Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'बट्टू इन द
'बट्टू इन द फ्रिज्...बट्टू ऑन द ओटा.. बट्टू बट्टू एव्हरीव्हेअर >>>
मी एकदा लहानपणी धाकट्या बहिणी बरोबर मसलत करुन तुपाची बाटली गॅसवर तापत ठेवण्याचा उपद्व्याप केला होता. तूपही गेले नी बरणी तर गेलीच.
सेकन्ड
सेकन्ड इयरला असतानाची गोष्ट. परीक्षा चालु होती कॉलेजमध्ये, निघताना भावाला वाटेत शाळेत सोडणार होते. आई सुट्टी असल्याने घरीच होती. दोघेही खाउन निघालो. घराजवळच्या बसस्टॉप वर ओळखीची एक मुलगी दिसली, तिच्यावर जोक मारण्याचा मोह आवरत (म्हणजे भावाला मागे वळुन जोक सान्गणे टाळुन) पुढे निघाले. पुणे विद्यापीठाच्या सिग्नलला आल्यावर एक कार आणि पीएम्टी ला कट मारुन चिन्चोळ्या जागेतुन गाडी बाहेर काढली आणि दिमाखाने मागे वळुन म्हणले, काय? कशी काढली गाडी??? ...मागे बघते तर काय भाउ नाहीच:( त्याने बॅग ठेवताना पाठीला लागलेली स्पष्ट आठवत होती, बापरे वाटेत कुठे गाडीवरुन पडला तर नाही?? त्याच चौकाला ४ वेळा फेरा मारला घाबरुन.. मग सुचले, बूथ वर जाउन घरी फोन केला तर आईने ओरडायला सुरुवात केली, तेव्हा कळले, तो बसण्याच्या आधीच मी गाडी घेउन सुटलेली
मग पेपर सुरु होइपर्यन्त एकटीच हसत बसले होते.
जबर्या
जबर्या आहे हा बाफ
एके दिवशी कंपनीत, मी नेहेमीप्रमाणे कॉफी मशिन वरुन कॉफी घेतली..आणि मग पाणी प्यायला कुलर पाशी गेलो.. एका हातात कॉफीचा कप आणि दुसर्या हातात पाण्याचा ग्लास अशी कसरत करताना, मी कॉफीने भरलेला कप कुलर वरती ठेवायला गेलो अन, नेमके त्याच वेळी त्याचे झाकण साफ-सफाइ करायला तिथल्या ऑफिस-बॉय ने उघडले होते :(.. काही कळायच्या आतच सगळी कॉफी त्या पाण्यात.... पाणी कॉफीमय झाले.. :).. तिथे असण्यार्या सगळ्यांची हसुन-हसुन जाम वाट लागली..
आणि तो सफाइ कामगार मला खाउ का गिळु अश्या नजरेने पहात होता..
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
वेंधळेपणा
वेंधळेपणा आणि माझे नाते अगदी खुsssssssssssप घट्ट आहे.


आता किती ते किस्से सांगायचे?
आज इतकी वर्षे मोबाईल फोन वापरत आहे तरिही मी आठवड्यातून जास्त नाही पण ३-४ वेळा तरी ऑफिसला जातांना मोबाईल घरी विसरते.
कधी ऑफिसला आल्यावर आठवते कधी गाडीत बसल्यावर आठवते. शेवटी वैतागुन माझा नवरा म्हणतो, तू मोबाईल वापरणेच सोडुन दे बघु.
लहानपणीचे तर अनंत किस्से आहेत.
माझी शाळा हि घरापासुन अगदीच जवळ होती. चालत जाउ शकु इतकी जवळ. आम्ही ३ मैत्रीणी एकत्र शाळेत जायचो. मी ब-याच वेळा साईकल वर शाळेत जायचे. पण येतांना मैत्रिणी बरोबर पायी घरी येयचे. विसरुनच जायचे कि आज आपण साईकल घेउन शाळेत गेलो होतो.
(हे म्हणजे अगदीच पाचवी सहावीतील किस्से आहेत हो
)
एकदा
एकदा घाइघाइने ऑफिसला जायला निघाले.गेट्च्या बाहेर पडेपर्यन्त वरून चिमणीने आपला कार्यभाग आटपला.पंजाबी ड्रेसअच्या पायजम्यावर डाग बघून तशीच उलट्या पावली घरी आले.आता उशिर झाला होता म्हणून कपडे बदलण्यापेक्शा पटकन तेवढाच डाग धुवुन , वाळवणं मला जास्त सोयीच वाटलं.पटकन पाण्याने चोळून काढलं आणि सुकवण्यासाठी त्यावर गरम इस्त्री फिरवली ....पायजम्यातला माझा पाय न काढता !
