(डिस्क्लेमरः हा एक ओळीचा वृत्तांत खास पर्यासाठी. पर्या तू फक्त येव्हढच वाच. रविवारी पिव्हीआरला जमलो. धम्माल केली :))
दक्स चा वृत्तांत वाचलात ना? मुलुंड चा पण गटग तसाच झाला, फक्त १२ च्या ऐवजी ३- ३.५ तास आणि कोरम जरा कमी होता इतकच बाकी भावना शेम टु शेम
पर्या मुंबईत येणार म्हणाला म्हणुन अगदी आयत्या वेळेला ठरवलेला गटग, आधी मलाच खात्री नव्हती होत, खरच जमणार सगळे की मी एकटीच भोज्जाला हात लावुन येणार ते. एकतर हा माझा पहीलाच गटग त्यात परत विनयने मलाच कार्यवाह करुन घोड्यावर चढवलेल म्हणजे एकटीच का होईना पण जाण भागच होतं.
सगळ्यांना फोना फोनी करुन मुलुंड च पिव्हीआर मॉल निश्चीत केलं. आधी ठाण्याच गडकरी ठरत होत ते लली आणि यो च्या सांगण्या वरुन पिव्हीआर वर ठरवलं. मी, विनय, पर्या पहिल्यांदाच मॉलच (आणि एकमेकांच पण) तोंड बघणार होतो.
पर्याने नवर्याला नी लेकीला घेउन ये अशी प्रेमळ धमकी दिली होती म्हणून नवरोबांना शुक्रवार पासुनच सांगुन ठेवल होत. तरी परत शनिवारी त्याची (म्हणजे नवरोबाची) भुण भुण चालु होती. सगळ्यांना फोन करुन विचार बघ कॅन्सल तर नाही ना झालं? नाहीतर फोन करुन डोंबिवलीलाच बोलाव आपल्या घरी. त्याला चिंता एकतर मेगा ब्लॉक, त्यात मी त्याची सानु सकट वरात काढणार, बरं भेटणारे सगळ्यांना प्रथमच बघणार. मग बोलायच काय? ह्या सगळ्या भुणभुणीला कानाआड करुन (म्हणजे नेहमी प्रमाणेच) मी जायचच हे डिक्लेअर केलं. मग त्याचाही नाईलाज झाला असावा (गुणी नवर्या प्रमाणे तोही तय्यार झाला)
रविवारी सकाळी यो चा समस आला, "सॉरी, नाही जमु शकणार" . माझा चेहरा बघुन नवर्याने विचारलच "काय ग कॅन्सल का?" ते तसच उडवुन मी बाकीच्यांना समस केले. म्हंटल बघु कोण नक्की येतय ते तरी. विनय, पर्या ने लग्गेच "नक्की येतोय" म्हणुन समस केले. लली ने पण यो पाठोपाठ "सॉरी कळवल", विशाल ने फोन केला दुपारी १.५ ची फ्लाईट आहे ३.५ ला मुंबई तिथुन घरी. थोड उशीरा येईन.
पण चला येईन तर म्हंटल म्हणून मी खुश. म्हंटल मी धरुन ४ मेंबर तर नक्की झाले. आशु आणि मंजु डी आशु ची मिटींग लवकर संपली तर येणार होत्या म्हणजे धड ना ह्या दगडा वर धड ना त्या. म्हणजे नक्की येणारा कोरम ४ जणांचा. मी मग घरुन जरा उन्ह उतरल्यावर निघायच ठरवल. विचार केला जर सगळेच टांगारु झाले तर सानुला तिथे फिरवुन एका नातेवाईकांकडे जाऊन घरी परतायच.
नशिबाने ट्रेन ने फारसा धोका न देता मुलुंडला वेळेत पोहोचवलं. आणि आम्ही तिघे वेळेच्या आधिच पिव्हीआरला पोहोचलो. कट्टा मालक विनयचा ५ मि. फोन आला, येतोच आहे म्हणुन आणि काय आश्चर्य खरच ५ मि. तो आमच्या समोर आला पण. पर्या पण ५.४५ पर्यंत आला. मग आमचा थंड जागा शोधण्याचा कार्यक्रम करुन झाला नी आम्ही सिसिडीत जाऊन बसलो.
