अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आतापर्यंतचे सगळे भाग बघितले. छान पकड घेतली आहे याही वेळी मालिकेने.
एक गोष्ट सिझन एक पुन्हा बघताना खटकली होती आणि या सिझनमध्ये पण तशीच दाखवली आहे. गेल्या सिझनमध्ये फ्लॅशबॅक मध्ये आप्पा गेल्याच्या दुसर्‍या दिवशी मृणालवर सोन्याचा गणपती घेतल्याचा आळ येतो तेव्हा आणि आताही सगळे अग्नीहोत्र विझले का ते पहायला जातात तेव्हा सगळे बिनधास्त देवघरात जातात! यांना सुतक असलं पाहिजे ना? सुतकात असताना देवपूजा कशी करतात ते काका?

सुतक नसतं, १३ वा दिवस असतो तो. असं अक्षराला सांगत होते. सुतक दहा दिवस असतं ना. अकराव्या दिवशी फिटतंना. बहीणींना तीन दिवस बहुतेक. भाऊ, भावजय यांना दहा दिवस, असं ऐकल्याचं आठवतं.

अरे देवा,म्हणजे इथे पण निगेटिव्ह रोल करणार की काय? >>> इथे सप्तमातृका मधली एक असेल. सात मुली हव्या आहेत ना. सात नायिका असतील.

त्या गोठमधल्या नीलाला नका आणू, माझं डोकं फिरतं तिला बघून. अगदी अभिनयशुन्य आहे ती.

तेरा दिवस असतं माझ्या माहितीप्रमाणे. इतर नातेवाईकांना कमी जास्त असलं तरी घरच्या देवांना पूर्ण सुतक असतंच ना. गेल्या वेळी तर आप्पांच्या मृत्यूच्या दुसर्‍याच दिवशी ती भांडणं होतात.

दाते पंचागात मी लिहीलं आहे तसंच आहे साधारण. विवाहीत बहीणीला दिड दिवस, महादेवकाकांच्या बाबतीत कारण ते स्वतःच्या घरी गेले, बहीणीच्या घरी गेले असते तर तीन दिवस. सुतक दहा दिवस असतं असंच लिहीलंय.

असो फार कॉम्प्लिकेटेड आहे सर्व. दाते पंचांग घरात असल्याने काढून वाचलं.

पण लॉजिकली जिज्ञासा बरोबर आहे प्रश्न पडणं हा, कारण दुसरीकडे ते भारतकाका कसं काय अग्निहोत्र सुरु ठेवतात सुतक असताना. त्यांच्याकडे कडक सोवळंओवळं असतंना, महादेवकाकाच सांगत होते.

महादेवकाका बहुतेक जिवंत असावेत, असं मला वाटतंय. हे सिरीयलमधलं लिहीलंय.

थोडं अवांतर लिहीते, अग्नीहोत्राचं खरोखर माहीती नाही. कदाचित मुलींकडून सुरु ठेवत असावेत पण एखादं देऊळ असेल तर काहीतरी विधी करुन पिढ्या तोडतात म्हणजे वेगळ्या करतात असं ऐकलंय. म्हणजे चुलत चुलत दशातले किंवा सात पिढ्यातले एकत्र मानतात पण काही कारणाने पुजा विधी व्हावा म्हणून असं करतात. त्यामुळे तिथे तीन दिवस सुतक पाळतात. आमच्या सासरी आमचं देऊळ आहे ब्राम्हणदेवाचं (वाड्याच्या विमलेश्वर तिथे आलाय असं मानतात, त्याचे मुळ पुजारी शेजारचे केळकर जे तीन दिवसांतले आमच्याशी आता) तिथे असं केलंय. काही चुलत चुलत त्याचं आणि आमचं तीन दिवसातले सोयर, सुतक. तेव्हा तीन दिवस दुसरे गावातले पुजा करतात.

देवगडजवळ वाड्याला विमलेश्वर देवळाच्या गुरव समाजात पण असं आहे, मला त्याच घराण्यातल्या एकीने सांगितलं तिथे गेले होते तेव्हा.

काहीतरी सोल्युशन अग्नीहोत्रमधेही दाखवायला हवं. बघुया काय दाखवतायेत.

वि जो व्हिलन आहे, त्यानेच गायब केलं बहुतेक महादेवकाकाला.

सतेज यांच्यावर खोटा आळ घेतलाय हे सर्वांना माहिती असतं तरी कोणी त्यांच्या बाजूने उभं रहात नाही, आज त्यांचा एक माजी विद्यार्थी येतो, त्याला सुनावत असते अक्षराची आई.

अपडेट वाचून पण बोअर वाटतंय. ७ नायिका??
अग्निहोत्र १ मध्ये सई आणि वैदेही खूप खूप बोअर करायच्या. आता ७ बायका म्हणजे फारच बोअर वाटतंय.

