Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आय अॅम गोईंग आऊट बरं का रे
आय अॅम गोईंग आऊट बरं का रे मॅकमिलन.... अरे काय हे लिव्ह माय पदर, लिव्ह माय पदर.. >
दक्शे.... मी तुला इमॅजिनलं असं म्हणताना.,...
मल्ल्या ते कुत्र्याला
मल्ल्या ते कुत्र्याला उद्देशून आहे रे
(No subject)
(No subject)
मल्ली, मंजे . लाजो
मल्ली, मंजे . लाजो

ऐका ..हो ..ऐका ..एक जोक
ऐका ..हो ..ऐका ..एक जोक ...ऐका ...सांगु का ?
आज मी सकाळी सानुची शाळेची
आज मी सकाळी सानुची शाळेची बसची वगैरे घाईत एका कानात एका रंगाचा खडा नी दुसर्यात दुसर्या रंगाच्या खड्याच कानातल घातल. साडेसातला घर सोडल तेव्हा पासुन सव्वा दहा पर्यंत कोणीच बोलल नाही
ऑफिसमधे मैत्रिणीच्या डेस्क वर गेले तेव्हा तिच्या लक्षात आलं 
पुण्यात शिकत असतानाचा एक
पुण्यात शिकत असतानाचा एक किस्सा,माझे काही रुमपार्टनर्स स्वत:चे इंग्रजी सुधरायच्या मागे लागले होते त्यामुळे प्रथेप्रमाणे टाईम्स आणून वाचणे आणि डिक्शनरीत अर्थ पाहणे जोरात चालले होते,मी त्यातल्या त्यात जरा बरा म्हणून मला एखादा शब्द माहिती नसला की ह्यांना कोण आनंद. एके दिवशी रुमवर आल्याआल्या त्यांनी मला, 'आज आम्ही दोन शब्द वाचले ज्याचा अर्थ डिक्शनरीतपण नाही,आणि तुला पण माहित नसणार' असं सुनावलं आणि पेपर दाखवला. ती दोन वाक्य अशी होती; 'Indian team has come to Vizag' आणि 'Pullela Gopichand in superb form' आणि हे वीर विचारतायत,'माहिती आहे तुला विझाग आणि पुल्लेला चा अर्थ?'
ह.ह.पु.वा झालं मला.
आज मी सकाळी सानुची शाळेची
आज मी सकाळी सानुची शाळेची बसची वगैरे घाईत एका कानात एका रंगाचा खडा नी दुसर्यात दुसर्या रंगाच्या खड्याच कानातल घातल.<<< नो प्रॉब्लेम कविता इथे अमेरिकेत आजकाल फॅशन आहे तशी तु चुकुन केलेस इथे मुद्दाम करतात्..मोजे सुध्दा वेगवेगळे घालतात,
साडेसातला घर सोडल तेव्हा
साडेसातला घर सोडल तेव्हा पासुन सव्वा दहा पर्यंत कोणीच बोलल नाही
>>
अहो तुमच्याकडे कोण लक्ष देतय. बायकाना उगीच वाटतं लोकांचं आपल्याकडं लक्ष असतं म्हणून.
ऑफिसमधे मैत्रिणीच्या डेस्क वर गेले तेव्हा तिच्या लक्षात आलं
अखेर **का त्या **काच !
आजचा किस्सा : दोन दिवसा
आजचा किस्सा :
दोन दिवसा पूर्वि आमचा ऑफिस चा बस चा छोटा अपघात झाला. त्यात मला गुडघ्या ला लागल.
आज ऑफिस ला आले तर एका मुलिने विचारले : "How is your knee now?"
अस्मादिक उत्तरले : "Repair(?) हो गया है", जस काही कुठला spare part आहे.
माझा नित्य सवयीचा वेंधळेपणा
माझा नित्य सवयीचा वेंधळेपणा :
डोळ्याला चष्मा आहे हे विसरून तसेच तोंडावर पाण्याचे हबके मारणे (फायदा असा की चष्माही आपोआप धुवून निघतो!), आणि चष्मा काढून ठेवला तरी तो घातला आहे असे समजून नाकावर सावरायला जाणे....बरेचदा ह्या प्रक्रियेत मी स्वतःच्याच डोळ्यात बोट खुपसलेले आहे!
आत्ताचा किस्स.... साबांना
आत्ताचा किस्स....
मनात विचार केला, ही पॅसेंजर वेगळी असेल. आणी गाडी पार्क करुन वेळापत्रक परत पाहीले, ५.४६ ची लोकल कन्फर्म केली नि तिकिट काढले. तिकिट दिल्यावर त्यांनि सांगीतलं की लोकाल एक तासाने आहे.
मी म्हणालो आहो ते ५.४६ ची कॅन्सल झाली का ?
साबांना संध्याकाळी ६ वा. पुणे स्टेशन वरुन आणायचंय म्हणुन सकाळीच दापोडी स्टेशनला जाउन लोकल्सचे टाईमिंग्स पाहुन आलेलो.. ५.४६ ची पकडून जाता येईल म्हणुन ऑफिस मधुन डायरेक्ट ५.३० ला दापोडी स्टेशन ला गेलो तर सवारी जाताना दिसली
ते: नाही, येणारेय ती.
मी. मग तुम्हीच तर म्हणालात ना एक तासाने आहे.. मग ?
ते: अहो, ५.४६ ची पुणे-लोनावळा आहे, तुम्हाला स्टेशनला जायचंय ना...
मग जाउन निट परत वेळापत्रक पाहीलं.. मी वेळापत्रक चुकीचंपाहीलं होतं सकाळी... आणी आत्ता सुद्धा


