तू....तूच ती!! S२ भाग ४

Submitted by किल्ली on 6 October, 2018 - 16:07

भाग १ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/66880
भाग २ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/67283
-----------------------------------------------------------------------------------------------------------
हा भाग टाकण्यास बराच उशीर झाला. त्याबद्दल दिलगीर आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
पण इकडे विचारमग्न अवस्थेत श्रुतीला कॉफीशॉपमध्ये सोडून गेल्यांनतर तिच्या मनात उठलेल्या वादळाचा त्याला थांगपत्ता नव्हता!
आपण आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचवल्या म्हणून मोकळ्या मनाने आणि ती काय उत्तर देईल ह्या विचारामुळे थोड्याश्या mixed feelings मनात घोळवत आदित्य तेथून गेला खरा, पण श्रुती मात्र गोंधळली होती.
"खरेतर आताच्या आता त्याच्या प्रेमाच्या प्रस्तावाला होकार देण्याची इच्छा होत आहे. पण मग आयुष्यात गाठायच्या ध्येयांचं काय? प्रेम निभावत उच्च शिक्षण, त्या अनुषंगाने येणारा अभ्यास आणि संशोधन जमणार नाही ह्या स्वतःच्या मर्यादा माहित असताना प्रेम स्वीकारणे म्हणजे दोन्ही बाबींवर अन्याय होईल. कारण दोहोंना पुरेसा वेळ देत त्यांना निभावणे आपल्याला जमणार नाही. काहीजण सगळं कसं व्यवस्थित सांभाळतात. मी मात्र एकाच गोष्टीत गुंतून राहते आणि दुसरीकडे दुर्लक्ष करते. असं होऊन कसं चालेल? काहीतरी एक निवडण्याची वेळ आलीये बहुधा. "

priorities स्पष्ट आहेत असं समजणारी श्रुती प्रेमप्रस्तावामुळे गोत्यात आली होती. एक मात्र मान्य करावं लागेल की श्रुती स्वतःच्या स्वभावाच्या मर्यादा आणि भावनिक गुंतवणूक जाणत होती. त्यामुळे विचारांचा खोटेपणा तिच्यात नव्हता. एकवेळ त्रास झाला तरी चालेल पण सतत भावनिक द्विधा मनस्थितीत राहणे हे तिला करायचं नव्हतं. त्याकडे जसा तिचा कल ध्येयाकडे झुकू लागला तसा काहीतरी एक निवडायचं ह्या निर्णयाप्रत ती आली. अर्थातच भावना आणि हृदयाला समज देऊन तिने आदित्यवरचे प्रेम हे गोड गुपित मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करायचं ठरवलं. पण हे तिला नक्कीच कठीण जाणार होतं. आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेम जे तिच्याकडे स्वतःहून चालत आलं होतं , ते नाकारणं म्हणजे मोठा निर्णय होता. पण ही रिस्क घ्यायची तिने ठरवलं. कारण काहीही झालं तरी उच्च शिक्षण आणि संशोधन ह्याबाबतीत तिला कुठलीही अडजस्टमेन्ट नको होती. जीवनध्येयासाठी प्रेमाचे आदित्यने पुढे उचललेले पाऊल मागे घ्यावे लागणार होते.
आदित्यला नकार देणे हे मात्र श्रुतीला कधीच शक्य झालं नसतं. त्याने थेट लग्नाचं विचारलं होतं. आपण जर त्याला नकार दिला तर तो कारण विचारेल, आपण त्याला जे काही आहे ते खरं कारण सांगू आणि मग तो convince करेल असं तिला वाटत होतं. ते convince करणं तिला टाळायचं होतं कारण त्याच्या बोलण्यामुळे ती पुन्हा confuse झाली असती आणि हे चक्र अविरत चालू राहिलं असतं.
ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी श्रुतीने वेगळाच पर्याय निवडला. परिस्थिती आहे तशी सोडून पळून जाण्याचा !

