Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोषा मामी नशिब पोळी म्हणून
तोषा
नशिब पोळी म्हणून खाल्ली 
मामी
तोषा बायकोला आरेबिक कळते का?
तोषा

बायकोला आरेबिक कळते का? >> बायकोला अरेबिक जरी नसले कळत.. तरी तोषा सेक्रेटरी शी बोलतोय हे टोन वरुन कळले असेल..
राजे रहम करा आधीच आम्ही इथे
राजे रहम करा आधीच आम्ही इथे आउटसायडर. त्यात अमेरिकेतील पालकांची मुले जसे बाहेर अमेरिकन इन्ग्रजी बोलतात तसे येथील मुले हैदराबादी हिन्दी/ तेलुगु/ इन्ग्रजी बोलतात व आइ बरोबर मराठी. मनसे ला बिर्यानी ची दावत माझ्या तर्फे.
दयचेसी इग्नोअर चेयंडी. असले कायम बोलावे लागते.
परवा अशीच गम्मत झाली. मी ठाण्यात गोखले रोड वर भरपुर फिरले मग रात्री मुलुन्ड ला जायचे होते. रिक्षावाल्याला सांगताना, 'ठाणे चेकनाक्याला सोडा.' अगदी ठाम पणे.( नेहमी मुलुन्डात तसेच सान्गायची सवय कारण राहायचे हाटेल तिथेच आहे चेकनाक्याला.) तो वैतागला. मी परत तेच सांगीतले.
मग एकदम लक्षात आले. आपण ठाण्यातच उभे आहोत मुलुन्ड चेकनाका असे सांगितले पाहिजे. तोपरेन्त
त्याला मी किती बावळट आहे ते लक्षात आलेच होते.
वा!!!!!!!!!! मामी अहो काय
वा!!!!!!!!!!
मामी अहो काय लावलय काय? जरा आम्हाला पण चानस द्या की................
केदारला १०० मोदक
आशुतोष , तरी तुला सांगत असतो
आशुतोष ,
तरी तुला सांगत असतो , एका वेळी कुठल्यातर एकाच योध्याशी लढत जा . ...
आशुतोष, नेपोलिअन , हिटलर यांचा पराभव एकाच वेळी दोन युद्ध आघाड्या उघडल्यामुळे झाला होता हे लक्षात ठेव....
आशुतोष, मामी अजुन एक किस्स
आशुतोष, मामी
अजुन एक किस्स कोर्टातला-
आमचे कोर्टात जागे अभावी एक कोर्ट एका छोट्याश्या हॉल मध्ये चालते. त्या ठीकाणी विटनेस बॉक्स सिमेटचा (कठडे) मुख्य भिंतिस लागुन " L" आकाराचा बांधलेला आहे. त्याला लागुनच पुढे न्यायाधिश साहेबांचे भले मोठे डायस. न्यायाधिश साहेबांच्या एका बाजुस इंग्रजी डिक्टेशन साठी स्टेनो तर दुसर्या बाजुस मराठी रेकॉर्डींग साठी कारकुन अशी बैठक व्यवस्था. साक्षीदाराने दिलेला जबाब न्यायाधिश साहेबांनी सागितल्या प्रमाणे रेकॉर्ड होतो, हि कोर्टाच्या कामकाजाची पध्दत.
एका खटल्याच्या सुनावनीचे कामकाज सुरु झाले. त्यावेळी कोर्टाचे जवळुन लग्नाची वरात जात होती. साक्षीदार अदिवासी अडाणी गडी, तो जरा विटनेस बॉक्सच्या मागिल कोपर्याला उभा. त्याचा आवाज स्पष्ट ऐकु येत नसल्याने न्यायाधिश साहेबांनी त्यास सांगितले कि, "पुढे या" तर हा बहाद्दर सरळ उडी मारुन सिमेंच्या कठड्यावर जाउन बसला आणि म्हणतो, "आता विचारा". न्यायाधिश साहेबांना त्याच्याकडे पाहुन हसावे का रागवावे? असे झाले. आम्हीला हसु आवरणे कठीण होते.
मामी पुढच्या वेळेस
मामी

पुढच्या वेळेस रिक्षावाल्याला फक्त 'चेकनाका' सांगा.हाकानाका
छावा: अजुन एक किस्स
छावा:
अजुन एक किस्स कोर्टातला->>>>>
न्यायाधिश साहेबांनी त्यास
न्यायाधिश साहेबांनी त्यास सांगितले कि, "पुढे या" तर हा बहाद्दर सरळ उडी मारुन सिमेंटच्या कठड्यावर जाउन बसला आणि म्हणतो, "आता विचारा". >>>>>>>

छावा.
