शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
निफ्टीचा एव्हरेज मंथली रेंज
निफ्टीचा एव्हरेज मंथली रेंज , ए टी आर किती असतो?
इतिहासातील डेटा आहेच , पण ....
अर्थमंत्रीण बाईंनी कॉर्पोरेट टेक्श मध्ये सवलत दिल्यावर सर्वांचे इ पी एस अचानक 10 ते 20 % वाढले व निफ्टी एका दिवशी पाचशे ने वाढला होता म्हणजे सुमारे 4.9 %.
https://www.livemint.com/market/stock-market-news/indian-equities-a-tad-...
म्हणजे एका महिन्यात 700 ने वाढणे अगदीच अशक्य आहे हे नक्की
Monthly ATR सध्या ६२५ आहे.
Monthly ATR सध्या ६२५ आहे.
अतरंगी बोकलतांची हरकत नसल्यास तुमच्या स्ट्रॅटेजी बद्दलही इथेच लिहा.
ऑप्शन्स हे बहुमितीय प्रॉडक्ट
ऑप्शन हे बहुमितीय प्रॉडक्ट आहे.
त्याची किंमत ठरवणारे मुख्य घटक म्हणजे त्या स्टॉक / इंडेक्सची स्पॉट प्राईस, एक्सपायरीला शिल्लक असलेला काळ आणि इम्प्लाईड व्होलॅटीलिटी. त्यामुळे स्ट्रॅंगल विकताना विविध बाबींचा विचार करावा लागतो, जसे की आपण एंट्री घेतल्यानंतर volatility वाढणार आहे का (उदा. पुढे लौकरच बजेट जाहीर होणार आहे) ? स्पॉट प्राईस अचानक बऱ्यापैकी खाली/वर जाण्याची शकत्या कितपत आहे,? आपण एन्ट्री घेतो तेव्हा काही कारणामुळे (जसे की इराक प्रकरण) अचानक खाली किंवा अचानक वर तर गेलेले नाही ना, जेणे करून मोठे करेक्शन होण्याची शक्यता आहे इत्यादि.
माझी कशाला काहीच हरकत नाही,
माझी कशाला काहीच हरकत नाही, तुम्ही सगळ्यांनी लिहा बिनधास्त.
स्ट्रेनगल नाहीच , फक्त वरचे
स्ट्रेनगल नाहीच , फक्त वरचे कॉल विकायचे,
गडगडणे सोपे असते, एकदम वर जाणे अवघड
म्हणजे एका महिन्यात 700 ने
म्हणजे एका महिन्यात 700 ने वाढणे अगदीच अशक्य आहे हे नक्की >>>
मला वाटते तूम्ही महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी, महिन्याच्या शेवटल्या गुरुवारच्या एक्सपायरीचा निफ्टीचा ७०० च्या फरकाने कॉल किंवा पुट विकला तर तुम्हाला तो साधारण ३० ला मिळेल.
म्हणजे साधारण ९०००० वर २२५०, महिन्याला २.५%.
1 जानेवारीला सुट्टी होती
1 जानेवारीला सुट्टी होती
2 जानेवारीचा हाय 12289 होता
म्हणजे 12289 + 650 = 12939 होतात, म्हणजे 13000
या महिन्यातले हायेस्ट टार्गेट इतके असू शकेल
मी बँकनिफ्टी मध्ये फक्त कॉल
मी बँकनिफ्टी मध्ये फक्त कॉल राईट करतो.
तिथे मला आठवड्याला ६५००० वर सरासरी १२०० मिळतात.
मला पर्सनली असे वाटते की
मला पर्सनली असे वाटते की निफ्टी एक महिन्यात कधीही 700 ने वर जात नाही
700 च्या आतले पूत कॉल रिसकीच रहातात>>>>>>
माझ्या मते टक्क्यामधे हिशोब केला तर बरे होईल. २००१ साली निफ्टी १०००-१२०० होती. आता १२००० आहे. तेव्हा पॉईंट पेक्षा ट्क्क्यातला हिशोब बरा.
गेल्या १८ वर्षात निफ्टीने ७% वर किंवा ७% खाली ५० वेळा मंथली गेन दिला आहे. २१६ महिन्यात ५० वेळा म्हणजे साधारण २५%.
या पद्धतीने हिशोब केला तर statistic च्या आधारे मंथली ट्रेड घेता येऊ शकतो. जर प्रत्येक १ तारखेला मागच्या महिन्यापासून ७% चा कॉल आणि ७% चा पूट विकला तर आधीच्या डाटा प्रमाणे तुम्हाला लॉस व्हायची शक्यता २५% पेक्षा कमी आहे ( यात अजून मिळणार्या प्रिमियम आणि द्यावे लागणारे ब्रोकरेज विचारात घ्या)
जाता जाता अजून एक, जर भांडवल कमी असेल तर, निफ्टी गेल्या १८ वर्षात ६४% वेळा मागच्या महिन्याच्या क्लोज पासून २.५% पर्यंत एकदा तरी गेलेली आहे.
