मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमण्या Biggrin

मी नविन सेल फोन घेतला होता तेंव्हाची गोष्ट...
टपरी वर सिगरेट ओढत बसलेलो ..... मधेच आईचा फ़ोन .....
मी एकदम घाबरून फ़ोनच फेकला ....
मित्रांची हसून पुरेवाट !!

Python Kid !

Biggrin निळूभाऊ

माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडलेला किस्सा.............
११ वीला कॉलेजला गेल्यावर आधीच मराठी मिडियम चा कॉम्लेक्स असतो. पहिल्या दिवशी मॅम सगळ्यांना विचारत होत्या, माझ्या मैत्रिणीला विचारलं, आर यू फ्रॉम व्हर्नक्युलर मिडियम........त्यावर ती म्हणाली, नो आय अ‍ॅम फ्रॉम मराठी मिडियम Lol असे उत्तर देऊन तिला वाटलं आपण मेजर क्रॅक मारला आहे, पुढे बरेच दिवसांनी कळलं की दोन्हीचा अर्थ एकच आहे.

मंजे, बिच्चारी तुझी मैत्रिण Sad

धमाल किस्से आहेत सगळ्यांचे.. ह.ह.वा.ला. Proud
आता मी.. Happy
लहान असताना आमच्या घरी मागचे दार वाजले की पळत जाऊन पुढचं दार उघडायची, अन हमखास पुढचं वाजलं की मागचेच उघडत असे.. Happy हे ते गावाकडचं घर मी सोडेपर्यंत चालू राहिलं.. (२१ वर्षे)
बहिणीला अजूनही आश्चर्य वाटतं आठवलं की,, तिला वाटायचं की ही मुद्दाम करतेय म्हणून.. Happy
साबुदाणा मी पण पाण्यात भिजत टाकलेला.. साधनासारखे माझे पण नेहेमी होते.. बाहेरच्या खोलीत फ्रीज असल्याने बाहेर येऊन फ्रीज उघडला की एकदम ब्लॅक व्हायला होतं.. कधी कधी नाईलाजाने आत जाऊन परत यावं लागत.. तसचं वर कुणीसं लिहीलय तसं टोमॅटो फोडणीत टाकणं हमखास विसरतं.. Sad

एकदा मी सकाळी उशिरा उठलो (नेहमी सारखा) ... आई बाबा ऑफिस ला गेलेले ... अन्हिक उरकून नाश्ता करावे म्हटले .
freeze मध्ये कसलीशी भाजी ठेवली होती... मी फार चवीने खाल्ली . (तसे मला चवीचे ज्ञान जरा कमीच आहे)
संध्याकाळी आई येउन विचारते की भज्यांचे पीठ कुठे गेले ??
तेंव्हा पासून आई म्हणते की माझी बायको फार सुखी राहिल म्हणुन !

Python Kid !

११वी-१२वी तला किस्सा असेल हा...
आमच्या सातार्‍याजवळ एक कासच पठार आहे.... ४ मित्र जमले की भटकायला जायची हमखास जागा.
एकदा असेच आम्ही ५-६ मित्र आपापल्या लुना, एमेट्या पळवत एका संध्याकाळी कासला गेलो होतो... तुफान वार्‍याचा दिवस होता तो.... तश्यात आमच्यातल्या एका धुराड्याला सिगरेट फुंकायची इच्छा झाली... एक काडी ओढली, दुसरी -तिसरी... पण वारा इतका भन्नाट होता की काही केल्या काडी टिकत नव्हती आणि सिगरेट काही पेटत नव्हती... शेवटी आख्खी काडेपेटी संपली पण सिगरेट काही पेटली नाही... त्या धुराड्याचा चेहरा तर असला बघण्यासारखा झाला होता... आणी त्याला बघुन आमची हसुन्-हसुन मुरकुंडी... अगदी घर येइपर्यंत आमचे हसणं चालुच होते...
घरी आलो तर बाबांच्या ऑफिसमधले एक मित्र सहकुटुंब आले होते... त्यांचा मुलगा नुकताच दहावी झाला होता.... त्याच्या अ‍ॅडमिशनचे चालले होते.... आमचे कॉलेज कसे आहे वगैरे चौकशी करायला ते सगळे आले होते.... त्यांनी सहजच विचारल "काय मग, काय केल कासला जाउन?"
अस्मादिकः "अहो काय सांगु काका, काय भन्नाट वातावरण होत आज! वारा तर इतका होता की काडी पेटता पेटत नव्हती!"
बोलुन गेलो आणि मग लक्षात आल काय बोललो....
नंतर कळल की त्या काकांनी पुढची काहीही चौकशी न करता त्यांच्या मुलाला दुसर्‍या कॉलेजमध्ये घातल म्हणुन!

