
MINDTREE 10.02.20.JPG
2. JUBLFOOD
JUBLFOOD 10.02.20.JPG
3. VOLTAS
VOLTAS 10.02.20.JPG
4. MOTHERSUMI
MOTHERSUMI 10.02.20.JPG
5. INDUSINDBK
INDUSINDBK 10.02.20.JPG
6. COLPAL
COLPAL 10.02.20.JPG

सोमवारी किंवा मंगळवारी हा स्टॉक २ ते ३ % खाली जाणार असे मला वाटते.>>>>>>>

आणि माझी भविष्यवाणी खरी ठरली Proud

ब्रिटानिया खूपच खाली आला. सध्यातरी ३१३० ला सपोर्ट घेताना दिसतोय. हि लेव्हल तोडली तर अजून खाली जाईल. अतरंगी तुम्ही एक्झिट झालात कि ट्रेल करताय अजून?
britannia 10.02.20.JPG

Watchlist for 11.02.2020
1. BERGEPAINT
BERGEPAINT 10.02.20.JPG
2. KOTAKBANK
KOTAKBANK 11.02.20.JPG
3. CONCOR
CONCOR 11.02.20.JPG
4. ACC
ACC 11.02.20.JPG
5. INFRATEL
INFRATEL 11.02.20.JPG
6. SIEMENS
SIEMENS 11.02.20.JPG

Watchlist for 12.02.2020
1. BAJAJAUTO
BAJAJAUTO 12.02.20.JPG
2. TECHM
TECHM 12.02.20.JPG
3. CASTROLIND
CASTROLIND 12.02.20.JPG
4. DRREDDY
DRREDDY 12.02.20.JPG
5. RAMCOCEM
RAMCOCEM 12.02.20.JPG
6. LT
LT 12.02.20.JPG

बोकलत,

तुम्ही टाकलेल्या शॉर्ट लिस्टेड स्टॉक्स वर दुसर्‍या दिवशी काय ट्रेड केलेत ते पण लिहा की. कुठे एन्ट्री केलीत, कुठे टार्गेट ठेवले, कोणते स्टॉप लॉस ऊडाले?

Pages