मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरभी भांडली होतीस का ग नवरोबांशी? >>> हा हा हा... चांगली आयडीया दिलीस, भांडले की कसा राग काढायचा ह्याची....

नवर्याच्या मित्राचा हा किस्सा...

वाशिंद ला ट्रेन मध्ये चढला, ११ सलग नाईट शिफ्ट्स कराव्या लागल्याने वैतागला होता. ठाण्याला उतरायचे होते, ट्रेन मध्ये गार वार्यावर झोप लागली. (रात्रीचे १० वाजले होते ), जाग आली तर कुर्ला आले होते, पुन्हा उतरुन आसनगाव गाडी पकडली,पुन्हा झोप लागली तर कल्याण आले होते, परत दादर पकडली, घाटकोपर ला उठला.. मग मात्र उलट बाजूच्या गाडीत चढून दारातच उभा राहीला...

अरेरे! Sad

आई, आण्णा घरात नसताना एकदा धाकट्या भावाबरोबर मिळुन गुळ्-शेंगदाण्याची चिक्की केली होती.
नंतर आम्ही दोघांनी मिळुन चमच्याने खाल्ली. Biggrin
____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

हेहेह्हे.. चमच्याने खाल्लीत तरी, मी अन माझ्या बहिणीने केलेली खरवडून खरवडून थोडीशीच खाऊ शकलो आम्ही.. Lol

इथे बायकांचीच सॉरी ... मुलीन्चीच भरमार दिसतेय !!
आता उगीचच मनाला वैगेरे लाउन घेऊ नका ... I am kidding !

Ro(Ha)ck on !!

नाही हो निळुभाऊ आम्ही कशाला मनाला लावुन घेऊ. ह्याचा अर्थ फक्त येव्हढाच बरेचसे पुरुष वेंधळेपणा कबुल करायला कमी पणा मानतात नाहीतर लिहिण्याच्या बाबतीत आळशी पणा करतात. मी पण जस्ट किडींग Wink
-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

दोन दिवसा पुर्वी कल्याण वरुन विठ्ठलवाडिला जायला बसमध्ये नविचारता बसलो .बस अर्धा कि .मि फिरुन पुन्हा तिथेच आली ड्रायव्हरला विचारल तर तो म्हणाला अहो ती हिच्या शेजारी लागलेली बस उतरा खाली .
''शर्म्रीदा होनापडा क्युकी उसमे लडकिया बहुत थी '' !

कविताजी ...
अहो शाल तरी कशाला पाहिजे ?? डायरेक्ट जोड़ा हाणा की ... Sad

Use LInux !

मी बालवाडीत असतानाचा माझ्या लहानपणीचा हा किस्सा आई नेहमी सांगते..
सकाळी नेहमीप्रमाणे गनीमामू चा रिक्षा मला शाळेत घेऊन जाण्यासाठी आला. आईने मला तयार केले आणि रिक्षात नेऊन बसवले. रिक्षा निघताक्षणीच अचानक माझे तारस्वरात रडणे सुरु झाले. मामाला काहीच कळेना. रिक्षा पुढे न्यावी तर माझे रडणे वाढत चाललेले... परत घराकडे फिरावे तर उशीर होणार..
शेवटी मला त्यांनी घरी आणून सोडले.
माझे ओक्साबोक्शी रडून झाले... आईला कळेना. ती सतत रडण्याचे कारण विचारत होती .
बर्‍याच वेळाने मी कसेबसे सांगितले,

"आई, चड्ड... घालायची विसरली..........................." आणि पुन्हा तेच तारस्वर...!!!

आता हा वेंधळेपणा माझा की आईचा हा प्रश्न गौण... आयुष्यभर हसण्यासाठी एक किस्सा मात्र मिळालाय घरच्यांना!

