Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असू दे असू दे, पैसे देताना
असू दे असू दे, पैसे देताना असंच काहीतरी होत असते....
दक्षे
दक्षे
२ जिने फिनिश आणि माझी मेमरी
२ जिने फिनिश आणि माझी मेमरी पण फिनिश
गजनी सिंड्रोम झाला की काय?
पनू, दक्षिणा अग काय भारी आहात
पनू, दक्षिणा अग काय भारी आहात गं???? :हहपुवा:
बघते तर खालून मैत्रिण फोन
बघते तर खालून मैत्रिण फोन करून विचारत होती अगं दक्षे येतेयंस ना खाली पैसे घेऊन?>>>>>>

लई भारी दक्षे, आता गझनीची
लई भारी दक्षे, आता गझनीची हेअरस्टाईलपण करुन टाक
दक्शे गजनी मध्ये कसं दिसशील
दक्शे गजनी मध्ये कसं दिसशील मि इमॅजिनलं...
जबरदस्त किस्से आहेत हे. माझा
जबरदस्त किस्से आहेत हे. माझा पण आहे एक असाच.
मी बनियन घालूनच शाळेत आलो होतो.
मी लहान होतो. मराठी शाखेत होतो तेव्हाची गोष्ट. शाळेच्या समोरच घर होते आमचे. मध्ये एक मोठेच्या मोठे पटांगण. (कोल्हापूरच्या लोकांना माहीत असेल. तपोवन). तर मी पटांगणात सकाळी खेळत होतो. हाफ चड्डी आणि सँडो बनियन घातले होते. इतक्यात मला मुले शाळेत जाताना दिसली. म्हणजे शाळेची वेळ झाली. मी धावत घरी गेलो. दप्तर घेतले आणि शाळेत पळालो. तोपर्यंत प्रार्थना सुरु झाली होती. प्रार्थना म्हणताना काही मुले गालात हसत होती. मला कारण कळले नाही. पण मी हसून घेतले. प्रार्थना संपता क्षणी बाइंनी मला समोर बोलावले व कान धरून सांगीतले की घरी जावून शर्ट घालून ये.
हाफ चड्डी आणि सँडो बनियन
हाफ चड्डी आणि सँडो बनियन घातले होते....

>>> हाफ चड्डी म्हणजे एकाच पायात घातलेली विजार काय?
पश्या सहीच!!!
पश्या सहीच!!!
>>>>>पनू, दक्षिणा अग काय भारी
>>>>>पनू, दक्षिणा अग काय भारी आहात गं????
तुम्हाला कसं कळलं न बघता?
किर्या
किर्या
दक्षी..... बापरे डेंजरच आहेस
दक्षी.....
बापरे डेंजरच आहेस तू
किर्या... कित्ती दिवसातुन
किर्या...
कित्ती दिवसातुन दिसलास.. आहेस कुठें ?
विशाल , " एक ऊनाड दिवस " ह्या
विशाल , " एक ऊनाड दिवस " ह्या किश्श्याचाच परिणाम का ?

