इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो अल्गो ट्रेडिंगच वाटतेय.
शेअरखानच्या डेस्कटॉप क्लायंटला स्वतः अल्गोरिदम तयार करून / करवून जोडता येतात. मी सुद्धा कधी ट्राय नाही केले.

Nifty option write करायला किती खाली वर जावे लागेल ?

80000 मार्जिन लागते.

2000 मिळाले तरी पुष्कळ

ऑप्शन शून्य झाला पाहिजे
विकली ऑप्शन विकून 8 रु खायचे किंवा मंथली विकून 30 रु खायचे म्हणजे 2000 होतात

आता सेबीने लिव्हरेज बद्दल काही रुल्स काढलेत. लिव्हरेज मिळणार नाही असं ऐकलंय. कोणाला काही माहीत आहे का नक्की बातमी?

हो झेरोधा स्ट्रिक मध्ये आपण बॅकटेस्ट करू शकतो आपण बनवलेले अल्गो. मी एकदा करत होतो तर 10 20 ema क्रॉसिंग स्ट्रॅटेजी चांगला रिझल्ट दाखवत होती.

बोकलत आणि इतर तज्ञ मंडळींनो टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस समजून घेण्यासाठी कृपया एखाद चांगल पुस्तक सुचवू शकाल काय ?.
धन्यवाद.
सध्या त्याविरूद्ध ग्रॅहम वाचतोय.

मी जेसी लिव्हरमोर यांचं How To trade in stocks वाचलंय. त्यात टेक्निकल नाही पण ट्रेडिंग सायकॉलॉजीवर छान माहिती मिळाली.

आहाहा!
ही खरी चर्चा!!!

खरच इथे एकापेक्षा एक वरचढ माणसं आहेत.
छान चाललीय चर्चा.
_/\_

download.png

INFY 2 hrs chart.

INFY चा ७७० कॉल जर ३५ च्या आसपास विकला आणि रिस्क कमी ठेवण्यासाठी ६९० चा पुट ६/६.५ ला विकला. तर फायदा होईल.
infy expiry पर्यंत ८०० च्या वर किंवा ६६० च्या खाली जाणे अवघड आहे.

७७० चा कॉल विकुन ६९० चा पूट विकत घेतल्याने रिस्क कमी कशी होईल? पूट सुद्धा विकून स्ट्रँगल बनवा असे म्हणायचे आहे का?

शेअरखानला ब्रोकरेज + टॅक्सेस मिळून एका लॉटला ₹७६ होतात.

झीरोधाला प्रति ऑर्डरला त्यात कितीही लॉट असले तरी हेच ₹ २६ होतात असं ऐकलं आहे, कुणी कन्फर्म करावे.

आज खरेदी आणि उद्या किंवा नंतर विक्री केली तर विकतानाही तेवढेच चार्जेस लागतात.

झीरोधाला प्रति ऑर्डरला त्यात कितीही लॉट असले तरी हेच ₹ २६ होतात असं ऐकलं आहे, कुणी कन्फर्म करावे <<< टॅक्सेस सकट साधारण 50-55 होतात.

Infosys , 21 p e रेशो वर ट्रेड होतो <<< ह्याचा F & O शी संबंध जोडायचा ?

निफ्टी 28 पी इ ला ट्रेड होतो

निफ्टीचा इ पी एस 430 आहे
म्हणजे
जरी एक महिन्यात इ पी एस 440 झाला व रेशो 29.5 झाला तरी निफ्टी होतो 12980
म्हणजे एक किंवा 2 महिन्यात निफ्टी 13000 च्या खालीच रहाणार हे नक्की.
13000 चे कॉल विकून गप्प बसा

शेअरचा आताचा इ पी एस घ्या
तो शेअर कोणत्या रेंज च्या पी इ रेशोत हलतो हे बघा
त्यावरून त्याचा ह्या महिन्यातील लो व हाय पकडा
त्याच्या पलीकडले कॉल व पूट विका, म्हणजे खालचे पुट अन वरचे कॉल

फार नाही , पण दीडेक हजार फायदा होतो
साधारण 1.2 % एक महिन्यात

छान.

अशा स्ट्रॅटेजीज यशस्वी असत्या तर कुणीही वर्षभरात करोडोपती झाले असते.
कुठलीही ऑप्शन स्ट्रॅटेजी प्रत्यक्षात घेण्यापेक्षा
या साईटवर सिम्युलेशन मोडमध्ये ट्राय करू शकता. तिथे फ्री रजिस्ट्रेशन करा आणि ही साईट कशी वापरायची याचे तिथे डेमो व्हीडिओज आहेत ते बघु शकता.
या साईटवर लाईव्ह स्टॉक (livestock नव्हे Wink ) प्राइसेस दर पाच मिनिटांनी अपडेट होतात. तेव्हा प्रत्यक्ष ऑप्शनची किंमत आणि या साईटवर दिसणारी किंमत यात जरा फरक असू शकतो. क्वचित कधी अपडेट होत नाही बराच काळ थांबावे लागते. एवढे सहन केले की विनामूल्य ऑप्शन स्ट्रॅटेजीज ट्राय करून बघायला ही चांगली साईट आहे. किती मार्जिन लागेल हे सुद्धा इथे दिसते. इथेच तुम्हाला ओपन इंटरेस्ट डेटा सुद्धा बघायला मिळेल. मी इथून ओपन इंटरेस्ट डेटा पाहून बँकनिफ्टीचे कॉल्स विकतो.
इथे पैसे गुंतवत नसलो तरी आपण जणू खरेच पैसे गुंतवले आहेत आणि होणारं नुकसान खरं आहे असे समजून ट्राय करा म्हणजे चांगला अनुभव येईल.
एखादी स्ट्रॅटेजी निदान महिनाभर वापरून बघितली आणि योग्य वाटली तर प्रत्यक्षात ट्रेडिंग करा.

