Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केदार
केदार
डोळ्यासमोर आले तू व तुझा बॉस. बॉसला नंतर लाळेरे दिलेस की नाही?
लहानपणी
लहानपणी केलेला वेंधळेपणा कम शहाणपणा...
घरी गणपतीचे मखर बनवत होते सगळे. मी बर्यापैकी लहान होते. घरी कुत्रा होता तेव्हा. त्याच्या पुढ्यात मी खाऊ म्हणून थर्मोकोलचे तुकडे टाकले होते. त्याने वास घेतल्याबरोबर त्याच्या नाकाला चिकटले ते.मी पण नाकाला लावुन बघितले. चिकटेनाच अज्जिबात. म्हणून नाकात अगदी वरपर्यंत टाकले, तरी खाली पडले. म्हणुन पेन्सिलने वर सरकवुन टाकले. आणि नंतर श्वास घेताना त्रास व्हायला लागला.
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...
केपी अरे
केपी

अरे माझी तिथे वाट लागलेली....आणि आयुष्यात पहिल्यांदा कुणा जपानी माणसाला एवढे मोठे डोळे केल्याचे पहात होतो..

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...
केदार
केदार
:हहगलो:,
फक्त घोळ हा केला की ओढणी अन कुर्ते वेगळ्या ड्रेसचे अन सलवारी वेगळ्याच ड्रेसच्या... >>>>
अल्पना ग्रेट्च आहेस
*******************************************
बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते,व्याकुळ होते,तीळ तीळ तुटते,खोल कुठे गलबलते
केदार
केदार
--------------
नंदिनी
--------------
केद्या
केद्या गूगलून पाहिले
अजुन एक ....
अजुन एक .... काल D-Mart मध्ये खरेदी केली आणि सामान घेऊन रिक्षामध्ये बसलो. अर्धे अंतर गेल्यावर लक्षात आले की माझी office sack मी तिथेच विसरुन आलो. परत रिक्षा वळवावी लागली. खरेदी करुन जेव्हढी बचत झाली त्याच्या पेक्षा जास्त पैसे रिक्षाला गेले.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
Google ने
Google ने माझीही एकदा फजिती केली. Bossला Presentation मेध्ये Crane चे चित्र हवे होते. मी Google सर्च केले तर crane bird (बगळा) चे चित्र आले.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
आईशप्पथ
आईशप्पथ काय ग्रेट वेन्धळे आहात तुम्ही सगळे!!!!
तांदुळ आणि उडीदाच्या डाळीची खिचडी केली आहे का कुणी?
साबुदाणा डोशाचे तांदुळ भिजवतात तसे पातेलेभर पाण्यात भिजवले आहेत.
नवर्याचा एक: घरातुन कॉलेजला निघताना ट्रॅशबॅग कोपर्यावरच्या बीनमध्ये टाकायच्या ऐवजी (एक हातात लॅपटॉप आणि एका हातात ट्रॅशबॅग ) कॉलेजपर्यन्त घेउन गेला
भावाचा एकः तेल आणायला जाताना बरणी घरी विसरुन जाणे
मामाचा एकः स्टेशनरी दुकानात जाउन विचारतो, साखर काय भाव दिली??
केदार...!
केदार...!
केदार,
केदार, राखीवाला किस्सा भन्नाट आहे.
मी एक वेंधळेपणा आज सकाळीच केला. इशानला पाळणाघरात दिवसभरासाठी जो काही खाऊ/डबा देते त्यात कधी कधी केळं देते. डब्यावर लिहुन द्यावे लागते त्यातला खाऊ कुठल्या वेळेला द्यायचा.
एरवी ISHAN- SNACK असे लिहिते आज केळ्यावर लिहिले- Ishaan - Banana
काल आईने
काल आईने पिशवी मागितली. तिच्या हातात टिव्हीचा रिमोट दिला...अश्शी वैतागली ना..
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...
केदार!
केदार! किस्सा महान आहे!
केदार आज
केदार
आज सकाळी मी दोन्ही लेन्सेस एकाच डोळ्यात घातल्या आणि मग दुसरी लेन्स केसमध्ये नाही म्हणून शोधत बसले. २ मिनीटांनी मला लेन्स घातलेल्या डोळ्याने विचित्र दिसायला लागलं, मला वाटलं त्या डोळ्यातली लेन्स सरकली. म्हणून आरश्यासमोर उभी राहून डोळा अंधुकश्या नजरेने तपासला तेव्हा उलगडा झाला...
