तू....तूच ती!! S२ भाग १५- अंतिम

Submitted by किल्ली on 23 December, 2019 - 02:20

आधीचे सर्व भाग :
--------------------------------------------------------------------------------
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
भाग ७ : https://www.maayboli.com/node/68459
भाग ८ : https://www.maayboli.com/node/68631
भाग ९: https://www.maayboli.com/node/69117
भाग १०: https://www.maayboli.com/node/69316
भाग ११: https://www.maayboli.com/node/70193
भाग १२: https://www.maayboli.com/node/70194
भाग १३: https://www.maayboli.com/node/72738
भाग १४: https://www.maayboli.com/node/72761
-------------------------------------------------------------------------------------

मीटिंग सुरु झाली. अपेक्षित अशा सर्व लोकांनी मीटिंगला हजेरी लावली होती. आदित्यला शलाका कुठे दिसत नव्हती. त्याच्या नावाचा पुकारा झाला आणि तो इतर विचार बाजूला सारत औपचारिक तरीही सुहास्यवदनाने presentation देण्यासाठी उठला. आदित्यचं presentation उत्तम झालं. त्याचे काम त्याने व्यवस्थित पार पाडले होतेच त्याशिवाय त्याच्या टीमचाही performance चांगला झाला होता. critical situation असतानाही शांत डोक्याने काम करत त्याने team कडून client ला हवे तसे सॉफ्टवेअर बनवून दिले होते. त्यामुळे त्याच client ने आणखी एक मोठा development प्रोजेक्ट कंपनीला दिला होता. तसेच इतर support ची कामे मिळाली होतीच. अखिलेश सरांनी आधीच declare केलं होतं की तिचं मीटिंगला सर्वात शेवटी येणं योग्य राहील. तिला मीटिंग मध्ये सहभागी करून घेतल्या जाणं हि नक्कीच खास बाब होती.त्यामुळे आता सगळ्यांना शलाकाची आणि तिच्या product engineering युनिटच्या कामाच्या अपडेट्सची उत्सुकता होती.

अखिलेश सर पुढे येऊन सर्वांना संबोधित करत म्हणाले, "तुम्हा सर्वाना ज्याची उत्सुकता आहे ते presentation लवकरच येथे सादर होईल. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची घोषणा मी आज करणार आहे. आपलं product engineering युनिट उत्तमरीत्या काम करत असून त्यांनी नुकताच एक अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. इतके दिवस हा प्रोजेक्ट, त्याची idea , execution plan वगैरे जाणीवपूर्वक गोपनीय ठेवण्यात आला होता. हे प्रोजेक्ट काय आहे ह्याबद्दल टीम लीड शलाका आणि मी स्वतः ह्याशिवाय कोणालाही काहीही माहित नव्हतं. पण आज ते सर्व announce करण्याची वेळ आली आहे. शलाका त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देईल."

सरांचे हे बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. असं काय गोपनीय आहे त्या प्रोजेक्टमध्ये ही उत्सुकता तर होतीच त्याहीपेक्षा जास्त नवल ह्या गोष्टीचं होतं की सरांनी ह्यामध्ये आदित्यला सामील करून न घेता त्याला जाणीवपूर्वक दूर ठेवलं. अर्थात असं त्यांनी का केलं हे समक्ष विचारण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. आदित्य मात्र दुखावला होता. त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव जाणून अखिलेश सरांनी विनाविलंब शलाकाला मीटिंगरूम मध्ये पाठवण्याची शिपायाला कॉल करून आज्ञा दिली. काही क्षणांतच प्रसन्नवदनाने आपला लॅपटॉप सांभाळत शलाका तिथे आली. आदित्य अजूनही विचारांत गुंग असल्यामुळे त्याने तिच्याकडे पाहिले नाही. तिनेही फार वेळ न दवडता presentation सुरु केले आणि नेहमीच्या कामाचे updates दिले. . शलाकाचा आवाज आदित्यला ओळखीचा वाटला म्हणून त्याने तिच्याकडे व्यवस्थित निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. पण ओळख पटेना. कुठेतरी पाहिलंय हिला अशीच जाणीव फक्त होत होती.