लोनावळा-पुणे कॉलम सोडुन, पुणे-लोनावळा कॉलम पाहीलेला...
मग काय, लोकलचं तिकिट घेउन (आणी पार्किंगची भुर्दंड भरुन) माझ्यच गाडीने स्टेशनला गेलो...
रागा रागने प्लॅट्फोर्म तिकिट न काढताच घुस्लो.. आणी येताना टिश्याने का पकडु नये...
तेवढ्यात (नशिब) मला काढलेल्या तिकिटाची आठवण झाली... मग निभवुन गेलं..
मल्ल्या, अरे साबांवर एवढी का
मल्ल्या, अरे साबांवर एवढी का खुन्नस? साबांची ब्याद नको म्हणून तुझ्या वेंधळेपणाचे कितीही पुरावे केलेस तरी बायकोला तुझे कावे बरोब्बर कळतील.
साबांची ब्याद नको म्हणून
साबांची ब्याद नको म्हणून तुझ्या वेंधळेपणाचे कितीही पुरावे केलेस तरी बायकोला तुझे कावे बरोब्बर कळतील.
कळतील ? आता घरी गेल्यावर आहेच तु-तु मै मै.. साबांना गेटवरच सोडुन आलोय, ऑफिसला यायचं होतं लगेच म्हणुन... बायकोला कळ्ळं असेल तिकीट पाहुन आता पर्यंत...
आता घरी गेल्यावर आहेच तु-तु
आता घरी गेल्यावर आहेच तु-तु मै मै >>> मल्ली फक्त १ वे असेल ना , मै मै
तु तु ला काही चान्सच नसेल .
आत्ताचा किस्स.... >> अरे
आत्ताचा किस्स.... >> अरे मल्ल्या काय हे ?
आत्ताचा किस्स.... >>
आत्ताचा किस्स.... >>
मल्ल्याचा लेटेस्ट वेंधळेपणा
मल्ल्या यू नीड रेस्ट
मल्ल्या यू नीड रेस्ट
मल्ली
मल्ली
(No subject)
(No subject)
मल्ल्या यू नीड रेस्ट >> मी
मल्ल्या यू नीड रेस्ट >> मी टेस्ट वाचलं
येस मल्ल्या, टेस्ट बाय रेस्ट
येस मल्ल्या, टेस्ट बाय रेस्ट
बायको फिस्स्कारत नाही काय रे
बायको फिस्स्कारत नाही काय रे वेंधळ्या
बायको फिस्स्कारत नाही काय रे
बायको फिस्स्कारत नाही काय रे वेंधळ्या >>> पनु तुला काय त्याने मांजरीशी लग्न केलयं वाटलं का ?

मल्लि, तुमच्यामुळे इथे
मल्लि, तुमच्यामुळे इथे बाकीच्यांना संधी मिळत नाहिये वेंधळेपणा करायला.
झाल. नशीब त्या वेळेस तिथे कोणी नव्हत, सिक्युरिटी गार्डपण नेमका कुठेतरी गेला होता त्या वेळेस (हुश्श!!!)
माझा किस्सा सांगते.
परवा ऑफिसच्या लिफ्टसमोर उभी राहुन अस्मादिक अॅक्सेस कार्ड दाखवत बसल्या होत्या लिफ्टच्या बटणाला. :अओ:, २-३ सेकंदानी लक्षात आल्यावर अगदी
माझा लेटेस्ट, ताजा ताजा,
माझा लेटेस्ट, ताजा ताजा, खुसखुशीत वेंधळेपणा!!!!!!!!! ऐका$$$$$$$$$$
ऑफिसमध्ये ४थ्या मजल्यावर काही कामानिमित्त गेले होते. लिफ्टमधुन येताना मी ९व्या मजल्याच बटण दाबल आणि मोबाइलशी खेळत होते. लिफ्ट थांबली आणि मी बाहेर आले, बाहेर येउन बघते तर काहीच ओळखीच वाटत नव्हत. मग लक्षात आल की मी ९ ऐवजी ८व्या मजल्यावरच आले होते. मग चेहर्यावर असे भाव आणले की मी इथे कोणाची तरी वाट बघत आहे आणि कोणाच लक्ष नाही अस बघुन पटकन जिन्याने वरती आले.
गेल्या आठवड्यातील
गेल्या आठवड्यातील गोष्ट.
बायको गावावरुन परत घरी परत आली. (हा वेंधळेपणा नव्हे... तो पुढे आहे ..........
)
)
घरात ४-५ दिवस मी एकटाच असल्याने दुधवाला, केरवाला, भांडीवाली सगळ्यांना सुट्टी होती.
कॉफी करायची म्हणून बायकोने मला बाहेरच्या किराणावाल्याकडुन दुध घेऊन यायला सांगितलं.
अस्मादिक कधी नव्हे ते हो म्हणाले आणि दुकानात गेले. (न जाउन सांगतो कोणाला???? मला पण कॉफी प्यायची होती............
किराणावाल्याकडे गेल्यावर मी सांगितलं " १ लिटर दुधाची पिशवी दे".
किराणावाल्याने विचारलं "म्हशीचं ना ??????????? "
"नाही नाही, चितळ्यांचं" इति अस्मादिक
किराणावाला माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघु लागला .................
नाही नाही, चितळ्यांचं" इति
नाही नाही, चितळ्यांचं" इति अस्मादिक>>>>>>>>
मग चितळ्यांच्या म्हशीच अस बोलायच हळुच..
Pages