केदार, मी
केदार, मी ऑफिसमधे सगळ्याना हसवलं या किश्श्याने.
लेंस
लेंस घालायची म्ह्टली की हे असेच घोळ होतात.. कधी एकाच डोळ्यात दोन्ही लेंस, कधी घाईघाईत मिरचीच्या हाताने लेंस घालणं, कधी चश्मा घालुन लेम्स घालणं...त्यात मध्येच कधीतरी लेंस कुठेतरी पडते मग नविन विकत आणा... कंटाळुन लेंस बंदच केल्या..आता सरळ चश्माच घालते..त्यातही एकदा चश्मा काढला कि कुठे ठेवला होता तेच कधी आठवत नाही..मग घरभर शोधणं आलंच..
राखी सावंत
राखी सावंत १ नं.
केद्या
जुन्या हापिसातला किस्सा...
ऑफिस जुने असल्यामुळे त्या काळी साईड ड्रॉवरवाले जुने लोखंडी टेबल (डेस्क) असतं आणि त्या खाली डसबिन... बॉसला माणिकचंद खाऊन पायाखालील डसबिन मधे थुंकायची घाणेरडी सवय होती. एके दिवशी दुपारच्या जेवणानंतर माणिकचंदचे रवंथ चालू होते... मला त्याच्या ड्रॉवरमधील एक फाईल हवी होती म्हणून मी त्याला न विचारताच ड्रॉवर उघडून फाईल काढली आणि हा भाई सवई प्रमाणे खाली वाकून त्यात थुंकला...
याक!
याक! घाणेरडा बॉस आहे!
रंगोट्या
रंगोट्या केल्या असतील ना फाईलवर???
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...
शी!! हे असं
शी!! हे असं ऑफिसात थुंकणार्यांचा मला भयंकर तिटकारा आहे.
बाकी इन्द्रा, तुझं जुनं ऑफिस जुनंच होतं???? सह्ही...
आज सकाळचाच
आज सकाळचाच पराक्रम- गाडीच्या किल्लीसकट पँट धुवायला टाकली, सकाळि घर पालथे घातल्यावर साबणाच्या पाण्यातून हात बुचकाळत शोधून काढली
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
अजुन एक
अजुन एक नविन ,अॅक्वागार्ड लावल होत, मधेच लाईट गेले ,पाणी बंद झाल ,बटण बंद करायचे विसरले, बिन्धास्त बाहेर पडलो , आल्यावर किचन मधे मस्त तळ झाल होत.
नवीन फॉरमल
नवीन फॉरमल शूज घेतलेले. सकाळी ६:३० ची बस पकडायची घाई आणि त्यातच नवीन शूज घालायची भारी हौस. बस, ट्रेन, शटल पकडून मी आरामात लिफ्टच्या दारात उभी. तेवढ्यात शेजारी असलेला माणूस म्हणे - 'you forgot to take out price tag on your shoe'...
price tag मस्त शूज च्या हिल वर विराजमान होता.... आणि मी दिड तास तसाच प्रवास करून ऑफिस मधे पोहचलेले.
राखी सावंत
राखी सावंत

सुप्रभात, हे असच प्राइस टॅगबद्दल आम्ही आमच्या कलीगला सांगितले होते ख्रिसमच्या पार्टीत सगळ्यांबरोबर तिचे नाचुन झाल्यावर
राखीचा
राखीचा किस्सा.....
फारच भारी...
हा किस्सा खरंतर 'एक धागा किश्श्यांचा' वर योग्य वाटला असता..
राखी
राखी सावंतचा किस्सा फारच मजेशीर आहे. माझाही एक.