पनु , दक्षिणा , पश्या , मल्ली
विशाल, दक्षिणा , पशा ...
विशाल, दक्षिणा , पशा ... असे कसे रे तुम्ही इतके निरागस?
हा धागा वाचून फार्फार छान
हा धागा वाचून फार्फार छान वाटतं - म्हणजे आपण एकटेच नाहियोत ह्याचं समाधान!
- पुणे स्टेशनला जाऊन मुंबई ऐवजी पुण्याचंच तिकीट मागितलंय मी बर्याचदा.
- लिफ्ट मध्ये ज्या मजल्यावर आहे, तिथलंच बटण दाबलंय.
- भाजी कचरापेटीत टाकून फोलकटं वरती ठेवली आहेत..
- कानातले टॉप्स,किल्ली पासून ते वॉलेट-पासपोर्ट पर्यंत सगळ्ळं सगळ्ळं हरवून पाहिलंय
- लॅपटॉप आणि सेलफोन्स ना पाण्यानं अंघोळी घालून स्वच्छ केलंय.. (एकदा तर .. असूदेत - ते नंतर कधीतरी)
एकदा तर काय नानबा... आम्हाला
एकदा तर काय नानबा... आम्हाला तेच वाचायचय , बाकी काही नाही वाचायच. ... खि खि.
माझ्या एका मैत्रिणीला एकदा ई
माझ्या एका मैत्रिणीला एकदा ई मेल्स डीलीट करायच्या होत्या..
तिनं सगळ्या सिलेक्ट केल्या - राईट क्लिक केलं - आणि चुकून डिलीट ऐवजी प्रिंट दाबलं..
आमच्या कंपनीत लिमिट होतं एका दिवशी किती प्रिंट आऊट्स घ्यायच्या यावर - वाट लागली बिचारीची कॅन्सल करून आधीच प्रिंट झालेल्या मेल्स शोधता शोधता..
हे हे हे.. हे खास सुनिधीच्या
हे हे हे..
हे खास सुनिधीच्या आग्रहावरून..
वेळ दुपारची.. माझा सेलफोन वाजला.. लई काम होतं..
मी तुला नंतर फोन करते सांगून फोन कट केला..आणि न बघता शेजारच्या मोबाईल स्टँडमध्ये ठेवला.
४-५ तासांनी लक्षात आलं की एकही फोन येत नाहिये आपल्याला - बघते तर फोन ठार (ठार म्हणजे खूप -एकदम- ज्याम ह्या अर्थानी हो) मेलेला..
तर झालेलं असं - फोन येण्यापूर्वी थोडाच वेळ कॉफी वाटणारा माणसाकडून बादाम मिल्क घेतलेलं - काम करता करता ठाSSSर विसरले प्यायचं - सेल फोन स्टँडवर ठेवण्या ऐवजी दुधाच्या भरलेल्या कपात ठेवलेला न बघता.. काय हेटाई केलीये public नं कळल्यावर...
एक जण म्हणाला - पुढच्या वेळे पासून तुला फोन दुधाच्या कपात ठेवायचा असेल तर दुध निदान मोबाईलच्या स्टँड मध्ये ठेवत जा
काल संध्याकाळी कॉफी करुन
काल संध्याकाळी कॉफी करुन घेतली आणि एकीकडे कणिक भिजवत होते. मळतामळता पाण्याऐवजी कॉफी ओतली. हाताला गरम लागले त्यामुळे अगदी थोडीच कॉफी पडली. पण मग तशाच कणकेच्या पोळ्या केल्या
हा किस्सा मी आधी लिहिला आहे
हा किस्सा मी आधी लिहिला आहे का आठवत नाही. लिहिला असेल तर तोही एक वेंधळेपणा समजा
एकदा कोबीची भाजी करायला म्हणून चिरलेल्या कोबीचे तयार पाकीट आणले. आणल्यावर तब्बल तीन-चार दिवस कोबीच्या भाजीचा मुहूर्त लागला नव्हता. फ्रिज उघड-बंद करताना कोबी समोरच दिसायचा. मग एके दिवशी सकाळी फोडणी केली. भिजलेली चण्याची डाळ घातली. मग परतून ते फ्रिजमधील पाकीट काढून चिरलेला कोबी भांड्यात ओतला आणि मग लक्षात आले की तो कोबी नसून लेट्यूस होता. डोक्याला हात लावला आणि तशीच त्या लेट्यूसची भाजी केली. जाम पाणचट झाली होती ...अगदी सपक ! दुसरी भाजी करायला खूप कंटाळा आला होता. मग पानात गूळ-तूप, चटणी वगैरे घेऊन कशीबशी बळेबळे खाल्ली. नवर्याला "एक दिवस असंही खाऊन बघावं. जिभेला शिस्त लागते. चोचले कमी होतात." असं काहीबाही तत्वज्ञानही ऐकवलं वर.
लिहिला असेल तर तोही एक
लिहिला असेल तर तोही एक वेंधळेपणा समजा >>:D
सिन्डी, आता रेसीपी टाक. कॉफी
सिन्डी, आता रेसीपी टाक. कॉफी फ्लेवर पोळी.
नवर्याला "एक दिवस असंही खाऊन
नवर्याला "एक दिवस असंही खाऊन बघावं. जिभेला शिस्त लागते. चोचले कमी होतात." असं काहीबाही तत्वज्ञानही ऐकवलं वर.
>>
आमच्या पुढ्यातही काहीही आम्बोण ठेवून ' हे लो क्यालरी आहे, ह्यात व्हिट्यामिने असतात, हे पोटाला बरे, ते पाठीला बरे, ते मेन्दूला बरे,ते गुडघ्याला बरे' असे पॅरामेडिकल तत्वज्ञान ऐकवले जाते. हम्म्म. घरोघर मातीच्याच चुली. क्या अमरिका क्या जापान.
गावी आंबोण एका विशिष्ट
गावी आंबोण एका विशिष्ट प्रांण्यांसमोर ठेवलेले पाहिलेले आठवते... मनुष्यप्राण्यालाही देतात हे न्हवते माहीती खरोखर.
मनुष्यप्राणी नव्हे---
मनुष्यप्राणी नव्हे--- नवराप्राणी..
lol रॉबिनहूडाजी.
lol रॉबिनहूडाजी. नवराप्राणी...हि एक वेगळी जमात आज कळली.
दक्षे, नानबा, अगो
दक्षे, नानबा, अगो

दक्ष, नानबा
दक्ष, नानबा
Pages