म्हणजे मागच्या महिन्याचा क्लोज १२१६८ होता तर निफ्टी या महिन्यात एकद तरी १२४७२ वर जाण्याची शक्यता ६४% आहे असे जर गृहीत धरले तरी ट्रेड करणे सोप्पे आहे. पण शक्यतो ऑप्शन घेण्यापेक्षा विकणे मला सोयीस्कर वाटते.
७ टक्क्यांनी हिशेब केला तर
७ टक्क्यांनी हिशेब केला तर सध्याच्या स्पॉट प्रमाणे ९०० च्या फरकाचा ऑप्शन विकावा लागेल. ज्याची किंमत साधारण २० असेल. म्हणजे ८५००० ला १५०० म्हणजे महिना २% च्या कमीच.
85 ह ला ला 1500
85 ह ला ला 1500
हो , माझेही हेच गणित आले आहे. साधारण दीड टक्के होते.
पुट विकणे मला पटत नाही , कारण
पुट विकणे मला पटत नाही , कारण मार्केट गदगदून 7 % खाली कधीही जाऊ शकते ( वर मात्र सहज जात नाही )
म्हणून स्ट्रेंगल लावण्यापेक्षा कॉल च विकायला बरे वाटते,
स्ट्रेंगल हे स्पॉटच्या जवळच्या व्यवहारात रिस्क कव्हरला वापरू शकता, कारण दोन्हीत प्रीमियम भरपूर मिळतो, एकमेकाला कव्हर करतात
http://dollarrupee.in/nifty
http://dollarrupee.in/nifty-predictions-and-forecast-tomorrow-and-future
अल्ला मेहेरबान
मित्रहो,
मित्रहो,
इथे काहितरी खूप चांगली चर्चा चाललेली असते. पण मला तुमची भाषा (ट्रेडिंगची) समजत नाही. काही मूलभूत ज्ञान मिळवण्यासाठी एखादी चांगली साइट किंवा पुस्तक सुचवाल काय?.
मला पूर्वी ट्रेडींगचे कॉल का असतात ते समजायचे नाही. म्हणजे एखादा शेअर २०० ला आहे. त्याने २२२ क्रॉस केले तर तो २४० ला जाईल पण त्याच श्वासात तो जेंव्हा डाउनसाइडला १७६ सपोर्ट ब्रेक केला तर १५० ला पण जाईल ह्या १५० ते २४० या गौड्बंगालाचे अक्च्युअली खूप हसू यायचे. पण आता समजायला लागले आहे की फंडामेंटल आणि टेक्निकल खूप वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांचा एकमेकांशी संंबंध असेलच असे नाही.
पॅरलल म्हणजे फलंदाजाच्या धावा वा गोलदाजाच्या विकेट त्याच्या अॅबिलिटीशी निगडीत असतात. त्यायोगे फंडामेंटल अॅनॅलिस्सिस करून कोण काय करणार याचे अंदाज क्रिकेट कोंमेंटेटर बांधतात. पण क्रिकेट कोंमेंटेटर कॅच उडाल्यावरच फलंदाज झेलबाद होईल की नाही का षटकार जाईल असे सांगू शकतो . ते टेक्निकल अॅनॅलिसिस. त्यावेळेस तो किती धावावर आहे, गोलंदाजाने किती विकेटस घेतल्यात, हवा कशी आहे हे सगळ दुय्यम किंवा झेलाशी संबंधीत नसलेलं. मग यावर प्रेक्षक म्हणून माझी बेट फक्त तो झेल होणार की नाही येवढ्यापूर्तीच. हे पॅरलल मुद्दाम लिहिलय, माझ्या फंडा क्लियर होण्यासाठी. बरोबर आहे की नाही ते सांगा.
मार्केट गुरुकुल नावाचा
मार्केट गुरुकुल नावाचा यूट्यूब चॅनल आहे त्यावर बेसिक्स चांगले समजावून सांगितले आहेत.
धन्यवाद बोकलतजी.
धन्यवाद बोकलतजी.
अडानी ग्रीन ९६ च्या आसपास
अडानी ग्रीन ९६ च्या आसपास घेतलाय.... मिळतोय तेव्हढा फायदा घेवून बाहेर पडू असा विचार करत असतानाच आता गेले ३-४ दिवस रोज लोअर सर्किट लागतय.
AMO ऑर्डर प्लेस करुनही शेअर विकला जात नाहीये!