बाकी शलाका एकदम स्मार्ट दिसत होती. खांद्यापर्यन्त रुळणारे बरगंडी कलरमध्ये highlight केलेले straight केस, कपाळावर येणाऱ्या fringes, कडक इस्त्रीचा light पीच शर्ट, ब्लॅक कलरचा पेन्सिल स्कर्ट आणि ब्लॅक फॉर्मल जॅकेट, एका हातात स्मार्ट watch तर दुसऱ्या हातात सिल्वरचे नाजूक bracelet , गोरापान रंग, घारे डोळे ह्या बाह्य रुपलक्षणांनी युक्त असून त्याचबरोबर अत्यंत आत्मविश्वासपूर्वक आणि technically करेक्ट बोलणे ह्या गुणांमुळे ती पहिल्याच impression मध्ये भाव खाऊन गेली होती. मीटिंगमधली लोकं तिच्या प्रत्येक मुद्याला convinced होती.नव्हे, तिने चुका काढण्यासाठी काही वावच दिला नव्हता. अपडेट्स देऊन झाल्यानंतर त्या विशिष्ट गोपनीय प्रोजेक्टची माहिती देणं अपेक्षित होतं. त्यासाठी तिने अखिलेश सरांची परवानगी मागितली, त्यांनीही मान तुकवून लगेच proceed कर असं खुणावलं.

शलाकाने 'त्या ' प्रोजेक्टची माहिती देणारे presentation सुरु केले. तिच्या प्रत्येक slide गणिक लोकांची उत्सुकता वाढत होती आणि सर्वांच्या नजरेत कौतुकही दिसत होते. प्रोजेक्टची idea भन्नाटच होती, innovative, तसेच नवीन असल्यामुळे त्यावर research केला गेला होता आणि त्या research पेपरला जागतिक दर्जाचे मानांकन असलेल्या संस्थेकडून नावाजल्या गेलं होतं. ह्या idea generation, incubation साठी पुरेशी मेहनत घेऊन बराचसा वेळ खर्च केला गेला होता. विशेष म्हणजे प्रोजेक्ट प्लांनिंग एवढं भन्नाट होतं की, त्यावर actual code development करणाऱ्या टीमलाही आपण नेमकं काय केलंय ते ह्याबाबत पूर्ण कल्पना नव्हती. Modularised architecture चं उत्तम उदाहरण होतं ह्या प्रोजेक्टचं design! शलाकाने शेवटच्या development phase मध्ये टीममधल्या सगळ्यांनी लिहिलेला code integrate केला होता आणि तिला अपेक्षित असलेलं execution यशस्वी झालं होतं. पण तरीही हा प्रोजेक्ट अगदी सुरुवातीच्या phase मध्ये होता आणि ह्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी तिला कंपनीतल्या सर्वासमोर तो सादर करणे भाग होते. थोडक्यात सांगायचे झाले तर, prototype आणि POC(proof of concept) तिने पूर्ण केली होती.

सर्वांनी presentation संपताच टाळ्यांच्या कडकडाटात शलाकाचे, अखिलेश सरांचे आणि तिच्या development team चे तोंडभरून कौतुक केले. सगळ्यांची प्रतिक्रिया उत्साहाची आणि कौतुकाची असली तरी एका व्यक्तीची प्रतिक्रिया सर्वाना अनपेक्षित अशी होती. ती म्हणजे आदित्यची! पूर्ण presentation ऐकून तो रागाने लाल झाला होता, संताप,आश्चर्याचा धक्का, चीडचीड असे समस्त भाव त्याच्या चेहऱ्यावर एकवटले होते. एव्हाना त्याला शलाकाचीही खरी ओळख पटली होती. फक्त आता त्याला अखिलेश काकांबरोबर एकांतात बोलायचे होते, शलाकाला जाब विचारायचा होता आणि बरंच काय काय करायचं होते जे नेमकं काय ते आता ह्या क्षणी सुचत नव्हतं! मुळात त्याला राग व्यक्त करायचा होता. पण तो मीटिंग संपण्याची वाट पाहत होता. तोंडदेखलं सगळ्यांसमोर त्यानेही कौतुक केलं, अभिनंदन केलं आणि मीटिंगरूमच्या बाहेर पडला. त्याला स्वतःची खूप मोठी फसवणूक झाल्यासारखं वाटत होतं.

