मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोल्ड्रिंग मशीन खाली हात धुतले>>> स्मिता तुस्सी ग्रेट हो Biggrin

-------------------------------------------------------------------------------
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

कुणी घरी आरामात गादीवर पडून पुस्तक वाचताना ctrl + F मारायचा प्रयत्न केलाय का ?
~~~~~~~~~

...:D Lol
मी ऑफिसमध्ये फोन वाजला कि माउस कानाला लावते आणि scroll करायला मोबाइल वापरते!!!
प्राजु

मैत्रिणीची आई तूप कढवायला ठेवून गेली होती. तूप झाल्यावर तिची आई अजून खूष व्हावी म्हणून मी मैत्रिणीला तुप प्लास्टीकच्या गाळणीतून गाळायला लावलं Sad बोलणी खाल्ली मग गाळणी पण कामातून गेली आणि तूप वाया.
~~~~~~~~~

आज सकाळी दंतमंजनासाठी wash basin च्या बाजुच्या कपाटातून tooth brush आणि shaving cream tube बाहेर काढली. .... लगेच लक्षात येवुन tooth patse बाहेर काढली.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

बोलणी खाल्ली मग गाळणी पण कामातून गेली आणि तूप वाया... Biggrin मिनु भारीच

कोणी शेव्हींग क्रीमाने (बरोबरे का ?) दात घासलेत का ? Proud

एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, मीनू!! :ओरडणारी बाहूली:

त्याच्यापूढे जाऊन सांगतो, रस्ता चुकला, चुकीची क्रिया केली गेली, एखादा जिना जास्त चढला गेला, चुकीचे शब्द बोलले गेले- तर Ctrl + Z किंवा undo ही बटणं बोटं किंवा डोळे चाचपडतात. हे कुणाला खोटं वाटेल, पण लाखो वेळा झालंय माझं असं, होतंय. Happy

--
रस्त्यात सारखा हॉर्न वाजविण्यात काहीच मर्दूमकी नाही..
जगाला आपले कर्तृत्व दाखविण्याचे इतर अनेक चांगले मार्ग आहेत. Happy

काय एक से एक किस्से आहेत...! ह. ह. पु. वा.

यासर्वांवर कळस म्हणजे माझा वेंधळेपणा ...ऐका..
ऑफीसमधे माझ्या बॉसचा चांगलाच वचक( चांगली ६० वर्षाची आहे ती) ! ती जिथे बसते त्या केबिनबाहेरुन जायला सुद्धा लोक घाबरतात. एकदम गुस्सेवाली ... ! तिची एक सवय आधीच सांगते..तिला मधेच काहीतरी आठवतं मग मला बोलावुन एका वेळेसे ४-५ काम, ४-५ मेल ड्राफ्ट करायला अस एकदम देते. आधीच सेक्रेटरी म्हटल्यावर फोन, अपॉइंटमेंटस, मिटिंग ची धांदल असते.

तर मागच्या वर्षीची गोष्ट..! माझ्या बॉसचे ज्यांच्यासी पटत नाही असे कॉर्पोरेट हेड एच आर, त्यांचे वडील वारले तिकडे पश्चिम बंगाल मधे ! आणि माझ्या बॉसने मला verbally २-३ वाक्य सांगितली .... condolence letter पाठवायचे मेलवरुन ..झाल मी घेतलं ड्राफ्ट करायला! अन घाईघाईमधे जे टाइप केल ते इतक हॉरीबल होतं की...तीच काय कोणीपण थयथयाट करेल्...पण अहो आश्चर्यंम, तिने इतके शांत नजरेने माझ्याकडे पाहिले की...मलाच माझी कीव आली...! Sad
मी ड्राफ्ट केलेले असे होते..!

we deeply mourned.... about your father's demise...the entire staff of.. share your grief deeply.
आणि शेवटी ते भयंकर वाक्य... May his sole rest in Piece!!!

Sad

दिर्पुझा, तुम्ही घासलेत ना, तेव्हाच एवढे चमकतात Happy

*******************************************
बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते,व्याकुळ होते,तीळ तीळ तुटते,खोल कुठे गलबलते

नयना, मला डेव्हिल वेअर्स प्राडा मधली मिरांडा प्रिस्ली आठवली Happy

May his sole rest in Piece!!! Lol

बूटाची कंपनी होती का त्यांची ??

क्ष, मी बघितल नाही ते..:( काय होत त्यात नक्की?

आयसीएलला प्रत्युत्तर म्हणून आयपीएल काढली....

१३ सप्टेंबर २००७ ला दिल्ली मधे आयपीएलच्या उद्घाटनामधे ललित मोदी याची सुरूवात
I welcome you all in Indian Cricket League....

