इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी आज टेक महिंद्रा बाय केला होता आणि रामको शॉर्ट. टेक महिंद्रात प्रॉफिट झाला आणि रामकोमध्ये लॉस. टेक महिंद्राचा प्रॉफिट किंचित जास्त होता. ब्रोकरेज पकडला तर जेमतेम 0.1% प्रॉफिटमध्ये बाहेर पडलो.

शॉर्टः- NestleInd, Dabur, Coal India << Dabur का शॉर्ट ?

कोल आणि गोदरेज कन्जुमर शॉर्ट केले होते. <<< कोल पहील्या १५ मि तच केलात का ? नंतर रेंज मध्ये फिरतांना दिसतोय.

मी काल सकाळच्या रॅलीत टाटा मोटर्स CE घेतला. मग अचानक बाहेर जावे लागल्याने २५ पैसे घेऊन एक्झिट. ह्या महीन्यात ऑप्शन सेलींग करायचा विचार आहे. पण पुढच्या आठवड्यात.

अतरंगी काल कॅनबॅन्क ऑप्शन चैन मध्ये सगळ्या पोझिशन्स लॉन्ग साईडला बनल्या होत्या पण आज तो खाली आला. त्यामुळे मी जरा कन्फयुज झालो. मी फक्त स्ट्राईक प्राईझवरचे ओपन इंटरेस्ट बघितले होते. अजून काही डेटा पाहायला लागतो का?

Watchlist for 13.02.2020
1. MCDOWELL-N
MCDOWELL-N 13.02.20.JPG
2. IGL
IGL 13.02.20.JPG
3. CHOLAFIN
CHOLAFIN 13.02.20.JPG
4. SBIN
SBIN 13.02.20.JPG
5. VEDL
VEDL 13.02.20.JPG
6. CIPLA
CIPLA 13.02.20.JPG

MCDOWELL-N buy at 694.50 exit 703.75
CIPLA Short at 444.20 exit at 444.70 सिप्ला एक्झिट करण्याऐवजी ट्रेल करायला पाहिजे होतो. आता खाली गेला. असो.
MCDOWELL-N 13.02.20_0.JPG

तुम्ही सगळी quantity एका किमतीला बााय/ सेल करता का?

मी एंट्री आणि एक्जिट तीन किमतीचा स्प्रेड लावून करतो.

Dabur का शॉर्ट ?>>>

धनश्री,

त्याचे उत्तर डेटा मधे लपलेले आहे. काल किंमत वाढली पण फ्युचरचा ओपन ईंटरेस्ट आजिबात वाढला नाही. उलट थोडासा कमी झाला. आणि कॉल्सचा ओपन ईंटरेस्ट वाढला. म्हणजेच काल जरी स्टॉक वर गेला असेल तरी आज अजून वर जाणे किंवा असलेली किंमत टिकून राहणे अवघड आहे. शिवाय स्टॉक स्टॉप लॉस च्या जवळ आहे. म्हणून मी तो शॉर्ट करणार.

आता डाबरचा आज सकाळपासूनचा डेटा पहा.

Capture1.JPG

कॉल्सचा ओपन ईंटरेस्ट अजून वाढला आहे. पुट्स च्या किंमती वाढल्या आहेत पण ओपन ईंटरेस्ट कमी होत आहे. त्यामुळे आता ज्यांनी कॅश मधे शॉर्ट केला आहे किंवा कॉल्स विकले आहेत त्यांनी स्टॉप लॉस ट्रेल करणे फायद्याचे ठरु शकेल.

पुट्सचा ओपन ईंटरेस्ट जरी कमी होत असला तरी खूप कमी झालेला नाही. त्यामुळे बुल्स गड राखायचा प्रयत्न करणार. आज आणि उद्या जरा रस्सीखेच होईल बहुतेक.

Watchlist for 14.02.2020
1. TORNTPHARM(B)
2. UJJIVAN(B)
3. INDUSINDBK(S)
4. GRASIM(S)
5. MOTHERSUMI(S)

माझ्या ऊद्याच्या लिस्ट मधे फक्त Nestle आला.

ऊद्या तो २ ते ३ % देणार. कोणत्या बाजूला ते पाहू.

मोस्टली गॅप अप ओपन आणि दिवसा अखेर रेड कॅंडल.

मी ओपन पासून शाॅर्ट. Happy

असेना का...

आपल्याला काय त्याच्याशी.

स्टाॅक १०० ला असो की १०,००० ला. आपण टक्क्यात खेळायचं.

नेस्ले ०.५३% वर ओपन झाला.

१६६५८ ला शॉर्ट करुन १६५६० आणि १६४९१ वर पार्शियल प्रॉफिट बूक केला. बाकी quantity आता ट्रेलिंग स्टॉप लॉस वर.