अजय / छावा
अजय / छावा
तसे येथील मुले हैदराबादी
तसे येथील मुले हैदराबादी हिन्दी/ तेलुगु/ इन्ग्रजी बोलतात व आइ बरोबर मराठी. >> अगदी
मामी माझ्या सगळ्या भाच्चे कंपनीचे बोलणे ऐकले तर चक्करच येइल. पुर्ण भेसळ झाली आहे.
व्वा!!
व्वा!!:P
स्वयंपाकघरातील मसाले ठेवतो
स्वयंपाकघरातील मसाले ठेवतो त्या रॅकमध्ये कॅच मिरेपूडीचा ड्बा शिस्तीत उलटा ठेवला होता. तीन दिवसांनी लक्षात आले. तोपर्यन्त बरीचशी मिरेपूड खालच्या रॅक वरील भांड्यांवर सांड्ली होती.
परवा लायब्ररीतून डीवीडी
परवा लायब्ररीतून डीवीडी आणल्या. >>>
============================
मामी ...
ही लायब्ररी इंग्रजांची काय ?? मला वाटले ते लोक कंसिडर करतात (निदान एक दिवस तरी ...)
नाही नाही. प्रियदर्शीनी. रोड
नाही नाही. प्रियदर्शीनी. रोड क्र. १२. फार जुनी म्हण्जे आम्ही व्हीएच एस टेप्स आणायचो आता सीडी व डीवीडी.
तो मालक तेलंगणा रेड्डी आहे. चांगला आहे आजकाल तब्येत बरोबर नसते त्याची.
.
.
.
.
आलेलेलेले....डिप्स, कमी पडत
आलेलेलेले....डिप्स, कमी पडत असतील तर हे घे अजून काही......
चिन्गुडी, इडली प्रकरण काय हे?
चिन्गुडी,
इडली प्रकरण काय हे? मी ऑफिस मध्ये एकटीच हसतेय ना ! सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पहात आहेत की बाबा हिला काय झाले अचानक हसायला ?
ह्अ.पु.वा. तुझ्या वेन्ध़ळेपणाची.
सुनिता
सकाळी नवर्यासाठी चहा करायचा
सकाळी नवर्यासाठी चहा करायचा कंटाळा आला. (मी चहा घेत नाही.) "तुम्हाला आज सर्दी झालीय. गरम हळदीचे दुध घ्या बरे वाटेल" असे सांगितले. बिचारे(आदरार्थी) आधी नको म्हणत होते पण मी अगदीच आग्रह केल्यावर तयार झाले. दुध उकळल्यावर साखर टाकली, मसाल्याचा डबा उघडून सरळ तिखट टाकले. मग हताश नजरेने एकदा दुधाकडे, एकदा डब्याकडे आणि केविलवाण्या नजरेने नवर्याकडे पाहिले. मुकाट दुसरे पातेले घेऊन चहा(सूंठीचा) करुन दिला.
बिचारे(आदरार्थी) >>
बिचारे(आदरार्थी) >>
पने,ते उलट असेल्,केविलवाण्या
पने,ते उलट असेल्,केविलवाण्या नजरेने नवर्यानेच बघितले असेल तुझ्याकडे
परवा आम्ही मैत्रीणी ट्रिप
परवा आम्ही मैत्रीणी ट्रिप वरून परत येत होतो. सगळ्या दमलो होतो तेंव्हा काही जणी रूमवर गेल्यावर लगेच झोपल्या कारण पहाटेची परतीची गाडी लवकर होती. मी सर्व पॅकिंग केले दोन बॅगा होत्या. व झोप येत नाही म्हणून पुस्तक वाचत बसले. झोप यायला लागली तेंव्हा पुस्तक ठेवल आणि बघितल तर माझी पर्स दिसत नव्हती. ब्लॅंकेट उशी चादर गादी सर्व उलट पालट करून पाहिल बॅगा सरकवून पाहिल्या परंतु पर्स काही सापडेना . माझी तर झोप उडालीच पण झोपलेल्या मैत्रिणी देखिल उठून माझी पर्स शोधायला लागल्या. जवळ जवळ अर्धा तास आमची शोधाशोध मोहिम चालू होती. नंतर माझ्या अचानक लक्षात आले व बॅग उघडून पाहीली तर पर्स बॅग मध्ये ' पॅक ' केली होती. सगळ्या मैत्रिणीं समोर माझा चेहरा इतका वाईट्ट ........ झाला. (त्यांची झोपमोड झाली ना माझ्या वेंधळेपणामुळे)
कालचि कथा, ओफिस् ला येताना
कालचि कथा, ओफिस् ला येताना कपनी च आय कार्ड खुप शोधल,शेवति वाटेत कुठे तरि पडल असेल म्हनुन ,येताना काल जिथे थाम्ब्लो होतो ,तिथे बघितल,शेवटि आफिस मध्ये आलो ,तर माझ आय कार्ड माझ्ह्या चेअर लाच अड्कुन रहिल होत.
