तू....तूच ती!! S२ भाग १३

Submitted by किल्ली on 18 December, 2019 - 02:41

आधीचे सर्व भाग :
--------------------------------------------------------------------------------
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
भाग ७ : https://www.maayboli.com/node/68459
भाग ८ : https://www.maayboli.com/node/68631
भाग ९: https://www.maayboli.com/node/69117
भाग १०: https://www.maayboli.com/node/69316
भाग ११: https://www.maayboli.com/node/70193
भाग १२: https://www.maayboli.com/node/70194
-------------------------------------------------------------------------------------

आदित्यचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पुन्हा कॉल येऊ लागला. स्क्रीनवर फ्लॅश होणारं नाव पाहून आदित्यचा मूड गुलाबी झाला. त्याने कॉल उचलला आणि म्हणाला,
"Hi श्रुती, कशी आहेस? काय म्हणते तुझी बंगळुरू ट्रिप? एवढं busy schedule असताना तुला कशी काय आठवण आली ह्या पामराची?"
"आज मुद्दामच कॉल केला तुला, वेळ होता, म्हटलं, निवांत गप्पा मारूयात"
"Oh, is it? मला वाटलं तिकडे मजेत असताना मला कशाला कॉल करशील, म्हणून मीही नाही केला"
"मस्करी पुरे हा आदित्य, msg वर बोलतोय ना आपण रोज, तू तर असं म्हणतोयस की मी अज्ञातवासात गेले"
"तुझा काही भरवसा नाही गं."
"मारलास ना टोमणा पुन्हा, एक संधी सोडू नकोस"
"आयुष्यभर हेच ऐकवणार आता तुला मी'
"हे हे, तशी संधी मिळणार नाही तुला"
"म्हणजे?"
ह्यावेळी आदित्यच्या स्वरात झालेला बदल आणि गांभीर्य श्रुतीलाही लगेच जाणवून ती म्हणाली,
"अरे म्हणजे, मला गावी जायचं आहे. खूप दिवस तिकडे गेले नाही ना, वेळही आहे. त्यामुळे उद्या निघेन मी गावी जायला"
"अगं एवढंच ना, मग ह्यात मला बोलण्याची संधी देणार नाही म्हणालीस त्याचा काय संबंध?"
"अरे म्हणजे मला संपर्कात राहता येणार नाही आता"
"आताही तू बाहेर आहेसच, आपण फोन, msgs वर बोलत असतो. मग गावी जाऊन असा काय बदल होणार आहे?" अधिरतेने आदित्यने विचारले.
"अरे आमचं गाव एकदम दुर्गम भागात आहे. तिकडे कोणत्याच कंपनीच्या कार्डला धड range येत नाही. त्यामुळे net, phone वगैरे बंद राहणार."
"ओह असं आहे का? कुठेतरी येत असेल न range?"
"हो टेकडीवरच्या देवळात येते, पण तिकडे फारसं जाणं होत नाही. अधून मधून जाईन तेव्हा बोलेन तुझ्याशी, ok?"
"आता काय, ok च. boar होतंय गं इकडे. त्यात माझं आवडतं कामही मी करणार नाही असं सांगितलंय काकांनी."
"त्यांचा काहीतरी हेतू असेलच. तू सध्या जे आहे ते काम करण्यावर focus कर आणि विश्रांती घेत जा रे जरा. सुनंदा मावशी सांगून थकली पण तू काही ऐकत नाहीस."
"आज ऐकणार आहे तुमचं. मला स्वतःला खूप थकवा जाणवत आहे, त्यामुळे आता मस्त ताणून देणार आहे. तू राहा संपर्कात. गायब होऊ नकोस."
"हो रे, गावी जायच्या आधी एकदा कॉल करेन तुला, आता मात्र आराम कर हा तू. Bye"
"Bye"
कमाल आहे ह्या मुलीची. भरपूर गप्पा मारणार होती आणि एवढ्यात बोलणं संपलं देखील. जाऊ देत चला झोपुया असं स्वतःशी पुटपुटत आदित्यने फोन silent वर टाकला
घरी पोचायला आदित्यला आज असाही उशीर झाला होता. काही खाण्याची इच्छा नव्हतीच. शिवाय श्रुतीबरोबर बोलणं झाल्यामुळे मनही भरलं होतं. आत्यंतिक थकव्यामुळे तो झोपायला गेला.
इकडे श्रुतीने लॅपटॉप उघडला. तिला गावाला जाण्यासाठी तिकीट बुक करायचे होते. तिने तिकीट बुकिंगच्या संकेतस्थळावर जाऊन फ्रॉम मध्ये बंगलोर लिहिले आणि टु मध्ये पुणे !!!!
-----------------------------------------------------------------------

