मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खत्तरनाक... गिरीष Rofl

दाद Lol

हा माझ्या लग्नाच्या आधीचा किस्सा.
समोरच्या लिस्ट मध्ये असलेल्या 'स्थळांपैकी' योग्य वाटणार्‍या एका स्थळाला फोन लावला. स्थळ एका आंतरराष्ट्रीय बँकेत मॅनेजर पदावर होते. फाड फाड मिंग्लिश बोलत होते. मी पुन्हा एकदा तिचे आडनाव हळूच तपासून घेतले... स्थळ महाराष्ट्रीयनच आहे ना हे बघण्याकरता.
सुरुवातीच्या दहा पंधरा मिनिटं गप्पा झाल्यावर अचानक स्थळ म्हणाले 'Mr. Kiran, I have to leave the office now. I am already late. Please give me your contact number so that I can contact you once I reach home.'
अस्मादिक संभाषणात इतके रंगले होते... मी पटकन माझा नंबर म्हणून समोरच्या लिस्टवरचा तिचाच नंबर सरळ तिला सांगीतला. तिने सगळा नंबर लिहून घेतल्यानंतर.. "Mr. Kiran, I think this is my number."
आणि मग आम्ही भानावर आलो. काय घडलय हे लक्षात आलं.
"Oh! you cought me" वगैरे वगैरे कसेनुसे विनोद करत वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला.

"Oh! you cought me" :p

आज सकाळीच ताजा वेंधळेपणा.
काल रात्री केसांना भरपूर तेल चोपडून ठेवलं होतं आज केस धुवायचे म्हणून.
केस धुताना शॅम्पू लावला. फेस का नाही आला असा विचार आला मनात. पण तरी शॅम्पू धुऊन काढला आणि कंडीशनर लावलं. ते धुतल्यावर केस अपरिमित चिकट झालेले. तेल तस्संच्या तस्सं...
अंघोळीहून बाहेर आल्यावर बघितलं तर शॅम्पूची बाटली अजून बॅगेतच होती. मग नीट पाह्यल्यावर लक्षात आलं की मी शॅम्पू आणि कंडिशनर ऐवजी दोनदा कंडीशनरच लावलं...
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

दाद Lol Lol

कंपनी मध्ये सगळीकडे अ‍ॅक्सेस कार्ड वापरण्याच्या सवयीमुळे मी बर्याचदा घराचे मेन डोअर कार्ड वापरून उघडण्याचा प्रयत्न केला आहे....आणी एकदा काहर म्हणजे ... बीग बाझार मघ्ये टॉयलेटचे दार ......

राहुल Lol सेम पिंच... मी ऑफिसातल्या.. Rofl

आयला, आज तर डोक भन्जाळलय!
अतिशय महत्वाची मेल, तयार केली, अ‍ॅटॅचमेण्ट्स लावल्या, खडूस बॉसला सीसी मार्क केली, अन दिली पाठवून
सबजेक्ट न लिहिताच! Sad
आता ठणाणा करेल, उलट टपाली मेल मधून!