मी पहिल्यांदाच भारतातून अमेरिकेत येताना फ्रँकफर्ट विमानतळावर उतरलो. तिथे डेल्टाचे पुढचे विमान कुठे आहे ते बघून तिथेच आजुबाजुला मिळेल त्या जागेवर बसलो होतो. जरावेळानी तहान लागली म्हणून पाणी कुठे मिळते आहे का बघायला उठलो. थोडे चालत पुढे गेल्यावर एका ठिकाणी पाण्याची सोय दिसली, म्हणजे लोखंडी पेटीवजा गोष्ट भिंतीला लावलेली दिसली. पण पाणी येते कसे त्यातून हे कुठे कळतय. एक दोन मिनीट प्रयत्न करून बघितले, पण कुठे काही दिसेन की जे दाबल्यावर पाणी येईल. जाऊ दे - म्हणून समोरच्या खुर्चीवरबसून राहिलो. जरा वेळानी एक लहान मुलगा आला पाणी प्यायला. तो आल्यावर आपोआप पाणी आले त्या नळातून. मी गार. मला वाटले इथे कुठेतरी विशिष्ट जागी उभे राहिल्यावर येते बहुतेक पाणी. मी परत त्या पेटी समोर जाऊन उभा. जरा पुढे - जरा मागे करत. पण पाणी काही आलेच नाही, लोकं मात्र बघायला लागली हा असं काय करतोय म्हणून. परत जरा नीट पाहणी केली तर पेटीच्या डाव्या बाजूला खालती एक कळ दिसली. ते दाबून बघितल्यावर मात्र पाणी आले. फारच आनंद झाला पण तो पाण्याच्या पहिल्याच घोटाला विरला, आणि दातातून कळ निघाली, येवढे ते पाणी गार होते. मी आत्ता पर्यंत खूप वेळा गेलो आहे फ्रँकफर्ट विमानतळावरून पण परत काही मला तिथे पाण्याची सोय दिसली नाही.
केदार हा
केदार
हा अगदी ताजा.. हाsss आत्ताचाच.
एक s/w अॅप्लिकेशन मधे डेव्हलपरने असा छान गोंधळ घातलाय की, नुस्तं त्याच्या विन्डो बंद करायच्या फुल्लीवर माऊस नेला तरी ते शहाणं आपणहून बंद होतय. इतका शहाणपणा बरा नाही.
म्हणून त्याचा एक व्ह्यू मी त्याला पाठवण्यासाठी कॅप्चर केला आणि पेंटमधे डकवला. त्यातला हवा होता तो भाग कॉपी-बिपी करून एमेलने पाठवला. शिवाय जरा जोरदार भाषा वापरली. "क्क्यॅय च्चाल्लय क्क्यॅय? अॅ?" असली. त्याच्या मॅनेजरचा लगेच फोन... "मी स्वतः लक्षं घालतो" वगैरे.
आणि आता ते अॅप्लिकेशन जाम म्हणजे जाम बंद होईना. माझी हवा टाईट... माझ्या शेजारच्याला बोलावून टिचकायला सांगितलं. तरी ढिम्मं नाही.
मग त्याने त्याच्या पीसीवर ते सगळं करून बघितलं. त्याच्या तिथून लगेच पळतय...
टास्क मॅनेजर उघडला... त्यात ते अॅप्लिकेशन दिसेचना... इथे समोर सरळ सरळ अॅप्लिकेशन दिसतय....
आईशप्पथ... म्हटलं पीसी मधे भुताटकी... तो पण म्हणाला, कायतरी जबरा गोंधळ आहे... हे असलं त्याने कधीच बघितलं नाहीये... आम्ही आपापल्या तोंडात आपापली बोटं घालून बघतोय... काय केलं तर हे भूत घालवता येईल....
दोनेक मिनिटांत माझ्याच लक्षात आलं की मी, पेंट मधल्या त्या व्ह्यू ला बंद करायचा प्रयत्नं करीत होते..... त्याला सांगताना मला हसू आवरत नव्हतं...
तो वैतागला होता... "तू ना,..... डेंजरस आहेस" असं त्याचं मत त्याने ह्यावेळी मोठ्याने बोलून दाखवलं.
दाद हा घोळ
दाद हा घोळ तर मी नेहमीच घालतो. म्हणजे चेस मधे जिंकलो ( जे केवळ सठीसामाशीच होते ) कि त्याचा स्क्रीनशॉट घेतो. आणि मग त्या स्क्रीनशॉटवरच दुसरा गेम खेळायला जातो.
दाद
दाद
अगदि
अगदि पहीलिपासुन सायकल...... डिपलोमा केला..नोकरी धरली... सायकल होतीच ससोबतिला....एके दिवशी सायंकाळी....सायकल कुठे दिसेना....शोधाशोध केली..पण काय हो ...सायकल चक्क गायब !.....कुथे असेल ?...घाबरा-घाबरा घरी आलो. आणि पाह्तो तर काय सायकल घरीच !
हायसं वाट्लं....अरे पण मी ऑफीसला कसा गेलेलो ?
दारावर गोंधळ्लेल्या अवथ्सेत पाहुन आई म्हनाली.....अरे .....नविन गाडी घेतलिस ना ? कुठे आहे ती ?....
Pages