स्वरूप, तू वाय्.सी.ला होतास काय? Happy
**********************
उडियो ना डरियो
कर मनमानी..

हो मी वाय.सी. लाच होतो!
(आणि त्या काकांच्या मुलाने एल्.बी.एस ला अ‍ॅडमिशन घेतली Proud )

वाटलंच. Proud
**********************
उडियो ना डरियो
कर मनमानी..

माझे वेंधळे वागणे कित्येक वेळा लागलेल्या सवयींमुळेही होते. ऑफिसातील २ब ब्लॉकमध्ये मी ६-७ महिने होते, तिथुन २क मध्ये शिफ्ट झाले. पायांना मात्र २ब मध्येच जायची सवय.. पहिले २-३ आठवडे विचारांच्या नादात किंवा मोबाईलवर बोलत बोलत २ब मध्ये जायचे, तिथे गेले की आठवायचे आपल्याला २क मध्ये जायचेय ते Happy

तसेच घरुन निघाले की ऑफिसला जायचे असले तर सरळ रस्त्याने जाऊन पुढे ठाणे बेलापुर रोड गाठावा लागतो, तेच वाशीला जायचे असेल तर पाऊण रस्ता गेल्यावर डावीकडे वळावे लागते. मी वाशीला जायचे झाले तरी न चुकता गाडी राईटलाच ठेवते आणि मग लेफ्ट टर्न आला की एकदम आठवते की अरे आपल्याला लेफ्ट ला वळायचे आहे, मग मागे बघत बघत गाडी हळुहळू लेफ्टला आणा नाहीतर आहे तिथेच थांबुन बाकीच्या गाड्या जायची वाट पहा आणि मग लेफ्ट घ्या Happy इतर ड्रायवर्स मग बघत बघत जातात, तोंडावर 'बायकांना कोण ड्रायविंग करायला सांगते' असा भाव... मग मी म्हणते की गाडीलाही थेट ठाणे बेलापुर रोड गाठायची सवय झालीय मी तरी काय करु?????

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

आज सकळचाच किस्सा. बँकेत जायच म्हणुन भर भर आवरत होते, पाणि आल म्हणुन पिंप घासुन अ‍ॅक्वा गार्डचा पाईप धुवुन पिंपात पाणि भरल. पुर्ण पिंप भरल्यावर बटण बंद करायला गेले तेव्हा लक्षात आल बटण चालुच नव्हत केल. पुन्हा सगळ पाणि थोड झाडांना, थोड बकेट मधे काढुन पिंप रिकाम केल नी नव्याने भरल

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

जाम मजा आली सगळ्यांचे किस्से एकून.............
आता माझी परिस्थिती बघा...........

होळीचा दिवस्.......मी स्वता:ला ओळखण्याच्या परिस्थितीत नव्हतो, घरी ५ पर्यंत मित्रांची गाण्यांची मैफल बसली होती. बायको आणि पोरगा ६ वाजता घरी आले ( ती मैत्रीणिकडे होती तोपर्यंत ) मग मी म्हणल आता मस्त आंघोळ करतो, मी आंघोळीला गेलो , मन्याने ( माझा लेक) मस्ती मस्तीत बाथरूमची बाहेरून कडी लावली, बायको मला सांगून परत बाजूच्या विंगमध्ये मैत्रिणीकडे गेली मन्याला घेऊन, माझी आंघोळ झाली , पण दरवाजा उघडेना , कारण तो बाहेरून बंद........... मी आत घामाघूम्म, मी त्रस्त..........
बाथरूम ची जाळी मी आधीच पार बंद केली होती , ती उघडायला काही मार्ग नव्हता.
मग मी ओरडायला लागलो, कानोसा घेत होतो की आमच्या बाथरूमच्या बाहेर कोणी आहे का ?
नशिबाने आमच घर तळमजल्याला आहे, बर्‍याच वेळाने एक लहान मुलागा कचाट्यात सापडला, त्याला बाहेर कळेना की आवाज कुठुन येतोय, मग त्याने गुरख्याला बोलावल, मग त्याने माझ्या बायकोला, एव्हाना बरेच लोक माझ्या बाथरूमच्या बाहेर जमा झाले होत, बायको आली , आणि ओरडून मला म्हणाली की अरे दरवाजा उघड मी चावी बरोबर घेतली नाही आहे,
मी ईतका लाल झालो होतो ना रागाने,मी आत घामाने चिंब भिजलो होतो त्यात आता मला बाहेर येता येत नव्हत , आणि हिला आत येता येत नव्हत.
मग समोरच्यांकडे नशिबाने चावी होती त्याने ती आत आली आणि माझी सुटका झाली.