हा दुसरा प्रताप,
मैत्रीणीच्या लग्नासाठी आम्ही दहा जणी सोलापूरला गेलो होतो. १९९९ ची कथा.
एका मैत्रीणीकडे उतरून सकाळचा नाश्ता तिथे उरकून लग्नघरी जायचे ठरलेले.तिच्या घरचे सुट्टीत गावी गेलेले.कोणतातरी उपवासाचा दिवस होता. ८ जणी अवराआवर करत होत्या. मी आणि रूपालीने साबुदाण्याची खिचडी बनवायचे ठरले. खिचडी बनवली, सर्वांना वाढली. खिचडी पहाताच सर्वजणी ओरडल्या..... " अगं हे काय? कसली खिचडी केलीय?"
........कांदा, जीरे-मोहरी ची खमंग फोडणी, हिंग, अद्रक लसुण पेस्ट, कडीपत्ता, हळद.... आणि साबुदाणा.!!!!!!!!
सर्वांना फ्रिज मधली फळे खावी लागली. ती खिचडी आम्हा दोघींना दुसर्‍या दिवशी खावी लागली हे वेगळे सांगणे न लगे. आजही खिचडी करताना माझ्या त्या पहिल्यावहिल्या खिचडीची आठवण येते. किती मेहनतीने बनवली होती म्हणून सांगू!...
अजुन एक आठवला.. शाळेत कोळीगीतावर नाचाची भरपूर तयारी झालेली, ऐन कार्यक्रमादिवशी मात्र ब्लाऊज टाचण्यासाठी दिला आणि न घेताच शाळेत गेले... "चोली पिवली गो.." ऐवजी शाळेचा पांढरा शर्ट...!!आजही "मी डोलकर.." गाणे ऐकले आणि "चोली पिवली गो.."च्या वेळी हसू येते.

!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*

Helping hands are always better than praying hands.

भन्नाट किस्से आहेत अबोली Lol
बरं ते "मी डोलकर" आहे हो. मला ढोलकर वाचल्यावर एकदम वाजंत्रीवाले डोळ्यासमोर आले. Proud

मज्जा आहे बुवा .....
ती साबुदाण्याची खिचडी खाणे म्हणजे दिव्यच असले असेल नाही ?

Share your code .. http://www.maayboli.com/node/7676

हा किस्सा माझ्या मैत्रीणीचा--
एकदा मैत्रीणीने पुण्याहून गावी जाण्यासाठी reservation केले. ३ तारखेचे. पण नंतर ऑफीस मधुन सुट्टी काही मिळेना! मग ३ तारखेचे reservation रद्द करुन ५ तारखेचे करुन आली. आणि ऑफीस सुटल्यावर जाऊ म्हणुन थोड्या उशिराच्या बस चे reservation केलं. ५ तारखेला बाईसाहेब गेल्या बस स्थानका वर.
बस लागलेलीच होती. जाऊन बघते तर तिच्या जागेवर कोणीतरी आधीच बसलेला होता. ती म्हणाली "Excuse me, माझे reservation आहे." तर तो म्हणाला माझे पण! तुमचे तिकिट बघु. हीने तिकिट दाखवल्यावर म्हणाला " ओ मॅडम, तुमचे ३ तारखेचे reservation आहे. आज ५ तारीख आहे!"
झालं! आत्ता सगळा गोंधळ हिच्या लक्षात आला. आता काय करावे? ऐन दिवळीचा मोसम! गाड्यांना प्रचंड गर्दी! पण तेव्हा सुदैवाने कोणीतरी ओळ्खीचे भेटले. त्यांच्याकडे १ तिकिट जास्त होतं. म्हणुन ती जाऊ शकली. नंतर तिच्या लक्षात आले की आपण reservation रद्द करायला गेलो तेव्हा फक्त वेळचं सांगितली, ५ तारखेचं द्या असं सांगितलचं नाही!! Happy

पावसाळ्यात शाळेत रेनकोट घालून बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जातात. पण अस्मादिक फाटका बनियन आणि अर्ध्या चड्डीवर रेनकोट चढवून शाळेत गेले होते. तो पूर्ण दिवस मी वर्गात रेनकोट घालून बसलो होतो. दर तासाला नविन शि़क्षक येऊन मला विचारीत "काय रे! हे काय घालून बसलास?". आमच्या वर्गातली पोरे सुध्धा इतकी आगाऊ होती. माझ्या ऐवजी तीच उत्तर देत. "सर! काळे नुसताच रेनकोट घालून आलाय! आत काहीच घातलेन नाय." मी लाजेने चूर होऊन म्हणे "सर! आत बनियन आणि चड्डी घातलीय! बघा पाहिजे तर."