त्याला ह्या क्षणी मोठ्याने ओरडावेसे वाटत होते.त्याच विचारांच्या नादात तो वॉशरूममध्ये गेला. त्याने चेहऱ्यावर सपासप थंड पाण्याचे हबकारे मारले व कसेबसे स्वतःला सावरले. रागावर ताबा मिळवत तो तिथून बाहेर पडला आणि मीटिंगरूम मध्ये शिरला. तिथे अखिलेश काका आणि शलाका असे दोघेच होते. बाकी सर्व सदस्य केव्हाच निघून गेले होते.

शलाकाकडे रागाने पाहत आदित्य म्हणाला,
"शलाका की श्रुती? काय म्हणू तुला? नाव काहीही असलं तरी तुझं काम मात्र फसवणुकीचं आहे हे पटलंय आता. कितीही makeover केलास तरी तुला मी चांगलाच ओळखतो. मला,काकांना एवढंच काय संपूर्ण कंपनीला फसवलं आहेस तू!
तू एवढी मोठी fraud असशील असे वाटले नव्हते. माझी प्रोजेक्ट आयडिया चोरलीस तू! मी कधीपासून त्यावर काम करत होतो ह्याची तुला कल्पना नाहीये. खूप मेहनत घेतली होती. सगळी वाया गेली. आणि काका तुम्ही? तुम्हीही फसलात? असे कसे अडकलात ह्या सापळ्यात? का माझी समजण्यात गल्लत होतेय? तुम्हीही हिला सामील आहात का? माझ्या प्रोजेक्ट आयडियाचं सगळं क्रेडिट ही मुलगी कशीकाय घेउ शकते? तुम्ही मुद्दाम ह्या सर्वापासून दूर केलंत ना मला? का केलंत असं? सांगा ना. "
आदित्य पोटतिडकीने जाब विचारत होता. शलाका ही इतर कोणी नसून वेषांतर करून आलेली श्रुती आहे, तिने बहाणे करून त्याचा लॅपटॉप हस्तगत करून प्रोजेक्ट आयडिया ढापली, तिला डेव्हलप केली आणि तिला अखिलेश काकांची साथ आहे हे समजून चुकल्यामुळे त्याचा संताप अनावर झाला होता.

आदित्य अत्यंत चिडलाय हे पाहून श्रुती बावरली होती. कसे react व्हावे हे तिला समजत नव्हते. हा प्रोजेक्ट execution चा प्लॅन तिचा असला तरी काकांचा तिला पूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शन होते. सुरुवात तिने केली असली तरी प्रोजेक्टच्या यशस्वी पूर्णत्वासाठी काकांनी सुद्धा खूप मेहनत घेतली होती. ती जर आता स्पष्टीकरण देण्यासाठी काही बोलली तर आदित्य तिच्यावर चांगलाच उखडला असता आणि प्रकरण आणखी गंभीर झाले असते. त्यामुळे ती शांत राहिली. त्याचं डोकं शांत होऊ देणे गरजेचे होते. मग तिला तिची बाजू मांडता आली असती. त्याच्यापर्यंत खरं काय घडलं ते नेमकेपणे पोचणं आवश्यक होतं आणि त्यासाठी त्याचा संताप घालवणं महत्वाचं होतं. कारण आदित्यसारखा समजूतदार मुलगा एवढ्या तेवढ्या क्षुल्लक गोष्टींवर चिडणारा नव्हता. पण इथे प्रश्न त्याच्या credibility चा होता आणि जिव्हाळ्याचा सुद्धा! म्हणून त्याचं डोकं फिरलं होतं. शिवाय श्रुतीवर त्याच प्रेम होतं आणि तिने कामाच्या संदर्भात केलेली फसवणूक त्याला सहन होण्यासारखी नव्हती.