--स्वस्ति
!!!*************************!!!
तुहा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी !
गर्दीच्या
गर्दीच्या ठिकाणी स्कूटी पार्क करत होते. इतक्यात शेजारची मोटरसायकल काढायला एकजण आला. माझ्या स्कूटीमुळे त्याला ती काढता येत नव्हती. दरम्यान मी डिकी उघडून त्यात माझं सामान कोंबायला सुरूवात केली होती. पण त्याला तत्परतेने मदत करण्याच्या हेतूनं ते काम थांबवून हातातली स्कूटीची किल्ली सनकोटच्या खिश्यात ठेवली आणि स्कूटी थोडी तिरकी करून धरून ठेवली. मला 'थँक यू' म्हणून तो मोटरसायकल घेऊन निघून गेला. मी माझं काम पुढे सुरू ठेवलं... सनकोट घडी करून डिकीत ठेवला आणि डिकी लॉक करून टाकली.... लॉक केल्याक्षणी लक्षात आलं - घराची आणि स्कूटीची किल्ली आतच !!!!
मग रिक्षा करून नवर्याच्या ऑफिसमध्ये गेले, त्याच्याजवळची घराची किल्ली घेऊन दुसरी रिक्षा करून घरी गेले. घरातली दुसरी स्कूटीची किल्ली घेऊन तिसरी रिक्षा करून पुन्हा त्या पार्कींगच्या ठिकाणी गेले...
~~~
हे गाणं ओळखा...
--- --- --- साथ --- --- --- हर --- को --- --- --- --- ---
अजुन एक
अजुन एक किस्सा सांगायचा आहे, माझ्याबद्दल नाही पण माझ्या एका काकांचा (वडिलांच्या मित्राबद्दल).
त्यांचे नविनच लग्न ठरले होते. साखरपुडा आणि लग्न ह्यांच्या मधिल अतिशय रोमँटिक असा आयुष्यातील काळ असतो त्याच काळातील त्यांचा हा किस्सा. होणा-या बायकोला बाईक वर घेउन फिरायला जायचा त्यांचा मनसुबा होता :). ते तीला घेयला बाईकवरुन तीच्या घरी गेले. तीला बाईकच्या मागे बसायला सांगितले. आणि त्यांनी मोटरबाईक सुरु केली. बरेच कि.मी. पुढे गेले, ती मागे बसली आहे असे समजुन ते छान तीच्याशी गप्पा मारत होते. ती काहीच का बोलत नाही आहे म्हणुन त्यांनी मागे वळुन बघितले तर मागे कोणीच नव्हते.
ती बाईकवर मागे बसायच्या आधिच गाडी सुरु करुन ते पुढे निघुन गेले होते.
आशु_के, >>>>> ह
आशु_के,
>>>>>
हे तर मी कित्तीवेळा केलंय. एकदा पाहूणे येणार होते म्हणून २ किलो काकडी कोचवली कोशिंबिरीसाठी हॉलमधे बसून (आमच्याकडे किसलेली आवडत नाही). एका हातात काकडीचे ताट आणि एका हातात सालांचे ताट असं घेवून किचनकडे निघाले. पॅसेजमधे डस्टबीन आहे. उरकायच्या घाईत मी एवढ्या मेहनतीने कोचलेली काकडी डस्टबीन मधे टाकली आणि सालं हातात तशीच. एका क्षणातच भानावर आले पण आता काही उपयोग नव्हता. मग बुंदी रायतं केलं
>>>>
म्हणजे तू अगदी माझ्या सारखी आहेस तर.
लले, तुझा
लले,
तुझा किस्सा वाचून जाम हसले...
लई भारी
लई भारी ललिता!
एकदा मी असाच लक्ष्मीनारायणपासच्या कम्पनी सेक्रेटरीज इन्स्टीट्युट मधे गेलेलो! बोम्बलायला तिथे आतल पार्किन्ग फुल्ल झालेल, तर स्कूटी बाहेरच मेन रोडवर एका पानपट्टीसमोर उभी केली!
इन्स्टीट्युट मधल काम सम्पवुन तन्द्रीत परत आलो, लाल रन्गाची स्कुटी बघितल्यावर जीव भान्ड्यात पडला, हो ना, ट्रॅफिकवाले टेम्पो केव्हा गाडी उचलुन पलायन करतील याचा नेम नस्तो पुण्यात!
