इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या लिस्ट मधे टेक महिंद्रा आला. लाँग साईड्ला.
उद्याचा दिवस एक्स्पायरी असल्याने छोटा ट्रेड घेणार.

रोज चान्स पाहून लाँग एंट्री.

ट्रेडींग बंद आहे की चार्ट्स टाकून टाकून कंटाळलात?>>> सध्या दोन तीन आठवडे धावपळ आहे. 16 मार्च पासून परत नियमित चार्ट्स टाकायला सुरवात करेन.

कोरोना जात नाही तोपर्यंत बोकलत ट्रेडींग कोरोना मोड मध्ये आहेत. Happy

कोरोना फार त्रास देणार आहे अस वाटतय. सगळी होल्डींग लि॑क्वीड करावीत का?. शेअर्स, इक्विटी वाले मुच्युअल फंड.?

आज ए सी सी 1380 ते 1400 मध्ये फिरत होता

वरचा कॉल अन खालचा पुट सेल केला, शेवटचाच दिवस होता

1500 +

आज ए सी सी 1380 ते 1400 मध्ये फिरत होता

वरचा कॉल अन खालचा पुट सेल केला, शेवटचाच दिवस होता

1500 +
>>>>>>>>>
मस्त.
तुम्ही स्टॉक ची रेंज कशी ठरवता?

मी नाही ठरवली, अंदाज घेतला, सकाळी जास्त हलत नव्हता

दुपारी मात्र त्यांची अन श्री सिमेंटची काय तरी भानगड झाली , म्हणून मोठ्या रेंजमध्ये हलु लागला, पण तोवर माझे सेल झाले होते , म्हणून बघत बसलो ,
नैतर माझ्या मते 1400 च्या आसपासच रहायला हवा होता,

हलला भरपूर पण क्लोज 1395 लाच झाला आहे, आता पाहिले

एकचुली मी सकाळी 1400 कॉल पूत सेल करणार होतो , 12 , 7 होते, आहे ह्या 1395 च्या क्लोजिंगला 14 रु प्रॉफिट भेटले असते, 400 चा लॉट, 5600.

केले असते तर मस्त झाले असते, पण जास्त रिस्क नको म्हणून स्प्रेड केले, पण त्यातही 1500 घावले

Screenshot_2020-02-27-16-00-44-632_com.protrade.goodwill_0.png

Pidilitind कोणी फॉलो करतं का ईथे?

या एक दोन दिवसात मस्तपैकी पडायची शक्यता आहे.
मी ऊद्या पासून १६०५ ते १६१० मधे स्टॉप लॉस ठेऊन रोज शॉर्ट करणार.

हो 1610-1620 मध्ये रेझिस्टन्स आहे पण तिथे शॉर्ट केल्यावर टार्गेट काय ठेवाल? कारण 1600 पासून खाली प्रत्येक स्ट्राईक प्राईझला पुट रायटींग झाले.

ऑप्शन चेन पॉझिटिव्ह असूनही तुम्ही शॉर्ट का करताय? कॉल साईडला जास्त लॉंग पोझिशन्स बनल्या आहेत म्हणून?

कॉल साईडला जास्त लॉंग पोझिशन्स बनल्या आहेत म्हणून?>>>>>

कॉल लॉंग करणारे रिटेलर आहेत आणि शॉर्ट करणारे मोठे प्लेयर्स. मी हे मागे याच धाग्यावर दोन वेळा लिहिले आहे की.

कॉल चा ओपन इंटरेस्ट वाढला की मी शॉर्ट करतो आणि पुट्स चा वाढला की लॉंग.

हो पण तुम्ही म्हणताय की शॉर्ट करणारे मोठे प्लेयर्स असतात तर त्यांनी पुट साईडला शॉट केलंय त्यामुळे स्टॉक वर जाऊ शकतो ना. काही चुकत असेल तर सांगा.

काल रात्री मी पाहिलेला डेटा मध्ये कॉल्स खूप विकले गेले होते. त्याप्रमाणात पुट्स विकले गेले नव्हते.

आजचा डेटा पाहिला नाही. संध्याकाळी बघेन

माझं आजच टार्गेट फक्त तीन मिनिटात अचिव झालंय, तेही लॉंग साईडला, त्यामुळे मी फक्त सायलेंट ओब्जर्वेर Happy
ट्रॅपमध्ये लॉंग वाले जबरदस्त अटकले असतील, यात शंका नाही.
मी फक्त पीडीलाईटची मुव्हमेंट बघतोय आता. शॉर्ट करणं आतातरी रिस्की वाटतंय, कारण तो अजूनही फॉल होत नाहीये, मेबी १६२० विल बी नाईस प्राईज टू इंटर
अतरंगी तुम्ही आता कितीला शॉर्ट केलाय?

मला पण वाटत नाही आता पीडिलाईट पडेल.

पण नियम म्हणजे नियम. स्टॉप लॉस किंवा टार्गेट हिट झाल्या शिवाय बाहेर पडायचे नाही Happy

अतरंगी तुम्ही आता कितीला शॉर्ट केलाय>>>

१६३२, १६३६, १६३८.

१६४२ ची ऑर्डर टाकली होती. Execute नाही झाली

बुल्स नी आज १६२५ ची खिंड चांगलीच लढवली.

आता उद्या परत १६४० ते १६५० चा स्टॉप लॉस आणि शॉर्ट

हो पण तुम्ही म्हणताय की शॉर्ट करणारे मोठे प्लेयर्स असतात तर त्यांनी पुट साईडला शॉट केलंय त्यामुळे स्टॉक वर जाऊ शकतो ना. >>>>>>

Capture.JPG

हा डेटा पहा. बुल्स थोडे अ‍ॅक्टीव्ह आहेत. आज ६७,५०० पुट्स विकले आहेत. पण अजूनही कॉल्सचे प्रमाण जास्त आहे. मी उद्या पण १६४० ते १६५० च्या शक्य तितक्या जवळ शॉर्टच करेन.

गॅप अप, गॅप डाऊन मार्केटमध्ये टेक्निकल काम नाही करत असा माझा आतापर्यंतचा अंदाज आहे. जे कोणी या कंडिशनला ट्रेडिंग करत असतील ते कसा अप्रोच करतात हे जाणून घ्यायला आवडेल.

Pages