Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी काल बाहेरुन आले , भर
मी काल बाहेरुन आले , भर दुपारच्या उन्हातान्हात घामाघुम होऊन . दोन्ही हात्तात भाजीच्या पिशव्या. पहिल्यामजल्यावर रहाते त्यामुळे नेहमी जीन्यानेच चढउतार पण आज दमले होते आणि कधी घरी पोचुन गार पाणी पिते अस झालं होतं त्यामुळे लिफ्टमधे शिरले आणि एकिइकडे मनात घरी गेल्यावर काय काय काम आहेत याची उन्जळणी करत होते. खुप वेळ झाल तरी पहिला मजला येइचना मग [७\८ मिनिट] लक्षात आलम की बटण न दाबताच उभी होते खुप वेळ झाल तरी पहिला मजला येइचना.
नादात बटण़्अ तर दाबलच नव्हत पण आपण बराच वेळ लिफ्टमधेच आहोत हेच लक्षात आलम नव्हतं 
दोन्ही हात्तात भाजीच्या
दोन्ही हात्तात भाजीच्या पिशव्या >>
मने यावेळी वांग नव्हत ना बरोबर
नादात बटण़्अ तर दाबलच नव्हत
नादात बटण़्अ तर दाबलच नव्हत पण आपण बराच वेळ लिफ्टमधेच आहोत हेच लक्षात आलम नव्हतं >>
परवा मी वॉशिन्ग मशीन मध्ये
परवा मी वॉशिन्ग मशीन मध्ये कपडे टाकून मशीन लावून बाहेर गेले. कामाच्या बाइ नंतर ते बघून कपडे वाळत
टाकतात. त्या ते विसरल्या. दुसर्या दिवशी पहाटे तेच कपडे परत एकदा त्यांनी मशीन मधून धूवून काढ्ले. एक चमचा साबण पावडर, वीज वाया. मला मशीन नीट लावता येतच नाही असा त्यांचा ठाम समज आहे. तो मी बरेच वेळा खरा करते. !
अशक्य किस्से एकेक मने
अशक्य किस्से एकेक


मने भाजीला जाताना दर वेळेस गोंड्याची ओढणी घालुन जातेस का ??:फिदी:
केद्या
आजचा किस्सा: आज ऑफिसमध्ये बॉस
आजचा किस्सा:
पायाला थंड गार पाणि लागले तेव्हा लक्षात आले पायात बुटच नाहीत....................मोजे ठेवलेत सुकायला आता
आज ऑफिसमध्ये बॉस नाही त्या मुळे धम्माल आहे, मी पण मस्त बुट काढुन मोज्यांवर बसलो होतो मध्येच काही कामासाठी कलिगच्या डेस्क वर गेलो (बुट न घालताच) तिथे ५ मिनिटे थांबुन तडक वॉश रुम मध्ये घुसलो
>>> मी पण मस्त बुट काढुन
>>> मी पण मस्त बुट काढुन मोज्यांवर बसलो होतो
कुणाला कशात आनंद मिळेल काही नेम नाही
मने, कठीण आहेस गं बाई
आज ऑफिसला निघताना मला लक्षात
आज ऑफिसला निघताना मला लक्षात आल की मी कपडे धुवायला टाकायचे विसरले म्हणून परत वर गेले आणि कपड्यांची बालदी घेउन खाली उतरले अगदी बाहेर पडले तशीच बालदी घेउन. समोरुन कामवाली येताना दिसली तेंव्हा माझ्या लक्षात आल की मी कपड्यांची बालदी ऑफीसमध्ये घेउन चाललेय. कामवाली आणि मी सकाळीच मस्ता हसलो माझ्या वेंधळेपणावर.
जागु... हापीसात..........
जागु...
हापीसात..........