नवीन व्यक्तीने प्रॉडक्ट इंजिनीरिंग युनिटची जबाबदारी उचलण्याच्या आणि आदित्यची तिथून हकालपट्टी होण्याच्या घटनेला आता २ आठवडे झाले होते. बाकी कामकाज व्यवस्थित मार्गी लागल्यामुळे कामाचा अतिरिक्त लोड कमी झाला होता. आदित्यचं वर्क लाइफ बॅलन्स सांभाळलं जात असल्यामुळे तोही आता खुश होता. पण अजूनही एक गोष्ट होती जी त्याच्या मनाला सतत खात होती. ती म्हणजे त्याला कुणी रिप्लेस केलाय हे त्याला नेमकं माहित नव्हतं. तो अजून नवीन जॉईन झालेल्या त्या व्यक्तीला भेटलाच नव्हता. काही ना काही घडत असे आणि तयच भेटणं राहून जात असे. काका सुद्धा अजून काही बोलले नव्हते. प्रॉडक्ट इंजिनीरिंग युनिटचं काम कसं चालूये ह्याचा रिपोर्ट तर सोडाच पण नवीन अपडेट्स सुद्धा त्याच्यापर्यंत पोचत नव्हते. ह्यामागे काही काळंबेरं असावं अशी शंका राहून राहून त्याच्या मनात येत होती. आपल्याला निदान clarity द्यायला हवी होती म्हणून तो चरफडत होता. पण काकांनी गप्प केल्यामुळे त्याचा नाईलाज होता. त्यात श्रुतीबरोबर पण आजकाल मनमोकळ्या गप्पा होत नव्हत्या. ती गावी असल्यामुळे कधीतरीच कॉल करत असे आणि लगेच बोलणे संपवून टाकत असे. तिच्या शिवाय त्याला करमेनासं झालं होतं. अतीव आतुरतेने आदित्य श्रुतीची वाट पाहत होता. अशीच तिची वाट पाहत वीकएंड आदित्यने कसाबसा घालवला.