आणि मी दिवस भर भटकायला रिकामा Proud

आता तो एक तर खाली जाणार नाहीतर साईड्वेज.

वर जाणे मला तरी अशक्य वाटते आहे.

असो. तसेही मला माझा प्रॉफिट मिळाला आता तो कुठे का जाईना.

काल एका दिवसात १२,५०० कॉल्स विकले आहेत. आज सकाळपासून साधारण ५,०००.

आज ऑपरेटर्सना रिटेलर ला ट्रॅप करायचे होते. म्हणून मी काल म्हणालो की आज स्टॉक गॅप अप ओपन होणार.

आज शुक्रवार आहे. आज स्टॉक खाली नेऊन तो फायदा प्लस दोन दिवस सुट्टीचा टाईम डिके ऑपरेटर्स ना मिळवायचा आहे. आज स्टॉक वर गेला तर त्यांना लॉस होईल. जो ते होऊ देणार नाहीत. म्हणून ते तो स्टॉक खालीच पुश करत राहणार.

जर दुसर्‍या कोणी स्टॉक वर नेलाच तर ज्यांनी कॉल्स विकले आहेत ते स्वतःची पोजिशन स्क्वेअर ऑफ करतील.

त्यामुळे जो पर्यंत मला कॉल्सचा ओपन ईंटरेस्ट कमी होताना दिसत नाही किंवा माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तो पर्यंत मी माझी पोजिशन कॅरी करणार. आणि तो परत वर आला तरी परत शॉर्टच करणार.

आत्ता स्टॉक मी शॉर्ट केलेल्या किंमती पासून -२.२५% वर आहे.

काल एका दिवसात १२,५०० कॉल्स विकले आहेत. आज सकाळपासून साधारण ५,०००.>> हा डेटा कुठे मिळतो तुम्हाला? तुमच्याकडे क्लासला येतो मी.

हा डेटा कुठे मिळतो तुम्हाला?>>>>>

NSE च्या वेबसाईटवर. Products > Equity derivatives > daily archive मधे. भावकाॅपी डाऊनलोड करा. त्यात सर्व डिटेल्स असतात.

मला शिकायची असल्यास कुठून सुरवात करू?>>>>

नेटवर derivative data analysis, option chain analysis वगैरे सर्च केलेत तर भरपुर व्हिडीओ, वेबिनार, कोर्सेस मिळतील.

Stock edge सारख्या अॅप्स वर हा डेटा रेडीमेड मिळतो.
पण कोणतेही ॲप किंवा डेटा ॲनेलेसिस साॅफ्टवेअर वापरत नाही. मी माझी स्वत:ची एक्सेल फाईल बनवून मेंटेन करतो.

इथे बरेच धुरंधर जमलेले दिसत आहेत

ऑप्शन ट्रेडींग साठी नविन धागा आहे का?

मी काही दिवस वेगवेगळ्या ऑप्शन स्ट्रतेजीज ट्राय केल्या ... बर्यापेकी फायदा पण मिळवला पण शिस्त ठेवू शकलो नाही Sad

काही नेकेड ट्रेडींग केल्याने झालेला फायदा धुळीला मिळाला.. दुसरे म्हण्जे तुम्ही टॅक्स इम्प्लिकेशन कसे मॅनेज करता.. कारण हे बिसिनेस इन्कम समजले जाते आणि ऑप्शन मुळे टर्न ओव्हर वाढत जातो आणी त्याच्या ८% प्रॉफीट नसेल तर किंवा लॉस असेल तर ऑडिट गरजेचे असते ते तापदायक आहे

अतरंगी मी नेस्लेची कालची ऑप्शन चेन पहिली त्यात सगळ्यांनी लॉन्ग पोझिशन घेतले. मग खाली कसा आला?
oc.JPG

मी मागे ब्रिटानिआचा ट्रेड लिहिला होता त्यात मी लिहिले होते की आॅप्शन विकणारा स्मार्ट असतो.

आॅप्शन घेणारे तुमच्या आमच्या सारखे रिटेलर असतात पण विकणारे institutional / operators. त्यांच्याकडे माहितीचा, नाॅलेजचा, टेक्नाॅलाॅजीचा खजिना आहे. आॅप्शन विकताना भांडवल पण खूप लागते आणि रिस्क पण खूप असते.
ते विकताना due diligence केल्याशिवाय विकत नाहीत. They are considered as smart money !

म्हणून पुट्स ची विक्री वाढली की स्टाॅक वर जाणार आणि काॅल्सची विक्री वाढली की स्टाॅक खाली जाणार.

Pages