आदित्यला समजावण्यासाठी अखिलेश काकांनी पाण्याचा पेला उचलला व त्याच्या हाती देत म्हणाले,
"वेद, शांत हो, तुझा गैरसमज होतोय. तू आधी बस बघू इथे. हे घे पाणी पी."
आदित्यने पाण्याचा एक घोट घेतला. पेला टेबलावर ठेवला.
"बरं वाटतंय का आता बेटा? तू शांत हो. माझं सर्व म्हणणं ऐकून घे. मग ठरव तुझ्यासोबत नेमकं काय झालंय fraud , फसवणूक की surprise ते. just relax my champ. "
काकांच्या ह्या शब्दांनी आदित्यला जरा धीर वाटला. आपण उगाच overreact झालो की काय असंही क्षणभर वाटून गेलं. पण सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आज काहीही करून तो मिळवणारच होता. नव्हे, त्यासाठीच आजचा दिवस उजाडला आहे ह्याबद्दल त्याला खात्री होती. आज नाही तर कधीच नाही. काकांनीही आज सर्व सांगायचे असे ठरवले होतेच. ते म्हणाले,
"सर्वात आधी हे लक्षात घे की श्रुती fraud नाहीये. ती माझ्या सूचनांनुसार काम करत होती. तिचं शलाका बनून इथे येणं, तुझी प्रत्यक्षात भेट न घेणं, युनिटला लीड करणं हे सगळं नियोजित होतं. नियोजित नव्हतं ते तिने तुझ्या प्रोजेक्टच्या idea वर काम करणं! त्याबाबतीत सारं काम तिने एकटीने technically स्वतः केलंय."
"पण काका, नियोजित असण्या नसण्याने काय फरक पडतो? मला सर्व नीट सांगाल का? अगदी सुरुवातीपासून? कारण तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये involved आहात म्हणजे काहीतरी विचार करूनच मला दूर ठेवलं असणार. माझा तेवढा विश्वास आहे तुमच्यावर. बरोबर ना? "
आदित्यच्या ह्या वाक्यामुळे तो शांत झालाय आणि आता सगळं सांगायला हरकत नाही हे काकांच्या लक्षात आले. त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली,
"मी तुला सगळं सविस्तर सांगणार होतो. पण तशी संधी मिळाली नाही. ह्या प्रोजेक्टसाठी काम करत असताना आम्ही दोघेही खूप busy होतो. तुला आधी clarity द्यायला हवी होती मान्य आहे. पण माझीच तशी इच्छा नव्हती. तुला surprise द्यायचं होतं."
"oh surprise? really? चांगलाच धक्का दिलाय तुम्ही मला." उपरोधाने आदित्य म्हणाला.
"ऐकून घे बेटा, just don't be judgmental right now, let me finish "
"हो, सॉरी. please go ahead"