दाद, गिरीश, किरु Rofl

मी एकदा एफ.वाय.च्या परिक्षेत उत्तरपत्रिकेवर माझा स्वतःचा रोल नं. टाकायच्याऐवजी माझ्या पार्टनरचा टाकला होता. Lol पार्टनर मागच्याच बेंचवर बसली होती. लागोपाठ दोन ४७५३ असे नं. बघून एक्झामिनर येडा झाला....

~~~
हम 'मत'वाले...

>>>>> पार्टनर मागच्याच बेंचवर बसली होती. लागोपाठ दोन ४७५३ असे नं. बघून एक्झामिनर येडा झाला
हो ना, आणि नन्तर ४७५२ (किन्वा ४७५४) या रोलनम्बरला मिळालेला भोपळा बघुन तेव्हापासून तूझ................. (हे अस झाल का?) Proud Light 1

जुन्या हितगुजवर पण लिहिलं होतं आताही लिहिते.
कुणी कधी आपली गाडी विसरून रिक्षाने घरी आलंय का?
मी एकदा लॉ कॉलेज रोडवर कृष्णा हॉटेलच्या इथे कायनेटीक लावली. रात्री आम्हि दोघं घरी रिक्षाने आलो. सकाळी बाबा विचारायला लागले की कायनेटीक कुठेय तेव्हा उजेड पडला.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नीधपे, पूर्वीही लिहिलं होतं आताही लिहितो परत
तेव्हा आम्हास मन्डईपासच्या रामेश्वर चौकातील पानाच्या ठेल्यावर रात्री जाऊन कलकत्ता एकसोबीसतिनसो किवाम खुशबु कतरी सुपारी घातलेले पान हाणायची सवय होती
एरवी पायी पायी जाऊन यायचो
त्या दिवशी सायकलने गेलो, पानाच्या ठेल्यासमोर सायकल उभी केली, लगेच पान घ्यायचे म्हणून कुलुप देखिल लावले नव्हते, पान घेतले, मस्तपैकी तोबरा भरुन, चघळत चघळत रमत गमत पायी पायी घरी आलो
दुसर्‍या दिवशी सकाळी सव्वासहाची लोकल पकडायची तर आवरुन खाली आलो जिने उतरुन, सायकल बघतो, तर कुठे जागेवर? इकडे तिकडे धावपळ केल्यावर थोरल्या भावाला आठवले.
म्हणाला काल पान आणायला (खर तर गिळायला अस म्हणला तो) गेला होतास ना?
मग माझी ट्युबलाईट पेटली, अक्षरशः धावत पळत रामेश्वर चौकात गेलो!
बन्द पानाच्या ठेल्याच्या दरवाजास माझी सायकल तशीच कुलुप उघड्या अवस्थेत लावुन ठेवलेली होती!
त्याच सन्ध्याकाळी पुन्हा त्या ठेल्यावर गेल्यावर, नेहेमीचे "गिर्‍हाई़क" म्हणुन ठेलेवाला म्हणाला, काय राव? सायकल इथेच लावुन गेला की, येवढी कसली गडबड होती?????????????
आता "रामेश्वर चौकातील" त्या पानवाल्याला मी काय बोलणार बापडा!
पण, खरच, विसरुनच गेलो होतो, हे मात्र त्याला सान्गितलेच!

बहुतेक वेळा मी हा वेंधळेपणा केलेला आहे.
ऑफिसमधे .... बॉसला मेल पाटवताना मी नेहमी attachment विसरते & खाली लिहिते कि "please find attached file". बॉस नेहमी return mail करतो कि रेश्मा , where is attachment ?
मग मी अगदि हसत सॉरि लिहिते & मग attachment पाटवते .

हे मी पण नेहमी करते

----------------------
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे

मी साधारण दहावीत असताना चि गोश्ट आहे , घरी अचानक पाहुने आले म्हनुन आइने बाजारात नारळ आणायला पाठ्वले , घाइत ड्रेस बदलुन निघाले.नारळ घेवुन परतत असताना लाक्शात आल कि मी उल्टा ड्रेस घातला आहे. मग काय प्रत्येक येनारा जाणारा मलाच बघ्तोय अस वाटायला लागल & जी धुम ठोकलि घराकडे.......

एकदा माझ्या मैत्रिणिने सांगितलेला एक किस्सा आहे हा.
लहानपणी आपल्या सगळ्यांचेच आई वडिल सहज अस म्हणतात ना की जेवण संपवळ नाही तर गळ्यात बांधेन.
ते माझ्या या मैत्रिणिने एकालेल , तीही लहानच होती तशी & तिला लहान बहीण होती .
त्यामुळे आई वडिलांनी जाताना तू हिला सांभाळ वग्ैरे सांगितलेले त्यामुळे हिने हुरूपाने बहिणीला भरवायला घेतले
& तिने ते सगळे संपवले नाही म्हणून उरलेले सगळे एका पिशवित भरून खरच तिच्या गळ्यात बांधले ते सगळे घरी येईपर्यंत तसेच ठेवले सुद्धा तिला ओरडून.
आई घरी आल्यावर मग तिला जो काही मार बसलाय म्हणता.

>>>जी धुम ठोकलि घराकडे.......
धुम ठोकताना डोळ्यासमोर आलात Lol

<<मी शॅम्पू आणि कंडिशनर ऐवजी दोनदा कंडीशनरच लावलं...>>
भारतात जर शांपू नि कंडिशनर एकत्र असलेली बाटली मिळत असेल तर त्यांच्या जाहीरातीसाठी ही गोष्ट चांगली आहे! नि ती ' दाखवली' टीव्ही वर तर सगळे पुरुष लगेच जाऊन घेऊन येतील.

साजिराची जाहिरात कं आहे, त्याला विका ही कल्पना!

माझा आजचा वेंधळेपणा....
ऑफीसमध्ये असताना फोन करयला रिसीव्हर उचलला आणि समोरच्या कंप्युटर कि-बोर्ड वर नंबर डायल केला....

आज ऑफिसमधें(जर्मनीत) झालेला हा किस्सा.. Happy
माझ्या शेजारच्या एका डेस्कवर जर्मन डिझायनर आहे...दुसर्‍या बाजुला एक तुर्की आहे....आणि पाठीमागे एक इराणी ....त्यामुळे पुर्ण कॅबिनेटमधे नेहमीच कमालिची शांतता असते !

आज सकाळी बॉस्(हा इंग्लीशमन आहे!) राउंडवर आला...माझ्याशी थोडा वेळ डिझाइनबद्दल चर्चा केली इंग्रजीमधुन्(तो जाम खूष असतो कुणी इंग्रजी बोलायला मिळाल्यावर!)......मग शेजारच्या जर्मनकडे वळला.....२-३ मिनीटे त्यच्याशी बोलल्यावर त्याच्या लक्षात आले(त्याचा भंजाळलेला चेहरा पाहुन!) आपण इंग्रजीमधुन बोलतोय्...मग पुढचे ते दोघे काय बोलले ते मला कळाले नाही Uhoh

परत तो माझ्याजवळ आला..आणि सांगु लागला कि,त्याची ह्या भिन्नभाषिक स्टाफमुळे कशी डोकेदुखी होतेय ते !मी त्याला म्हणलं भारतात जवळपास १८ भाषा आहेत....आणि त्यात जवळपास प्रत्येक शिकलेल्या माणसाला सरासरी ३ भाषा तर येतातच......काहींना तर ८-१० भाषा पण येतात ...वगैरे वगैरे ....बरेच तारे तोडले!

मग तेवढ्यात अमित आला(माझा भारतीय सहकारी).........व्हाट्सप?.....चल कॉफी मारके आते है.....कॉफी प्यायला गेलो पँट्रीमधे....तेवढ्यात घरून फोन आला....फोनवर बोललो.... आणि अमितला मॅल्कमचा किस्सा सांगीतला......२-३ मिनिटांनी तो छताला चिकटलेला पाहुन लक्षात आले...कि मी या हरियाणी जाटाशी मराठीत बोलतोय ! Sad हाय रे दैवा !

घर shift करुन एक महीन्यानंतर काल जुन्या घरी जाणारी बस पकडली. Happy (माणुस हा सवयीचा गुलाम आहे)

राहुल, सतिश, प्रकाश Rofl