मी सेकंड इअरला असताना एकदा आई बाहेरगावी गेली होती. दोन्ही भाऊ तिच्याबरोबर गेलेले. घरी ति. आण्णा (वडील) आणि मी, असे आम्ही दोघेच. आण्णानी मला सांगितले होते, कॉलेजवरुन येताना कुठलीतरी पालेभाजी घेवुन ये, मी आल्यावर पोळ्या आणि भाजी करीन.
आम्ही ठरवले (आम्ही म्हणजे अस्मादिक) की आज आण्णांना त्रास द्यायचा नाही. पोळ्या करू आपणच, फार काय तर नकाशे होतील, त्यासाठी एखादी गोलाकार डिश वापरता येइल, आहे काय त्यात?
पालक आणला होता, तो कापुन कुकरला लावला, वाफवण्यासाठी. पीठ भिजवलं, पण काय झालं तेच कळेना, त्यात चिकटपणाच येइना. मळलेली कणीक कशी वेगळीच दिसते? मग त्यात अजुन पाणी घाला, पीठ घाला, थोडंसं तेल घालुन बघितलं. पण काही फरक नाही. बावचळलो आणि शेजारच्या काकुंना बोलावलं...त्यांना सांगितलं "काकु, मला पोळ्या करायच्या आहेत. पण बघा ना ही कणीक मळलीच जात नाहीये पोळ्यांसाठी नीट."
काकुंनी एकदा त्या गोळ्याकढे बघितलं आणि जोरजोरात हसतच सुटल्या.
मी पोळ्या करण्यासाठी ज्वारीचं पिठ वापरलं होतं !
____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

परवा शुक्रवारी घराची किल्ली नव्हती माझ्याकडे. सापडतच नव्हती. घरी पोचले तेव्हा कोणीच नव्हतं. मग आठवलं की एक एक्स्ट्रॉ किल्ली हॉलच्या खिडकीत आहे. खालच्या काकांना बोलावून त्यांना माकडासारखं खिडकीत चढायला लावून वगैरे ती किल्ली काढून घेतली. घरात पोचले आणि माझा किल्लिचा जुडगा शोधू लागले, अज्जिब्बात सापडला नाही. Sad
दुसर्‍या दिवशी ऑफिसला जाताना माझ्या बाईकवर काहीतरी दिसलं ते पहायला गेले तेव्हा गाढवपणा लक्षात आला, माझी किल्ली बाईकलाच होती. बाईक वापरली होती बुधवारी रात्री, तेव्ह्यापासून माझी किल्ली इग्निशन लाच.. Proud

अरेच्चा ... दुरुस्ती केली हो रुनी . धन्यवाद.
निळूभाऊ ,चव मस्त लागते, खरंच! उपवास नसेल तर एखाद्या वेळी करुन पहावी... वेगळीच चव लागते. अर्थात दिनेशदा सांगतीलच याबद्दल . दिव्य नव्हे पण सगळ्याजणी जाम चिडवत होत्या.
!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*!*

Helping hands are always better than praying hands.

कालचाच किस्सा...
मी हेडफोन लावुन एक चित्रपट पाहत होतो.
दोन तासानंतर चित्रपट संपला आणि हेडफोन काढुन ठेवला.
तो ठेवता क्षणी, माझा वेंधळेपणा लक्ष्यात आला. आणि माझी हा.हा.पु.वा.....

कारण मी मुकपट पाहात होतो......

कांदा फोडणीला टाकून खिचडि खरेच चांगली लागते. ( म्हणजे हा वेंधळेपणा नाही तर !!! )

टिल्लु, कुठला मूकपट ?

हो मलाही आवडायची. बहुधा पिवळी दिसते नेहमीपेक्षा.

दिनेश - ती उपासाच्या दिवशी केल्याने वेंधळेपणा म्हणून उल्लेख असावा Happy

टिल्लू, महान आहेस Happy

मुकपटात संवाद नसले तरी पार्श्वसंगीत असतेच ना ? ते ऐकायला headphone हवाच. यात वेंधळेपणा तो काय ?
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

एकदा एका मित्राला ऑफिसमधून फोन लावला. फोन करण्याआधी मोबाईलच्या फोनबूक मधून त्याचा नंबर मिळवला आणि मोबाईल बंद केला. बेल वाजत होती तेवढ्यात माझा बॉस आला. आम्ही कामाबद्दल काहीतरी बोललो.. काही वेळच आणि तेवढ्यात त्या समोरच्या मित्राने फोन उचलला.. आणि मी त्यावेळेस चक्क विसरून गेलो होतो कुणाला फोन लावलाय ते. हॅलो हॅलो म्हणत आवाज ओळखता येतोय का ते पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. शेवटी फोन कट केला.
माझ्यावर ही परिस्थिती तीन चारदा ओढवलीये. हल्ली मोबाईलमधून नंबर घेतला तरी समोरच्याचा हॅलो येईपर्यंत फोनबूक मी ओपनच ठेवतो. Proud

आणखी कुणाच अस कधी झालय? Happy
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

आणखी कुणाच अस कधी झालय? >> इथे उलटं झालयं... Sad

दिनेश, मी The Kid, Charlie Chaplin, 1921 पाहत होतो. छान आहे.

