अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दुसर्‍या भागात लाइट ही आले
आणि नीलचा उल्लेखही आला >>> वा वा, हे छान झालं.

म्हणजे तिसरा सिझन नको म्हणता का? >>> खरंच नको.

माझं पण hotstar व्हीआयपी आहे पण 66 भागच दिसत आहेत..>>अग्निहोत्र २ चे दिसत आहेत असे म्हणायचे होते.

मी बघितला दुसरा भाग, रिपिट टेलिकास्ट असतो रात्री अडीचला.

किचन एकदम आधुनिक आहे यावेळी. मागे होतं का असं, नाही बहुतेक.

शुभांगी गो़खले आणि इतर जी मी नावं लिहीली आहेत ते सर्व एबीपी माझावर आले होते, मी अगदी शेवटी शेवटी बघितलं, तेव्हा तो आस्तादच्या जागी असलेला जे सांगत होता, त्यावरुन तो आहे या मालिकेत परत आणि बाकीचे मी नावं लिहीलेले सर्व आहेत असा अंदाज. मो जो यांच्याजागी वि जो असतील बहुतेक, किंवा ते भरत अग्निहोत्री असतील. भगवती अग्निहोत्री कोण दाखवणार, ते माहीती नाही.

अन्वय झालेला दुहेरीमध्ये हिरोचा भाऊ होता.

विनिता थँक्स, अंबरीश देशपांडे नावासाठी. तो असतो बऱ्याच सिरीयलमधे पण नाव माहिती नव्हतं.

इथे एवढं वाचून पण लक्षातच नाही राहिलं १० वाजता स्टार प्रवाह लावायचं Sad किती सिरीयल बघणार असंही वाटतं, मी फक्त कलर्स मराठी च बघते, (किती त्रास देणार जिवाला, झी बघायची हिंमत नाही आता Lol पण अग्निहोत्र मनाच्या जवळची सिरीयल ती नाही चुकवायचीये. जशी रूद्र वेगळ्या चॅनेल वर होती तरी नेटाने बघितली तशी बघू हि जमते का? आणि भाग २ तेवढा चांगला होतोय का ते पण बघू

उदय टिकेकर हे सध्या जीझावेपी मध्ये आहेत पण तिथे बहुदा त्यांचा रोल कमी करणार असे वाटते कारण कालच्या एपी मध्ये ते आत्याबाईंच्या नावाने एकेरी हाक मारून हॉस्पिटल मधून हाकलून देतात.तेव्हा घरी आल्यावर ती म्हणते याचा बंदोबस्त करावा लागेल वैगरे. अग्निहोत्र वाटते फुल टाइम करणार आहेत.

मी सध्या जी झा वे बघतेय आणि अग्निहोत्र. मला आनंदी जग हे सारे बघायची असते पण सात वाजताची वेळ विसरते. पहीला रिपिट बघितला होता, आज बघेन पाच वाजता रिपिट कदाचित.

शरद पोंक्षे यांचं काम अगदी अफाट, खूप सुंदर आणि नैसर्गिक अभिनय. इतक्या मोठ्या आजारातून बाहेर येऊन कित्येक वर्षांनी कॅमेरा फेस करून असा अभिनय(खरं तर तो अभिनय वाटतच नाही) म्हणजे कमाल . मी खूप फॅन आहे त्यांची.

अग्निहोत्र 1 मधील वंश वृक्ष --
- फोटो दिसतील आणि डिटेल वाचता येईल अशी ही इमेज कुठे मिळेल?@डीविनीता >>>hotstar वर आठवणी अग्निहोत्र च्या असा पाउण तासाचा Video आहे.. त्यात ही वंशावळ detail समजावली आहे.. अग्निहोत्र चा पहिला भाग पाहिला नसणार्‍यांनी तो video जरूर पहावा... सगळ्या कलाकारांचं अनुभव कथनही आहे त्यात.. छान आहे...

हो राजन भिसेंच पण काम छान झालंय.
Fb वर वेगवेगळ्या समूहांवर खूप कौतुक चालू आहे अग्निहोत्र च. बरेच लोक फॅन होते आधीच्या पार्ट चे ते आता हा पार्ट ही खूप उत्सुकतेने बघता आहेत.

नविन प्रोमोत वाड्याला कुलुप आणि जुन्यातले काहीजण, मी मागे नावं लिहीली ते आणि ही नवीन रश्मी एकत्र दाखवलेत. महादेवकाकांचा रोल संपणार आहेकी काय. मी चॅनेलच्या फेसबुक पेजवर लिहून आले, त्यांचा रोल संपवू नका, जबरदस्त अभिनय बघायला मिळतोय.

काय यार हे सिरीयलवाले, आज शेवटच्या सीनला रडवलं, महादेवकाकांचा रोल संपवतायेत की काय, त्यांना गायब करून नंतर आणणार असतील तर ठीक, नाहीतर Sad .

सॉलिड touching झाला तो सीन, काय डायलॉग्ज होते, शरद पोंक्षे यांनी डोळ्यात पाणी आणलं.

त्यांना वाड्यात tv वगैरे तरी भाच्या पुतण्याने घेऊन द्यायचा होता, वर्षानुवर्षे कशी काढली असतील एकट्याने त्यांनी तिथे भकासपणे.

शरद पोंक्षे यांचा अभिनय खूप छान. कोणी नाशिक ला रहात नाही ठीक आहे पण कोणी बोलत ही नाही खूप दिवस असे का दाखवले आहे. पहिल्या भागात फोन आलेला असतो न वाड्यात. मग आता कसा नाही...

काय माहीती काय ते. एकेका बहीणीने महिन्यातून एकदा तरी चक्कर मारायची भावाला भेटायला.

ते सुहास पळशीकर गायब करतील बहुतेक महादेवकाकांना सप्तमातृका एकत्र आणण्यासाठी.

त्यात ही वंशावळ detail समजावली आहे..>>मोक्षू थँक्स
अक्षराची आई फारच इनसेन्सेटिव्ह पात्र आहे
आणि भाऊ तर निव्वळ स्वार्थी दिसतोय
मी चॅनेलच्या फेसबुक पेजवर लिहून आले,>>अञ्जू फेबुच्या पेजची लिंक इथे द्या ना

पल्लवी पाटील, प्रतीक्षा मुणगेकर असणार आहेत
प्रतीक्षा मुणगेकर - घाडगे अँड सून मधली आत्ताची कियारा

Pages