एका उन्हाळ्याच्या सुट्टीत
एका उन्हाळ्याच्या सुट्टीत सहकुटुंब दिवे आगारला गेले होते! सूर्यास्त बघायचा राहिला होता म्हणुन सूर्योदय पाहू असे ठरले! सकाळी सूर्योदयाच्या आधी सगळे समुद्रकिना-यावर हजर झाले...आणि कॅमेरा लावून सज्ज! मग काय? थोड्या वेळाने आरामात सूर्व्यादेव आमच्या मागून उगवताना दिसले आणि आम्ही हसत सुटलो! पश्चिम किनारपट्टीवर आम्ही समुद्रावर सूर्योदयाची वाट बघतोय म्हणजे कहरच!!!
कोणीही प्रश्ण विचारला की कधी
कोणीही प्रश्ण विचारला की कधी आलास तर माझ ठरलेलं उत्तर = झाले बरेच वर्ष
परवा घरी गेलो होतो. मातु:श्री घरात नव्हत्या. थोड्यावेळाने आल्यावर त्यांनी विचारल कधी आलास. सवयीन उद्गारलो, झाले बरेच वर्ष म्हणून.
त्यावर तेवढ्याच शांतपणे तिनी मला सांगितले तू केंव्हा आलास हे मीच तूला सांगितल होत. तू घरात कधी आलास तेवढ सांग.
सातारकर
सातारकर
पनू, सुनिता, अनिल, आर्या,
पनू, सुनिता, अनिल, आर्या, सातारकर
माध्यमिक शाळेत असतांना होस्टेल ला राहत होतो. होस्टेल संस्थेच्या मंगल कार्यालयाच्या बिल्डींग मध्येच होते.
सर्व मुल अगदी मिळुन मिसळुन राहत असु. कोणाच्या घरुन खाऊ, लोणचे आले कि वाटुन घाणे हा शिरस्ता. नविनच रेक्टर जॉईन झालेत भलतेच कडक. कोणी खोडी अगर गैरवर्तन केल्यास शिक्षा ठरलेली. त्यात एक नविन विद्यार्थी भरती झाला. कोणालाच खाऊ किंवा लोणचे देत नसे आणि तोंडात शिव्या. आम्ही थोडे जरी त्याचे नाव घेतले कि आमची रेक्टर कडे तक्रार आणि आम्हाला शिक्षा व्हायची. म्हणुन आम्ही त्याच्यावर टपलेलोच होतो.
एके दिवशी ठरले, मंगल कार्यालयाच्या हॉल चे बिमचे आडोश्याला या पठ्ठ्या अंथरुण टाकुन झोपला कि, कंबल परेड घ्यायची. आम्ही आठ मित्र, दोघांनी लाईट बंद करायची आणि सहा जणांनी कंबल परेड घ्यायची. पठ्ठ्या गेला झोपी. ठरल्या प्रमाणे रात्री अकरा वाजता लाईट बंद करण्यात आली. आम्ही त्याच्या अंगावर कांबळा टाकुन लाथाबुक्क्यांनी चांगलेच चोपले. तो ओरडला, आम्ही दचकलो, आवाज प्रौढ होता. आणि ते आमचे रेक्टर होते. आम्ही अंधारात लगेच पसार, ज्याच्या त्याच्या बेड मध्ये गुडुप.
सर्वांना (३५ विद्यार्थ्यांना) उठवण्यात आले. पण कोणीच नावे सांगितली नाहीत. म्हणुन सर्वांनाच छडीचा चोप मिळाला.
वेंधळेपणा म्हणू का आंधळेपणा ?
वेंधळेपणा म्हणू का आंधळेपणा ? जे काय असेल ते रेक्टरला भारीच पडलं असेल नाही ?
एकदा ताईला आणि मला आत्याकडे
एकदा ताईला आणि मला आत्याकडे जायचे होते...ताईनी रिक्शा थांबवली आणि बसल्यावर रिक्श्यावाल्याला सांगितले " पोली गेट पेरु स्टेशन.. ".... रिक्श्यावाला आधी कावराबावरा झाला आणि तीघांच्याही एकदम लक्शात आले... ताईला म्हणायचे होते... "पेरुगेट पोलिस स्टेशन"
Pages