श्रुतीने आदित्यचा सहवास आणि संपर्क बंद करण्याचा निर्णय घेतला. एकाच कंपनीत काम करत असताना असे होणे जवळजवळ अशक्य होते. आदित्य कंपनीचा कारभार सांभाळत असल्यामुळे सगळ्यांबरोबर डील करत असे. त्याला टाळायचं असेल तर कंपनी सोडावी लागली असती आणि अशी तडकाफडकी नौकरी का सोडली ह्याबद्दल घरी काय सांगावे ह्या नवीन विवंचनेत श्रुती अडकली.
पण दैवाने तिची ह्या निर्णयात साथ दिली. अमेरिकेला एका नावाजलेल्या आणि मुळात भारतीय अशा कंपनीत तिच्या बाबांची एका मोठ्या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शक ह्या पदासाठी निवड झाली असं कळलं आणि काही दिवसातच श्रुतीने कंपनी सोडली. ती जेमतेम २ महिने नोटीस पिरेड वर होती. तिने ते २ महिने कसेबसे काढले, ती जाणार असल्यामुळे कामही खूप होतं. त्या कामाचा बहाणा होताच. आदित्यला वाटलं की श्रुती वेळ घेत आहे, तिला योग्य वाटेल तेव्हा ती नक्कीच प्रेमप्रस्तावाचं उत्तर देईल. ती अमेरिकेत जात आहे हे काही तिने सांगितलं नव्हतं. वैयक्तिक व कौटुंबिक कारण एवढंच सांगून तिने रिझाईन टाकलं होतं. ह्या विषयावर नंतर निवांत बोलता येईल म्हणून आदित्यनेही गंभीरपणे घेतलं नव्हतं. आपण गृहीत धरतो ना एखाद्याला आयुष्यात , तसं आदित्यने श्रुतीला नंतर विचारता येईल म्हणून गृहीत धरलं आणि मोठी चूक करून बसला. ह्या चुकीचे परिणाम तो विरहरूपाने भोगणारच होता. श्रुती कितीही दाखवत नसली, मनाला समजावत असली तरीही आदित्य तिच्या मनाचा हळवा कोपरा होता. ह्या कोपऱ्याने पूर्ण मन आणि आयुष्य व्यापू नये म्हणून ती दूर जात होती. पण तिला कुठे माहित होते की, असे दूर जाण्याने गोष्टी solve होत नाहीत म्हणून ! उलट जास्त कठीण होऊन बसतं सगळं !
ठरल्याप्रमाणे कुणाला काहीही न सांगता, न कळवता, सगळे नंबर बदलून, सोशल मीडियातुन बाहेर पडून श्रुती अमेरिकेला निघून गेली. तिच्या अशा वागण्याचं घरच्यांना पण आश्चर्य वाटलं. अभ्यासात अडथळा नको म्हणून नाही सांगितलं असं कारण ती घरी आई बाबा आणि दादा वहिनी ला सांगत होती. तिचा लहरी स्वभाव माहित असल्यामुळे कोणीही जास्त चौकशी केली नाही. श्रुती दादाची लाडकी होती. लहानपणापासूनच काहीही अडचण आली की त्याला सांगत असे. दादा दूर गेल्यापासून जरा कमी झालं होतं पण तिचा भावनिक आणि confused स्वभाव दादाला चांगलाच माहित होता. म्हणून तो तिच्यावर लक्ष ठेवत असे. दादाला शंका आली होती, त्याला सारखं असं वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. त्याने एकदा चल तुला शहर दाखवतो म्हणून बाहेर नेले आणि खोदून खोदून काय झालं ते विचारू लागला. येथे मात्र स्वतःला खंबीर समजणारी श्रुती स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने सगळं खरं काय घडलं ते दादाला सांगितलं. दादाला बहिणीने करिअर निवडलं म्हणून तिचा अभिमानही वाटला. पण तिने आदित्यला असं मध्येच सोडून यायला नको होतं असं दादा म्हणत होता.आदित्यबरोबर किमान एकदा बोलून घे असंही तो म्हणत होत. पण श्रुती मात्र ठाम होती. ती म्हणाली आता परत पुण्यात जाईन ते ध्येय पूर्ण करूनच!
----------------------------------------------------------------------------------------------------------------