आदित्य दुखावलाय आणि त्याला समजावणं आपण समजत होतो तेवढं सोपं नाही हे काकांना एव्हाना कळालं होतं. त्यांनी नजरेनेच श्रुतीला बसायला सांगितलं. स्वतः उभे राहिले. आदित्यजवळ गेले, त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले,
"हो मी सांगतो सगळं पण तू मनाची पाटी कोरी ठेवून ऐक. कोणतेही पूर्वग्रह नकोत. मला मान्य आहे, तुझं जरा confusion झालंय आणि त्यामुळेच गैरसमज झालेत. पण ते सर्व दूर करण्याची जबाबदारी आता माझी आहे. माझ्यावर विश्वास आहे ना?"
काकांचा स्पर्श आदित्यला आश्वासक वाटला. तोही आता खरंच relax झाला. काही प्रश्न आलाच तर शेवटी विचारू असं ठरवून तोही त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार झाला. त्याच्या नेहमीच्या स्वरामध्ये तो "हो काका." असं म्हणाला आणि अखिलेश काकाही relax झाले. आदित्यमोरच्या खुर्चीवर बसून त्यांनी सांगायला सुरुवात केली.
"ह्या प्रोजेक्टची सुरुवात तशी अपघातानेच झाली. श्रुतीचा मला प्रोजेक्ट idea discuss करण्यासाठी call आला. आम्ही त्या विषयावर बोललो. मला ते proposal अत्यंत interesting वाटलं. त्या प्रोजेक्टसाठी श्रुतीला माझी मदत हवी होती. तेव्हा मी बंगलोरला होतो. कामाच्या अत्यंत व्यग्र वेळापत्रकामुळे मला पुण्यात येणं शक्य नव्हतं. सविस्तर चर्चेसाठी मी तिला तिकडेच भेटायला बोलवलं. तिलाही काही कामानिमित्त तिकडे यायचं होतं. त्यामुळे ती तिकडच्या आपल्या ऑफिसला आली. आम्ही सविस्तर मीटिंग केली आणि ही idea discuss केली. ही कुठली प्रोजेक्ट आयडिया आहे माहितीये का वेद? श्रुतीच्या मास्टर्स कोर्स साठी तिने सादर केलेल्या research paper मधली! मागच्याच वर्षी तिचा ह्यासंदर्भात conference ला paper प्रकाशित झाला होता आणि तिला त्याचा विस्तार करण्याची इच्छा होती. हेच काम ती भारतात आल्यापासून करत होती. योगायोग असा की, तुही त्याच संदर्भातल्या algorithm वर काम करत होतास. पण तुला त्याचं in-depth ज्ञान नसल्यामुळे यश मिळत नव्हतं."
"असं नाही काका, knowledge आहे त्याला, फक्त research कमी पडला, बहुतेक कामाच्या ताणामुळे असं झालं. त्याने १०० गोष्टी एकदाच करायला घेतल्या होत्या. ऑफीसचं काम, बाकीचे प्रोजेक्ट्स, त्यांचा सपोर्ट, टीम मॅनॅजमेन्ट वगैरे. त्यामुळे इकडे दुर्लक्ष झालं होतं असं मला दिसलं. "
श्रुती काकांचं बोलणं तोडत म्हणाली. त्याही परिस्थीतीत तिचं आदित्यची बाजू घेणं लक्षात येऊन काकांना तिचं मनोमन कौतुक वाटलं. पण ते म्हणाले, "आता इथून पुढे तू technical details सहित सांग, मी आवश्यक वाटलं तर मध्ये बोलेन "
"तर ज्या संकल्पनेचं आदित्य actual implementation करत होता, त्याचे write-ups मला त्याच्या लॅपटॉपमध्ये सापडले. सॉरी आदित्य, मी आगाऊपणा करून ते फोल्डर उघडायला नको होतं आणि वाचायलाही नको होतं.

पण झालं ते एका अर्थी बरंच झालं. माझ्या लक्षात आलं की आपण एकाच प्रॉब्लेम ला solve करण्यासाठी वेगवेगळ्या पायऱ्यांवर धडपड करतोय. मग मी तुझे write-ups, code आणि माझा algorithm एकत्र करून, काही बदल केले. आता presentation मध्ये जर तू लक्षपूर्वक ऐकलं असशील तर लक्षात आलं असेलच की मी implementation तुझ्या पद्धतीने केलं असलं तरी सुरुवातीच्या steps वेगळ्या आहेत, त्या माझ्या algorithm च्या आहेत. हे सर्व integrate करून त्याची चाचणी करायला मला बराच वेळ आणि अभ्यास करावा लागला. तो मी थोडासा इकडे पुण्यात आणि बाकीचा बंगलोर मध्ये केला. मी कुठेच दुसऱ्या गावाला गेले नव्हते. तुला हे सगळं सांगून तुझी मदत घ्यावी असं कित्येकदा मनात आलं होतं पण तू आधीच ऑफीसच्या कामात व्यस्त होतास. तिकडे दुर्लक्ष झालं असतं तर कंपनीचं नुकसान झालं असतं. client handle करत होतास तू आणि ह्या जाबदारीच्या कामात तू असताना तुला disturb न करता मीच स्वतः जमेल तसं हे पार पाडलं. पण त्याने फक्त basic प्रोग्रॅम आणि prototype develop झाला. ते खरंच इंडस्ट्री आणि commercial उपयोगासाठी कामाचं आहे का? ह्याचे खरंच production environment ला काही उपयोग करता येतील का हे मला माहित नव्हतं. ह्याचा विशाल दृष्टिकोन मिळवण्यासाठी मला एक्स्पर्टचं मार्गदर्शन लागणार होतं म्हणून मी हे सगळं अखिलेश काकांसमोर मांडलं. त्यांनाही ते पटलं. काही domain experts बरोबर चर्चा करून आम्ही खात्री करून घेतली आणि हे prototype पूर्णत्वास नेलं."

