तू....तूच ती!! S२ भाग १४

Submitted by किल्ली on 20 December, 2019 - 03:37

आधीचे सर्व भाग :
--------------------------------------------------------------------------------
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
भाग ७ : https://www.maayboli.com/node/68459
भाग ८ : https://www.maayboli.com/node/68631
भाग ९: https://www.maayboli.com/node/69117
भाग १०: https://www.maayboli.com/node/69316
भाग ११: https://www.maayboli.com/node/70193
भाग १२: https://www.maayboli.com/node/70194
भाग १३: https://www.maayboli.com/node/72738
-------------------------------------------------------------------------------------

आदित्यला आज उल्हसित वाटत होते. सकाळपासूनच त्याचे मन अगदी उत्साही होते. राहून राहून त्याला असे वाटत होते की एखादी अपूर्ण गोष्ट पूर्णत्वास येणार आहे. एखादा दिवस असतो ना, आपण उगाच फ्रेश असतो, टवटवीत असतो, गुणगुणत असतो, कारण विचारलं तर आपल्यालाही सांगता येत नाही. Intuitions मुळे positive vibes येत असतात. तसच काहीसं आदित्यचं झालं होतं. आज त्याने पांढराशुभ्र फॉर्मल शर्ट आणि डार्क ब्लू जीन्स असा सेमी कॅज्युअल पेहराव केला होता. शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत दुमडून त्याने हलकासा क्लासिक परफ्युम फवारला. गाडीत आवडती गाणी लावून ती ऐकत तो ऑफिसला निघाला होता. रस्त्यावर ट्रॅफिक असूनही तो वैतागला नव्हता. आपल्याच नादात गुणगुणत, शीळ घालत तो ऑफिसला पोचला.

त्याने कामाला सुरुवात केलीच होती, इतक्यात त्याच्या डेस्कवरचा landline खणाणला.
"Hello वेद, काका बोलतोय"
"काका, कसे आहात? खुप दिवसांनी कॉल केलात."
"हो रे, वेळच मिळत नाहीये. एका महत्वाच्या कामात अडकलो होतो."
"कोणतं काम? I mean मी काही मदत करू शकतो का तुम्हाला?"
"नाही बेटा, तू already बरंच काम करतो आहेस. हे कामही आता उरकत आलंय. पण हे काम पूर्ण करण्यासाठी मला अजून थोडा वेळ लागेल. काही लीगलची, official कामं आहेत, मला त्यांना priority देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली मीटिंग थोडीशी पुढे ढकलावी लागत आहे. असंही आता कंपनीची quarterly performance review मीटिंग होईल. तेव्हाच आपलं discussion करून घेऊ. product engineering च्या कामाचे updated डिटेल्स तेव्हा तुला देईन. चालेल ना बाळा? राग मानू नको. "
"हो अगदी चालेल काका, काळजी करू नका. तुम्हाला वेळ मिळाला कि करू आपण मीटिंग. तुमचं भक्कम छत्र असताना मला कसली काळजी. तुम्ही वेळ घेताय तितकंच महत्वाचं काम असेल हे मी समजू शकतो . उलट तुम्ही माझं काम सोपं केलंय सध्या. राग वगैरे तर अजिबातच नाही."
"ok बेटा , बाय, ठेवतो फोन, नंतर बोलू."
"बाय काका"

"काका मला ह्यावेळेस कामापासून दूर ठेवत आहेत आहेत. काय कारण असावे? नाहीतर एरवी सगळ्या विभागांमध्ये काय चालूये ह्याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे असते. रिपोर्ट्सची कॉपी माझ्या मेलवर नेहमी येते. मग आता असं का होतंय? काही काळंबेरं तर नाहीये न? काका नेमकं काय लपवत आहेत माझ्यापासून आणि का? पण ते तर म्हणालेत भेटल्यावर सांगतो म्हणून. मग मी उगाच शंका घेणं चुकीचं आहे. हा तर सरळसरळ अविश्वास दाखवणं झालं. नाही, मी असं करू शकत नाही. बाबा गेल्यानंतर समर्थपणे काकांनी कंपनी सांभाळली, मला सावरलं. मी हे काय विचार करतोय त्यांच्याबद्दल. माझे विचार कुठेही भरकटत आहेत. काका, मला माफ करा. तुमचा उद्देश माझ्यावर आलेला कामाचा ताण कमी करणे हाच असेल हे मी समजून घेऊ शकतो. पण तुम्ही मला असं कामापासून दूर लोटू नका. मला आवडतं काम करायला. काकांशी ह्या विषयावर स्पष्ट बोलायला हवं."