रोज order लावा
रोज order लावा
आज एच डी एफ सी बँक चे १० शेअर
आज एच डी एफ सी बँक चे १० शेअर घेतले.
परवा रिलायन्स व टीसीएस रिझल्ट डिक्लेअर करनार.
बाय ऑन रुमर्स सेल ऑन न्यूज
बाय ऑन रुमर्स
सेल ऑन न्यूज
Watchlist for 16.01.2020
Watchlist for 16.01.2020

1. CHOLAFIN
2. GODREJCP

बँकनिफ्टीचा Daily ATR ४०० -
बँकनिफ्टीचा Daily ATR ४०० - ४४० आहे तर Weekly ATR हा ८५०च्या आसपास आहे. हा इंडेक्स दिवसभरात बरीच चढ उतार करत असतो पण आठवड्याला त्यामानाने फार वर चढत नाही. उतरतो मात्र बराच. याचा P/E रेशोही ४० च्या आसपास आहे. गेल्या वर्षीच्या मार्केट फॉल मध्ये हा चांगलाच खालावला होता आणि नंतर वधारलाही जास्तच, निफ्टीच्या तुलनेत बराच. याचा All Time High ३२६१३ आहे. हा आता ३२५०० कडे जाण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या लेव्हल ला प्रॉफिट बुकिंग होते आणि खाली येतो.
मी शुक्रवार पासून पुढल्या गुरुवारच्या एक्सपायरीच्या कॉल्स वर लक्ष ठेवून असतो. यासाठी मी कॉल्सचा ओपन इंटरेस्ट डेटा चेक करतो आणि खालील काही नियम मी बनवले आहेत (यात बदल करत असतो अनुभवाने) ते पाळतो.
१. एखाद्या स्ट्राईक प्राईसला कॉल रायटिंग दृढतेने झालेले असावे. - म्हणजे या स्ट्राईकचे कॉल रायटिंग उच्चतम तर असावेच पण त्याचा नेक्स्ट स्ट्राईकचा कॉल वगळता, पुढील उच्च कॉलरायटिंगच्या किमान ४० % तरी वर असावे. ( हे ४०% एक बॉल पार्क फिगर आहे.)
२. उच्चतम पुट रायटिंगच्या तुलनेत हे उच्चतम कॉल रायटिंग कमाल २० % खाली असावे, शकत्यो बरोबरीने किंवा वर असावे.
३. हे उच्चतम कॉलरायटींग ज्या स्ट्राईकप्राईसला झाले आहे त्याच्या दोनशेच्या वरचा स्ट्राईक प्राईस मी घेतो.
पण हा मी जो घेणार तो स्ट्राईक प्राईस किमान ऑलटाइम हाय एवढा (३२६००) असावा आणि एंट्री घेतोय त्यावेळी स्पॉटप्राईस पासून किमान ०.६ x weekly ATR एवढा दूर असावा.
४. कॉलचा मिळणारा प्रीमियम ५० तरी असावा शुक्रवार किंवा सोमवारच्या एंट्रीला. मंगळवरच्या एंट्रीला किमान ४०.
साधारणपणे मला असा कॉल ६० ते ७० च्या दरम्यान मिळतो.
एका कॉलला ६३००० मार्जिन लागते. आणि सरासरी ६० चा प्रीमियम धरल्यास, ६० x २० (बँकनिफ्टीचा लॉट साईझ २० आहे). = १२०० रुपये निघतात. ब्रोकरेज आणि टॅक्स वगळून ११२५. म्हणजे आठवड्याला १.७%
महिन्याला ६.८% व्हायला हवेत पण एखाद्या आठवड्यात नियमांप्रमाणे एंट्री मिळत नाही म्हणून तीन ट्रेड्स धरून ५.१%.
उदाहरण: गेल्या शुक्रवारी मी
उदाहरण: गेल्या शुक्रवारी मी बँकनिफ्टीचे ३२८०० स्ट्राईकचे दोन कॉल्स ७२ ला विकले. आज बँकनिफ्टी ३१८१४ ला आहे.
उद्या ते कॉल्स Out of The Money (OTM) एक्सपायर होतील.
म्हणजे प्रति लॉट १४४० - ७५ ब्रोकरेज + टॅक्स) = १३६५ मिळतील.
उद्या एका दिवसात बँकनिफ्टी अचानक जवळपास १००० ने वर गेला आणि ३२८०० ला क्लोज झाला तरी मला पूर्ण नफा मिळेल, ३२८७२ ला क्लोज झाला तर मला शून्य नफा मिळेल, ३२८७२ पासून पुढे माझे दर पॉइंटला प्रतिलॉट २० रुपये नुकसान होइल.