"पण तू हे सगळं का केलंस श्रुती? सरळसरळ पद्धतीने जाऊ शकली असतीस ना. मला न सांगता गावाला काय गेलीस, तिकडून परतही आलीस. शलाका बनून इथे काम केलंस. मी तुला तुझ्या कामात अडवलं नसतं. माझ्याशी हे सगळं आधी discuss केलं असतं तर एवढे गैरसमज आणि मनस्ताप झालाच नसता."
आदित्यने बऱ्याच वेळापासून मनात डाचणारा प्रश्न शेवटी श्रुतीला थेट विचारलाच. त्यावर श्रुतीकडे खास असं काही स्पष्टीकरण नव्हतंच. काकांसमोर ती कसं म्हणणार होती की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मागच्या वेळेला तू केलेल्या मदतीची आणि प्रॅन्कची ही परतफेड आहे!
जराशी अडखळत आणि नजर चोरत श्रुती म्हणाली,
"हे सगळं मला तुला अचानक सांगून surprise द्यायचं होतं. तुझी जराशी गंमत करावी म्हणून शलाकाचं पात्र जन्माला घातलं. असंही मला ऑफिसमध्ये श्रुती म्हणून कुणी ओळखत नव्हतंच. मला ओळखणारी सौम्या सुट्टीवर गेली होती. तरीही शंकेला जागा नको म्हणून थोडासा makeover केला आणि join झाले. पण माझ्या अपेक्षेपेक्षा तू जास्तच जागरूक निघालास! वेळोवेळो तुझं ऑफीसमध्ये सगळीकडे लक्ष असायचं. त्यामुळे मला जास्त हालचाल करता आली नाही. तुला युनिटचे अपडेट्सही वेळेवर हवे होते. तू ते तपासतही होतास. मग काकांच्या आणि माझ्या असं लक्षात आलं की तुला आता सत्य सांगितल्याशिवाय पर्याय नाही. त्यात आमच्यावर ह्या प्रोजेक्टच्या कामाचा प्रचंड ताण होता. मग हे नाटक पुढे नेण्यात आणि वठवण्यात काही अर्थ राहिला नव्हता.

म्हणून आजच्या मीटिंग मध्ये सगळं clear केलं. पण त्यातही होऊ नये तो घोळ झालाच. तुझा गैरसमज झाला, तुला मनस्ताप झाला. काका होते म्हणून तू शांत झालास आणि मला आता हे सगळं सांगता आलं. नाहीतर काही खरं नव्हतं. "
श्रुतीच्या ह्या वाक्यावर अखिलेश काका हसून म्हणाले, "हो ना, रागाने नाक लाल झालं होतं ह्याचं! क्षणभर मला वाटलं माझं तरी ऐकतो की नाही. पण आली बुआ परिस्थिती कशीतरी नियंत्रणात!
बरं का वेद, ह्या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली. ह्या प्रोजेक्टचं क्रेडिट तुझंच आहे. documents मेल केली आहेत. ती व्यवस्थित वाचलीस की समजेल. पुढचं काम तुला आणि श्रुतीलाच करायचं आहे.
"श्रुती नाही करू शकत हे काम. ती कुठे आपल्या कंपनीत आहे?"
"पण शलाका तर आहे"
"म्हणजे?"
"वाघाचे पंजे!"
"??"
"अरे शलाकाचे joining documents बघ. खऱ्या नावाने आहेत. श्रुती ऑलरेडी आपल्याला जॉईन झालीये. पण तुझी हरकत नसेल तरच ती इथे काम करेल. नाहीतर नाही करणार. आदित्य सर, तुमच्यासारखंच श्रुतीचं on paper नाव वेगळं आहे. भेटला ना शेरास सव्वाशेर , काय ? "
"माझी काय हरकत असणार. मला तर आनंदच होईल ती असेल तर. म्हणजे कंपनी आणि प्रोजेक्टसाठी चांगलं होईल. After-all she has proved it through her good performance. पण माझी एक अट आहे. ती मान्य असेल तरच तिने इथे काम continue करावं"
"कसली अट ?"
"इतक्यात कंपनी सोडून मला किंवा तुम्हाला न कळवता गायब होणार नाही असं तिच्याकडून लिहून घ्या. नाहीतर तिच्या असण्याची सवय होईल आणि नंतर तिचं नसणं झेपणार नाही."
"काय?"
आपण काय बोलून गेलो हे लक्षात आलं तसं स्वतःचं वाक्य सावरत आदित्य म्हणाला,
"कंपनीचं नुकसान होईल,काका. dependency असते म्हणून म्हणालो मी."
"तुझा dependency चा मुद्दा समजलाय मला. काय गं श्रुती, तुला समजला ना?" मिश्किल हसत काका म्हणाले.
श्रुतीने मानेनेच होकार भरला.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