>>मुकपटात संवाद नसले तरी पार्श्वसंगीत असतेच ना?
सतीश तुमचे बरोबर आहे, पण तेव्हढ्यासाठी मी दोन तास माझे कान दुखवुन घेतले ना. Happy Happy

अरे ते एक्सेस कार्ड वापरुन दारं उघडायची इतकी सवय झालीय... परवाचा किस्स्सा.... कंपनीतुन घरी आलो आणि लॅच समोरुन २-३ वेळा कार्ड फिरवल... दरवाजा उघडेना तेंव्हा लक्षात आलं काय करत होतो ते.... नशीब आजुबाजुला कुणी नव्हत हे बघायला Wink
कसे सवयीचे गुलाम होतो ना आपण!

माझा छोटासा वेंधळेपणा..

माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस कधी ते विसरले.. आठवुन, आठवुन २५ ला तिला फोन केला आणि शुभेच्छा दिल्या. तर ती म्हणाली 'आज माझा वाढदिवस नाहिये', मग २-३ सेकंदात पुन्हा डोक्याला ताण देऊन बोलले, 'हो माहित आहे ग, २३ ला झाला, आज उशिराने शुभेच्छा देतीये तेव्हा रागावु नकोस'. तर ती पुन्हा शांतपणाने म्हणाली, 'तु विसरली आहेस ना खरी तारीख? उद्या आहे माझा वाढदिवस'. मला ततपप झाले पण तरी चिकटपणाने म्हणालेच मी, 'बघ, मी तर आधीच शुभेच्छा दिल्यात तुला..'.

ती समोर असती तर मी मार खाल्ला असता, फोनवर होते म्हणुन वाचले Happy

वाढदिवसावरून आठवलं...

पुण्यात असताना रोज सकाळी ६ ला पर्वतीला जायचो... वाटेत एका मित्राचं घर होतं, तो कॉलेज ला जाण्यासाठी तयार होऊन निघालेला माझ्या परतीच्या वाटेवर भेटायचा... थोड्या गप्पा मारून मी घरी यायचो... एक दिवस त्याचा वाढदिवस... तो काही खाली दिसला नाही... मी वर चढून त्याच्या घरी... बेल वाजवली (सकाळी साडेसहाचा सुमार, मी शॉर्ट्स आणि विदाऊट स्लीव्ज टीशर्ट मधे)... त्याच्या वडिलांनी दार उघडलं... त्यांच्या डोळ्यात झोप...
मी- शरद आहे का?
ते- १ मिनिट... शरद... तुझा मित्र आलाय
शरद (नुकताच झोपेतून उठून, डोळे चोळत)- पळ्या... काय रे... सकाळी सकाळी ??
मी- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आज काय पार्टी द्यायला लागू नये म्हणून कॉलेज बंक का? Wink
शरद (चेहेर्‍यावर मोठ्ठं प्रश्णचिन्ह घेऊन)- पळ्या... रविवार आहे आज... आणि आज तारीख काय?
मी- ३० जुलै, तुझा वाढदिवस...
शरद- लेका माझा वाढदिवस ३० सप्टेंबर ला असतो... २ महिने आधीच काय विश करतो... च्यायला... मस्त झोपलो होतो...

पुढे प्रत्येक वाढदिवसाच्या पार्टीला माझी यावरून खेचली जायची....
Happy
_______
सपनोंसे भरे नैना, तो नींद है ना चैना...

<<<कसे सवयीचे गुलाम होतो ना आपण!>> अगदी अगदी....

आमच्या ऑफिस च्या लँडलाईन वरुन बाहेर फोन करायचा असेल तर आधी झिरो डायल करायला लागतो. मी घरुन फोन लावताना हमखास आधी झीरो डायल करते आणि मग पलिकडुन जेव्हा ओपरेटरच्या सुमधुर आवाजात 'प्लीज चेक युवर नंबर' ऐकु येत तेव्हा ट्युब पेटते.... Happy

Pages