"अरे बापरे सगळा वेळ विचारातच गेला म्हणायचा, आता काही महिने इथे राहायचं म्हणजे पुण्यात निवासाची व्यवस्था बघायला हवी."
असं स्वतःशीच बोलत श्रुती विचाराच्या गर्तेतून बाहेर आली. स्वतःच्याच मनात डोकावून पाहिल्यामुळे जरा बरं वाटत होतं. पण त्याचवेळी आदित्यची आठवण आल्यामुळे हुरहूर वाटत होती. आता तिचे मन केवळ आदित्यविषयीच्या विचारांनी व्यापले होते.
"तो कुठे असेल, काय करत असेल. कंपनीच काय चालू असेल, त्याला माझी आठवण येत असेल का? त्याच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाले असतील. खूप वाईट वागले मी त्याच्याशी! कंपनीच्या प्रगतीच्या बातम्या कळतात तेवढाच काय तो अपडेट! बाकी मी काहीही माहित करून घेण्याच्या भानगडीत पडले नाही. एवढी कशी निष्ठुर झाले. पण आता वेळ निघून गेलीये कदाचित. इतकी वर्षे झाली, तो मला विसरला असेल. कदाचित त्याच्या प्रेमाला पात्र असणारी आणि त्याच्या भावनांची कदर करणारी दुसरी मुलगी त्याच्या आयुष्यात आली असेल तर ! "
ह्या शक्यतेने श्रुती एकदम दचकली. प्रथमच तिला खूप जास्त वाईट वाटले. पुण्यात आल्याचा उत्साह पार विरून गेला होता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हर्षदा श्रुतीची बालमैत्रीण होती. तिच्याच घरी श्रुती राहायला सध्या आली होती. हर्षदा म्हणजे एकदम उत्साही, बडबडी मुलगी होती. तिच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्यामुळे श्रुतीला खूप बरं वाटलं. दोघी मस्त गावभर भटकून आल्या. वीकडे असल्यामुळे कुठे जास्त गर्दीही नव्हती. हर्षदाने तर खास सुट्टी घेतली होती. बोलता बोलता श्रुतीने हर्षदाला सांगितले की तिला राहण्यासाठी जागा हवी आहे. मग काय! हर्षदाच्या ओळखीत जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी त्या जाऊन आल्या. पण श्रुतीला जागा पसंद पडेना. तिला शांतता हवी होती, शिवाय जेवणाचा प्रश्न होताच. कधीही घर सोडून बाहेर न राहिलेल्या श्रुतीला घरगुती जेवण हवं होतं. शेवटी चार ठिकाणी विचारून ,चर्चा करून दोघींचं असं मत पडलं की श्रुतीने छोटासा फ्लॅट रेंट ने घ्यावा आणि तिथे मनासारखे बस्तान मांडावे.
पण सगळ्याच गोष्टी तुम्ही जशा ठरवता तशा झाल्या असत्या, तर नशिबाला कुणी विचारलंच नसतं ना!
श्रुतीला कुठे माहित होतं की जे अर्धवट प्रश्न आणि गोष्टी तिने सोडल्या होत्या, त्या सर्वांची लवकरच तिला भरपाई करावी लागणार आहे !!
शेवटी ह्या जन्मी केलेल्या कर्माची फळं ह्या जन्मीच भोगावी लागतात, नाही का ?
(क्रमशः )
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

KATHA SURUVATI PASUNCH VACHATIYE..
CHHAN JAHALY BHAG... PAN KHUPCH LAHAN BHAG AHET...
PUDHCHA BHAG LAVAKR YEUDYA...

कथा खूपच मस्त आहे.... पण माझा एक genuine प्रश्न आहे... कथेचे पुढील भाग तुम्हाला अजून सुचलेच नाहीत... की सर्व कथा तयार असूनही फक्त वाचकांना गॅस वर ठेवण्यासाठी तुम्ही भाग उशिरा टाकता ?

पुढचा भाग सुचला आहे , पण लिखाण करणं वेळेअभावी जमत नाहीये. लवकरच type आणि पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन

Nawin bhag kadhi yeil wat pahatey. Diwali chi mejwani milel ase waatle hote aata lawkarach bhaag takala tar Chan watel.

सुंदर ...