मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही मग आईने त्यात बहुतेक चिंच कुळ घातला आणि थोडी खाणेबल केली.
त्याच वर्षी आई नसताना, मी केक करायला घेतला रव्याचा (ह्या आधी केलेला बिघडला नव्हता म्हणुन उद्योग करायला घेतला) तुप जास्त झाल नी त्याचा चॉकलेट घातलेला शिरा झाला. त्यावेळी भावाने घरात एक कुत्र्याच पिल्लु आणुन ठेवलेल संपवायला मग त्याला पण घातला खायला. त्याने भुंकुन भुंकुन (म्हणजे मागुन मागुन) खाल्ला. पुढचे ८ दिवस भाऊ सगळ्यांना सांगत होता, ताईने केलेला शिरा केक कुत्र्याला पण आवडला. आई बाबा परत आल्यावर आधी कुत्र्याला आणला तिथे सोडुन यायला लागल Sad (म्हणुन पुन्हा शिरा केक नाही केला)

आत्त्ता आत्ता लग्न झाल्यावर माझी नणंद आणि मिस्टरांची आत्या रहायला आल्या होत्या. सा.बां नी माझ्या केक च खुप कौतुक केलेल त्यांच्या पुढे म्हणुन घेतला करायला माय्क्रोवाला ५ मि. मे केक. टाईम सेट करुन ३ मि. झाली केक फुगायला लागला आणि हाय रे दैवा लाईट गेले ते चक्क पाऊण तास. तो पर्यंत केक पुन्हा खाली बसला. लाईट आल्यावर पुन्हा टाईम सेट केला तर चक्क गोल दगड होऊन बाहेर आला. नशीब घरात आम्ही तिघेच होतो. बाहेर गेलेली सगळी परत यायच्या आधी तो दगड कचर्‍यात झाक पाक करुन टाकला आणि पुन्हा हिंमती ने दुसरा केक केला. ह्य वेळी एमएससिबी च्या कृपेने तो व्यवस्थीत झाला. आल्यावर अरे वा म्हणत सगळ्यांनी खाल्ला खरा, पण नवरा तिथे हसत होता एका वर एक फ्री ऑफर होती म्हणत

-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

कविता Proud ,मी ही ८-९ वीत असेन तेव्हा
मी एकदा साबुदाणा कडधान्य भिजवतात तसा भिजत ठेवला होता खिचडी साठी आणि मग शेवटी त्याच्या पापड्या कराव्या लागल्या

कविता एवढी जोरात हसले कि आजुबाजुचे बघायला लागले, कुत्र्याची आयडीया लई भारी

अरे वेंधळेपणाचा बीबी आहे "स्वयंपाकघरातल्या" वेंधळेपणाचा नव्हे!!
आज एक मेल पाठवताना चुकून,, Deear Mr. gogaTe असं लिहून पाठवलय.. Happy
--------------
नंदिनी
--------------

हो ग नंदिनी हे हल्ली नेहमी होत माझ्याकडुन आणि मला वाटत होत की मलाच अशी सवय लागलेय..
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...

मगाशी कट्ट्यावर टाकलेला वेंधळेपणा, जो माझ्याकडून न चुकता होतो

१. कंडक्टर समजुन तश्याच रंगाचा शर्ट घातलेल्या माणसाकडे टिकीट मागणे
२. दुकानात सेल्स्मन समजुन विकत घ्यायला आलेल्याच एखाद्या माणसाकडे किंमत विचारणे , अजुन वस्तु दाखवायल सांगणे. बर कळल्यावर नुसत सॉरी नाही येत तोंडातुन, त्याबरोबर फिस्सकन हसायला येत नी अजुन ४ माणसांना कळत त्याला सेल्स मन समजले ते. तो बिचारा तोंड वाकड करुन पटकन सटकतो तिथुन

-------------------------------------------------------------------------------
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

कोणी फोनची रिंग वाजताना दरवाजा उघडुन हॅलो म्हटलय???
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...

आज एक मेल पाठवताना चुकून,, Deear Mr. gogaTe असं लिहून पाठवलय.>>>> नंदिनी माझ ही हल्ली बरेच दा अस होत, मा बो अ‍ॅडिक्ट दुसर काय ?