तर गाडी बघितली अन किल्ली लावु लागलो!
शिन्ची किल्ली आतमधे धड शिरेना, मी खटपट करतोय, करतोय, वैतागुन डोक्यावरच हेल्मेट काढल!
तोच्, समोरच्या पानपट्टीवरुन एक काळगेला रान्गडा तरुण ओरडू लागला
ओ काका, काय करताय? कुणाची गाडी काढताय???
मी चपापून बघितल! एकदा त्याच्याकडे, एकदा गाडीकडे
गाडी तर लाल रन्गाची स्कुटीच होती!
मग पुढे जाऊन नम्बरप्लेट बघितली, अन घोळ लक्षात आला, ती स्कुटी माझी नव्हती! माझी थोडी पलिकडे लावलेली होती!
ओशाळवाणे हसत मी त्या स्कुटीचा नाद सोडला नि माझ्या हक्काच्या गाडीकडे वळलो!
तो तरुण अन पानपट्टीवाल्यासहीत इतर गिर्हाईके, काय पण एकेक ध्यान अस्तात अशा अविर्भावात माझ्याकडे बघत होती!
नशिब माझे, तो तरुण, ओ काका... वगैरे तरी म्हणला, मला गाडीचोर ठरवून डायरेक्ट मारायला धावला नाही! (नाही, हेल्मेट काढल्यावर तस देखिल मला कोणी चोर बिर म्हणणार/समजणार नाही म्हणा!)
लई झ्याक
लई झ्याक बीबी
आठवायला
आठवायला गेले तर माझे प्रत्येकदिवशीचे किस्से निघतील...
अश्विनी, मीही एकदा असेच आल्यालसणाची पेस्ट करायची म्हणुन पाव किलो लसुण सोलला, साले निट कचरासुपात भरली, ताटलीत लसुण भरला आणि मग शांतपणे सगळा लसुण खिडकीतुन खाली लोटुन दिला आणि सुपातल्या कच-याकडे बघत बसले. आई इतकी भडकलेली की तिला ओरडायलाही सुचत नव्हते. (म्हाडाच्या घरात होतो तेव्हा खिडकीतुन कचरा लोटुन द्यायची सवय होती. मधे कच-याचाच चौक होता
)
दरवाज्याला पहिल्यांदा गोदरेजचे लॅच बसवले तेव्हा, धाकट्या भावाला अगदी समजाऊन सांगितले की कोणी घरात नसताना जर दरवाजा बाहेरुन लावला तर वाट लागणार आपली. त्याला सांगितलेले कळेना, म्हणुन मुद्दाम बाहेर घेऊन गेले, दरवाजा ओढुन कसा लावायचा ते दाखवले. आई शेजारी गेली होती, चावी घरात आणि आम्ही दोघं दरवाजाबाहेर उभे.
म्हाडाची घरे असल्याने खिडक्यांच्या गजांमध्ये चांगलेच अंतर होते त्यामुळे एका बारकुंड्या मुलाला खिडकितुन कसेबसे आत ढकलले दार आतुन उघडायला लावले. (आधी पाय आत टाकले आणि मग डोके, ते डोके मेले जाता जाता जाईना
) जवळजवळ पाऊण तास हा मनोरंजनाचा कार्यक्रम चालु होता.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
फारच
फारच मजेदार बी बी आहे हा !!
सगळेच किस्से छान आहेत ! आणि आपण एकटेच असे नाही हे वाचून बरंसुद्धा वाटतं .
मी इस्त्री करत असताना मैत्रिणीचा फोन आला. मी म्हटलं multitasking करूया म्हणून फोन वर बोलत असताना इस्त्री करणंसुद्धा चालू ठेवलं. मधेच मैत्रिणीने कोणाचातरी नंबर मागितला म्हणून उठले, नंबर आणला आणि फोनऐवजी इस्त्री गालाला लावली. चटका लागल्याबरोबर इस्त्री लांब केली पण गालावर पंधराएक दिवस तरी डाग होता. तेव्हापासून आजपर्यंतं मी इस्त्री करायला बसले की नवरा फोन लांब नेऊन ठेवतो
दरवाजा बंद
दरवाजा बंद ही गोष्ट माझ्या अशी अंगावर शेकलीये ना-
ठाण्यात आमची दोन घरे होती. जेवणखाण एका घरी करुन आम्ही दुसर्या घरी नुसते रहायला जात असू. तिथेच दिवाणखान्यात बाबा(सासरे) क्लास घेत. क्लास संपला की ते दार ओढून घेत आणि बहेरच्या जाळीला कडी लावत.