ती अक्षराची आई आगाऊ कुचकट व्हर्जन ऑफ स्मिता जयकर वाटते.
भांडखोर काकवा असतात तशा दिसतात ह्या बाई.

वि जो व्हिलन आहे, त्यानेच गायब केलं बहुतेक महादेवकाकाला. > वि. जो. म्हणजे?
महदेव्काकांच काय झाल? सिरियल बघायला जमत नाहीये. सहज जमेल त्यांन्नी इथे अपडेट देणार का.

वि जो म्हणजे विद्याधर जोशी म्हणजे भारत अग्नीहोत्री. अक्षराचे काका पण त्यांची वृत्ती वाईट आहे म्हणाली अक्षरा त्यामुळे तिला वाटतंय महादेवकाका जिवंत आहेत. वि जो यांनी ते गेले असं कळवलं सर्वांना, म्हणून सर्व आलेत वाड्यात म्हणजे दोन बहिणी, भावजय, भाचा आलाय.

वि जो म्हणजे विद्याधर जोशी म्हणजे भारत अग्नीहोत्री. अक्षराचे काका पण त्यांची वृत्ती वाईट आहे म्हणाली अक्षरा त्यामुळे तिला वाटतंय महादेवकाका जिवंत आहेत. वि जो यांनी ते गेले असं कळवलं सर्वांना, म्हणून सर्व आलेत वाड्यात म्हणजे दोन बहिणी, भावजय, भाचा आलाय. > थँक्स अन्जू Happy

अंगारा लावल्यावर सतेज कसा काय शांत झाला? अंधश्रद्धेचे प्रमोशन असा मुद्दा उपस्थित होतो जो होनी अनहोनी सिरियल च्या वेळी १९८८मधे उपस्थित झाला होता

सुतक नसतं, १३ वा दिवस असतो तो. >> पण श्राद्ध नंतरच्या एपिसोडमध्ये करताना दाखवलेय आणि पुजा घरात कुलुप तोडण्याआधीच झालीय हे फारच चुकलेय.

अग्नीहोत्राबाबत मला नेटवर फारशी माहिती मिळाली नाही.
कुणी सतत चालणारी अग्निहोत्रे पाहिली आहेत का?
मी सातार्‍यात लहानपणी अनेकदा शंकराचार्य मठाचे पाहिले आहे. आताही ते चालू असते.
शिर्डीत धुनी आहे, तशीच.
नेटवर अग्निहोत्र म्हणजे होम किंवा हवन (जो थोडाकाळ चालतो, अखंड नाही) याचीच फक्त माहिती मिळते.

इथे सप्तमातृका मधली एक असेल. सात मुली हव्या आहेत ना. >> केवळ देवींबद्दलच मर्यादित असू शकते. मुली आणतीलच असे नाही.

तीन नायिका समजल्या आहेत, अजून चार आणतील असं वाटतंय.

बाकीचे कसे काय सह्या करणार पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीवर, एकटी अक्षरा करणार नाही. तरी अक्षरा सांगत होती की काकाची वृत्ती चांगली नाही.

आता इतके सगळे का रडतायेत, भावाला भेटायला तर येत नव्हते कधीच आणि पत्राला उत्तर पण देत नव्हते. नाशिक काही एवढं लांब नाही मुंबई पुण्याहून. अमेरीकेत मुलाकडे जाऊन येतात पण नाशिकला एक दिवस कोणी येत नाही. मुलाकडे जायलाच हवं तो मुद्दा नाही, नील सईला बाळ पण झालंय.

अन्वय आणि अण्णाकाकांचा डाव असेल, अन्वयलापण वाडा विकून कॉम्प्लेक्स करायचा असतो.

नेटवर अग्निहोत्र म्हणजे होम किंवा हवन (जो थोडाकाळ चालतो, अखंड नाही) याचीच फक्त माहिती मिळते. > हो. खूप पुर्वी मी एका कुटुंबात पाहिलं होतं. एक तांब्याचं य्ज्ञकुंड सारखं पात्र अस्तं. गोवर्‍या तूप इ. साधन वापरून ते सकाळ संध्याकाळ पेटवायचं. सकाळचं नक्की आठवत नाहीये; पण संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ असते. ती चुकवायची नाही म्हणून घरात कोणा न कोणाला थांबाव लागे. पण अखंड वगैरे नसे ते.

मी असं ऐकलं होतं काही कुटुंबात अखंड अग्निहोत्र असायचं पूर्वी, आता कुठे असेल तर माहिती नाही. अग्निहोत्री आडनाव पण त्याच्यावरून पडलंय असंही ऐकलेलं.

एवढं सगळं घडतय..अण्णा काका गायब झालाय..धमकी चे फोन येत आहेत..पण तरीही अक्षरा श्रिपाद,किंवा आत्या याना फोन का नाही करत आहे???उद्या च्या भागात तर कळेल की वाडा विकला गेलाय..

