इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

टाटा एलक्ससी मध्ये ट्रेड घ्यायचा झाला असता तर मी तो शॉर्ट केला असता. जे दोन बाण दाखवलेत त्यापैके कोणत्यातरी कॅण्डलला शॉर्ट करून स्टॉप लॉस डेली हायच्या थोडा वर ठेवला असता. कारण डबल टॉप बनलाय. पण जे स्टॉक बाईंगसाठी निवडलेत त्यात मी शॉर्ट नाही करत.आणि जरी बाय केला असता तरी डबल टॉप बनल्यावर बाहेर निघालो असतो.
TATAELXSI TD.JPG

उद्या टेक्निकल स्टडी काही काम नाही करणार.त्यामुळे मस्त पॉपकॉर्न खात, कोक पीत, एकीकडे राजकारणी धागे ऑटो रिफ्रेश मोडवर ठेऊन, मंद आवाजात धुळवडीची गाणी लाऊन, समोर लॅपटॉपवर बजेट बघायचं. स्वर्ग सुख म्हणतात ते यालाच. कोणाला काही अनुभव असेल बजेट डे ट्रेडिंगचा तर शेअर करा.

Watchlist for 03.02.2020
1. TECHM
TECHM 03.02.20.JPG
2. DRREDDY
DRREDDY 03.02.20.JPG
3. BHARTIARTL
BHARTIARTL 03.02.20.JPG
4. UPL
UPL 03.02.20.JPG
5. HDFC
HDFC 03.02.20.JPG
6. TATAGLOBAL
TATAGLOBAL 03.02.20.JPG
7. BANKINDIA
BANKINDIA 03.02.20.JPG

@देवकी, सगळा प्रोबॅबलिटीचा खेळ आहे. एक्झिट कशी आणि कुठे घ्यायची हे ज्याला समजलं त्याची नाव या महासागरात तरली.

मी 5 पैसा वापरतो. २० टाइम्स लेव्हरेज आहे बहुतेक!!

Screenshot_20200203-143521.png

आजचा दिवस संपला माझ्यासाठी Happy फक्त २ हजारचा आकडा बघायचा होता, तो बघितला!

Watchlist for 04.02.2020
1. ASIANPAINT
ASIANPAINT 04.02.20.JPG
2. ESCORTS
ESCORTS 04.02.20.JPG
3. BALKRISIND
BALKRISIND 04.02.20.JPG
4. GRASIM
GRASIM 04.02.20.JPG
5. CONCOR
CONCOR 04.02.20.JPG
6. HINDUNILVR
HINDUNILVR 04.02.20.JPG

Screenshot_20200204-122611.png

आजचा छोटा प्रॉफिट.
(यापेक्षाही जास्त मोठा असू शकला असता, टाटा मोटर्सच्या वेळी थोडा गोंधळ होऊन बराच मोठा लॉस बुक केला.)

@अज्ञातवासी, छान, आजपण प्रॉफिट. टाटा मोटर्स मध्ये नक्की काय चूक झाली हे सांगितलं तर इतरांनाही मार्गदर्शन होईल.
@सप्रस, मोठा प्रॉफिट आहे. किती इन्व्हेस्ट केले होते. बायोकॉन मध्ये मोठी रक्कम टाकली होती का?

एकच चूक झाली, बाय ऐवजी सेल झाला Lol
बाकी आज ज्या शेयर्स मध्ये ट्रेड केलं, योग्य वेळी स्मॉल प्रॉफिट बुक केल्याने वाचलो.
नाहीतर आता नेट लॉस ३००० च्या वर असता!

ईंट्रा डे चार्टस च्या धाग्यावर नफ्याचे फोटो टाकायचा ऊद्देश काय? त्या साठी हवे तर वेगळा धागा काढा.

ते पाहुन कोणाचा काय फायदा होणार आहे. त्या ऐवजी तुमचे ट्रेड सेट अप, स्टाॅप लाॅस, ट्रेलिंग स्टाॅप लाॅस, टारगेट हे लिहा.

My today's trade diary

Trade 1
Script heromotco , 2500CE QTY 1 lot , Short Entry 11.14 Am, Price:- 54, Exit:- 58, SL Hit
Reason for Entry:- yesterday price dropped more than 2% but there was no movement in futures and option. So was doubtful how much it will gain today and if it will be able to gain momentum. Shorted after stock went above 2% and formed doji followed by bearish candle. . Exited on SL. stock went down after hitting SL. Probably Sl was too close.

Trade 2:-
Script:- itc cash segment, Qty:-1100, LONG entry at:- 11.05, Price:- 213.6, Exit:- 215.45 (tgt), 215.85 (tgt), 215.1 , (trailing SL.)
Reason for entry:- yesterday the price dropped. there was heavy rise on OI of put and calls. It could have gone either way So kept on watching did not enter till it broke yesterday's intraday resistance.

trade 3:-
Script:- colpal Segment:- cash Qty:- 700 short entry:- 13.25, Price:- 1370.8, Exit:- 1364 (tgt), 1357 (tgt), 1360 ( trailing SL)
Reason for entry:- yesterday price increased but there was no movement in futures and options. So was doubtful how much it will gain today and if it will be able to gain momentum. So shorted after lower high was made.

आज Titan मध्ये गॅप फिलींग झाले. माझ्या analysis प्रमाणे
जेव्हा स्टॉक Supertrend आणि moving averages च्या वरती close झाला होता तेव्हा एक सिग्नल मिळाला होता.
जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.
IMG_20200204_192513.jpg

download_0.png

उद्याच्या माझ्या लिस्टमधला एक, सिप्ला. उद्या रिजल्ट आहेत. कोणत्या तरी एका बाजूला चांगली मूव्ह द्यायची शक्यता आहे.

आज ०.८८% वाढला आहे, व्हॉल्यूम आणि डिलिव्हरी मधे जास्त काही हालचाल नाही. पण कॉल्सचा ओपन ईंटरेस्ट ४७% ने वाढला आहे. बहूतेक उद्या खाली जाणार.
पण लाँग साईडला दिल्यास मूव्ह दिल्यास उत्तम. चान्स बघून एक ४४० चा पुट विकून, तोच पुट स्टॉप लॉस ट्रेल करत महिनाअखेर पर्यंत नेता येईल.

मी नेहमी फ्रेश मुव्हमेंट सिलेक्ट करतो. ज्या दोन हिरव्या लाईन्स आहेत(5min कॅण्डल) त्या ट्रेन्डलाईन आहेत. हिरवं वर्तुळ बाईंग झोन झाला. या झोनमध्ये प्राईझ टिकली तर तो बाय करतो. asian paint बाईंग झोनमध्ये ससटेन झाला, जी हिरवी कॅण्डल दिसते त्याच्यावर बाईंग ट्रिगर झाली. रिस्क रिवॉर्ड रेशो १:२ ठेवतो. स्टॉप लॉस ट्रेंड लाईनच्या खाली असतो. जर स्टॉकने मुव्हमेंट नाही दिली १५-२० min तर लगेच बाहेर पडतो. पण प्रत्येकवेळी स्टॉक आपण ट्रेन्डलाईन आखले म्हणून तिथे येईल आणि मगच वरती जाईल असं होत नाही. तेव्हा व्यवस्थित एक्झिट घेता अली पाहिजे आणि हे सरावानेच येतं असं मला तरी वाटतं. याव्यतिरिक्त मी 1min कॅण्डल पॅटर्न्स, %dly , मार्केट डेप्थ, व्हॉल्युम. या गोष्टीसुद्धा विचारात घेतो.
ASIANPAINT TRADE 04.02.20.JPG

Pages