शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.
इंट्राडे चार्ट्स
Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी GTT बद्दल विचारतोय. SLM
मी GTT बद्दल विचारतोय. SLM फक्त इंट्राडे ला आहे, ते माझ्या उपयोगाचे नाही.
अतरंगी सध्या माझ्याकडे असलेला
अतरंगी सध्या माझ्याकडे असलेला बँक निफ्टी आणि निफ्टी ५० चा डेटा अपलोड केलाय. गेल्या पाच वर्षाचा डेटा ४ ते ५ gb च्या घरात जाईल त्यामुळे सवडीने मिळेल तसा टाकतो.
https://drive.google.com/drive/folders/1MxIozWIchgPtQenHAN6IgRzE5i_om_aA...
मी GTT बद्दल विचारतोय. SLM
मी GTT बद्दल विचारतोय. SLM फक्त इंट्राडे ला आहे, ते माझ्या उपयोगाचे नाही.^^ माझ्या माहिती नुसार होते
ओके धन्यवाद सुन्या. करून
ओके धन्यवाद सुन्या. करून पहातो.
बोकलत,
बोकलत,
तुम्हाला संपर्कातून ईमेल केला आहे.
Pages