<<<<आज ऑफिसला निघताना मला
<<<<आज ऑफिसला निघताना मला लक्षात आल की मी कपडे धुवायला टाकायचे विसरले म्हणून परत वर गेले आणि कपड्यांची बालदी घेउन खाली उतरले अगदी बाहेर पडले तशीच बालदी घेउन. समोरुन कामवाली येताना दिसली तेंव्हा माझ्या लक्षात आल की मी कपड्यांची बालदी ऑफीसमध्ये घेउन चाललेय. कामवाली आणि मी सकाळीच मस्ता हसलो माझ्या वेंधळेपणावर.<<<
आईशप्पथ! ग्रेट... कपड्यांची बालदी..
ती बादली पण हसली असेल कदाचित.
ती बादली पण हसली असेल कदाचित.
एकापेक्षा एक वेंधळे हा विनोदि
एकापेक्षा एक वेंधळे हा विनोदि कार्यक्रम सुरु करायला हरकत नाहि.
मी अनेकवेळा वेंधळेपणाने वागले असेन पण आता आठवत नाहि आहेत...
परवा कोकणात जाताना एक गाडी
परवा कोकणात जाताना एक गाडी माझ्या गाडीच्या पुढे होती. तो ही जोरात चालला होता आणि मी ही. आम्ही जवळपास ४ ते ५ तास एकमेकांच्या मागे पुढे चाललो होतो. बायको म्हणाली की आता याच्याच मागे चल. हा डिसेंट स्पीडने चालला आहे. मी त्याच्या मागे जाऊ लागलो. अचानक तो डावीकडे वळला. मी ही (वेंधळेपणाने) सरळ जायच्या ऐवजी त्याच्यामागोमाग डावीकडे वळलो आणि त्याच्यामागेच पेट्रोलपंपावर उभा राहीलो. (पेट्रोल ची गरज नसताना) आता बायकोला सांगायच कस म्हणून उगाचच पेट्रोल टँक फुल करून घेतला.
जागु, वैभव, किर्या
जागु, वैभव, किर्या
किर्या तु बायकोचे केव्हडे
किर्या तु बायकोचे केव्हडे ऐकतोस हे कळले
शँकी, ड्रायव्हींग करतानाच
शँकी,
ड्रायव्हींग करतानाच फक्त ऐकतो बायकोचं. नाय ऐकलं तर जास्त बडबड ऐकावी लागते ड्रायव्हींग करताना.
किर्या...
किर्या...

दक्षे, नानबा, अगो, मनिषा,
दक्षे, नानबा, अगो, मनिषा, किरू
१ जानेवारी ला संध्याकाळी
१ जानेवारी ला संध्याकाळी मित्राकडे कल्याणला रहायला गेलो, दुसर्या दिवशी सकाळ अंघोळ वगैरे आटोपुन डोक्याला तेल लावायला गेलो, पॅराशुट तेलाच्या दोन एकसारख्या बाटल्या होत्या त्यातली एक उचलली आणि तेल हातावर घेतले थोडे जड वाटले, मी म्हटले थंडी आहे म्हणुन घट्ट झाले असेल, डोक्यावर चोळल्यावर लसणाचा वास येऊ लागला (वास ..........अगदी घमघमाट) त्याचं काय झालं मित्राचं ८ महीन्याचं बाळ आहे त्यासाठी मित्राच्या आईने लसुण आणि तेल कढवुन बाळासाठी ठेवले होते व दुसर्या बाटलीत रेग्युलर तेल होते..... मला काय माहित हे गौडबंगाल .....एक तर मी पक्का लसुण विरोधी गटातला
मग काय पुन्हा अर्धी अंघोळ पण तरीही दिवसभर मला त्या घमघमाटाने हैराण केलं..........मनात म्हटल....बिच्चारं बाळ...
>> बिच्चारं बाळ...
>> बिच्चारं बाळ...
बिच्चारे बाळ.. नानबा संपले
बिच्चारे बाळ..

नानबा संपले काय इतक्यात किस्से?
