मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजे... रताळ, थालीपीठ >> Rofl ,
करपट थालीपीठा चा प्रश्ण.. 'माझे काय चूकले' या बीबीवर टाक्..लोक त्यातनही सोल्युशन सांगतिल Proud

मंजे Rofl

अगो ग्रेट आहेस , तो मित्र जेवण्यापुर्वी १० दा विचार करेल . Lol
आशुतोष , आता तु भारतात परत आलास की तुझं काही खरं नाही . Lol
केदार Rofl मला तर बरेचदा अचानक समोर आलेल्या माणसांचं नावचं आठवत नाही . Proud

सही किस्से आहेत. हा एक माझा: एक दिवशी सकाळी सकाळी ऑयल इंडिकेटर ऑन झाला म्हणुन गाडी घेऊन सर्विस स्टेशनला गेले. तिथुन सरळ ऑफिसला गेले. संध्याकाळी निघताना अंधार झाला होता. मी नेहेमीच्या सवयीने गाडी हाय वे वर काढली. एका गाडीला ओवर टेक केल्यावर लक्षात आले की मागचा गाडीवाला फ्लॅश मारतोय. सहसा काही चुकीचे लक्षात आले की असे इंडिकेट करतात ना लोक. मग मी सीट बेल्ट लावलाय का बघितला, ट्रंक बंद आहे, दारं बंद आहेत सगळे बघितले. तेव्हा मला असे एकदा वाटले की गाडीतले कंट्रोल्स नीट दिसत नाहीयेत. मी विचार करतेय की आज फारच ढग आलेत, अंधारुन आलेय त्यामुळे असे असेल Uhoh तो मागच्या फ्लॅश मारतच होता. मला वाटलं त्याला नक्की पुढे जायचय म्हणुन हाय बीम मारतोय. जायचय तर दुसर्‍या लेनमधुन जा ना. मला कशाला फ्लॅश मारतोय. मी अजिबात ह्याला जाऊ देणार नाही म्हणुन मी जरा स्पीडमधे काढली. मग मधे मी गॅस घ्यायला गाडी एका गावात घेतली. तिथे एका वळणावर अंधारात पुढचा रस्ता दिसेना तेव्हा लक्षात आले की हेड लाइट्स बंद होते Sad माझ्या गाडीचे हेड लाइट्स नेहेमी ऑटो वर ठेवलेले असतात. पण सकाळी सर्विस सेंटरच्या लोकांनी रीसेट केले असणार. नशीब मामुने नाही बघितले नायतर तिकिट नक्की होते.

रताळं??? Rofl Rofl Rofl Rofl

सिंडरेला.... रिस्की वेंधळेपणा, हो! Wink
तू बराच वेळ काही रिस्पॉन्स देत नाहीस म्हटल्यावर त्या मागच्या गाडीवाल्यालाच वाटलं असेल की आपणच काहीतरी वेंधळेपणा करून फ्लॅश मारला की काय Lol

एक किस्सा-
कोर्टात मोबाईल फोन वापरास बंदी आहे. त्यामुळे मोबाईल सायलेट मोड वर ठेवावा लागतो, नाही तर एक तर बंद ठेवावा लागतो. मोबाईल वाजल्यास जप्त करुन नंतर दंड आकारण्यात येतो.
एके दिवशी एका अशिलाचे वकील बाहेर गावी गेलेत म्हणुन पुढची तारीख मिळाणे करिता अर्ज घेऊन कोर्टात आला. आणि त्याचा मोबाईल अचानक वाजला. मग त्याने तो गडबडीत काढुन ऑन करुन बोलण्यास बाहेर जाऊ लागला. तेव्हढ्यात जज्ज साहेबांनी आदेश दिला, "मोबाईल इकडे आणा!" तर हे बहाद्दर सरळ मोबाईल च्या पलिकडील इसमास (त्याचे वकिलांना) म्हणाले, "थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी." म्हणत सरळ डायसवर चढुन जज्ज साहेबांच्या हातात मोबाईल दिला. त्या प्रकाराने सर्वच अचंबित झाले. नंतर सर्वांना हसु आवरेनासे झाले. Happy असे अनेक किस्से झालेत.

>>"थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी." >>
छावा, जज्ज वेडा नाही झाला का ही रिअ‍ॅक्शन पाहून? Lol Rofl

थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी >>> अ श क्य Rofl मी इमॅजीन करुन हस्तेय एकटीच Rofl

थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी >> लै भारी राव. मी इकडे एकटाच वेड्यासारखा हासुन रायलो.

