इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Option writing good option

पण दात कोरून पॉट भरण्याआगत आहे

आणि कधीतरी एकदम दात जोरात पडतात

माझिपन इचछा आहे
5-6 लाखाचे , 8 , 10 लॉट राईट करून महिन्याला 50 हजार मिळवायचे,

पण धाडस होत नाही

@बोकलत
झकास,
दोन्ही ट्रेड मिळून अर्धा टक्का मिळाला की!

दररोज एवढे मिळाले तर वार्षिक परतावा होतो १३० टक्के.
वरील वाक्य काळंमाऊ साठी Happy

ओके ऑप्शन्स रायटिंगचा धागा काढून माझे प्रयोग लिहीतो, जाणकारांकडून अधिक मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच
>>>+१

रोज अर्धा टक्का नाय मिळत

मी महिन्यातून एकच ट्रेड करायचा , त्यात 4000 , 5000 घ्यायचे , दोन ट्रेडला ( म्हणज्ड एक वरचा , एक खालचा , पेअर ) लाखभर रुपये लागतात, असे म्हणत आहे

म्हणजे महिन्याला 5 ते 10 % होतील
पाच लाखावर 30 ते 50 हजार सुटतील

अहो पण ते बोकलत डेट्रेडिंगबद्दल लिहीताहेत ना?

बरोबर ब्लॅककॅट.
इन्ट्रा डे मध्ये रोज ट्रेड्स घेऊन नफा मिळवणे म्हणजे दांडगा अभ्यास, रोजचे होमवर्क आणि डेडीकेशन हवे.
तरीही वर्षाला सरासरी दररोज ०.५% म्हणजे मुरलेला फुल टाइम ट्रेडरच करू शकेल असे मला वाटते.

इन्ट्रा डे ला महिन्याला ५ ते १० टक्के (कनसिस्टंटली) म्हटलं तरी माझ्या मते बराच अनुभव, शिस्त, ज्ञान, कसब वगैरे लागेल.

डायरेक्शनल न्यूट्रल ट्रेड्स (ऑप्शन्स रायटिंग) ला तुलनेत सुरवातीला जास्त डेडीकेशन आणि नंतर इन्ट्रा डे च्या तुलनेत खूपच कमी लक्ष आणि रिस्क लागते असे माझे वैयक्तीक मत आहे सध्याचे.
पण यात गुंतवणूक जास्त लागते (सुरवातच किमान दोन लाखा पासून) आणि सुरवात करताना खूप दांदरते.

ते ॲाप्शन प्रकरण मलाही झेपत नाही.
कॅश सेगमेंट बरी वाटते.
खरेदी चुकली तरी शेअर्स हातात असतात. भाव वर येईपर्यंत थांबावे लागते. कंपनी चांगली असली की झालं
विक्री चुकली तरी पैसे हातात असतात. अगोदरच विकल्यामुळे नफा कमी होतो.

तरीपण शिकायचंय.
कागदावर तरी ४-५ ट्रेड यशस्वी करायचेत.
Happy

बोकलत डे ट्रेडिंग बद्दलच बोलताहेत , पण ऑप्शन पेअर राईट करून पैसे खायचे असतील तर टाइम डिके जास्त पाहिजे , म्हणजे डे पेक्षा आठ दहा दिवस ठेवून घेणे जरा सेफ पडेल
बेसिक गणित सेमच रहाते

ओके.

आज CANBK आणि HINDPETRO दोघेही गॅप अप ओपन झाले. २.५% + गॅप अप ओपन झाले कि मी शक्यतो शॉर्ट करतो कधी कधी स्टॉप लॉस हिट होतो नाही असं नाही पण सक्सेसफुल झाले तर रिस्क रिवॉर्ड रेशो खूपच जास्त मिळतो. आज संधी होती पण वेळ मिळाला नाही.
CANBK
CANBK 080120.JPG
HINDPETRO
Hindpetro 080120.JPG

वरती जे दोन शेअर दिलेत तसाच ITC पण अगदी हलका गॅप अप ओपन झाला. पण हा शेअर शॉर्ट केला नाही कारण चौथी कॅण्डल जी लाल फॉर्म झाली तिची पुढचीच कॅण्डल ग्रीन फॉर्म झाली आणि याच कॅण्डलमुळे फॉलिन्ग मोमेंटम ब्रेक झालं आणि शेअर वरती गेला.
ITC 080120.JPG

Watchlist for 09.01.2020
1. TATAMOTORS
TATAMOTORS 090120.JPG
2. ICICIBANK
ICICIBANK 090120.JPG
3. M&M
M&M 090120.JPG
4. TATAGLOBAL
TATAGLOBAL 090120.JPG
5. HDFC
HDFC 090120.JPG

ओके ऑप्शन्स रायटिंगचा धागा काढून माझे प्रयोग लिहीतो, जाणकारांकडून अधिक मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच>>> +111111111 ....लिहा....

जे अमेरीकेत आहेत त्यांच्याकरता - फायडॅलिटीचे एक 'गो फायडॅलिटी' म्हणुन खाते आहे. नवोदित गुंतवणूकदारांकरता असावे. इथे आपण जे पैसे त्या खात्यात जमा करतो त्या पैशाची गुंतवणूक आपोआप एक यंत्रप्रणाली करते. आधी खातेधारकांना काही प्रश्न विचारले जातत व तदानुषंगिक 'रिस्क टॉलरन्स' चा अंदाज घेतला जातो. मला ती सुविधा बरी वाटली. इन अ सेन्स मला फारसा अनुभव नाही. जस्ट काही दिवसांपूर्वी शोध लागला आहे.

कोणाला काही अनुभव आहे?

आणि हो, ते खाते मेन्टेन करायला, थोडीफार फी आहे. बोकलत यांची हरकत या नसल्यास धाग्यावर कृपया उत्तर द्यावे. हरकत असेल तर नवीन प्रश्न-धागा काढेन.
धन्यवाद.

@सामो, लिहा बिनधास्त इथे.
इथे आपण जे पैसे त्या खात्यात जमा करतो त्या पैशाची गुंतवणूक आपोआप एक यंत्रप्रणाली करते. >>> अल्गो ट्रेडिंग?

Pages