इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Watchlist for 05.02.2020
1. HDFC
HDFC 05.02.20.JPG
2. TECHM
TECHM 05.02.20.JPG
3. RECLTD
RECLTD 05.02.20.JPG
4. GODREJCP
GODREJCP 05.02.20.JPG
5. AMARAJABAT
AMARAJABAT 05.02.20.JPG
6. LT
LT 05.02.20.JPG

जरा जास्तच होतय, पण समजून घ्या
माझा उद्या साठी लिंबू टिंबू ट्रेड.
टिटान साठी सुरूवातीला डाउन वर्ड असेल तर.
Entry 1280 Target 1215 Sl 1340
कारण अप मूव नंतर रेझिस्टन्स जवळ दोजी.

Entry 1280 Target 1215 << एका दिवसात एवढी मुव्ह देइल ? शॉर्ट करत आहात म्हणून विचारतीये.

सुरूवातीला डाउन वर्ड << सुरुवातीला म्हणजे किती वेळ ? डाऊन असेल तर १२८० ला एन्ट्री मिळेल का ? जेन्युइन प्रश्न आहेत.

आज सिप्ला पुर्ण दिवस रेंज मधे राहुन शेवटच्या १० मिनिटात ४% गेला. मी सकाळ पासून पुट शॉर्ट करुन बसलो होतो. ३.१० च्या सुमारास आता काय हा जाणार नाही म्हणून स्क्वेअर ऑफ केला. Angry

टायटन अपट्रेण्डमध्ये दिसतोय. हे अपट्रेण्ड स्टॉक कधी कुठला सपोर्ट घेऊन वरती जातील याचा भरोसा नाही. मी या अपट्रेण्ड स्टॉकना शॉर्ट करताना सुरवातीला स्टॉप लॉस जरा मोठा ठेवतो आणि एकदा का 0.7% खालची मूव्हमेंट दिली की बाहेर पडतो नाहीतर स्टॉप लॉस ट्रेल करतो.

धनश्री : entry घेता आली तरच. सुरूवातीला म्हणजे अर्धा तास.
बोकलत : हे फक्त थियरी तपासण्या साठी. तस झाल नाही तर learning. Happy
मी नवखा लिंबू टिंबू आहे हे लक्षात घ्या.

@विक्रमसिंह, हो, मी आपला माझा अनुभव सांगितला अपट्रेन्ड शॉर्ट करताना काय करतो ते. आणि शेअर मार्केटसमोर सगळेच लिंबू टिंबू आहेत. Happy

Watchlist for 06.02.2020
1. TATAMOTORS
TATAMOTORS 06.02.20.JPG
2. SRTRANSFIN
SRTRANSFIN 06.02.20.JPG
3. TCS
TCS 06.02.20.JPG
4. COALINDIA
COALINDIA 06.02.20.JPG
5. ACC
ACC 06.02.20.JPG
6. RAMCOCEM
RAMCOCEM 06.02.20.JPG

आज सिप्ला पुर्ण दिवस रेंज मधे राहुन शेवटच्या १० मिनिटात ४% गेला. मी सकाळ पासून पुट शॉर्ट करुन बसलो होतो. ३.१० च्या सुमारास आता काय हा जाणार नाही म्हणून स्क्वेअर ऑफ केला>>>>स्टॉक साईडवेज गेल्यावर बाहेर नाही पडत तुम्ही? मी जास्तीस्त जास्त १५ ते २० मिनिटे वाट पाहतो त्यानंतर मुव्हमेंट दिली नाही तर लगेच एक्झिट घेतो.

मी या अपट्रेण्ड स्टॉकना शॉर्ट करताना सुरवातीला स्टॉप लॉस जरा मोठा ठेवतो आणि एकदा का 0.7% खालची मूव्हमेंट दिली की बाहेर पडतो नाहीतर स्टॉप लॉस ट्रेल करतो.>> ओके. समजल तुम्ही काय म्हणताय ते. लक्षात ठेवीन . Happy

नाही. एक तर लॉस हिट व्हायला हवा नाही तर टार्गेट. >>> एक टाइम स्टॉपलॉस सुद्धा ठेवत चला अर्ध्या तासाचा. तेवढ्यात हवी ती मूव्हमेंट झाली नाही की बाहेर पडायचे.

बोकलत अहो नाही ना. मला ते कसे करावयाचे माहिती नाही. ते नीट समजून घ्यायचे आहे. झाला असता फायदा.
(मटका. Beginners luck)

.पण मी जशी supporting thought process लिहीली तशी सगळ्यांनी लिहिली तर चर्चा करता येइल आणि सगळेच शिकतील.