सध्या ललित मोदीचे भाषण ड्राफ्ट करायला घेतल्यवर आयपीएल हे बोल्ड मधे लिहायचा रूल आहे
(आपलाच वेंधळेपणा का म्हणून कायम लिहायचा??? लोकाचा पण लिहावा,,,)

असो. बॉयने आणून ठेवलेला चहाचा कप पाहून झोप उडेल असे वाटले होते. आताच लक्षात आलं.... चहा प्यायला विसरलेय.
अल्पना, तुमचे किस्से येऊ द्यात की जरा. चाफ्फा कुठाय कुनास ठाऊक?

योगिता लगे रहो.
--------------
नंदिनी
--------------

मी एकदा पोर्टीको मधे आईसक्रिम कोन खाल्ल्या नंतर गप्पांच्या नादात कोल्ड्रींक मशिन खाली हात धुतले पेप्सी ने आणी तो मॅनेजर ओरडत आला आणी दोन कोल्ड्रींकचे पैसे घेतले वाजवुन देवा...... जबरी रे.. (मेली हाफिसात मनमोकळं हसायची पण चोरी आहे....सगळे बघत बसतात अचानक काय झालं म्हणुन.. धावत वॉशरुममध्ये जावे लागले)

लिंबु.. खरंच तिथे काहितरी असणार.. मी मेंदुला कितीही ताण दिला तरी मुळ्ळीच आठवायचं नाही... Happy

माझ्या एका कलिगची बायको रिसेप्शनिस्ट कम टेलेफोन ऑपरेटर होती.. ती घरी असताना त्याने कधी घरी फोन केला तर ती फोन उचलल्यावर न चुकता, हॅलो, dcm corporation म्हणायची.. तो अस्सा वैतागायचा....

आणि मी... देवा मला अजुनही लेफ्ट राईटचा गोंधळ होतो. रिक्शावाल्याला सांगते लेफ्ट, मग तो लेफ्ट घ्यायला लागला की एकदम त्याच्यावर ओरडते 'लेफ्ट,लेफ्ट' आणि हाताने मात्र त्याला उजवीकडे दाखवत असते. काही रिक्शावाले समजुन बरोबर राईट ला नेतात, काही मात्र अर्धवट वळून पाहतात, चेह-यावर असे भाव असतात की अगदी वरमुन जायला होत.. Happy

मी गाडी शिकायला लागले तेव्हाही असेच.. इन्स्ट्रक्टर राईट मारा म्हणाला की मी न चुकता लेफ्ट मारलीच...मग त्याला सांगायचे, बाबा मला हाताने दाखव कुठे वळवायची ते, हे लेफ्ट राईट आपल्याला समजत नाही. दररोज वेगळा इन्स्ट्रक्टर असायचा. मग दररोज हे लेफ्ट राईट्चे लफडे... आताही गाडी चालवताना जर रस्ता माहित नसेल आणि कोणी माहितगार बाजुला बसुन रस्ता सांगत असेल तर त्याला आधीच सांगुन ठेवते, दिशा तोंडाने सांगु नकोस, हाताने दाखव..

माझ्या बाबांनी शेविंग क्रिमने दात घासलेत एकदा, आणि वर बाथरुममधुन बाहेर आल्यावर मला विचारतात, कसली टुथपेस्ट आणलीस, एकदम भयानक चव आहे....

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

रिक्शावाल्याला सांगते लेफ्ट, मग तो लेफ्ट घ्यायला लागला की एकदम त्याच्यावर ओरडते 'लेफ्ट,लेफ्ट' आणि हाताने मात्र त्याला उजवीकडे दाखवत असते.>>>>>
माझ्या ताईची आठवण आली, ती नेहमी हा गोंधळ करते.
................................
आज फिर जीनेकी तमन्ना है .....

अ‍ॅशबेबी हा "डाव्या उजव्याचा" गोंधळ बर्याच बायकांचा होतो. त्यातून २ विधान करता येतात, -
१. आम्ही बायका कध्धी डावं - उजवं करत नाही ना, म्हणून ते!
२. जगात बायका कुठेही तेवढ्याच सफाईने गाडी चालवू शकतात - मग ते लेफ्ट हँड ड्राईव्ह असो वा राईट! Proud

लेफ्ट राइट चा गोंधळ मी पण घालते नेहेमी, गॅसवर दुध ठेवुन विसरून जाणे (मग त्याची बासुंदी होणे अन कधी कधी त्या बासुंदीचा कोळसा होणे) हेही नेहेमीचच, तसचं मोबाइल चार्जिंगला लावुन बटन ऑन करायला विसरणे, पाण्याची मोटर बंद करायची विसरणे, फोननी टीव्ही चालु करणे असल्या गोष्टींवर चिडणं बंद केलय आता नवर्‍याने.
चहा करताना चहामध्ये चहा -साखर घातल्यावर कॉफीच्या कपाऐवजी चहाच्याच पातेल्यात २-३ वेळा कॉफी घातलीये मी. आमरसामध्ये ताक पण घातलय दुधाऐवजी.. Happy
१०-१५ दिवसांपुर्वी एका दिवसासाठी गावाला जायचं होतं. बाळ बरोबर आहे म्हणुन मुद्दाम एकाऐवजी २-३ ड्रेस घेतले... फक्त घोळ हा केला की ओढणी अन कुर्ते वेगळ्या ड्रेसचे अन सलवारी वेगळ्याच ड्रेसच्या... Proud
बाकी शेव्हींग क्रिमनं नाही पण माझ्या जावेने अन पुतणीनं एकदा ओडोमॉसनी दात घासले होते.. Proud

