इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

दुसरे म्हण्जे तुम्ही टॅक्स इम्प्लिकेशन कसे मॅनेज करता.>>> पोलीस दारापर्यंत येतील तेव्हा बघू >>> हा हा मग काय बोलणेच खुंटले Happy Happy
मला ते जमायचे नाहि Sad

अतरंगी तुम्ही ट्रेड करत असलेली पद्धत माझ्या ट्रेडिंगसोबत मॅच करून बघतोय आणि मला त्याचा खूपच फायदा होतोय. तुमचे मनापासून धन्यवाद.

You are welcome, बोकलत.

तुम्हाला लवकरच ही पद्धत आत्मसात होवो, तुम्हाला रोज एकच स्टाॅक वेगवेगळ्या टाईमफ्रेम मधे पाहणे, त्यावर चित्रविचित्र रेघोट्या मारणे, मार्केट चालू असताना सहा तास स्क्रीनला खिळून राहणे या सर्वांतून तुमची सुटका होवो हीच सदिच्छा!!!! Happy

फ्युचरचा ओपन इंटरेस्ट हिस्टोरीकल डेटा उपलब्ध असतो काय?>>>>>

हो

Go to Nse website, products, equity derivatives, historical data, contract wise archives.

IMG_20200215_224040.jpg
Zerodha varsity मधून शिकताना वरील माहिती मिळाली
यामधील long unwiding व short covering विषयी
माहिती हवी आहे

पाहिलं जे ऑप्शन आहे प्राईझ वाढते आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय हे एखाद्या स्राईक प्राईझला जर कॉल मध्ये होत असेल आणि त्याच्या विरुद्ध त्याच स्ट्राईक प्राइझला पुट मध्ये ऑप्शन रायटिंग झाली नसेल तर स्टॉक प्राईझ खाली जाते अस मला वाटतंय. लॉंग अन्वयडिंग म्हणजे ज्यांना वाटत होतं मार्केट वर जाईल आणि पोझिशन घेतली होती त्यांनी पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्या आणि बाहेर पडले.त्यांच्या मते मार्केट आता वर जाणार नाही , आणि शॉर्ट कवरिंग म्हणजे ज्यांना वाटत होतं मार्केट खाली जाईल आणि पोझिशन घेतली होती त्यांनी पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्या आणि बाहेर पडले त्यांच्या मते आता मार्केट खाली जाणार नाही. अधिक माहिती अतरंगी सांगतीलच.

माझा एक बेसिक प्रश्न आहे airtel च्या बाबतीत.
नेमका airtel कशाच्या बेसिस वर कायम वर जातोय?
सरकार जीवघेणा टॅक्स पे करायला लावतय, airtel बिजनेस शट डाऊनची धमकी देतंय, 5G स्पेक्ट्रम मध्ये भाग घेणार नाही असंही सांगतंय.
एक ना एक दिवस airtel ही DHFL सारखा कोसळेल असं दिसतंय...

उद्या बहुतेक पडेल असं वाटतंय. काही सांगू नाही शकत सगळे शॉर्ट पोझिशन घेतील आणि ऑपरेटर वर नेतील. रिटेलरला लुटा.

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बोकलत.
आज एका बिझनेस चॅनल वर देखील या विषयी माहिती मिळाली.
____________________________________________________
माझा एक बेसिक प्रश्न आहे airtel च्या बाबतीत.
नेमका airtel कशाच्या बेसिस वर कायम वर जातोय?
सरकार जीवघेणा टॅक्स पे करायला लावतय, airtel बिजनेस शट डाऊनची धमकी देतंय, 5G स्पेक्ट्रम मध्ये भाग घेणार नाही असंही सांगतंय.
एक ना एक दिवस airtel ही DHFL सारखा कोसळेल असं दिसतंय...
>>>>>>>>>>>>
https://www.google.com/amp/s/m.businesstoday.in/lite/story/why-bharti-ai...

Watchlist for 18.02.2020
1. BALKRISIND
BALKRISIND 18.02.20.JPG
2. TORNTPOWER
TORNTPOWER 18.02.20.JPG
3. MANAPPURAM
MANAPPURAM 18.02.20.JPG
4. BAJAJ-AUTO
BAJAJ-AUTO 18.02.20.JPG
5. HDFC
HDFC 18.02.20.JPG
6. BPCL
BPCL 18.02.20.JPG

बोकलत तुम्ही जे रोज चार्ट्स टाकता ते थोडेसे एक्स्प्लेन पण करा ना? कुठले इंडीकेटर वापरता... काय पोसिशन घेता वगैरे वगैरे म्हणजे आम्हालाही शिकता येइल

आज ट्रेडिंग करायला वेळ नाही मिळाला पण केली असती तर manappuram मध्ये 1% च्या आसपास प्रॉफिट घेऊन बाहेर पडलो असतो. कारण तो ट्रेंडलाईन वरून वरती जायला लागला होता. बाकी hdfc आणि bajaj-auto ने चांगला प्रॉफिट दिला असता शॉर्ट साईडला पण एन्ट्री घेतली असती की नसती माहीत नाही. जरी घेतली असती तरी बहुतेक ऑन कॉस्ट एक्झिट झालो असतो.