कट्टा मालक म्हणजे मला जरा ३५-४० च्या दरम्यानचा आडव्या बांध्याचा माणुस वाटला होता (म्हणजे आमच्या इथे एक विनय वेलणकर म्हणून वैद्य आहेत त्यांच्या सारखा हा विनय असणार अस वाटल होत) प्रत्यक्षात मात्र अपेक्षाभंग झाला. दिसण्यात अपेक्षाभंग झाला असला तरी बाकी बाबतीत नाही झाला. एकदम दिलदार माणुस (मालक तुम्ही दिलेल्या कॉफीला जागले बर का ;))
पर्या ला जसा इमॅजीन केला होता तसाच निघाला (म्हणजे इरसाल ;)) समिर येणार ही नविन पण सुखद बातमी होती. एक एक करत सगळी टाळकी जमली. आम्ही सगळे मिळुन १० जण होतो (२ मोठी - सानु - माझी लेक आणि निरजा - मंजु डी ची लेक), ३ मुली (मी, आशु नी मंजी) आणि ५ लहान मुल - पर्या, समिर, विशाल आणि विनय, विश्वेश (माझा नवरा) होतो. त्यात आशु सगळ्यात शेवटी आली ती येईपर्यंत कोणि जायच नाही म्हणुन पर्याने सगळ्यांना दम भरला होता.
एक एक येईल तसा "ओळखा कोण" चा खेळ खेळुन झाला. त्यात पण परेश नी मंजुला मस्त गंडवल आणि कोणीच कोणाला ओळखु शकल नाही . मंजु नी आशु ला सम्या मालक वाटला, नी विनय पर्या वाटला.
गप्पा कट्ट्यावरुन सुरु होऊन नेहमीची वळण घेत घेत गेल्या. पर्याला श्रिखंडा वरुन थोड पिडुन झाल (म्हणजे नेहमी कट्ट्यावर पिडतो तेच). आशु आल्यावर थोडावेळ "विशाल" गिर्हाईक होता मस्करीच. बिचारा मुग गिळुन बसला होता . पर्याचे पंचेस जबरदस्त होते (ते इथे सांगण्या सारखे नाहीत उगाच का व्ही & सी करा :G) (खाजगीत विचाराल त्याला तर तो "नाव" बघुन सांगेल - आता ह्यावरुन समजा की लोकहो) परेश ने मला गिर्हाईक बनवुन माझी पण मस्करी करुन झाली ललित वरुन. केव्हढ मोठ्ठ लिहितेस. एका ओळीत सांग ना काय ते म्हणुन. म्हणुन त्याच्यासाठी वृतांत एका ओळीत सुरुवातीला लिहीलाय.
कोण काय काय करत (करत नाही) त्या सगळ्याची उजळणी झाली. वय विसरुन एकमेकांची मस्करी चालली होती. आम्हाला वाटत होत आता बहुतेक हाताला धरुन आम्हाला बाहेर काढणार सिसिडी वाले पण नाही त्यांना सवय असावी अशा वागण्याची .
कॉफी प्यायली. बील आलं तेव्हा सगळे चित्पावन उदार राजा सारखे वागत होते. टीटीएमएम काय पण टिटीएमटी पण नाही चक्क टिएमएमएम चालल होतं (तुझ मी आणि माझ पण मीच) शेवटी मालकांनी बील भरल, पर्या आम्हाला डोंबिवली पर्यंत लिफ्ट देईन म्हणाला (पण ट्रॅफिक नी रोड पहाता मला ट्रेन सोयिस्कर होती) सगळच आक्रित. बहुतेक हा फरक पुण्यातले मुळचे वाड्यातले चित्पावन नी मुंबापुरीत राहुन बदललेले चित्पावन अशामुळे असावा (आता माझ्यावर संक्रांत येणार पुणेकर हाणणार मला.लोक्स मजेत घ्या, सगळेच दिलदार हायती, पुणेकर मला हाणु नका तिकडे आल्यावर स्वःखर्चाने पार्टी द्या म्हणजे माझ म्हणण खोडुन निघेल ;))
खरच बाहेरच्या कोणि बघितल असेल तर वाटणारही नाही कोणाला ही खिदळणारी खोडं पहील्यांदा भेटतायत म्हणुन. खुप मज्जा आली. असा मस्त गॄप जमवुन दिल्या बद्दल मायबोलीचे आभार.
जबरदस्त ग
जबरदस्त ग कवे...
-------------------------
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..
छानच कवे
छानच कवे

एकुणात सगळेच धम्माल करतायत म्हणायचे
************
To get something you never had, you have to do something you never did.
कवे मुंबइ
कवे मुंबइ त कधि पुन्हा गटग कराल तेव्हा मला नक्कि सांगा ग! मला हि असा अनुभव घ्यायचा आहे! आपण कट्टया वर ज्यांच्याशी इतक्या हक्का ने बोलतो अशा तुम्हा सगळ्यां ना भेटायला खुप खुप आवडेल!
अरे व्वा!
अरे व्वा! कट्टेकरी धमाल केलीत हां! कविता वृत्तांत झकास! म्हणजे अनिल कपुर म्हणतो तसं "एकदम झक्कास!"