दक्षिणा, तू नाही का केला काही वेंधळेपणा अश्यात? तुझे पण खुप किस्से होते न जुन्या माबोवर? अनघा, सखी तुम्ही सोडला की काय वेंधळेपणा? झकासराव, योगेश दामले, च्यायला हे पण भरपुर किस्से टाकायचे की...
वेंधळेपणासारखा तो इब्लिसपणाचा बाफ पन सुरु करा की कोणीतरी.. माझ्याकडे तरी इब्लिसपणाचे काही किस्से नाहीयेत...

गेल्या वर्षी जपान मधे झालेला हा किस्सा..

रक्षाबंधनाच्या निमित्ताने मला बहिणीने भारताहुन राखी पाठवली., पण चुकुन तिने घरी पाठवायची ऐवजी ऑफिस च्या पत्त्यावर पाठवली.. आता ऑफिस च्या सुरक्षा नियमाप्रमाणे ते पार्सल माझ्या जपानी बॉस कडे गेले इन्स्पेक्शन साठी :).. त्याच्यावर फक्त राखी लिहिले होते आणि त्यावरुन त्याला काहीही बोध होत नव्हता..त्याने मला पाकिटात काय आहे हे विचारले, पण तो मला काय ते पाकिट उघडु देइना..

आणि मला भाउ-बहिण, सण, दोरा-गोंडा, रक्षण वैगेरे जपानी शब्द काही केल्या आठवेनात्..मग अचानक माझी ट्युब पेटली..आणि गुगल महाराज कि जय !! असे म्हणुन मी गूगल उघडले आणि तेथे राखी टाइप करुन google images ला क्लिक केले.. Proud

आणि पहतो तो काय, त्याच्या मोठ्या स्क्रीन वर, राखी ऐवजी राखी सावंत चे नको त्या अवस्थेतले फोटोज, आणि रक्षबंधनाऐवजी मिका सिंग च्या बंधनात अडकलेली राखी पुढे आली Lol Lol (एक वेळ राखी गुल्झार परवडली असती..).. मी आणि जपानी बॉस्..दोघेही जाम हादरलो..मला हसावे का रडावे तेच कळेना..आणि बॉस मात्र ते दृश्य त्याच्या चिंचोळ्या डोळ्यात साठवत होता Happy

मग परत रक्षबन्धन असा शोध घेतला आणि योग्य ते फोटोज आले.. Happy

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

भन्नाटच केद्या Lol

काय सही धागा आहे हा Rofl
माझ्या वेंधळेपणाची यादीही प्रचंड आहे,
काही एकदम स्पेशल आहेत
पुणे विद्यापिठात माझ्या गाईडबरोबर प्रोजेक्टच्या कामाला सकाळि ९ ला स्वतःच्या गाडिवर गेलो आणि आपण आपल्या गाडीवर आलो आहोत हेच विसरुन काम झाल्यावर गाईडच्या मागे बसून तिच्या घरी पौडरोडला गेलो.तिथून निघाल्यावरही आपण घरातून गाडीवर आलो होतो हे मला आठवले नाही.तसाच बसने शुक्रवार पेठेतल्या माझ्या फ्लॅटवर आलो तेंव्हा मनात विचार आला की अपार्ट्मेंटच्या पार्किगमधे आपली गाडी का बरे नाही आहे? त्यावेळी रात्रीचे ९ वाजले होते!!
- विंडचिटरच्या खिशात गाडीची किल्लि टाकून तो व्यवस्थित डीकीत टाकणे व नंतर गावभर ती किल्ली शोधणे,
- गाडी कुठे पार्क केली आहे ते विसरुन हवालदिल चेहर्‍याने पार्किंगमधे फिरणे,
- चष्मा शर्टात अडकवून घरभर हुडकणे इ.इ. तर कॉमन गाढवपणे आहेतच.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

सगळयात शेवटी घराबाहेर पडताना दार सताड उघडे टाकुन ऑफिसला जाण्याचा पराक्रम ३-४ वेळा केलाय...:) Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

केदार Proud
................................
आज फिर जीनेकी तमन्ना है .....

केद्या !! Lol Lol Lol Lol

>>>> राखी ऐवजी राखी सावंत
केद्या, जाम हसलो इमॅजिन करुन! Lol
थाम्ब, आता मीच गुगलून बघतो! Proud Wink

मी बघितलं गुगलून . Lol

थाम्ब, आता मीच गुगलून बघतो!
>> लिंबुभाउ.. बघा पण आजुबाजुला कोण नाही याची खात्री करा.. भयनक फोटो येतात हो Proud

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

Pages