शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.
इंट्राडे चार्ट्स
Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
किती लोक स्वतःसाठी पूर्ण वेळ
किती लोक स्वतःसाठी पूर्ण वेळ शेअर ट्रेडिंग करून स्वतःचा चरितार्थ चालवतात?>> शंभर पैकी 2 ते 3 जण. स्पर्धा परीक्षेत 1 जागेसाठी येणारे हजारो फॉर्म पाहिले की शेअर मार्केटचा सक्सेस रेशो मला खूपच भारी वाटतो
इंडिगोने गॅप अप ओपनिंग नंतर
इंडिगोने गॅप अप ओपनिंग नंतर दिलेली शॉर्ट साईड मूव्ह

ओके बोकलत
ओके बोकलत
Adani green 150च्या आसपास आला
Adani green 150च्या आसपास आला की थांबेल असं दिसतंय.
150.... ह्म्ममम ओके!
150.... ह्म्ममम ओके!
Watchlist for 17.01.2020
Watchlist for 17.01.2020




1. BIOCON
2. HINDPETRO
3. IOC
4. CADILAHC
Cadila पर्फेक्ट शॉर्ट
Cadila पर्फेक्ट शॉर्ट कॅन्डीडेट वाटतोय.
बोकलत सर तुम्ही स्क्रिनिंग साठी कुठली साईट वापरता?
cadilahc आज माझ्या पण लिस्ट
cadilahc आज माझ्या पण लिस्ट मधे आहे. कोणत्यातरी एका बाजूला तो मोठी मुव्ह देणार. आज नाही तर दिली तर सोमवारी. शक्यतो आजच आणि माझ्या मते लाँग साईडला.
काल future चा OI एकदम १०% ने वाढला आहे. डिलिव्हरी पण सरासरीपेक्षा जास्त आहे. कॉल्स OI सरासरीपेक्षा जवळ जवळ १५ ते २० पट आहे. काल एका दिवसात जानेवरी आणि फेब चे १५,१८,००० कॉल राईट झालेत.
Cadila पर्फेक्ट शॉर्ट
Cadila पर्फेक्ट शॉर्ट कॅन्डीडेट वाटतोय. << का ?
बोकलत तुम्ही स्क्रिनिंग साठी
बोकलत तुम्ही स्क्रिनिंग साठी कुठली साईट वापरता?>>> कुठलीच नाही . मी fno मध्ये लिस्ट झालेले सगळे स्टॉक चार्ट पाहतो. कधी वेळ नसेलच तर nse साईटवरून bhavcopy डाउनलोड करून चांगली मूव्हमेंट दिलेले स्टॉक्स पाहतो.
Cadila पर्फेक्ट शॉर्ट
Cadila पर्फेक्ट शॉर्ट कॅन्डीडेट वाटतोय. << का ? >>>>>मला वाटतंय तो वर जाऊ शकतो आणि खालीही येऊ शकतो. आपण आधीच अमुक एक स्टॉक वर जाईल किंवा खाली येईल असा माईंडसेट बनवला की ते ट्रेडिंगच्या दृष्टीने घातक ठरतं. आपण फक्त मार्केट सुरू झाल्यावर बैल आहे की अस्वल ते ओळखायचं आणि त्यावर बसायचं.
आणि अजून एक, बैल अस्वल चालत
आणि अजून एक, बैल अस्वल चालत नसले की लगेच उतरून साईडला व्हायचं. आता चालेल नन्तर चालेल असं करत वाट नाही पहायची.
मी २६८.३५ ल घेतला, कॅश मधे.
मी २६८.३५ ल घेतला, कॅश मधे. २६६ चा SL.
आज तो डाउन सायकल मध्ये दिसतोय
आज तो डाउन सायकल मध्ये दिसतोय, बायर्स एव्हडे स्ट्रॉंग दिसत नाहीत. बहुतेक खाली जाईल आज तो. पण तुम्ही घेतलाय तर माझा अंदाज साफ खोटा ठरून तो वर जावा.