गैरसमजाचे मळभ दूर होऊन दोघांची मनं स्वच्छ झाली होती. तसेच ह्या दोघांच्या मनात काय आहे ह्याची थोडीफार कल्पना अखिलेश काकांनाही आली होतीच. खूप दिवसानंतर आदित्यला मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. सगळे missing pieces जुळले होते. श्रुतीने थेट नाही पण अप्रत्यक्षपणे त्याला होकार दिला होता. तसेच इतक्या दिवसांपासून सुरु असलेलं नाटक संपलं होतं. त्यामुळे तिलाही प्रसन्न आणि मोकळं वाटत होतं. श्रुती बंगलोरला जायच्या आधी आदित्यच्या घरी राहत होती, त्यानंतर काही दिवस ती दुसऱ्या मैत्रिणीकडे राहिली. पण आता नाटक संपलं असल्यामुळे ती पुन्हा तिथे परत आली.

आता जास्त ताणण्यात अर्थ नाही, आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे दोघांच्याही लक्षात आले होते. पण ह्यावेळी पुढाकार श्रुतीने घेतला. अर्थात, तिनेच तो घेणं अपेक्षित होतं. मिटींगच्या ह्या घटनेनंतर तिने २-३ दिवसानंतर आदित्यला कॉफी date साठी त्याच कॅफे मध्ये जिथे त्याने तिला propose केलं होतं तिथे invite केलं. श्रुती त्या date साठी खूप nervous झाली होती. आदित्य आता काय म्हणेल ह्याबाबीचं तिला जरा टेन्शनच आलं होतं.
एकाच घरात राहत असले तरी ते दोघे ऑफीसनंतर भेटणार होते. छान तयार होऊन जरा लवकरच श्रुती कॅफेमध्ये आदित्यची वाट पाहत होती. त्यानेही जास्त वेळ लावला नाही. दिलेल्या वेळेच्या ५ मिनिट आधीच पोचला. नेमकं काय बोलावं दोघांनाही समजेना. प्रेम ह्या विषयावर दोघे कधी प्रत्यक्षपणे व्यक्त झालेच नव्हते. मनात भावना कितीही तीव्र असली तरी ती बोलून दाखवावी लागते. नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसली ही वेडी जोडी!
कॉफी संपली, जाण्याची वेळ झाली तरी ह्यांचं प्रेमाचं बोलणं काही झालंच नाही.

त्या रात्री दोघांनाही झोप आली नाही. एकमेकांच्या सहवासात धुंद तरीही बेचैन अशी संध्याकाळ त्यांनी घालवली होती.
पहाटे कधीतरी जाग आली तेव्हा फ्रेश होऊन, सुस्नात होऊन श्रुती रोजच्याप्रमाणे व्यायामाला न जाता आज घराजवळच्या गणपती मंदिरात गेली. तिला मानसिक बळ हवं होतं. दैवी योगायोग म्हणा हवं तर पण आदित्यही मंदिरात आला. प्रदक्षिणा घालताना त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. श्रुती छानशी हसून आदित्याजवळ गेली. त्याला म्हणाली जरा वेळ बसुया का इथे पायऱ्यांवर? काही न बोलता आदित्य तिथे तिच्याबरोबर बसला.