आता माझ्या बहिणिचा किस्सा ऐका........
अशीच ती आणि तिचा मुलगा आदित्य नवर्‍याला बाथरूम मध्ये बंद करून बाहेर गेले, बिचारा " अभिजीत "
तब्बल दोन तास आत होता.......घामाघूम.आता कडी लावणारा आदित्य होता.
ताई आदित्यला शाळेत पोचवून, जिमला जाऊन घरी आली , बाथरूमला जायला कडी उघडली , समोर घामाने चिंब भिजलेला अभिजीत पाहून तिने त्याला विचारल..............हे काय तू अजून ईथेच ?
----------------------------------
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है जिसको छुपा रहे हो.

निळूभाउ....आम्चे बी तुमच्या मातोश्रींना अनुमोदन Wink

स्वरूप- Proud

साधना,विनय Lol

~ प्रकाश ~

मी बरेच वर्षांनी भारतात गेलो होतो. मामेभावाच्या नव्या घरी जाऊन तिथून मग मामांना भेटायला जायचे असे ठरले होते. त्याप्रमाणे कसा बसा विचारत विचारत मामेभावाच्या घरी पोचलो. मग मामांच्या घरी पोचलो. मामांए विचारले, सापडले का याचे घर तुला. मी म्हंटले जरा विचारावे लागले पण एका दारूच्या दुकानात विचारल्यावर त्याने लग्गेच बरोब्बर पत्ता सांगितला!
असे म्हंटल्याबरोबर माझा मामेभाऊ माझ्याकडे रागाने का बघतो आहे, आणी बाकीचे खुसुखुसु का हसताहेत ते जरा एक मिनिटाने लक्षात आले. नशीबाने आम्ही सगळे पन्नाशीच्या पुढे असल्याने गौप्यस्फोट, किंवा कुणाचा महाविद्यालय प्रवेश, लग्न ठरण्यात अडचण इ. प्रकार झाले नाहीत. मामेभावाची सौ. मात्र गप्पच होती!

हा माझ्या मित्राचा किस्सा...

साहेब पिंचिंमधल्या एका कंपनीत नोकरीला होते. संध्याकाळी कंपनीची बस पकडून घरी यायचे... घर अलका टॉकीजच्या जवळ असल्याने तिथे उतरुन चालत घरी जायचे.. संध्याकाळची वेळ... दिवसभर काम करुन आलेला थकवा आणि गार वारा ह्यामुळे गाडीत बर्‍याच वेळेस झोपून यायचे पण रोज कुठल्यातरी कारणानी जाग यायचीच.. पण एक दिवस असे काही गाढ झोपले होते की उठलेच नाहीत.. त्यामुळे तिथे न उतरता तिथून पुढे जाऊन थेट ४ किमीवर असलेल्या स्टॉप वर उतरले... माझं घर तिथे जवळच असल्याने माझ्या घरी आले आणि म्हणाले, "चल रे मला घरी सोडायला."
हा प्रकार त्या प्राण्यानी तीन चार वेळा केला आहे..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