>>>>"थांबा साहेब बोलताहेत तुमच्याशी."
छावा Lol
------------------------
आमच्या इथेही कोर्टात मजेशीर किस्सा झाला होता. एक इसम कोर्टामध्ये केस चालु असताना तोंडात तम्बाखुची गुळणी धरुन बसला होता. त्याची साक्ष आल्यावर महाशय कुत्र्यासारखं तोंड वर करुन मुखरस सांभाळीत बोलायला लागले. त्याची ती अवस्था बघुन कोर्टात बाकीचे लोक हसायला लागले. Biggrin तेवढ्यात कोर्टाने त्यास खडसावुन बाहेर जाऊन तोंड मोकळे करुन येण्यास सांगितले व नाममात्र दंड केला.
त्या गुळणीवाल्या अशिलाच्या वकिलाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता. Happy

"थांबा साहेब बोलताहेत तुमच्याशी.">>>>>>>>>>
भन्नाट किस्सा आहे. Lol

बाय द वे, मला कोर्ट (इथे न्यायाधीश ह्या अर्थाने) म्हणजे डॉ मोहन आगाशे आणि तो साक्षीदारच्या ऐवजी वकील असलेला (?)
मकरंद अनासपुरे दिसला.

म्हणजे डॉ मोहन आगाशे आणि तो साक्षीदारच्या ऐवजी वकील असलेला (?)
मकरंद अनासपुरे दिसला.
>>
काल 'कायद्याचं बोला' पाहीलास का?? Proud

<<<"थांबा साहेब बोलता आहेत तुमच्याशी." >>> Lol
म्हणुनचं म्हणतात वाटतं शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये . एक तर वकिलाला फी द्या अन अशा चुका करुन वर परत दंड भरा Proud

हा लेटेस्ट किस्सा -
कैरोला असलो की रोज संध्याकाळी एक फोन घरी करुन डेली रिपोर्टींगचा शिरस्ता.गेल्या आठवड्यात असाच ऑफिसमधून निघायच्या आधी फोन केला. फोनवर नेहमीप्रमाणे अर्धांगिनीची बडबड चालू झाली.
ईतक्यात सेक्रेटरी येऊन रीपोर्टसमध्ये काही बदल करायचेत का म्हणुन विचारत आली. हँड्स फ्री कानाला होताच तरीही मी गप्पच कारण अर्धांगाचा मंजुळ(?) स्वर कानात पडत होता. शिवाय घरी फोन केल्यावर माझा रोल फक्त श्रोत्याचा,हो,नाही,ठीक यापलीकडे फारसं काहीच बोलु न देण्याचा अर्धांगाचा आटोकाट प्रयत्न.
सेक्रेटरीला कशाला ताटकळवत ठेवा म्हणुन तिला पटापट बदल सांगितले.तरी ती आपली मख्ख चेहरा करुन उभीच. कानात ठणाणा तसाच चालू.
२ मिनिटांनी डोक्यात प्रकाश पडला की सेक्रेटरीला मराठीत बदल काय हवे होते ते सांगितले आणि फोनवर अर्धांगिनीशी अरेबिकमध्ये बोललो.

श्री,काय करणार? माझ्या युद्धकौशल्यावर असलेला माझा अतिआत्मविश्वास नडतो Proud

मंजे,संपदाला कळेचना की अचानक हा मराठी सोडून कोणत्या भलत्याच भाषेत बरळायला लागला? म्हणुन ठणाणा आणखी जोरात चालू Proud

तोषा Lol
नाहीतर तू अरेबिक मधे बायकोशी बोलल्यानंतर ती म्हणायची, एवढा वेळ मी हेच तर सांगत होते तुला..... Proud

परवा लायब्ररीतून डीवीडी आणल्या. गड्बडीत परत करायला झाले नाही. काल नक्की परत करायच्या म्हणुन
टिफिनबरोबर ब्यागेत ठेवल्या. नेहमी मी ब्रीफ्केस मध्ये अश्या परत करायच्या गोष्टी ठेवते. घरी वेळ झाला नाही म्हणुन ऑफिसात बसुन पुर्ण ब्रीफकेस आवरली. परतताना लायब्ररीत गेले व ब्रीफकेस मध्ये पाहिले तर डीवीडीज नाहीत. ऑफिसात विसरल्या म्हणुन स्वतःलाच शिव्या घातल्या. ( दोन डीस्कस प्रतीदिनी १५० रु. ची फोडणी) घरी आले, टिफिन घासायला टाकायचा म्हणुन टीफीन्ची ब्याग उघड्ली तर आत डिवीडीज.
आता कपाळाला हात लावला. ( कारण शिव्या पहिलेच दिल्या होत्या)

तेवढ्यात कन्या उड्त आली व म्हणे " आपने अभी तक वापस नहीं किया?" तु. क.

मी खलासच.

" आपने अभी तक वापस नहीं किया?">> मामी, तुमची कन्या घरी हिंदी का बर बोलते, तुम्ही मराठी शिकवल नाही का ? मनसेवाल्याना नाव सांगु का , सांगु का.

Pages