मस्त गं
मस्त गं कवे. मलापण अज्जिब्बात वाटलं नाही की मी पहिल्यांदाच भेटतेय सगळ्यांना
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |
मीनू पण
मीनू पण होती म्हणे त्यादिवशी मुलुंडमधे. आधी माहित असतं तर मंजूला सांगता आलं असतं तिला काँटॅक्ट करायला.
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |
अरे व्वा,
अरे व्वा, इकडे पण जीटीजी झाल का? मस्तच की! अन दहा जण म्हणजे बरेच होते की!
>>>> पुण्यातले मुळचे वाड्यातले चित्पावन नी मुंबापुरीत राहुन बदललेले चित्पावन
असा काही फरक नस्तो ग अस्सल चित्पावनान्च्यात!
कविता छान
कविता छान वृत्तांत,
मला पण सांगा पुढ्च्या ग ट ग ला,
तसा मी जास्त बोलत नाही पण एकेल नक्की, जसा ईथे वाचक म्हणून वावरतो तसा
एस एस
एस एस संदीप - तू बोलत नाहीस पण ऐकतोस नक्की, मग तर तुला बोलावणारच पुढच्या वेळी. श्रोता कोणितरी हवाच ना! ,)
लिंब्या - अरे सगळे "एकारांती चित्पावन तू नको रे मी देतो बील म्हणुन प्रेमळ वाद घालत होते, कसल दृश्य होत ते, ह्याची देही ह्याची डोळा अनुभवल ना मी. भंजाळले मी पण ;)"
बाकीचे लोकहो हा चित्पावन वाला भाग गमतीत घ्या
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग व्रूतांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
Donate Eye - Bring Light to Blind
यो, सगळ्या
यो, सगळ्या वृतांतांवर तुझा पहिला अभिप्राय...
काय ग टवळे वाचतेस पण की नुसतेच अभिप्राय देतेस?
बाकी - कवे, तुम्ही पण मज्जाच केली की... आमच्यासारखी...
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
कविता
कविता नेहेमीप्रमाणेच भारी लिवले आहे तुम्ही :).
खूप मिसले मी...
चित्पावन वाला भाग गमतीत घ्या >>> आमचा विश्वास बसत नाही ;).. खरच असे झाले ?
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
लय
लय भारी...आता पुढच्या वेळी पुणे-मुंबई गटग एकत्र करू
मनकवड्या
मनकवड्या नक्की करुयात. ते पुण्यातले चित्पावन तेव्हढ खर्चाच मनावर घ्या भौ
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
Donate Eye - Bring Light to Blind
छान वृ.
छान वृ.
यशस्वी जिटीजीबद्दल अभिनंदन.. 
<<आता
<<आता माझ्यावर संक्रांत येणार पुणेकर हाणणार मला.>>
काही हाणत नाहीत. जास्तीत जास्त तीव्र निषेध करतील. मुळात हिंमतच नाही पुणेकरांत. उगाच नुसता वितंडवाद नि मागून रडणे, 'सारखे का हो आम्हाला नावे ठेवता?' मला पुरते माहीत आहे. पण स्वतःच्या खर्चाने बटाटेवडा नि चहा नक्की देतील. फक्त काही काही बोलून त्यांची करमणूक केली पाहिजे.
गेले आठ वर्षे अनुभव घेतला आहे इथे.
वास्तविक तसे पुणेकर म्हणजे एक आगळेच, नि कधी कधी प्रशंसनीय व्यक्तिमत्व असलेले लोक! त्यांना का वाटते की लोक आपल्यावर टीकाच करतात? कळत नाही. याला काय म्हणायचे? एव्हढी का असुरक्षिततेची भावना यांच्या मनात? कळत नाही. पण तसे बरेच काही कळत नाही पुणेकरांबद्दल. म्हणून तर ते पुणेकर नि इतर आपले नुसतेच कसलेतरी 'कर'.
झक्की
झक्की :d
कविता... वृत्तांत आणि फोटो छानच.
फोटो बद्दल विनयचे धन्यवाद.
यशस्वी जिटीजीबद्दल अभिनंदन..
कवे,
कवे, मस्ताय बर्का!
खरंच गं, असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदाच भेटतोय. असं वाटत होतं की कॉलेजचे जुने जिवलग मित्र ८-१० वर्षानंतर एकत्र आलो आहोत आणि गोंधळ घालतोय. ए पण मी समीर आणि पर्या दोघांनाही ओळखले होते बर्का ! विश्वेशबद्दल शंका आली होती ते तुझ्याबरोबर (तुझे लगेज) असावे म्हणुन कारण सगळ्यात तेच थोडे शांतपणे बसले होते आणि तुझी लेक चिकटली होतीच की त्यांना. पण मालकांनी मात्र धक्काच दिला.पण मजा आली. मी म्हणतो महिन्यातुन एकदा असे भेटायला काय हरकत आहे, त्यापेक्षा जास्त वेळा जमणार असेल तर आपली काय हरकत नाय गो .