हिम, मग तू त्याला 'हाती घेतलंस' का? :p

--------------------------
छुम छनन बोले, झनक झन बोले

तसे वर काही जणांनी लिहिल्याप्रमाणे दुधाची बासुंदी/कोळसा, साखरेचा पाक्-पाकाचि पुन्हा साखर..तसे नेहमिचेच .
मी SY ला असतानाचा-
एकदा आई घरी नसताना मोठ्या भावाचा एक मित्र आला होता त्याचा उपवास होता.मग भाऊ आनि मि त्याच्यासाठी खिचडी करु लागलो . भाऊ सांगेल तसे मी करत होते आणी तो मधेमधे बाहेरच्या
रुममधे बसलेल्या मित्राशी बोलुन येत होता .तसे तो गेला आणी मि आपली (मि किती सुगरण आहे ते दाखवावे असे वाटुन )साबुदाणे फोडणी करुन परतताना ते चांगले मऊ शिजावे म्हणुन भाजीला वरुन टाकतात तसे खिचडीत ग्लासभर पाणी वरुन ओतले होते Uhoh भाऊ परत किचनमधे आला आणी ते पाहिले तेव्न्हा मला हातच जोडुन जी काहि पुजा केलि कि...बस्स .त्याच्या बाहेर बसलेल्या मित्राला पण कळाले ..मि किती सुगरण Proud ..तो बिचारा घरचे ताजे दही खावुन निघुन गेला.
आणी परवाचा अगदि ताजा..रात्रि जेवण झाले,आणि सगळे किचन आवरुन भांडे डिशवाशर मधे टाकले,सोप ओतला,आणि झोपुन गेलो. सकाळी उठल्यापासुन प्रत्येक भांडे घेताना वाटले कि ,'अरेच्चा! आज भांडे काहि चांगले नाहि निघाले धुवुन्.'..असे मनात म्ह्न्णतच ते पुन्हा नळाखाली धुवुन घ्यायचे असे केले.रात्री पुन्हा डिशवाशर् मधे सगळे आवरुन भांडे ठेवले आणी सोप ओतायला गेले तेव्न्हा आदल्या रात्रीचा सोप तसाच आहे पाहिल्यावर कळाले..अरे देवा !म्हणजे काल डिशवाशर सुरु करायचाच विसरला ..आणि आपण दिवसभर सगळे खरकटे भांडेच वापरतोय Sad
(तरी नशीब भांडे पाण्याने विसळुनच डिशवाशर मधे ठेवले होते ;-))

डिशवॉशर मधली न धुतलेली भांडी घेण्याचा प्रकार आमच्या अहों नी २-३ वेळा केलाय... नंतर कळल्यावर म्हणतो 'तु भांडी घासुन डीशवॉशर मधे लावुन ठेवतेस...मला वाटल ती धुतलेलीच आहेत?' हल्ली लेक आणि नवरोबां मुळे चाईल्ड लॉकच लावायला लागल्येय मी... जे फक्त मलाच माहितीये उघडायचे कसे? Happy

मी तशी वेंधळी नाही पण काल जाम कहर केला....

मागच्या आठवड्यात लेक आणि मी दोघी ही आजारी असल्यामुळे मी बुधवार पासुन घरीच होते. कालच्या सोमवारी सकाळी ९.०० वाजता मिटींग होती...अ‍ॅज युज्वल आपल्याला घाई असली की पोरांना उत येतो. लेक तयार व्ह्यायला टंगळ्-मंगळ करत होती...४-५ दिवस घरी आईजवळ राहिल्याने डे केअर ला जायला कंटाळा करत होती...कसबस तिला तयार करुन निघाले... पण डोक्यात मिटींगचेच विचार्....सुट्टी झाल्याने आधी काही तयारीही करता आली नव्हती...म्हंटल जरा लवकर जाऊन प्रपोजल चेक करु...म्हणुन निघाले की घाईघाईत्...डोक्यात चक्र चालु...लेकीला कार सीट मधे कोंबल्...आणि सोडली गाडी...डोक खयालोंमे....अर्ध्या रस्त्यात जेव्हा लेक 'भुर..भुर' म्हणुन ओरडायला लागली तेव्हा लक्षात आल...लेक अजुन मागेच.. तिच्या डे केअर च्या वळणावर वळायच्या ऐवजी मी सरळ हापिस च्या रस्त्याला लागलेली... बर माझ्या हुश्शार लेकीच्या लक्षात आल की आपला रोजचा रस्ता नाही आणि आई आपल्याला आज पण डे केअरला न सोडता फिरायला नेणार आहे... Happy आता परत फिरायच तर पुढच्या वळणावर...आणि सकाळच्या ट्रॅफिक मधे अजुन १०-१५ मिनीटांची निश्चिंती....शेवटी तिला सोडल आणि हापिसाच्या रस्त्याला लागले....

नाही संपल नाही अजुन...