~~~
हम 'मत'वाले...

Lol कमाल लोक आहेत...
सतिश, घर बदलून एक महीना झाला तरी ही अवस्था? Lol

सतीश :d

Lol राहूल, सतिश

Lol राहुल, प्रकाश ,सतिश

हा माझ्य बाबांच्या बाबतीत झालेली फजिती.

एकदा आमच्या घरातील तेल (पॅरशुटचे) संपले होते.. मग सकाळी बाबांनी आरडा ओरडा सुरु केला, संपल होत तर रात्रीच आणून ठेवायला काय झाले होते.. मग मी बाबांना शांतपणे सांगितले, बाबा माझ्य ड्रेसिंग टेबल बर आहे हेअर अ‍ॅड केअर ची बाटली, ते लावा तातपुरते मग दुपारी मी आणून ठेवेल निवांत तेल. बाबा गेले मग शांतपणे तेल लावण्यासाठी माझ्या रुम मधे.

आणि परत आरडा ओरडा, जाऊन बघते तर काय बाबांच्या डोक्याला फेस?? तर बाबा परत सुरु कसल ते तेल काय माहीती. मी विचारले तर बाबांनी मला बाटली दाखवली, अरे बाबा तुम्ही तर माझे फेस वॉश लावले डोक्याला.. आता परत धूवा केस.. असा कय मग ओरडा खाल्ला होत मग.. Sad

०------------------------------------------०
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

>> जुन्या घरी जाणारी बस पकडली
जुन्या घराशेजारी काही अ‍ॅट्रॅक्शन असल्याचा मला संशय येतोय.

माझी खात्री आहे Proud

Pages