फोन ठेवल्यापासून आदित्यचं विचार करकरून डोकं गरगरायला लागलं होतं. आता काकांशी बोलायचंच असं ठरवलं तेव्हा त्याला बरं वाटलं.
इकडे अखिलेश काकांनी जणू आदित्यच्या मनातील भावना समजून एक फोन लावला.
"hi, शलाका?"
"yes, अखिलेश सर"
"तुझ्या प्रोजेक्टच्या कामाचे अपडेट्स, प्रोग्रेस, ट्रॅकिंग रिपोर्ट्स मला सेंड कर, त्यात आजच्या तारखेपर्यंतचे रेकॉर्डस् असले पाहिजेत . "
"सर, मी ते तुम्हाला वीकली पाठवत असते. त्या प्रोसेसनुसार सोमवारी सगळं पाठवलं आहे. त्यात आजपर्यंतचे रेकॉर्डस् ऍड करून पाठवते. मला त्यासाठी अर्धा तास वेळ द्या. "
"हरकत नाही. take your time. आणि हो, मेलच्या cc मध्ये आदित्य सरांना मार्क करायला विसरू नको."
"पण सर….......... "
"जे सांगितलं ते कर शलाका."
"ठीक आहे सर."
"अजून एक, आपण मागच्या कॉल मध्ये discuss केलेल्या गोष्टी तशाच राहतील ह्याची काळजी घे."
"समजलं सर, मी तशी काळजी घेईन."
"thanks, good day, bye "
"welcome sir, good day"

आदित्यच्या कॉम्प्युटरची नोटिफिकेशन बीप वाजली. शलाकाने तिचे काम केले होते. तिने प्रोजेक्टच्या अपडेट्सची सविस्तर माहिती असणारी मेल पाठवली होती. आदित्यने अधाशासारखी ती संपूर्ण मेल चेन वाचून काढली. तेच रेगुलर अपडेट्स होते. सगळी attached documents सुद्धा त्याने वाचली. ज्या प्रकारे काम होणं अपेक्षित होतं, तसंच, किंबहुना त्यापेक्षा वेगात ते सुरु होतं. पण तरीही त्याला काही प्रश्न पडले होते. technically, काहीतरी missing होतं हे त्याला नक्की वाटत होतं. पण नेमकं काय हे लक्षात येत नव्हतं. ह्याबद्दल अधिक विचार करून मीटिंगमध्ये प्रश्न विचारूया असं त्याने ठरवलं. श्रुती असती तर त्याने तिला technical doubts विचारून हैराण केलं असतं. तिनेही न कंटाळता सगळी उत्तरे दिली असती. एक तर ती असताना असं missing काही वाटतच नसे. तिचं काम कसं चोख असे. नाही म्हटलं तरी नकळत आदित्यच्या मनात शलाका आणि श्रुतीच्या कामाची तुलना केली गेली होती.

अखिलेश काका आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि ह्या बाबींची माहिती शलाकाला आहे असा आदित्यला संशय होता. शलाका अजून समोरासमोर भेटायला का आली नाही ह्याचेही गूढ उकलले नव्हते. मीटिंगमध्ये जरी सगळ्याचा उलगडा होईल असं काका म्हणाले असले तरी त्याबद्दल सुद्धा आदित्यला शंकाच होती. ह्या सगळ्या संशयकल्लोळामुळे आदित्यचे मन पुन्हा अस्वस्थ होऊ लागले होते. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. एकदा संशयाचा किडा डोक्यात वळवळायला लागला कि झालं! त्याचं पूर्णपणे निरसन झाल्याशिवाय मन शांत होत नाही. आदित्य तर technical क्षेत्रातला माणूस! त्यामुळे हा किडा मीटिंग व्यवस्थित पार पडेपर्यंत त्याचा मेंदू पोखरणार होताच.