"किती प्रसन्न वाटतंय ना इथे, दिवसाची सुरुवात हवी तशी झाली की समाधान----. "
आदित्यने श्रुतीचे बोलणे मध्येच तोडत विचारले.
"तुला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे का श्रु?"
"हम्म, हो. पण कसं आणि काय सांगू तेच कळत नाहीये"
"हवा तेवढा वेळ घे असं मी नाही म्हणणार आता श्रुती. you know what I mean, right? "
"बोलायलाच हवं का?"
"हो, clarity महत्वाची!"
"आदित्य, … "
"बोल श्रु, ऐकतोय…. "
"आदी, ….. "
श्रुतीने देवळाकडे पाहून देवाला हात जोडून नमस्कार केला. एक दीर्घ श्वास घेतला.
"खरं तर मी हे आधीच तुला सांगायला हवं होतं रे, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर!! आधीपासून! तू जेव्हा विचारलं होतंस तेव्हाही मला हो म्हणायचं होतं. तेव्हा काही बोलले नाही ही चूक झाली आणि इतके दिवस वाट पाहावी लागली. मला तू खूप आवडतोस आदित्य. मला आयुष्यभर साथ देशील?? "
ह्या शब्दांचीच कित्येक वर्ष चातकासारखी वाट पाहणाऱ्या आदित्यच्या डोळ्यात आनंदाने पाणी तरळले. त्याने तिचा हात जातात घेतला आणि म्हणाला,
"हो गं राणी! मलाही तूच आवडतेस. मला माझं आयुष्य तुझ्यासोबत आनंदाने जगायचं आहे. प्रत्येक क्षण फुलवायचा आहे.माझं किती प्रेम आहे तुझ्यावर हे तुला जाणवलं असेल एव्हाना. पण तरीही सांगतो, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत.
तूच ती … माझ्या हृदयाची राणी …
तूच ती …. माझी प्रीत पुराणी ..
तूच ती… माझी जीवनसंगिनी …
तूच ती … दिलाची धडकन दिवाणी "
----------------------------------------------------------------------------------------------
[समाप्त]
---------------------------------------------------------------------------------------------
तळटीप:
ही कथा IT, corporate क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पात्रांवर आधारित आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने इंग्रजी व तांत्रिक शब्द वापरले आहेत. पर्यायी मराठी शब्द वापरल्यास भाषा समजावयास बोजड दिसेल असे वाटले.
ही कथा आपल्याला कशी वाटली हे जरुर सांगा (बालीश, चीझी जशी वाटली तशी सांगा). सूचनांचे स्वागत आहे. Happy
----------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------
**किल्ली**
----------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गं किल्ली Happy

आपण एकाच प्रॉब्लेम ला सोळावे करण्यासाठी वेगवेगळ्या पायऱ्यांवर धडपड करतोय. >> इथे सोळावे घातलेस ते नीट कर Happy

पहिला सिझन निव्वळ अप्रतिम होता.... हा सिझन माञ शेवटी थोडा गंडल्यासारखा वाटला... फक्त शेवटच्या टप्प्यात.... हेमावैम...
पण माझ्या बायकोला खुप आवडली पुर्ण कथा.....

सुफळ संपुर्णम
नव्या सिझनच्या प्रतिक्षेत.

पहिला सिझन निव्वळ अप्रतिम होता.... हा सिझन माञ शेवटी थोडा गंडल्यासारखा वाटला... फक्त शेवटच्या टप्प्यात.... हेमावैम...>>>>>अगदी अगदी

… दिलाची धडकन दिवाणी>>>दिवाणी न्यायालय आठवले पटकन Wink

धन्यवाद अमृताक्षर , मनिम्याऊ, विनीता, आदू, सिद्धि' , pravintherider, मन्या Happy
दिवाणी न्यायालय आठवले पटकन >> Lol
इथे सोळावे घातलेस ते नीट कर>> केलं Happy