किरु सारखेच एकदा मी केले. अमेरिकेत नवीन गाडी शिकल्यावर १-२ दा airport वर गेले होते मैत्रीणीबरोबर. एकदा कुठेतरी उडणार होते. सकाळी ४ ला निघाले घरुन. गाडी airport वर पार्क करणार होते. धाकधुक तर होतीच. अमेरिकेत नवीन, गाडी नवीन, शिकले नुकतीच, पहिल्यांदाच बेरात्री airport च्या आतल्या रस्त्याच्या जाळ्यातुन पार्किंग शोधायचे वगैरे वगैरे.
शेवटी एकदाची airport चे एक्झीट घेउन आत शिरले. मग शोधाशोध चालु अंधारात पाट्या पाहुन. समोर एक गाडी होती, ती पण साधारण मी जशी वळत होते तशीच वळत होती. मग मी निर्धास्त. 'अरे ह्याला पण पार्किंग लाच जायचे आहे, ह्याच्यामागुनच जाऊ', असा विचार करुन सुटले. तर तो अचानक एकाजागी वळला. मी पण अर्थात वळले. तर तो रस्ता खडबडीत... तरी शंका नाही आली, तशीच निघाले. विचित्रच वाटत होते आजुबाजुला, तरी निघाले. शेवटी एका गेट मधुन तो आत शिरला आणि गायब. मी पण शिरले, गेट उघडेच होते. पहाते तर समोर भलेमोठे ग्राउंड आणि जेमतेम ४-५ गाड्या उभ्या. म्हटले, क्रिकेट च्या मैदानावर आले काय, असला कसला पार्किंग लॉट? लायनी नाहीत, काही नाही. मग एक माणुस दिसला. हुश्श. त्याला विचारले 'Is this airport parking? तो म्हणाला 'no madam, this is airport' ............ माझी पळता भुई थोडी झाली... चक्क airport वर घुसले होते मी सिक्युरिटी (कुठे असलीच तर) ला चकवुन.
पुन्हा कानाला खडा, दिवसाढवळ्या विमान पकडायचे.
मनात म्हटल....बिच्चारं
मनात म्हटल....बिच्चारं बाळ...>>:फिदी:
<<<'no madam, this is
<<<'no madam, this is airport' >> बापरे
<<<'no madam, this is
<<<'no madam, this is airport' >> बापरे
>>
आण्खी थोडी पुढे गेली असतीस ना तर ऐकावे लागले असते
'No Madam, this is aeroplane "

सुनिधी माझ्या नवर्याची कलीग
सुनिधी
माझ्या नवर्याची कलीग चुकुन अशीच रात्री अंधारात गेली होती सर्व्हिसिंग करणार्या गाडीच्या मागे ते पण चक्क धावपट्टीवर . तिचे ड्रायव्हिंग लायसन सस्पेंड केले होते कोर्टाने. पुढच्यावेळी काळजी घे.
अगोबाई, वाचले की मग मी
अगोबाई, वाचले की मग मी रुनी... त्याला आता खुप वर्षे झालीत, तरीपण लक्षात ठेवेन. चूक कुठल्याही वयात होते, अगदी एखादी गोष्ट १००० वेळा केली असेल तरी.
ओ रॉबीन्हुड, विमानात गाडी घेऊन शिरेन इतके पण काही 'ही' नव्हते बर का मी. अंधारात विमान दिसते म्हटल मला.
'No Madam, this is aeroplane
'No Madam, this is aeroplane "
नानबा संपले काय इतक्यात किस्से?
>> नाही ग! लई आहेत... एक मित्र 'बत्ती' म्हणायला लागला माझे एकएक पराक्रम बघून..
पण सगळेच सांगितले तर माझ्या 'बत्ती' पणाची तुम्हालाही खात्री पटेल ना!
गॅस चालू ठेवणे - तिनदा..
इस्त्री चालू ठेवणे - एकदा
असले भयानक प्रकारही माझ्या नावावर जमा आहेत..
एकदा नवरा ऑलरेडी हाफिसला गेलेला.. मी निघालेले.नवर्याशी बोलता बोलता घराबाहेर आले.. लॉक करता करता डोक्यात चेकलिस्ट रन होत होती.. बॅज आहे - पर्स आहे - चश्मा आहे..

