इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Devki madam, tumhi shares aaj buy or sell karu shaktat ..faqt settlement aaj honar nahi karan karan bank holiday aahe...

.faqt settlement aaj honar nahi karan karan bank holiday aahe...>>>>> हो हेच माझी ब्रोकर बोलली.मी काल शेयर घेतले होते.सकाळी तिचा, काय रेटने विकू म्हणूनही फोन आला होता.तास दीड तसाने मागच्या पानावर दिल्याप्रमाणे रिप्लाय मिळाला.

कोलगेटने आजच चांगली मूव्ह दिली. मी १३३३.५ ला लॉंग एन्ट्री घेऊन १३४९ ला बाहेर पडलो.

आता संध्याकाळी डेटा अपलोड झाला की कळेल नक्की कोणत्या बाजूला जायची शक्यता आहे.

Watchlist for 20.02.2020
1. ICICIPRULI
ICICIPRULI 20.02.20.JPG
2. JUBLFOOD
JUBLFOOD 20.02.20.JPG
3. GRASIM
GRASIM 20.02.20.JPG
4. TCS
TCS 20.02.20.JPG
5. MARICO
MARICO 20.02.20.JPG
6. LT
LT 20.02.20.JPG

कोलगेटने आजच चांगली मूव्ह दिली. मी १३३३.५ ला लॉंग एन्ट्री घेऊन १३४९ ला बाहेर पडलो.

आता संध्याकाळी डेटा अपलोड झाला की कळेल नक्की कोणत्या बाजूला जायची शक्यता आहे. >> अतरंगी तुम्ही फ़्यूचर मधे घेता का कॅश मध्ये?

मार्केट रेंजबाउंड दिसत आहे. मी निफ़्टी मार्च चा ११७०० चा PE आणि १२४०० चा CE सेल करायचा विचार करतो आहे... Any Expert Comments?

मी १४, १७,१८,१९ सलग चार दिवस नेस्ले शाॅर्ट केला. आज दुसरा ट्रेड ॲक्टीव्ह असल्याने त्यात पेपर ट्रेड केला.

फक्त काल सोडून सगळे ट्रेड प्राॅफिट मधे.

आता पुढच्या आठवड्यात ईन्फोसिस. चांगली संधी बघून रोज शाॅर्ट करणार.

आता पुढच्या आठवड्यात ईन्फोसिस. चांगली संधी बघून रोज शाॅर्ट करणार.>>>>>>>

८०७.९५,८०८.९५,८०९.९५ चा स्प्रेड लावून शॉर्ट केला. आठवड्याची सुरुवात तरी मस्त झाली. Happy

मी amarajabat शॉर्ट केला होता 767.6 ला 755.90 ला Bo टार्गेट हिट झाला. ट्रेल करायची चांगली संधी हुकली.

छान

नाही इन्ट्रा डे मी फ़ारसा करत नाही...
अगदी जुजबी पोझिशनल ट्रेड करतो.
पूर्वी ऑप्शन ट्रेडींग करत होतो पण कराच्या भानगडीमुळे सोडले

आज ब्यांक निफ्टी स्ट्रेडल केले

सकाळी पाच मिनिटे पाहिले , आधीच खाली होते आणि फार हलत नव्हते, कॉल पूत दोन्ही शॉर्ट केले

11 वाजता दोन्ही मिळून 700 रु प्रॉफिट आले , बाहेर

नंतर 1 वाजता सेम अँसिस मध्ये केले, पुट सेल केलेला आकसून 1000 रु नफा

कॉल जरासा वाढून 200 रु नुस्कॅन

एकूण 1500 रु नफा दिवसात

Screenshot_2020-02-25-15-36-54-381_com.protrade.goodwill.png

मध्ये काही काळ अँसिस कॉल पुट दोन्ही आकसून दोन्ही नफ्यात होते , एकूण 2300 रु प्रॉफिट होत होते

पण ऑटो स्केआर ऑफ साठी गम्मत म्हणून थांबलो

IRCTC & Metropolis का पळतोय इतका?
Navin flourine पण दोन दिवसात खुपच वाढला.

६०० ला सपोर्ट घेताना दिसतोय. आता थोड्या दिवसात ६७० पर्यंत जाईल असं दिसतंय.
>>>>>>
हो , ६५५ चा resistance पार केल्यावर ६७० पर्यंत जाईल

Screenshot_2020-02-26-14-21-12-510_com.protrade.goodwill.png

आज तोच प्रयोग केला, सकाळी आय टी सी शांत होता म्हणून कॉल पुट शार्ट केले , 700 रु प्रॉफिट आले,

1 वाजता स्टेट बयाँक शांत होता, त्याचे कॉल पुट शार्ट केले , तर मजाच झाली , फक्त पुट ऑर्डर एक्सिकुट झाली , पाँच मिनिताने समजले कोल शार्ट झाला नाही, तोवर पुट 100 रु प्रॉफ़िट दाखवत होता, म्हणून मग त्याला तसाच ठेवला, तर तोच 2700 रु प्रोफितात आला, नेकेड नागड़ा पुट .

यहॉ पे सब शांति शांति है
शांति शांति शांति

बोकलत,

ट्रेडींग बंद आहे की चार्ट्स टाकून टाकून कंटाळलात? Happy

Pages