इथे सगळे स्टॉकमधले, मुरब्बी
इथे सगळे स्टॉकमधले, मुरब्बी खिलाडी दिसतायत
आम्ही अनाडी. फायडॅलिटी चं एक 'गो फिडेलिटी' अकाउंट काढून बसलोय. त्यातही १००० च्या वर घालायला पाकपूक (धाकधूक) होतेय 

आपले सी डीज व बॉन्डसच बरे असे वाटते खरे पण ..... अति कासवगती प्रकार ब्वॉ. आकडा हलतच नाही - हलतच नाही
सामो,
सामो,
गो फिडीलिटी सारखे इतरही अनेक प्रॉडक्ट्स आहेत जे अल्गोरिदम वापरुन तुमचे पैसे गुंतवतात. यात तुम्ही काय उत्तर देता त्यावरुन तुमच्यासाठी योग्य अशी गुंतवणूक ठरवली जाते. त्यामुळे किती जोखीम घ्यायची तयारी आहे, किती अवधी हाताशी आहे याचा नीट विचार करुन उत्तर द्यावे. बरेचदा तरुण वयात गुंतवणूकीसाठी हातात फारसे पैसे नाहीत / मार्केटमधले काही कळत नाही आणि जोडीला फी ओन्ली सल्लागार परवडणार नाही या कारणास्तव गुंतवणूक केली जात नाही. अशा वेळी रोबो अॅडवायझर हा तसा चांगला पर्याय आहे. कमी पैशात गुंतवणूकीची सुरुवात करता येते. तुमच्यासाठी योग्य अॅसेट अॅलोकेशन वगैरे अल्गोरिदम ठरवतो. खरेतर हे काही नवे नाही. सुरवातीला टार्गेट डेट फंड्स साठी हे तंत्रद्यान वापरले गेले. मात्र ही सॉफ्टवेअर्स वेल्थ मॅनेजर वापरत, सामान्य माणसाला हे काही उपलब्ध नव्हते.
रोबो अॅडवायझर तर्फे गुंतवणूक केली तरी मार्केट वर -खाली होणार, तेजी-मंदीचे सायकल असणार हे लक्षात घ्यावे . त्यामुळे जी रक्कम येत्या ५ वर्षात लागणार आहे ती शक्यतो मार्केटमधे गुंतलेली नको. मात्र दर महिना ठराविक रक्कम असे सातत्याने करत राहील्यास परतावा चांगला मिळेल. त्यासाठी हातात कमीतकमी ७-१० वर्षांचा कालावधी हवा.
मी स्वतः रोबो अॅडवायझर वापरत नाही. पण मी तरुण असताना असे काही असते तर सुरवातीला नक्कीच सोपे गेले असते. नव्या देशात सल्ला द्यायला कुणी अनुभवी वडीलधारे नाही. मुचुअल फंडात खाते उघडताना सुरुवातीची गुंतवणूक म्हणून लागणारे $३००० साठवायला धडपड, योग्य माहिती अभावी म्युचुअल फंड निवडताना झालेल्या चुका वगैरे बरेच काही टळले असते. अर्थात तेव्हा इंटरनेट नव्हते. लायब्ररीतून मासिके, पुस्तके आणून वाचायची, शिकायचे असे होते.
छान माहिती दिलीत मानव सर.
छान माहिती दिलीत मानव सर.
धन्यवाद स्वाती. मी सध्या
धन्यवाद स्वाती. मी सध्या महीन्याला ३० टाकते आहे म्हणजे दिवसाला १ डॉलर. बघू काय होते
माहीतीबद्दल आभार.
छोट्या गुंतवणूकदारासाठी कोणते
छोट्या गुंतवणूकदारासाठी कोणते शेयर उपयुक्त ठरतील ?
मला एक कुतुहल आहे.
मला एक कुतुहल आहे.
किती लोक स्वतःसाठी पूर्ण वेळ शेअर ट्रेडिंग करून स्वतःचा चरितार्थ चालवतात?
म्हणजे महिना सरासरी ४०,००० रुपये नक्त यातून मिळवतात? (मूळ गृहीतक -- साधारण १० ग्राम सोन्याच्या भावात मध्यमवर्गीय माणूस सुखात राहू शकतो)
म्हणजे स्वतःचे ५० लाख रुपये भांडवल यात न टाकता
कारण ५० लाख रुपयावर नुसत्या ९ टक्के व्याजाने पण ४०००० रुपये महिना मिळतील
@जाई, गुंतवणूकीचा कालावधी
@जाई, गुंतवणूकीचा कालावधी जास्त असेल तर हेविवेट स्टॉकमध्ये सिप करत राहणं चांगलं राहील. आणि थोड्या कालावधीसाठी असेल तर ते चार्ट्स पाहूनच ठरवता येईल.
Pages