या सारखी अजून कुठकी साईट कुणाला माहीत असल्यास सांगा.

स्वप्नील, सेन्सिबुल मला आधीही सुचवण्यात आली होती पण ८५० महिना असल्याने मी सध्या त्याचे सबस्क्रिप्शन घेणार नाही थोडा अनुभव वाढला की घेईन.
तुम्ही वापरता का ती? तुमचा अनुभव कसा आहे त्याचा? विशेष करून स्ट्रॅटेजीची सक्सेस प्रोबॅबिलिटी दाखवतात त्याचा?

सगळ्या स्ट्रॅटेजी वेब साईट वर फ्री मिळतात , ते थेरोटीकल ज्ञान आहे , त्याचे साचे फिक्स आहेत,

मला पर्सनली असे वाटते की निफ्टी एक महिन्यात कधीही 700 ने वर जात नाही
700 च्या आतले पूत कॉल रिसकीच रहातात

स्वप्नील, सेन्सिबुल मला आधीही सुचवण्यात आली होती पण ८५० महिना असल्याने मी सध्या त्याचे सबस्क्रिप्शन घेणार नाही थोडा अनुभव वाढला की घेईन.
तुम्ही वापरता का ती? तुमचा अनुभव कसा आहे त्याचा? विशेष करून स्ट्रॅटेजीची सक्सेस प्रोबॅबिलिटी दाखवतात त्याचा?
>>>>>
https://web.sensibull.com/education
Option शिकण्यासाठी मला ही साईट सुचवायची होती
Option simulator म्हणाल तर मलादेखील तुम्ही सुचविलेली opstra option site योग्य वाटते

ब्लॅककॅट तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात.
पण प्रॅक्टिकली महिनाभर किंवा अधिक पोझिशन ठेवणे मला रिस्की वाटते. स्पॉट प्राइस जसा खाली वर होऊ लागतो तसा आपल्या स्ट्रॅंगल लेग्ज चा डेल्टा अनबॅलन्स्ड होत जातो. म्हणजे एका लेग मध्ये आपल्याला जेवढा फायदा होतोय त्या पेक्षा दुसऱ्या लेग मध्ये आपल्याला नुकसान होऊ शकते. त्यामुळे डेल्टा बॅलन्स करायला लेग चेंज करावे लागतात आणि दोन लेग्स मधील स्ट्राईक प्राईसचा स्प्रेड कमी होतो. असे करत राहिल्याने हा स्प्रेड चांगलाच कमी होतो आणि मग लेग इन द मनी जाण्याचे चान्सेस वाढतात, व मध्येच एक्झिट करावे लागते, त्यावेळी बूक केलेले प्रॉफिट बरेच कमी असू शकते.

या करता मी दीड ते दोन महिने एक्सपायरी असलेले लेग्ज घेतो, स्पॉट प्राईस पासूनWeekly ATR च्या दुपटीने लांब असलेले आणि ते एक ते दोन आठवड्यात काढुन टाकतो. यातही कधी एकदा किंवा फार तर दोन दा लेग चेंज करावे लागतात. पण दोन आठवड्याला २ ते २.५ % प्रॉफिट मिळते.
दोन आठवड्या नंतर दोनदा लेग्ज चेंज केले असतील तर स्ट्राईक प्राईस मधील स्प्रेड आता दीडपट झाला असतो, लेग्ज बदलले नाहीत म्हणजे स्पॉट प्राईस आता किमान Daily ATR ने खाली किंवा वर गेलेली असते. तेव्हा दोन आठवड्याने नवीन स्पॉट प्राईस वरुन हिशेब करून नवा स्ट्रॅंगल विकतो

मी हे आता पर्यंत फक्त निफ्टीवर केले आहे.

Weekly ATR च्या दुप्पट म्हणजे लो रिस्क आहे, दीडपट ही मॉडरेट रिस्क असेल, त्यात नफा जास्त होईल, पण मी त्या साठी बारकाईने लक्ष आणि चांगलाच अनुभव लागेल असे मला वाटते.

हे सगळे माझ्या मार्यदित माहिती आणि अनुभवावर आधारीत आहे. ( मी एक ऍडव्हान्स्ड ऑप्शन्सचा कोर्स केला तीन महिन्यांपूर्वी.)

अनुभवी जाणकारांच्या प्रतिक्रिया, मते, सूचना आल्यास बरे होईल.

Pages