कुठले इंडीकेटर वापरता>>>गेल्या एक महिन्यात मी कोणताही इंडिकेटर वापरला नाही आणि इथून पुढे बहुतेक वापरणारही नाही. यापूर्वी मूव्हिन्ग ऍव्हरेजेस, vwap , पिव्होट वापरायचो.

त्यामुळे जो पर्यंत मला कॉल्सचा ओपन ईंटरेस्ट कमी होताना दिसत नाही किंवा माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तो पर्यंत मी माझी पोजिशन कॅरी करणार. आणि तो परत वर आला तरी परत शॉर्टच करणार.>>>>>>>

मी सलग तीन दिवस चान्स पाहून नेस्ले शाॅर्ट केला.

१४ फेब १६६५८
१७ फेब १५५९९
१८ फेब १५५४५

अतरंगी फ्युचर ओपन इंटरेस्ट कसं काम करतो. म्हणजे स्टॉक वर गेला आणि फ्युचर ओपन इंटरेस्ट वर गेला तर बुलीश ट्रेंड आहे. पण दुसऱ्या दिवशी तो स्टॉक खाली आला आणि ओपन इंटरेस्ट कमी झाला तर तिसऱ्या दिवशी तो तिसऱ्या दिवशी खाली येईल की ओपन इंटरेस्ट वाढलेला असेल तर खाली येईल.

कुठले इंडीकेटर वापरता>>>गेल्या एक महिन्यात मी कोणताही इंडिकेटर वापरला नाही आणि इथून पुढे बहुतेक वापरणारही नाही. यापूर्वी मूव्हिन्ग ऍव्हरेजेस, vwap , पिव्होट वापरायचो. >>> ओके. धन्यवाद मग आता फ़क्त कन्डलस्टिक वरून त्रेंड ठरवता का?

अतरंगी फ्युचर ओपन इंटरेस्ट कसं काम करतो. म्हणजे स्टॉक वर गेला आणि फ्युचर ओपन इंटरेस्ट वर गेला तर बुलीश ट्रेंड आहे. पण दुसऱ्या दिवशी तो स्टॉक खाली आला आणि ओपन इंटरेस्ट कमी झाला तर तिसऱ्या दिवशी तो तिसऱ्या दिवशी खाली येईल की ओपन इंटरेस्ट वाढलेला असेल तर खाली येईल. >>> अतरंगी सांगतीलच. पण दुसर्य दिवशी स्टॉक खाली आला व ओ. आय पण कमी झाला म्हणजे प्रॉफ़िट बुकिंग झाले.. आता तिसर्या दिवशी स्टॉक काय म्वूव देईल हे त्या दिवशी काय ट्रेंड असेल त्यावर ठरेल

दुसऱ्या दिवशी तो स्टॉक खाली आला आणि ओपन इंटरेस्ट कमी झाला तर तिसऱ्या दिवशी तो तिसऱ्या दिवशी खाली येईल की ओपन इंटरेस्ट वाढलेला असेल तर खाली येईल.>>>>

किती खाली आला आणि ओपन ईंटरेस्ट कितीने कमी झाला यावर ते ठरेल ना. शिवाय त्याचा सरासरी ओपन ईंटरेस्ट किती असतो हे पाहणे पण महत्वाचे.

तुम्ही कोणत्या विशिष्ठ स्टाॅक बद्दल बोलत आहात की जनरल?

धन्यवाद मग आता फ़क्त कन्डलस्टिक वरून त्रेंड ठरवता का?> हो आता फक्त प्राईझ ऍक्शन आणि पॅटर्न. आणि खरं सांगायचं तर एन्ट्रीपेक्षा माझी एक्झिट व्यवस्थित होते त्यामुळे प्रॉफिट होतो.

हो आता फक्त प्राईझ ऍक्शन आणि पॅटर्न. आणि खरं सांगायचं तर एन्ट्रीपेक्षा माझी एक्झिट व्यवस्थित होते त्यामुळे प्रॉफिट होतो. >> Ok Got it thanks

मला कोलगेट मधे एकदम मुव्ह येणार असे वाटत आहे. कोणत्या बाजूला देईल आणि कधी देईल हे अजून कळत नाहीये. पण फ्युचरचा ओपन ईंटरेस्ट वाढतो आहे. ११ तारखेपासून किंमत जास्त वर खाली होत नाहीये पण ओपन ईंटरेस्ट २६ % वाढला आहे. पोजिशन बिल्ड होत आहे.

कोलगेट इंटरेस्टींग आहे. मला वाटत एखादा दिवस वर जाउन परत खाली जाइल.

जनरल ; कोरोना मुळे प्रचंड उलथापालथ होउ शकते.

ट्रेड झाला , 900 रु मिळाले,>>>> अरे पण आताच ब्रोकरने फोन केला की आज सुटी असल्याने सेटलमेंट करू शकत नाही२० मिनिटांपूर्वी त्यांना मेसेज आला.मार्केट चालू आहे.माझे अडानीचे शेयर विकू शकत नाही.

Pages