शनिवारचा दिवस म्हणजे संध्याकाळचा खाऊ म्हणून वडे आणायचा दिवस. क्लास संपल्यावर बाबा आणि नवरा बोलत बोलत बाहेर पडले. नवरा म्हणाला मी वडे आणतो तुम्ही घरी जा. मला सांगीतले तू लवकर पोहोच हा घरी.
मी तयारी केली नी मुख्य दरवाजा उघडला. जाळीचे दार बाहेरुन बंद! नवरा वड्याच्या दुकानात, बाबा घरच्या वाटेवर. मला काय करावे ते सुचे ना! मी तिकडे कोनी येतय जातय का जिन्यातून याची वाट पहात! शेवटी नवरा वाट पाहून मला शोधत आला आणि ३० मिनिटांनी माझी सुटका झाली!
तुम्ही म्हणाल ह्यात काय माझा वेंधळेपणा?

सोप्पा उपाय होता की दुसर्या घरी फोन करायचा ना आईला किंवा दिराला? सुचलाच नाही
आणि घर तळमजल्यावर आहे. खिडकीतून बाहेरच्या मुलांना हाक मारायचे पण सुचलेच नाही!
ती सेल
ती सेल टेलची अॅड आहे ना त्यात तो दाढी करताना सेल पाण्याने धुतला.
ती सेल
ती सेल टेलची अॅड आहे ना त्यात तो दाढी करताना सेल पाण्याने धुतला.
पण अजुन
पण अजुन एका पायात बाटा स्लिपर आणि एका पायात अभ्यंकर चप्पल घालुन फिरुन आलेल कोणि लिहलेलं दिसत नाही.
परत आल्यावर काढताना लक्षात आलं.
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
मी एका
मी एका पार्टीहुन निघताना एका पायात माझा बूट आणि दुसर्या पायात मित्राचा बूट घालून निघालो. तो बिचारा शोधत बसला असे कसे झाले म्हणून आणि मग पार्टीच्या ठिकाणी रात्रभर राहून दुसर्या दिवशी मला शोधायला आला.
विनय
खतरनाक
खतरनाक किस्से.

मागच्या वर्षी- एका अतिमहत्वाच्या मिटींगसाठी ७ मि. उरली असताना मी कागदपत्र चाळत, कॉफी पीत मनात शेवटची उजळणी करत होते. बॉस नी हाक मारली चला आता म्हणून. त्या धांदलीत कॉफी, काही माझ्या अंगावरच्या पांढ-याधोप शर्टावर, काही अतिमहत्वाच्या त्या व्यक्तिला द्यायच्या कागदावर/फाईलीवर आणि उरलेली माझ्या भ्रमणध्वनीवर सांडली. मग आधी घाबरून बॉसला तू पुढे हो म्हणून सांगीतलं, मग शर्टावर कोट अडकवला, डाग लपले, मग फाईल आणि मोबाईल नेऊन नळाखाली धरले आणि हॅन्ड ड्रायर वर वाळवले. प्रसाधनगृहातील सहकारी बायांचा वासलेला आ तसाच.
टीप १- तो सेलफोन अजूनही चालतो. नव-याचे म्हणणे - नोकियाला कळवायलाच हवे. त्यांना नोबेल पारितोषीक मिळवून देईल हा शोध.
टीप २- (तीच) नोकरी अजूनही आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तिला वाळवलेली आणि फिक्कट कॉफीच्या रंगाची कागदपत्र देऊनही.
टीप ३- शर्ट शहीद झाला. जगातले कुठलेही स्टेनरिमुव्हर कामाला आले नाही. अक्कलखाती जमा. कूठल्यातरी अज्ञात शक्तीच्या कृपेने त्या दिवशी साडी वगैरे नेसली नव्हती, नाहीतर टीप २ बदलावीच लागली असती.
पायात बाटा
पायात बाटा स्लिपर आणि एका पायात अभ्यंकर चप्पल >>>
...डोळ्यासमोर भयंकर
दृश्य उभे राहिले... 
निवांत पाटील
०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...
>>अभ्यंकर
>>अभ्यंकर चप्पल >> निवांत पाटील तुम्ही पण कोल्हापूरकर काय?
चप्पलेवरु
चप्पलेवरुन आठवल
गेल्याच वर्षीचीच.
