शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.
इंट्राडे चार्ट्स
Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पेपर ट्रेडिंग नका करू. रियल
पेपर ट्रेडिंग नका करू. रियल ट्रेडिंग करा, सुरवातीला कमी शेअर्स घ्या. मी मध्यंतरी एका कंपनीचे फक्त दोन ते तीन शेअर्स घ्यायचो. तोटा झाला तरी सहा सात रुपयांचा व्हायचा. नन्तर अनुभव आला की शेअर्स संख्या हळूहळू वाढवायची.
तोटा झाला तरी सहा सात
तोटा झाला तरी सहा सात रुपयांचा व्हायचा. ........ कसं. काय? ब्रोकरेज आणि कर मिळून जास्त होतात..माझे प्रभुदास लीलाधर मध्ये अकाऊंट ahé.
काही शेयार विकत घ्यायचे असतील तर 5000 रुपयांच्या आतील रकमेवर 1.5% ब्रोकरेज लागते
झिरोदा वापरा
झिरोदा वापरा
@देवकी, झेरोधा, अपस्टॉक्स,
@देवकी, झेरोधा, अपस्टॉक्स, फायर्स या सगळ्यांवर 0.07% च्या आसपास ब्रोकरेज आहे.
Ohh.धन्यवाद!
Ohh.धन्यवाद!
धन्यवाद बोकलत !
धन्यवाद बोकलत !
आणि मग बॅक टेस्टिंग कशी करावी ? झेरोदा चे Streak वापरावे का ?
हो झेरोधा स्ट्रिकवर होते
हो झेरोधा स्ट्रिकवर होते बॅकटेस्ट. पण हे बॅकटेस्ट करण्यापेक्षा लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग केली की माणूस पटापट शिकत जातो. बॅकटेस्ट मध्ये तुम्ही म्हणाल अमुक एक शेअर मी 500 ला घेऊन 505 ला विकेन पण खरोखर ट्रेडिंग करताना तो तुम्हाला मिळेल का 500 ला?
मी याविषयात शून्य आहे. पण
मी याविषयात शून्य आहे. पण तुमची चर्चा वाचून इंटरेस्ट यायला लागलाय.
मी नंतर इकॉनॉमिक टाइम्स मधले ट्रेडींग कॉल्स बघायला लागलो. त्यात मला गेल्या आठवड्यातला भारती एयरतेल चा कॉल चांगला वाटला.
तेंव्हा तो ५०९ ला होता. स्टॉप लॉस ४८९ आणि टार्गेट ५८०. योग्य वाटतो का. आज ५२० आहे.
नेकेड ऑप्शन (फक्त कॉल किंवा
नेकेड ऑप्शन (फक्त कॉल किंवा पुट विकत घेणे)नका घेऊ विक्रमसिंह. अचानक वळला तर मोठा फटका बसेल.
त्यापेक्षा जर तुम्हाला स्टॉक वर जाणार असे वाटत असेल तर Bull spread calls किंवा Bull spread puts घ्या.
यात एक ATM किंवा nearest ITM call विकत घ्यायचा आणि जेवढी वर मूव्हमेंट अपेक्षीत आहे त्याच्या सर्वात जवळचा कॉल विकायचा. यात तुम्हाला जेवढी मूव्हमेंट अपेक्षित आहे तेवढा फायदा होण्याचे पोटंशीअल असते (स्टॉक खूपच वर गेला तरी एवढाच फायदा होईल जास्त नाही, पण जर स्टॉक अचानक पडला तर मर्यादित थोडकेच नुकसान होते, मोठा फटका बसत नाही.
वर नमूद केलेल्या strategies बद्दल तुम्ही गुगल सर्च करून अधिक माहिती बघु शकता. तसेच मी आधी दिलेल्या opstra साईटवर अशी स्ट्रॅटेजी कन्स्ट्रक्ट करून जास्तीत जास्त किती नुकसान, किती फायदा हे पाहु शकता, रिस्क रिवार्ड रेशो किमान १: २ असावा.
तसेच स्टॉक खाली जाणार वाटत असेल तर bear spread calls घ्यावेत.
बेक टेस्टिंग्ज भरोषयाचे नसतात
बेक टेस्टिंग्ज भरोषयाचे नसतात , त्यात प्रत्येक ट्रेड मध्ये जाणारा बायर सेलर डिफ्रँस मोजला जात नाही, म्हणजे एल टी पी 240 असेल तरी बाय करताना 240.60 जातात व सेल करताना 230.30 ला होतो
काही चार्ट हे ओव्हर रायटिंग वाले असतात , म्हणजे लाईव्ह मार्केटला वेगळे असतात अन नंतर अर्ध्या तासाने एक वेगळी जागा असते, म्हणजे अर्ध्या एक तासाने ते आपोआप 100 % बरोबर दाखवतात , म्हणजे आधी बाण मारून मग गोल काढल्यागत.
त्याला रिपेंटिंग फॉर्म्युला म्हणतात , 100 % यशस्वी म्हंटले की ते रिपेंटिंग असतेच
बेक टेस्टिंग्ज भरोषयाचे नसतात
बेक टेस्टिंग्ज भरोषयाचे नसतात , त्यात प्रत्येक ट्रेड मध्ये जाणारा बायर सेलर डिफ्रँस मोजला जात नाही
ट्रेड घेण्यापूर्वी जास्तीत जास्त किती लॉस आणि किती प्रॉफिट हे बघु शकतो, वाटल्यास स्ट्राईक प्राईस ऍडजस्ट करू शकतो चांगला R/R रेशो मिळवायला. bid - ask स्प्रेड त्यात नसतो, पण प्रत्यक्ष ट्रेड घेण्यापूर्वी आपण तो तपासून पाहायचा असतो.
आपण नक्की कसला ट्रेड घेणार आहोत हे कळायला बॅक टेस्टिंगचा चांगला फायदा होतो. वापरण्यावर आहे.
काही लोक बॅक टेस्टिंग खरंच पैसे गुंतवल्या प्रमाणे गांभीर्याने घेत नाहीत, त्यांना बँक टेस्टिंग वेळेचा अपव्यय वाटतो, जे गांभीर्याने घेतात त्यांना वेळेचा सदुपयोग वाटतो. एकच निकष सगळ्यांना लागू होत नाही.
अहो मानवजी खरच तुम्ही काय
अहो मानवजी खरच तुम्ही काय म्हणला ते कंप्लीट डोक्यावरून गेले. वाइड बॉल.
पूर्वी टेल एंडरला लोक बाउन्सर टाकायचे नाहीत. 
अहो मी कुठ्ल काय घ्यायला. उगाच डोक फोडून घ्यायचय काय. अजून नेट प्रॅक्टीस सुद्धा चालू केली नाही. अभ्यास जमेल तसा चालू आहे.
पण धन्यवाद. काळजी घेइनच. मला काही डे ट्रेडिंग जमणार नाही. (सध्या वेळेवर वेळ नाही) . पण काहितरी टेक्निक वापऊन आठवड्यात २ -३ ट्रेड करता आले तर करावे म्हणतो.
तुम्ही ATM किंवा nearest ITM , Bull spread calls किंवा Bull spread puts म्हणजे स्टोप लॉस वगैरे बद्दल बोलताय का?. नंतर वेबवर चेक करीनच.
त्या ऑप्शन स्ट्रॅटेजीज आहेत.
त्या ऑप्शन स्ट्रॅटेजीज आहेत. गुगलवर सापडेल सगळं.
Watchlist for 24.01.2020
Watchlist for 24.01.2020