सोमवारी ऑफिसला पोचल्यानंतर रोजची कामे उरकण्यास आदित्यने सुरुवात केली होती. एकीकडे काम करताना त्याला प्रॉडक्ट इंजिनीरिंग युनिटच्या अपडेट्स विषयी लक्षात आले. त्याने थेट काकांना विचारण्यापेक्षा त्या टीममधल्या कोणालातरी सहज बोलून अपडेट्स विचारावे असे ठरवले. टीमला तो आधीपासून ओळखत असल्यामुळे सहज गप्पा मारत माहिती काढून घेणे तितकेसे कठीण जाणार नव्हते. विचार केल्याप्रमाणे दुपारी जेवणाच्या वेळेला त्याने त्या टीम मधल्या अमितला गाठले. अमितकडून त्याला एवढेच समजले की, सध्या प्रोजेक्टमध्ये खूप काम सुरु आहे. प्रोजेक्ट हाताळणारी नवीन व्यक्ती खूप शिस्तप्रिय, हुशार असून तिने कोड रीडिझाईन केला आहे. पूर्ण प्रॉडक्ट चं architecture लीडलाच माहिती असून प्रत्येकाला module सोपवण्यात आले आहे. त्या module ची पूर्ण जबाबदारी त्या त्या व्यक्तीची असेल आणि कोणत्याही प्रकारे त्यात चुका राहता कामा नयेत. काम कधी पूर्ण करायचं ह्याच वेळापत्रक आखून दिलं होतं आणि ते पाळलं गेलं पाहिजे ह्यावर लीडचा कटाक्ष होता. बाकी अमितकडून जास्त माहिती मिळाली नाही. एकंदरीत आदित्यला एवढेच समजले की प्रॉडक्ट डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने चालू आहे आणि टीमचं बरं चाललंय. प्रोजेक्टची खबरबात घेऊनही त्याबद्दल आदित्य विचार करतच होता.
"काय नाव म्हणाला अमित त्या नवीन लीडचं? हा आठवलं, 'शलाका'.
तिचं प्रोफाइल आदित्य पोर्टलवर पाहत होता.
"कमी अनुभव असूनही कामाचा एवढा सिस्टिमॅटिक एप्रोच आहे म्हणजे कमाल आहे. काकांनी तिला एवढ्या विश्वासाने ह्या कामासाठी नेमलंय म्हणजे कुछ तो बात होगी उसमे, भेटायला हवं शलाका मॅडमला. जरा हम भी तो देखे क्या टॅलेंट है. अरेच्चा, फोटोच नाहीये हिचा पोर्टलवर.समोर आली तरी ओळखता येणार नाही मला."
आदित्य नकळत शलाकाच्या प्रोफाइलवर इंप्रेस झाला होता.तो फोनवर काकांशी शलाकाबद्दल बोलला. काका म्हणाले, 'लवकरच मीटिंग ठेवून तुझी officially ओळख करून देईन. तोपर्यंत तू निश्चिन्त राहा.'
दुसऱ्या दिवशी आदित्यचा ऑफिस मध्ये भरपूर कामं आणि मिटींग्समुळे वेळ भराभर निघून गेला. श्रुतीच्या मेसेजला रिप्लाय द्यायला सुद्धा त्याला वेळ मिळाला नाही. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने तिला कॉल केला.
"hey आदित्य, काय रे, तुला वेळच नाहीये माझ्यासाठी"
"तसं नाही गं, कामात busy झालो होतो. धड जेवलोसुद्धा नाहीये आज. बोल न, काय म्हणतेस? "
"तुझ्यासाठी एक surprise आहे"
"काय? बरं, let me guess, प्रपोझ वगैरे करणार आहेस कि काय मला?"
"well, you never know. surprise आहे ते, सांगणार नाही आताच"
"अगं, तू आधी इकडे ये तरी. बोर झालंय गं."
"हम्म,येईन. काम कसं सुरुये?"
"काम छानच. ती शलाका भारी आहे यार. "
"कोण ?"
"अगं, नवीन जॉईन झालीये कंपनीत. कामाचे reviews छान आहेत सगळे तिचे."
"ओह, हो का, मला पण भेटायचं आहे तिला"
"मीच नाही भेटलो अजून, बघू तू येईपर्यंत माझी तिच्याशी ओळख झाली तर भेटवतो तुलाही"
"बरं, दिसायला कशी आहे रे ती?"
"ओह्ह्ह, जेलस हा. एकदम मस्त आहे असे सगळे म्हणतात. मी भेटलो की सांगेनच तुला."
"म्हणजे तू पाहिलं सुद्धा नाहीस अजून तिला? मग कसले गोडवे गातोय तिचे? तुझा अनुभव सांग जेव्हा भेटशील तेव्हा "
"अगं पण तुला का एवढी उत्सुकता?"
"काही नाही, सहज."
"तुम्हा मुलींचं हे असच असतं. किती चौकशा करता? ऐक न, शलाका दिसायला छान असेल तर काय बोलू तिच्याशी? तिला मी आवडलो तर? ती बिनधास्त आणि बेधडक आहे असं ऐकलंय म्हणून बाकी काही नाही"
"मला काय विचारतो, बघ तूच. चल मला जावं लागेल, नंतर बोलते, बाय"
"अगं श्रुती ऐक, मस्करी करत होतो. तुझ्याशिवाय इतर कोणा मुलीचा विचार करेन का मी?"
पण श्रुतीने आदित्यचं हे वाक्य ऐकलंच नाही. तिने फोन कट केला होता. आदित्य स्वतःशी खुदकन हसला. त्याला वाटले,
"मनातून श्रुती किती प्रेम करते माझ्यावर. लगेच मत्सर वाटायला लागला हिला शलाकाबद्दल. पण हे प्रेम व्यक्त कधी करणार ही मुलगी देव जाणे."
इकडे श्रुतीचा जळफळाट होत होता. "मी काही दिवस भेटले नाही, दूर आहे तर दुसऱ्या मुलीबद्दल विचार करणं सुरु झालं याचं, तेही तिला न भेटताच! खुप झालं. आता मला आदित्यला भेटायलाच हवं असं दिसतंय. ती वेळ आलीये बहुतेक, हम भी पुरी तैयारी के साथ मैदान मे उतरेंगे. " आता पुढे काय करायचे हे श्रुतीने मनाशी पक्के ठरवले होते.