ऑफिसला जाताना बूट घालायचा कण्टाळा करतो मी, त्या दिवशीही तसेच घडले!
फक्त तन्द्रीतच, नेहेमीच्या चप्पलाऐवजी टॉयलेटला जाण्यासाठी राखुन ठेवलेल्या रबरी सपाता (स्लिपर) पायात घातल्या, नि गेलो ऑफिसला! कार्ड पन्च करताना ते लक्षात आल, पण तोवर खूप उशीर झाला होता!
दिवसभर त्या सपाता घालुनच ऑफिसमधे वावरलो! नशिब कुणा गेस्टला भेटायची वेळ आली नाही!
दुसर्या दिवशी रिसेप्शनिस्टने (तशी स्वभावाने चान्गली आहे ती) विचारलेच, काल काय झाल होत तुम्हाला? सपाताश्या घालून आलेला?
लिंबूदा, ला
लिंबूदा,
लाल स्कूटीचा किस्सा लै भारी...
~~~
आता हे गाणं ओळखा...
--- --- --- साथ --- --- --- हर --- को --- --- --- --- ---
कालचाच
कालचाच वेंधळेपणा..
कुर्ला स्टेशनवर आले आणि ट्रेनसाठी उभी राहिले. येताना इंडिकेटर बघितला तर ठाणा ट्रेन लागली होती. तितक्यात एका बाईने विचारल की लेडिज कुठे येईल? तर म्हटल बाई ग इथे first class येईल पुढे आहे second class. इतक्यात ट्युब पेटली ट्रेन १२ डब्बा तर नाही ना??इंडिकेटर बघायचा म्हणुन डावीकडे बघितल आधी मग उजवीकडे बघितल. इंडिकेटरच दिसेना. म्हटल येताना तर बघुन आले इंडिकेटर आणि गेला कुठे अचानक?? अख्या स्टेशनभर इंडिकेटर काय तो दिसेचना. थोड्या वेळाने असच लक्ष गेल तर अस्मादिक इंडिकेटरच्या खाली उभे.आमचा मस्त पोपट बाकी काय...
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...
योगिता_
योगिता_ ग्रेटच आहेस.
या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे
अग भरपुर
अग भरपुर आहेत ग असे. पण लिहायचा कंटाळा बाकी काय??
एकदा तर माझा फ्लोअर समजुन 1st floor ला अगदी माझ्या डेस्कपर्यंत जाऊन आलीय. 1st floor चा security guard स्वतःच म्हणाला मॅडम हा 1st floor आहे.
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...
बापरे
बापरे भन्नाटच आहे बी बी हा ,चला आपल्या सारखे वेंधळे बरेच आहेत म्हणायच
लिंबुदांच्या किस्श्या वरुन एक आठवला, माझ्या कडे पूर्वी प्रिया स्कुटर होती, त्या दिवशी ऑफिस पार्किंग मधे जागा मिळाली नाही म्हणून बाहेर लेन मधे गाडी लावली, ऑफिस सुटल्यावर गप्पांच्या नादात पार्किंग मधे आले आणि स्कुटर शोध शोध शोधली.ऑफिसच्या पिऊन पासुन सगळे खाली आले अर्धा तास शोधुन शेवटी असा निषकर्ष काढला कि स्कुटर चोरीला गेली आता पोलिस कंपप्लेंट करायला पाहिजे आंणि बाहेर रिक्षा स्टँड वर आले तर शेजारच्या लेन मधे माझी 'प्रिया' दिसली. बापरे नंतर ऑफिस मध्ल्या लोकांनी चार दिवस पिडल. त्या वरुन.
स्वयंपाका
स्वयंपाकाचे तर अगणित ,
मी एकदा आईने भेंडी चिरुन ठेवायला सांगितली तर बटाटे चिरतात तशी पाण्यात चिरली, अर्थात बटाट्याचीच भाजी करावि लागली नंतर
एकदा पिठल करायला घेतल पिवळ दिसेना म्हणून हळद टाकायच्या ऐवजी बेसन घालत राहिले, मला वाटल बेसना मुळे पिवळा रंग येतो,शेवटी कढईभर खळ तयार झाली त्याची.
स्मिता हा
स्मिता हा भेंडी वाला किस्सा मी पण ८ वीत असताना केलाय, फक्त चिरुन पाण्यात टाकायच्या ऐवजी फोडणीत टाकल्यावर पाणी टाकुन वाफ देऊन शिजवली होती. आईला चकीत करण्यासाठी.
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
खाताना
खाताना तोंड चिकट ना कवे???
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...
Pages