____________________________________________
कृष्णासारखा सखा पाठीशी असेल तर येणारी संकटेही असामान्यच हवीत.
संकटे जर सामान्य असतील तर तो कृष्णाच्या देवत्वाचा अपमान ठरेल ना !!
निषेध
निषेध !!!!!!
मुंबईत गटग असुन आम्हाला कळाला नाही?
तरी कविता वृत्तांता बद्द्ल धंन्स्...
************
आपला अमर.....
विशाल तुला
विशाल तुला १००००००००००००० (ह्या पुढे किती पण ० टाक) मोदक. पण पुढच्या वेळी सौ ना घेऊन याव लागेल.
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
@दक्षे अग
@दक्षे
अग निदान गटगला नाही त्याची कसर भरुन काढायला वृ पटापट वाचुन रिप्लाय केला...
-------------------------
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..
अमर चल
अमर चल तुझ्या साठी पुन्हा एकदा करु गटग, तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे बघु पटकन
ह्या वेळी तू कार्यवाह हो म्हणजे तुला कळल्या शिवाय होणारच नाही गटग.
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
अमर चल
अमर चल तुझ्या साठी पुन्हा एकदा करु गटग,
ओके, कविता एकदा डोंबवलीत करुयात गटग.
इंद्रा कडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्या कडुन घे ( त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर)
************
आपला अमर.....
>>लय
>>लय भारी...आता पुढच्या वेळी पुणे-मुंबई गटग एकत्र करु >> मनकवड्या, आयडी अगदी सार्थ घेतलायंस...
मनातलं ओळखलंस.
चल आता पुढच्या गटग चा कार्यवाहक तु हो आणि सगळं नीट जाहीर कर बरं.
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
अरे वा......
अरे वा...... मज्जा करताय राव तुम्ही सगळे..... !! आम्ही फक्त दुरूनच "मज्जा करा" म्हणणार
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
>>चल आता
>>चल आता पुढच्या गटग चा कार्यवाहक तु हो आणि सगळं नीट जाहीर कर बरं.
आधीच तिकडे पुणे गटग बद्दल किती मारामारी चालू आहे बघ...मला वाटतय ते बघूनच तुला पुढच्या गटग ची कार्यवाहक पदाची जबाबदारी नाही घ्यायचीचीय 

पण तुझ्यासारखी उत्तम कार्यवाहक दुसरे कोण असू शकेल? मी तुला मदत करायला तयार आहे
अरे व्वा!
अरे व्वा! कट्टेकरी धमाल केलीत हां! कविता वृत्तांत झकास! म्हणजे अनिल कपुर म्हणतो तसं "एकदम झक्कास!"
त्यात पण
त्यात पण परेश नी मंजुला मस्त गंडवल
जल्लां गळ्यात कॅमेरा लटकवलेले मालक, हे मी आल्या आल्याच ओळखलं होतं, पण म्हटलं जरा आपल्याला गंडवल्याचं समाधान परेशला घेऊ द्यावं... म्हणून मी मुद्दाम चुकीची नावं सांगितली..
इंद्रा, फोटो मी पाठवले तुला... विनयचे का आभार???
अमर, तसा अगदी आदल्या दिवशी ठरला हा जीटीजी... पण कविताने मुलुंड बीबीवर पण जोरदार बोंब ठोकली होती, ती ऐकू नाही का आली?
कविता ताई
कविता ताई म्हणतात :-
कट्टा मालक म्हणजे मला जरा ३५-४० च्या दरम्यानचा आडव्या बांध्याचा माणुस वाटला होता (म्हणजे आमच्या इथे एक विनय वेलणकर म्हणून वैद्य आहेत त्यांच्या सारखा हा विनय असणार अस वाटल होत) प्रत्यक्षात मात्र अपेक्षाभंग झाला. दिसण्यात अपेक्षाभंग झाला असला तरी ------------------------
पार पंचनामा केलात मालकांचा...........
----आणि आपण थंड ची आठवण काढून हसलो ते राहील की ग ------
----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....
विन्या
विन्या लेका तुझ कौतुक केलं, तू येजेड असशील अस वाटल हुतं, यंग एज निघालास.
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
मी मुद्दाम
मी मुद्दाम कोणा कोणाची आठवण काढली ते नावाने नाही लिहील, तुझी सोसायटीतली डिटेक्टिव्हगिरी पण नाही लिहीली कॅमेरा लाउन चोर पकडण्याची ;), पर्याचा कोंबडी का महागली वरचा बॉम्ब पण नाही लिहीला इथे ;).
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
Pages