कारण अप मूव नंतर रेझिस्टन्स जवळ दोजी. <<<< आज दोजीला फॉलोअप आलाय. अर्थात नोव्हेंबरची गॅप भरुन निघाली आहे. त्यामुळे सध्या फक्त वॉच ठेवणे .

Watchlist for 07.02.2020
1. HEROMOTOCO
HEROMOTOCORP 07.02.20.JPG
2. BPCL
BPCL 07.02.20.JPG
3. HINDALCO
HINDALCO 07.02.20.JPG
4. ITC
ITC 07.02.20.JPG
5. UPL
UPL 07.02.20.JPG

एक टाइम स्टॉपलॉस सुद्धा ठेवत चला अर्ध्या तासाचा. तेवढ्यात हवी ती मूव्हमेंट झाली नाही की बाहेर पडायचे.>>>>

मी शक्यतो कॉल किंवा पुट शॉर्ट केलेला असतो. त्यामुळे साईड्वेज स्टॉक मधे मला टाईम डिके मिळतो.

त्यामुळे मी सगळी रिस्क आधीच पाहिलेली असते. मी शक्यतो एकदा ट्रेड घेतला की ना स्टॉप लॉस हलवतो ना टार्गेट.

मी आज हिरो मोटर्स शॉर्ट केला होता २४६१ ला. मार्केट ओपन झाल्यावर २४०० चा कॉल विकायला ठेवायला होता ९० ला पण ऑर्डर एक्सिक्यूट नाही झाली, मग ९.४० च्या सुमारास शॉर्ट केला.
२४४३ ला पहिला प्रॉफिट बूक केला. नंतर गाडीवर होतो म्हणून घाईघाईत स्टॉप लॉस २४६६ ऐवजी २४५६ ला ठेवला आणि तो ऊडाला.

असो. ट्रेड प्रॉफिट मधेच गेला.

तुम्ही हिरो मोटर्स फक्त पॅटर्न बघून केला होता का? आज हिरो मोटर्स वर जाणे आणि गेला तरी टिकणे अवघड होते. आज माझ्या साठी हिरो मोटर्स शॉर्ट सेट अप होता.

हो खरं तर तो आज बाईंग लिस्टमध्ये होता. पण ओपनिंग 3% दिली. त्यामुळे खाली ट्रेंडलाईन जवळ आला तेव्हा बाय केला. पण वर जाण्याची चिन्ह दिसत न्हवती त्यामुळे लगेच बाहेर पडलो.

स्टॉप लॉस २४६६ ऐवजी २४५६ ला ठेवला << option शाॅर्ट करताना स्पॉट वरुन कसे ठरवता स्टाॅप लाॅस ? म्हणजे सिस्टिम मध्ये कोणत्या अंदाजाने टाकून ठेवता?

मी कॅश मधे शाॅर्ट केला होता

मला काॅल शाॅर्ट करायचा होता त्या किमतीला तो झाला नाही. मग तो जेव्हा परत शाॅर्ट करायच्या रेंज मधे आला तेव्हा तो लाॅट साईज मुळे माझ्या गणितात बसत नव्हता. म्हणून मी कमी quantity कॅश मधे शाॅर्ट केला.

ओके.

मी सध्या वेगवेगळे पर्याय बघत आहे. काय आणि कसं जमेल ह्याचा अंदाज घेते आहे.
मला मुख्य म्हणजे योग्य वेळ साधता येत नाही. मग अभ्यास बरोबर असला तरी काही वेळा SL हिट होतो किवा entry च मिळत नाही.

धनश्री,

मी पण शिकतच आहे. जेव्हा कधी वाटतं की आपल्याला आता सगळं कळलेलं आहे. आपल्याला ट्रेडींग जमायला लागलं आहे तेव्हाच मार्केट मस्त एक धोबी पछाड देतं आणि आपल्याला अजून खुप शिकायचं आहे हे परत जाणवतं.

ट्रेडींग करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला कोणती जमते ते पहा.

बोकलत वापरत असलेली पद्धत मला जमत नाही. माझा भर डेटा ॲनेलेसिस वर असतो. मी त्या डाटा वरूनच ट्रेड सेट अप ठरवतो. फक्त स्टाॅप लाॅस ट्रेल करायला चार्ट वापरतो. मी मला सुटेबल मेथड वापरायला लागल्या पासून लाॅस कमी झालाय.

तुमचा जर नियमित तोटा होत असेल तर तुम्ही ट्रेडींग डिसीप्लिन तोडत नाही ना किंवा तुम्ही तुमच्या स्वभावाला सुटेबल नसलेली ट्रेडींग मेथड फाॅलो करत आहात का हे पण पहा

Pages