पुढच्या आठवड्यात होणाऱ्या मीटिंगसाठी आदित्यच्या दृष्टीने तयारी झाली होती. आवश्यक documents तयार करून झाल्यावर त्याने आपले प्रश्नही तयार ठेवले होते. सगळ्या गोष्टींची तर्कशुद्ध उकल झाल्याशिवाय कशालाही हो म्हणून अनुमोदन द्यायचे नाही असे त्याने ठरवले होते. ह्या गोष्टीबाबत श्रुतीबरोबर एकदा discuss करावे असे त्याला वाटले होते. पण क्षणभरच! श्रुतीने कंपनी सोडून काही वर्षे झाली आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या खाजगी व internal बाबी तिला सांगणे योग्य नाही म्हणून त्याने तो विचार टाळला.

बघता बघता मीटिंगचा दिवस उजाडला. आज schedule नुसार शलाका presentation देणार होती. इतर युनिट्स साठी आदित्य presentation देणार होता. ह्या प्रकारच्या मीटिंगमध्ये आतापर्यंत आदित्यशिवाय इतर कोणी presentation दिले नव्हते. त्यामुळे शलाकाच्या presentation विषयी सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती. तसंही मीटिंगला मोजकेच लोक असणार होते. पण त्यांचं तिथं असणं हेच महत्वाचं ठरणार होतं. अनेक महत्वाचे निर्णय अशा प्रकारच्या मीटिंगमध्ये घेतले जात असत.

"तर शलाका, तू तयार आहेस ना? सर्व तयारी झालीये? कुठलीही चूक होता कामा नये. "
"हो अखिलेश सर, मी पूर्णपणे तयार आहे. माझ्या presentation संदर्भात documents ची एक -एक copy संदर्भासाठी प्रत्येकाला देण्यासाठी तयार करून ठेवली आहे. ठरल्याप्रमाणे आधी तुम्ही इतर युनिट्सचं, तसेच आदित्य देणार असलेलं presentation बघून घ्या. मी त्यानंतर मीटिंग join करेन."

मीटिंग सुरु झाली. अपेक्षित अशा सर्व लोकांनी मीटिंगला हजेरी लावली होती. आदित्यला शलाका कुठे दिसत नव्हती. त्याच्या नावाचा पुकारा झाला आणि तो इतर विचार बाजूला सारत औपचारिक तरीही सुहास्यवदनाने presentation देण्यासाठी उठला. आदित्यचं presentation उत्तम झालं. त्याचे काम त्याने व्यवस्थित पार पाडले होतेच त्याशिवाय त्याच्या टीमचाही performance चांगला झाला होता. critical situation असतानाही शांत डोक्याने काम करत त्याने team कडून client ला हवे तसे सॉफ्टवेअर बनवून दिले होते. त्यामुळे त्याच client ने आणखी एक मोठा development प्रोजेक्ट कंपनीला दिला होता. तसेच इतर support ची कामे मिळाली होतीच. अखिलेश सरांनी आधीच declare केलं होतं की तिचं मीटिंगला सर्वात शेवटी येणं योग्य राहील. तिला मीटिंग मध्ये सहभागी करून घेतल्या जाणं हि नक्कीच खास बाब होती.त्यामुळे आता सगळ्यांना शलाकाची आणि तिच्या product engineering युनिटच्या कामाच्या अपडेट्सची उत्सुकता होती.

-----------------------------------------------------------------
(क्रमशः )

----------------------------------------------------------------
**किल्ली**
----------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथेचा अन्तिम भाग फक्त बाकी आहे, तो लिहुन होताच येथे पोस्ट करीन. १५ वा ब्भाग शेवटचा असेल.

कथा लिहुन पुर्ण करावयास खुपच जास्त वेळ लागला हे मान्य आहे.
दीर्घकथा लिहुन पुर्ण झाल्यावरच प्रकाशित करायची असे ठरवले आहे.

बाकि काही सुचना असतील तर जरुर सान्गा. Happy