कोणी फोनची रिंग वाजताना दरवाजा उघडुन हॅलो म्हटलय???>>>>> बापरे भन्नाट
मी चुकुन रोमोट घेऊन हॅलो म्हणलय मोबाईलच्या ऐवजी

रिमोट सोबत असताना सेल-फोनने टिव्हीच चॅनेल चेंज केलय कधी??
लाईट गेले असताना पीसी चालत नाही म्हणुन रॅम चेक केलीय कुणी???
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...

योगिता अशक्य आहेस Proud

>>आज एक मेल पाठवताना चुकून,, Deear Mr. gogaTe असं लिहून पाठवलय << नंदिनी
कित्ती ते माबोमय होणं तुझं Lol

माबोमय.....अल्कोहोलिक ला समांतर शब्द आहे ! Lol

मी तर महत्वाच्या लोकांना मिटींग रीक्वेस्ट मधे CC मधे घालण्याऐवजी resources मधे घातलं होतं (जी जागा conference room च्या नावासाठी असते. )
copy paste करुन मेल टाकली आणि खालचं नाव बदलायचं विसरले.
टोमॅटो हा मी जेव्हा कधी चिरते तेव्हा तेव्हा तो मी घालायची विसरते. पोहे आमटी कशासाठीही टोमॅटो चिरला की फोडणी होऊन पदार्थ तयार झाला की मला तसाच राहीलेला टोमॅटो दिसतो.
गॅस चालू न करणे किंवा चालू करुन विसरुन जाणे (मग दूध ऊतू गेल्यावरच कळतं) दूध ऊतू घालवणे हा एकेकाळी माझा छंदच होता. म्हणजे रोज करायची गोष्ट होती. हल्ली सुधारणा आहे. Happy
पुस्तक बदलायला जायचं पुस्तक घरीच विसरुन
दुकानदाराला पैसे देऊन वस्तू दुकानातच विसरणे.
बापरे यादी न संपणारी होणारे...
~~~~~~~~~

face steamer मधल पाणी तापल की नाही हे कोणी बोट घालुन बघितलय का steamer चालु असताना???
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...

नाही.. पण मी विचार करता करता कढईत तेल तापलंय का हे बघायला बोट घालून नक्की बघितलंय Proud

योगे तू ना ग्रेटच आहेस! Lol

क्ष- Proud

सगळ्यांचे किस्से Rofl

आज उशिरा ऑफिसला आलो... एका Urgent मेलसाठी बॉस डेस्क जवळच उभा होता... घाईघाईत PC ON करून मायबोलीच्या IDने मेल मधे Login करत होतो... बॉसला काय बोल सुचेचना... माझे मायबोलीचे वेड पाहून तो पण वेडा झालाय... :d

आला रे...

छान क्ष..मी थोड तुझ्या पुढे जाऊन बघितल
आणि माझ्या आत्याने तर मीठ घातले होते गरम पाण्यात चेहरा जास्त चांगला व्हावा म्हणुन..
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...

का steamer चालु असताना???
>>> यो :)... तु प्रश्ण नको विचारु... Proud तुझ्याइतके बहुतेक अजुन कोणी नाही वेंधळे Happy

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

तेल, स्टीमर सारखंच कढई तापली का नाही हे हात लावून पाहिलंय.

हे थोड विषयान्तर होईल, पण विषय निघालाच आहे तर.....
विळीवर भाजी चिरता चिरता, कोण तरी आल म्हणून त्यास भेटायला वा अन्य कामासाठी, विळी तशीच उघडी ठेवुन जाणार्‍या बायकान्ची मला मनस्वी चीड आहे! ग्यास तसाच चालू रहाणे, दूध उतू जाणे, ग्यासचे बटण सुरू करुनही तो पेटवायलाच विसरणे, इस्त्री बन्द करायला विसरुन जाणे इत्यादी अनेक बाबी अशाच! (देशस्थात यान्चे प्रमाण जास्त असते असा अनुभव) Happy