मनात तयार असलेल्या योजनेनुसार तिने पहिली गोष्ट केली असेल ती म्हणजे एक महत्वाचा फोन केला. फोनवर ती म्हणाली,
"ती विशिष्ट वेळ आलीये. आता सावज टिपण्याचा दृष्टीने पुढील हालचाल करण्यासाठी मला प्रत्यक्ष सावजासमोर यावे लागेल. मिशन आदित्य कुठल्याही परिस्थिती यशस्वी करून दाखवीन मी. मागच्या वेळेस संधी हातातून निसटून गेलीये, पण आता असं होऊ देणार नाही. सगळ्या गोष्टींचे हिशोब चुकते होतील. मिस्टर आदित्य, बघाच आता."
"तू म्हणतेस तसच होईल. मी पूर्वतयारी केली आहे. या नाटकात तुझा प्रवेश आधीपासूनच झाला आहे. आता वेळ झालीये ती पडद्यासमोर येण्याची! काळजी करू नको. मी तुला माझ्याकडून शक्य होईल तेवढी संपूर्ण मदत करेन." "किती नौटंकी आहात तुम्ही अखिलेश काका! "
श्रुती खळखळून हसत म्हणाली.
"तुही काही कमी नाहीस. सावज म्हणे. माझा वेद सावज आहे का, हा? लक्षात ठेव मी काका आहे त्याचा."
"थोडीशी गंमत केली हो. मग ठरल्याप्रमाणे उद्या मीटिंगमध्ये भेटूया."
"सगळं काम झालं आहे ना, paperwork, documentation वगैरे."
"हो झालंय. पुढच्या आठवड्यात आपण ही गोष्ट जगजाहीर करू शकतो, असा अंदाज आहे."
"चालेल, तू उद्या सगळे reports घेऊन ये. presentation तयार करून आण, मला demo दे. मग बघू आपण."
"ok, sir."
"अगं, काका म्हणालीस तरी चालेल, rather काकाच म्हण, ठरलंय न आपलं तसं, मग मध्येच हे सर कुठून आणलंस?"
"ते चुकून आलं, सवयीने. ok काका. खुश ?"
"that's like a good girl! भेटू उद्या. bye "
"bye काका "
-----------------------------------------------------------------
(क्रमशः )
ह्या कथेचे भाग प्रकाशित करण्यास झालेल्या अतिविलंबाबद्दल किल्ली समस्त माबोकरांची मनापासुन क्षमा मागते,
मी अति दिलगीर आहे Happy
-------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank you killi , मला वाटलं इतर काही कथांसारखी ही पण अपूर्ण रहाते की काय.. Wink

धन्यवाद आसा, PradnyaW , प्राची, मनिम्याऊ Happy

कथा पुर्ण करावयास घेतली आहे, बघु काय होतंय, कितपत जमतंय Happy