1. M&M
2. HAVELLS
3. M&MFIN
4. CUMMINSIND
5. TECHM
Indiabull फायनान्स कसा आहे
Indiabull फायनान्स कसा आहे उद्याच्या दृषटीकोनातून
इंडिया बुल उद्या ट्रेंड
इंडिया बुल उद्या ट्रेंड लाईनला कसा रिऍक्ट करतोय ते पाहायचं आहे. आज व्हॉल्युम व्यवस्थित मिळालाय पण %DLY बघाल तर खूपच कमी आहे.


धन्यवाद!
धन्यवाद!
Watchlist for 27.01.2020
Watchlist for 27.01.2020






1. TECHM
2. SIEMENS
3. MUTHOOTFIN
4. JINDALSTEL
5. GRASIM
6. GAIL
आशिया मार्केट एव्हडं डाऊन का
आशिया मार्केट एव्हडं डाऊन का आहे आज?
आशिया मार्केट एव्हडं डाऊन का
आशिया मार्केट एव्हडं डाऊन का आहे आज?> बहुतेक कोरोना वायरस
Watchlist for 28.01.2020
Watchlist for 28.01.2020






1. CIPLA
2. NIITECH
3. SIEMENS
4. RAMCOCEM
5. EXIDEIND
6. GRASIM
बहुतेक कोरोना वायरस
बहुतेक कोरोना वायरस
Submitted by विक्रमसिंह on 27 January, 2020 - 09:14>>>> +१११११
Watchlist for 29.01.2020
Watchlist for 29.01.2020






1. BPCL
2. MANAPPURAM
3. LICHSGFIN
4. COALINDIA
5. JUBLFOOD
6. LUPIN
बोकलत,
बोकलत,
खूप उपयोगी लिखान आहे....keep continue....
Watchlist Chart can you specify....bullish/bearish?
बोकलत तुम्ही चार्ट देताच आहात
बोकलत तुम्ही चार्ट देताच आहात तर त्यात काय पाहिले हे एकदोन वाक्यात लिहिले तर आम्हाला शिकायला मदत होइल. धन्यवाद.
बुलिश १,२,५
बुलिश १,२,५
बेयरीश ३,४
कन्सॉलिडेशन ६
असे अनुमान काधायचे का?
बुलिश १,२,३
बुलिश १,२,३
बेयरीश ४,५,६
ज्या चार्टवर हिरवी लाईन दिसते ते बुलिश आणि लाल लाईन ते बेअरिश. आजपासून स्टॉक सिलेक्ट का केला ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. मी शक्यतो फ्रेश मुव्हमेंट घेतो. म्हणजे एखादा स्टॉक रेंजमध्ये ट्रेडिंग करत असेल आणि त्याने ती रेंज तोडून वर क्लोजिंग दिली तर तो माझ्या बाय लिस्टमध्ये येतो (BPCL for buyआणि COALINDIA for short ) . तसेच एखादा स्टॉक सलग दोन दिवस वर जात असेल तर तिसऱ्या दिवशी शक्यतो तो माझ्या बाईंग लिस्टमध्ये नसतो.
Watchlist for 30.01.2020
Watchlist for 30.01.2020






1. TATAMOTORS
2. BATAINDIA
3. BERGEPAINT
4. HINDALCO
5. PETRONET
6. MUTHOOTFIN
Watchlist for 31.01.2020
Watchlist for 31.01.2020






1. JUBLFOOD
2. TATAELXSI
3. MANAPPURAM
4. COLPAL
5. PEL LADY
6. ADANIPORTS
2. TATAELXSI ===> HOURLY
2. TATAELXSI ===> hourly heiken ashi...look bullish at opening.....but now bearish candle formed...१०.५५ IST
Pages