आपण आधीच अमुक एक स्टॉक वर
आपण आधीच अमुक एक स्टॉक वर जाईल किंवा खाली येईल असा माईंडसेट बनवला की ते ट्रेडिंगच्या दृष्टीने घातक ठरतं. <<< +१११
आज तो डाउन सायकल मध्ये दिसतोय
आज तो डाउन सायकल मध्ये दिसतोय, बायर्स एव्हडे स्ट्रॉंग दिसत नाहीत. बहुतेक खाली जाईल आज तो. पण तुम्ही घेतलाय तर माझा अंदाज साफ खोटा ठरून तो वर जावा.>>>>>>>
मला १% मिळाला. दिवसाचे टार्गेट पुर्ण झाले. आता तो कुठे का जाईना.
(No subject)
Cadila पर्फेक्ट शॉर्ट
Cadila पर्फेक्ट शॉर्ट कॅन्डीडेट वाटतोय. << का ? >> डेली चार्टवर सहा महिन्यातील ट्रिपल टॉप आणि २७० पासूनचे वाढलेले कॉल रायटींग, यावरून मला शॉर्ट कॅन्डीडेट वाटला, आजच्या पुरता अर्थात.
पण वाटला म्हणजे लगेच एन्ट्री घ्यावी असे नाही. १५ मिनिट चार्टवर सुपर ट्रेंड + PSAR + MACD ने मिळून एन्ट्री दिली तर (किंवा अजून कोणते इंडिकेटर्स वापरात असाल त्या नुसार एंट्री मिळाली तर).
एंट्री घ्यायला तुम्ही / इतर कोण कोणते इंडिकेटर्स वापरता हे जाणून घ्यायला आवडेल.
कुठलीच नाही . मी fno मध्ये
कुठलीच नाही . मी fno मध्ये लिस्ट झालेले सगळे स्टॉक चार्ट पाहतो. कधी वेळ नसेलच तर nse साईटवरून bhavcopy डाउनलोड करून चांगली मूव्हमेंट दिलेले स्टॉक्स पाहतो.>>>
ओके.
Submitted by बोकलत on 17 January, 2020 - 09:51
Submitted by बोकलत on 17 January, 2020 - 10:0 >>>
छान टिप्स.
Adani Green आला एकदाचा बाहेर
Adani Green आला एकदाचा बाहेर लोअर सर्किट मधून... आज परत जवळजवळ ५% up आहे!
बोकलत , मानव छान अभ्यास आहे
बोकलत , मानव छान अभ्यास आहे तुमचा.. अन छान लिहिताय..
डेली चार्टवर सहा महिन्यातील
डेली चार्टवर सहा महिन्यातील ट्रिपल टॉप <<< मी जे ऐकलय, वाचलय त्याप्रमाणे हा टॉप तुटण्याची शक्यता आहे. अर्थात एक डिप नक्कीच देइल.
२७० पासूनचे वाढलेले कॉल रायटींग <<< ह्याचा माझा नीट अभ्यास नाहीये. करायला हवा.
Adani Green आला एकदाचा बाहेर
Adani Green आला एकदाचा बाहेर लोअर सर्किट मधून... आज परत जवळजवळ ५% up आहे!>>>हो निघाला एकदाचा. आता परत अप्पर सर्किट मारणार की ट्रॅप आहे हा?
एंट्री घ्यायला तुम्ही / इतर
एंट्री घ्यायला तुम्ही / इतर कोण कोणते इंडिकेटर्स वापरता हे जाणून घ्यायला आवडेल>>> मी शक्यतो पॅटर्न आणि प्राईझ ऍक्शन बघतो. बाकी मूविंग एव्हरेज रेफरन्ससाठी असतात फक्त.
बोकलत , मानव छान अभ्यास आहे
बोकलत , मानव छान अभ्यास आहे तुमचा.. अन छान लिहिताय..
Submitted by भावना गोवेकर on 17 January, 2020 - 11:55>>> धन्यवाद भावनाताई
https://zerodha.com/margin
https://zerodha.com/margin-calculator/SPAN
हेज पोझिशन असेल तर दुसऱ्या मारजीनवर 40-50% सवलत मिळते
सेबी अजून मार्जिन कमी करणार आहे म्हणे
Watchlist for 20.01.2020
Watchlist for 20.01.2020



1. LT
2. ADANIENT
3. GRASIM
फायनली cadilahc आज हालला.
फायनली cadilahc आज हालला. व्हॉल्यूम पण बर्यापैकी आहे.
आजची क्लोजिंग ट्रेंड लाईनच्या
आजची क्लोजिंग ट्रेंड लाईनच्या वर दिली तर येत्या काही दिवसात हा चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

पेपर ट्रेडिंगची चांगली पद्धत
पेपर ट्रेडिंगची चांगली पद्धत कोणती ?
इंटरनेटवर काही सीम्युलेटर आहेत का ?
कृपया मार्गदर्शन करावे.
Pages