उघड्या विळीवर स्वतःचाच वा दुसर्‍या कुणाचा पाय पडून तो चिरला गेल्याच्या अनेक घटना लहानपणापासून ऐकीवात आहेत! असच लहानपणी विळीवर चिरताना विळी तशीच उघडी ठेवून जाऊ लागल्यावर पाठीमागून "रान्डो़ळ्या, तुझ झाल नाही ते तळपट, आधी विळी मिटून ठेव" ही आईची दरडावणी अजुनही कानात घुमते! आजही काय बिशाद हे माझी विळी तशीच उघडी ठेवण्याची? माझ्याकडूनच नाही तर नात्यातल्या कोणत्याही ज्येष्ठ अन श्रेष्ठ बाईने विळी उघडी ठेवली तर आईप्रमाणेच जागेवर फटकारायला मी देखिल कमी करत नाही, शब्द थोडे वेगळे अस्तात इतकेच! Proud

का steamer चालु असताना???
>>> यो ... तु प्रश्ण नको विचारु... तुझ्याइतके बहुतेक अजुन कोणी नाही वेंधळे

केदार असं म्हणुन तू माझा अपमान करतोयेस हं..मला पुर्वी वेंधळेपणासाठीचे पारितोषिक जाहीर झालयं जुन्या माबोवर.. Wink

केदार असं म्हणुन तू माझा अपमान करतोयेस हं..>>> ओह्ह Happy ...असे आहे होय Proud
तुमचा पण आवडता किस्सा टाका के मग इथे :).. तेवढीच झलक नविन लोकाना पण..

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

ऑफिसमधली सवय घरी जाताना पण कधी कधी पाठ सोडत न।ही.............. कार्यालयात शिरताना मुख्य दरवाज्यावर कार्ड्(मराठी?) दाखवायला लागते ( access control card) . काल घरी गेले तेव्हा दरवाज्यावरची घन्टा वाजवण्याच्या ऐवजी गळ्यातल कार्ड दाखवुन दरवाजा ढकलत होते.....कार्यालयातील वापरायच कार्ड घरापर्यन्त गळ्यात घालुन गेले हा पण एक नेहमीचाच वेन्धळेपणा!!!!!!!!!

प्राजु...

माझ्या आधीच्या घरी किचन खुप लहान, एवढं की फ्रिजलाही जागा नाही. मग त्याची रवानगी एका बेडरुममध्ये झाली. किचन आणि बे. मध्ये एक छोटा पॅसेज होता. सैपाक करताना अचानक मला मिरची/टोमॅटो/कोथिंबीर काहितरी हवे असायचे. फ्रिज जाऊन उघडला की मी एकदम ब्लँक व्हायचे. कशासाठी आलेय तेच आठवायचे नाही. मग परत किचनमध्ये जा. तिथला नजारा पाहिला की लगेच आठवायचे मिरची पाहिजे की टोमॅटो ते. मग परत फ्रिजकडे.. तिथे गेल्यावर परत ब्लँक.. मग परत किचन. मग मिरची मिरची मिरची असे जोरात घोकत परत फ्रिजकडे. आणि मग मिरची यायची किचनमध्ये..

तुम्हाला हे अतिरंजीत वाटेल पण असे बरेचदा झालेय आणि मी कधीकधी चारचार फे-या मारल्यात.. Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

>>>> तिथे गेल्यावर परत ब्लँक
तिथली वास्तूशान्त केली होती का? Proud
नसेल तर विशिष्ट जागी बरेचदा असे "चकवे" बसतात! Happy

प्राजु,
हे तर माझे पण होते बरेचदा. ऑफिसमधुन बाहेर येताना कार्ड दाखवते. बाहेर आल्यावर लिफ्ट वर बोलवण्यासाठी लिफ्टचे बटण दाबण्याऐवजी तिथे पण कार्डच दाखवते.

तिथली वास्तूशान्त केली होती का?
>>> लिन्बुटिन्बु Proud

access control card >>> प्रवेशपत्र (identity card - ओळखपत्र या प्रमाणे Happy )

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

मी एकदा पोर्टीको मधे आईसक्रिम कोन खाल्ल्या नंतर गप्पांच्या नादात कोल्ड्रींक मशिन खाली हात धुतले पेप्सी ने आणी तो मॅनेजर ओरडत आला आणी दोन कोल्ड्रींकचे पैसे घेतले वाजवुन

Pages