बावळट आहे ती अक्षरा.

ती आर्किटेक्टची आई भगवती आहे का. अग्नीहोत्री कुटुंबातली आणि अक्षराची आत्या. तसं असेल तर तिची मुलगी मातृका नंबर दोन असेल.

बावळट आहे ती अक्षरा.>>>>+११
आर्किटेक्ट सुद्धा मातृकांंपैकी एक असेल तर पहायला मज्जा येईल. सद्ध्या तरी अक्षरा पेक्षा तीच आवडतेय.

हो,ती आर्किटेक्ट ची आई भगवती असावी.पण मला तर सध्या ते अण्णा नाईक,शेवंता आणि सुशल्यासारख वाटत आहे......हसणारी बाहुली
पण ती आर्किटेक्ट, तिचा तो बावळट फ्रेंड आणि अक्षरा यांचा ट्रँगल दाखवणार बहुतेक.

परवा अग्निहोत्र पाहायला सुरू केले. रेकॉर्डिंग केले होते त्यामुळे अगदी पहिल्या भागापासून पाहत आहे. पहिले अग्निहोत्र अगदी मनापासून पाहिले होते. परंतु सर्वांचा उत्तम अभिनय आणि चांगले कथानक (मधे जरा भरकटले तरी) एवढे लक्षात आहे बाकीचे तपशील काही आठवत नाहीत. अग्निहोत्र २ सुरू होत आहे म्हटल्यावर पाहणार हे नक्की ठरले होते.
शरद पोंक्षे यांचे काम फारंच आवडले. त्यांचं एकटेपण अगदी अंगावर आले. रश्मी अनपट आवडली (बाकी मराठी कार्यक्रम पाहत नसल्याने हिच्याबद्दल काही माहित नव्हते आणि इथे आवडली.) राजन भिसे आवडले. अक्षराची आई पाहून सुरुवातीला वैताग आला पण नंतर जाणवले की ती व्यक्तीरेखा तशी आहे. एकूण परिस्थितीने गांजलेली. निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे स्वतःचा विचार बाजूला ठेवून येणाऱ्या प्रसंगांना तोंड देत आहे.

तेलगिरी आणि कंपनी काही विशेष आवडली नाही. अगदीच साचेबद्ध अभिनय वाटला.

सेट ठिकठाक वाटला. रेनोव्हेशन केल्याचा उल्लेख असला तरी खूपच जास्त चकचकीत दिसत आहे.

कित्येक गोष्टींचा बारकाईने विचार केला आहे. महादेव काकांच्या डायरीमधील लेखन जुन्या पद्धतीचे वाटते. कित्येक अक्षरांवर अनुस्वार दिसले.

मालिका फार न भरकटता चांगली चालावी आणि काही तरी दर्जेदार पाहिल्याचा आनंद मिळावा.

कोण भगवती?? >>> महादेवकाकाची चुलत बहीण, सतेज आणि भारत म्हणजेच अण्णा अग्निहोत्रीची सख्खी बहीण. पहिल्या सिझनमध्ये ह्या कोणाचाही उल्लेख नव्हता, मलातरी आठवत नाही. आता आहे.

सद्ध्या तरी अक्षरा पेक्षा तीच आवडतेय. >>> मलाही.

अजून पल्लवी पाटीलची एंट्री नाही झाली, ती मला आवडते, सहज अभिनय असतो तिचा. रुंजीची नायिका, झी युवावर कुठली सिरीयल होती, रविंद्र मंकणी आणि सुयश टीळकची त्यात व्हिलन होती, सुयशवर सहज मात करायची अभिनयात.

सिझन १ म्हणजे जूनी अग्निहोत्र सिरीयल पूर्ण बघायची आहे, फक्त ६६ भाग हॉट स्टार वर कसे काय? खुप फ्रस्ट्रेट व्हायला झालं, मला माहीत होतं कि ६६ चं भाग आहेत. पण तरी वाटलं काहीतरी मिरॅकल होईल आणि बघायला मिळेल पूर्ण सिरीयल Sad

कोण भगवती?? >>> महादेवकाकाची चुलत बहीण, सतेज आणि भारत म्हणजेच अण्णा अग्निहोत्रीची सख्खी बहीण. >>> पण मग तिच्या मुलीला अक्षरा कशी ओळखत नाही Uhoh

पण मग तिच्या मुलीला अक्षरा कशी ओळखत नाही Uhoh> हो ना!

ती आर्किटेक्ट, तिचा तो बावळट फ्रेंड आणि अक्षरा यांचा ट्रँगल दाखवणार बहुतेक.>> बावळट फ्रेंड आणि बावळट अक्षरा चांगले जमेल!

आर्किटेक्टची आई भगवती आहे का.>> पण तिला नाशिकचे अग्नहोत्रींंचा उल्लेख आणि वाड्याचे फोटोज पाहून क्लिक कसे झाले नै?

Pages