अचानक लक्षात आलं की फोन दिसत नाहिये पर्समध्ये.. नवर्याला म्हणाले, अरे, सेलफोन सापडत नाहीये..
तो ही महान! मला म्हणाला 'अग, घरात राहिला असेल - जा बघून ये'..
बर्याच शोधाशोधीनंतर लक्षात आलं - की तो कान आणि खांद्याच्या मध्ये धरून आपण इतका वेळ नवर्याशीच बोलतोय..
मी एनीवे अश्या गोष्टींकरता फेमस आहे... पण ह्या प्रकरणात नवरा चांगला ताबडीत सापडला माझ्या
'no madam, this is airport'
'no madam, this is airport'
_/\_
मुंबईला शिकायला आल्यावर
मुंबईला शिकायला आल्यावर सुरूवातीचे काही दिवस "बंबैय्या"नगरीचे छक्केपंजे शिकण्यात गेलेले.एफ.एस.( फॅशन स्ट्रीट )वर ५०० रू ला सांगितलेली 'कापडं' १०० रू ला घेतली की महापराक्रम केल्यासारखं वाटायचं.
घासाघीस करायची सवय कधी भिनली कळ्लंच नाही.
एकदा सुट्टीत पुण्याला घरी आले. थंडीचे दिवस .खामै सोबत ( खास मैत्रिण ) आप्पा बळवंतात फिरताना लिप बाम घ्यायला औषध दुकानात घुसले. बाम घेतलं.
" कितीला?" मी.
"१५ रू." तो ( दुकानदार )
" १५ रू कशाला? ते काही नाही. मी १० रु.च देणार." मी
धाडधाड दुकानाच्या पायर्या उतरून रस्त्याच्या पार पलीकडे....माझी खामै
" काय यड्चाप पोरगी आहे!" तो ( अर्थात डोळ्यांतले भाव.)
...............त्यानंतर प्रत्येक वेळी " ए बाई, इथे घासाघीस करू नकोस हं"
असं आठवणीने बजावणारी माझी खामै....आणि गुपचूप ऐकून घेण्याशिवाय काहीच पर्याय नसणारी अर्थात मी!!!!
सगळ्यांचे किस्से वाचून
सगळ्यांचे किस्से वाचून

एकदा आईवर इंप्रेशन मारायला जाऊन ज्वारीच्या पीठाची कणीक भिजवली....नंतर काय उद्धार झाला तो सांगायला नकोच!
जीन्सच्या किंवा लॅबकोटच्या खिशातले पेन कमोडमध्ये पडण्याचे प्रकार अनेकदा घडलेत! आधीच पेन पडल्याचं दु:ख, ...फ्लश होईल की अडकून बसेल ही काळजी...आणि त्यातून मैत्रिणींचे बिनकामी प्रश्न " तुला एवढे पेन कशाला लागतात गं ?".....आता काय सांगणार? ...ज्याचं जळतं त्यालाच कळतं!
एकदा तर रिलायन्सचा नवीन सेलफोन ( पहिल्याच आठवड्यात) 'पडला'....आधी हरवलेले पेन शोधायचं काम न सांगता करायला गेला
फोनची लागायची ती वाट लागली.......नंतर जेव्हा जेव्हा नवरा रिलायन्सच्या सी डि एम ए फोनला लाखोली वाहायचा,तेव्हा तेव्हा मी मनातल्या मनात अंबानींची क्षमा मागायचे!!
ता.क.----फोन फ्लश करायचा विचार होता, पण "अशावेळी आतील बॅटरीने अख्ख्या इमारतीच्या पाईपलाईनचा विस्फोट होऊ शकतो का" ह्याची अधिकॄत माहिती वाचल्याचं आठवेना , म्हणून म्हटलं नको रिस्क!
*************************************
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मोमकीन
उसे इक खूबसूरत मोड दे कर छोडना अच्छा !!
Pages