हापिसात ९ ला ५ मिनीटे असताना पोचले. यंत्र चालु करायला वेळ नव्हता...फाईल वाचायला म्हणुन हातात घेतली तेव्हढ्यात रिसेप्शन वरुन फोन की क्लायंट आलेत मिटींग साठी....मग काय निघाले हातात फाइल घेऊन..म्हंटल बघु काय होतय ते नाहीतर नंतर अ‍ॅडिशनल अ‍ॅड्व्हाईस देऊ.. हाय हॅल्लो झाले आणि क्लायंट ने प्रपोजल ची त्याची फाईल उघडली...मी माझी आणि.. हाय रे दैवा...त्याची ड्राँईंग्स एका घराची आणि माझी ३ मजली ऑफिस बिल्डींगच्या प्रपोजलची....मी दुपारच्या मिटींगची फाईल घेउन गेले होते... Uhoh

पुर्वी सानिकाला पाळणाघरात ठेवायचे तेव्हा आमच्या दोघांपैकी एक जण तिला शाळेत सोडायचा आणि एक जण पाळणाघरात तिची बॅग ठेवायचा. बर्‍याच वेळा ट्रेन पकडायच्या धुंदीत मी तिची बॅग घेऊन रेल्वेचा ब्रीज चढलेय. मग लक्षात आल्यावर खाली उतरुन त्यांना देऊन आलेय. नशीब पाळणाघर जवळ होत स्टेशनच्या. पाळणाघर एक्स्टेंडेड रेल्वे ब्रीज च्या एका टोकाला आणि घर दुसर्‍या टोकाला म्हणजे मला खरतर फक्त ब्रिज घालुन जायला लागायच पण तंद्रीत मी एक साईडने ब्रीज चढून जायचे मग लक्षात यायच बॅग राहीली द्यायची मग समोरच्या बाजुने पुन्हा खाली उतरायचे बॅग द्यायला Proud

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

कवे,
धन्य आहे तुझी.

नवरा आणि मुलगा घरात असतांना दार ओढून घेऊन बाहेरुन कडी घालून निघाले, स्टेशन वर गेल्यावर नवर्याचा फोन ... नशिब वॉचमन जागेवर होता.

सुरभी भांडली होतीस का ग नवरोबांशी? Proud

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

एकदा लेकीला क्लास ला सोडायला चालत गेले, दर वेळेस जाताना २ व्हीलरवरुन सिग्नला वळसा घालुन जातो, चालत जाताना ही सवयी प्रमाणे पुर्ण सिग्नल ला जाउन वळसा घालुन मग क्लास्च्या रस्त्याला, लेक म्हणत होती आई काय झाल रस्ता क्रॉस करायला घाबरलीस का ? शॉपींग मॉल मधे गेलो होतो , मी आणि लेक वर्च्य मजल्या वर पुस्तक बघत होतो, मी वर याय्च्या एस्केलेटर वरुन खाली जायला निघाले तंद्रीत , लेक ओरडली जोरात, अग तो फक्त चढण्याचा जीना आहे म्हणुन, दुसरी कडुन उतरायचा.

कवे कठिण आहेस तु!

स्मिता Lol

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

मी शॅम्पू आणि कंडिशनर ऐवजी दोनदा कंडीशनरच लावलं...

>>>
असे होऊ नये म्हणून शहाण्यालोकानी शहाण्या लोकांसाठी शाम्पू +कन्डिशनर असा एकत्र फॉर्म्युला निर्मान केला आहे. तो वापरावा. त्यामुळे शाम्पूचेही काम होत नाही आणि कन्डिशनरचेही
Proud

मी असंख्य वेळा पॅन्टची बटणे न लावता महत्वाच्या ठिकाणी गेलेलो आहे. तुमचा काय अनुभव. ? खोटे बोलू नका. लक्षात आल्यावर कोठे कोठे गेलो होतो , कोणाला भेटलो याची जंत्री विनाकारण आठवावी लागते महाराजा....

मी रोज सकाळी नाष्टा ऑफिसमधे आल्यावर करते. मागे कधीतरी एकदा डिस्पोझेबल बाउल्स आणुन ठेवले होते. ते संपल्यावर (आणायचे लक्षात रहात नाही) मग इथे पाण्यासाठी जे डिस्पोझेबल ग्लास आहेत त्यात सिरिअल खाते. आज एका मीटिंगसाठी बॉसबरोबर जायचे होते. जायच्या आधी पाणी प्यावे म्हणुन घाईत एक ग्लास उचलाला आणि नेमकाच सिरिअल्स असलेला ग्लास नाका/तोंडावर रिकामा केला Sad एक बरे की मी कोरडेच खाते, दूध घालुन खात नाही.

Pages