अग्निहोत्र-१ आणि २

Submitted by मोरपिस on 6 November, 2019 - 03:24

काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अग्निहो त्र एक भाग सीझन कुठे मिळेल बघायला. >>> +१११

मी पहिला भाग बघीतला नाही पण ईकडे त्याचे ईतके फॅन्स बघुन माझी ईच्छा झालीये दुसरा भाग बघायची, पहिला भाग बघीतला नसल्याने काही फरक पडेल का विचार करतीये.

पहिला बघितलेला चांगला.

कदाचित दुसरा भाग सुरु करताना मोठा precap घेतीलही, तसं केलं तर चालेल पहिला नसेल बघितला तर, otherwise बघितलेला चांगला.

Hotstar वर पाहिले काही भाग. त्यातल्या एका भागात एका लहान रोल मध्ये (चहा टपरीवाला) रात्रीस खेल चाले मधला दत्ता दिसला !

चांगल्या गाजलेल्या सीझनचा सीक्वेल बऱ्याचदा गंडतो... अनेक उदाहरणे आहेत.
दरवेळी तशीच भट्टी जुळून येईल असे नाही.
अग्निहोत्र याला सन्माननिय अपवाद ठरो!

त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. >>+१
शरद पोंक्षे यांची कॅन्सरच्या आजरपणातून बाहेर पडल्यानंतरची मुलाखत पाहण्यात आली. किती बदल झालाय त्यांच्यात, आधी त्यांना ओळखलेच नाही. उपचार आणि प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर ते या आजारातून लवकर बाहेर पडले.

शरद पोंक्षे यांची कॅन्सरच्या आजरपणातून बाहेर पडल्यानंतरची मुलाखत पाहण्यात आली. किती बदल झालाय त्यांच्यात, आधी त्यांना ओळखलेच नाही. उपचार आणि प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर ते या आजारातून लवकर बाहेर पडले >>>+१

शरद पोंक्षे यांची कॅन्सरच्या आजरपणातून बाहेर पडल्यानंतरची मुलाखत पाहण्यात आली. किती बदल झालाय त्यांच्यात, आधी त्यांना ओळखलेच नाही. उपचार आणि प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर ते या आजारातून लवकर बाहेर पडले >>+१

मला फार काही होप नाहीयेत. प्रोग्रॅमिंग मध्ये झी कलर्स च्या तुलनेत स्टार प्रवाह खूपच मागे पडलाय.
१० वर्षांपूर्वी असंभव , अग्निहोत्र, मुंबई पुणे मुंबई, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एक डाव धोबिपछाड हा सतीश राजवाडेंचा सुवर्णकाळ होता.
अलीकडे ती सध्या काय करते, मुंबई-पुणे-मुंबई चा अत्यंत बेक्कार तिसरा भाग - हे पाहून त्यांच्याकडून काही अपेक्षाच उरल्या नाहीयेत.
जसं गुंतता हृदय हे ला रिमिक्स करुन जिवलगा बनवलं तसंच अग्निहोत्रचं करतील अशी शक्यता वाटते.

त्यातून अग्निहोत्रची मेन जान त्यातली पहिली , दुसरी पिढी होती- मोहन जोशी, विनय आपटे, रोहिणी गोखले, शरद पोंक्षे, अविनाश नारकर किंवा त्याही आधी डॉ. आगाशे, सुहास जोशी वगैरे. आता मोहन जोशींची नातवंडं वगैरे स्टोरी असेल तर सॉरीच. फार बोअर होईल.

थोडक्यात- MPM-3 नंतर रजवाडे प्रॉड्क्शनवर मी अगदीच फुली मारली आहे.

पूर्वी youtube वर होते सगळे भाग , मग hide झाले. मी दोनदा तरी हि सिरीयल वेड्यासारखी पहिली .
इतका सगळं बेस्ट होतं ना या सिरीयल मध्ये कि बस्स !!
हॉटस्टार वर बघायला सुरुवात केली या वर्षी आणि लक्षात आलं ६६ च भाग आहेत . भयानक रसभंग झाला . Sad

नवीन अग्निहोत्र मध्ये शरद पोंक्षे वगळता पूर्ण नवीन संच आहे. तसेच कथा श्रीरंग गोडबोले यांची आहे आणि दिग्दर्शक भीमराव मुडे (रुद्रम फेम) आहेत. त्यामुळे चांगले काही तरी बघायला मिळेल अशी आशा आहे.

हो मलाही तसंच वाटतंय. फार काही अपेक्षा नको ठेवायला. पहिलं वहिलं जे काही असतं तेच बेस्ट असतं. आणि अग्निहोत्र सारखी क्लास सिरीयल परत परत होत नाही सहसा. पण तरीही अजून काही बेटर बघायला मिळाले तर चांगलंच आहे.

झीने इतक्या वेळा अपेक्षाभंग केलाय. आता स्टार प्रवाहला संधी देईन म्हणते. >>> Lol

फार अपेक्षा ठेऊन मीही नाही बघणार पण भीमराव मुडे डायरेक्टर आहेत हे मला आवडलं आहे, रुद्रम तरी छान केली होती त्यांनी.

आजारपणामुळे शरद पोंक्षे आता वेगळे दिसतात पण अग्नीहोत्र एक च्या वेळी ते होमकुंडात सतत तेवणारे अग्नीहोत्र आणि त्यांचा तेजस्वी चेहेरा, तेजस्वी डोळे हे फार एकमेकांना पूरक वाटायचे, आवडायचा तो सीन बघायला.

Charactorचा स्वभाव किरकिऱ्या, एकटा वाड्यात राहिलेला, पण भाचे पुतणे यांच्याबाबत प्रेमळ आणि शेवटी मुक्ता बर्वेला पण पुतणी मानतो आणि प्रेमळ होतो नाहीतर बाब्बो तिला हाड्तुड खूप करणारा असा काका . त्यामुळे नवीन पर्वात ते प्रेमळ आजोबा वगैरे असतील बहुतेक.

हॉटस्टार वर बघायला सुरुवात केली या वर्षी आणि लक्षात आलं ६६ च भाग आहेत . भयानक रसभंग झाला . >>>>> पुढचे कुठे आहेत ते कळलं तरच हे बघायला सुरवात करेन मग Wink

हॉटस्टार वर बघायला सुरुवात केली या वर्षी आणि लक्षात आलं ६६ च भाग आहेत . भयानक रसभंग झाला . > मी बघायला सुरूवात केल्ये :(. पुढचे भाग याय्ला हवेत लौकर

कोणत्याही मालिकेचा चित्रपटप्रमाणे असा दुसरा भाग मी क्वचितच पाहिलाय. त्यामुळे मी अग्निहोत्र-२ पाहणार आहे.

कोणत्याही मालिकेचा चित्रपटप्रमाणे असा दुसरा भाग मी क्वचितच पाहिलाय. >>>>>>> आभाळमाया ही पहिली मालिका असावी जिचा दुसरा भाग निघाला होता.

https://www.youtube.com/watch?v=ltWW_ONj-og

अरेरे ह्या रड्या रश्मी अनपटला का घेतलं. एकसुरी बोलते कुठलीही भूमिका असो, ती मेन आहे. श्या मी थोडी नाराज झालेय.

दोन डिसेंबरपासून रात्री दहाला आहे.

Pages